Skip to main content

सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी....

कवी संजीव यांची क्षमा मागून
मूळ गीत - सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती

सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी देशाला मिळून लुटाया...
वेड्या बहिणीची रे वेडी माया || धृ ||

माया माहेराची बोफोर्स दलालीची...
'इकडून' घातली भर पाचशे कोटींची...
गिळलेल्या जमिनीची झाली चौकशी तयार आम्ही नाटक कराया...
वेड्या बहिणीची रे वेडी माया || १ ||

येता निवडणूक साडी नेसावी...
आई - भावासाठी मते मागावी...
चमचांचा सागर नाचतो समोर आपली निष्ठा दाखवाया...
विमानातून काही हाती आले नाही, कोकलतो भाऊराया रे...
वेड्या बहिणीची रे वेडी माया || २ ||

- यतिन भट

स्पार्टाकस Wed, 13/02/2019 - 20:50

लिहायला सुरवात केली आहे.
बॉलिवूडमधल्या #metoo वर आपल्या रोहित प्रधानांची कथा.
झाली की पोस्टेनच. बहुतेक मार्च किंवा जास्तीत जास्तं एप्रिल.