Skip to main content

लाख चुका असतील केल्या...

निसटले वर्ष मला
पाठमोरेसे दिसले
त्याची बघून हताशा
माझे काळीज द्रवले

म्लान वदनाने त्याने
हलकेच विचारले
जगशील का रे पुन्हा
दिस चार माझ्यातले

विचारात मी पडलो
चार कोणते निवडू
आनंदात गेले ते, की
चुकांनी जे केले कडू

निवडले मग चार
चुका मोठ्या केल्या ज्यात
सुधारेन म्हणताना
गेलो आणखी गर्तेत

नवे वर्ष नव्या चुका
करण्यास नाही बंदी
असे असता कशाला
भूतकाळा द्यावी संधी?

तिरशिंगराव Sun, 03/01/2021 - 15:29

बऱ्याच वर्षांनी, गेले २०२० हे वर्ष माझ्यासाठी खूप चांगले होते.

anant_yaatree Thu, 07/01/2021 - 10:57

tangential प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद.