Skip to main content

आज.उद्या.रोज.

तुमच्या आमच्या
आजच्या चुकांचे
पातक आपणा
उद्या भोगायचे
रोज बघायचे
भेसूर रुपडे
भकास पृथ्वीचे
वाढत्या कार्बनी
पाऊल ठशांचे
पिचल्या फाटल्या
ओझोन थराचे
गटारगंगांचे
विखारी धुराचे
अवकाळी वृष्टीचे
प्रलयी वणव्यांचे
भेगाळ नापीक
नि:सत्व भूमीचे
मरणपंथाच्या
चिमणचोचींचे
पुस्तकी उरल्या
कांदळवनांचे
पाताळी पोचल्या
भूजल स्रोतांचे

आवाज कसला?
चीत्कार कुणाचे?
अंधार्‍या रात्रीच्या
बेबंद गतीच्या
कर्वतीखालच्या
शेकडो झाडांचे!

सामो Sat, 12/10/2019 - 14:41

आवाज कसला?
चीत्कार कुणाचे?
अंधार्‍या रात्रीच्या
बेबंद गतीच्या
कर्वतीखालच्या
शेकडो झाडांचे!

चित्रमय, ध्वनीमय दर्शन. आवडली.