Skip to main content

चक्र

झुंजूमुंजू आभाळात
किती ओसंडे केशर

सोनसळत्या सकाळी
निळे झळाळे अंबर

तळपत्या माध्यान्हीची
वितळती काचधार

धूसरशा संध्याकाळी
अदृष्टाची हुरहूर

नि:शब्दाच्या चाहुलीने
जागे रात्र काळीशार

प्रहरांच्या रंगी रंगे
बिलोरी हे कालचक्र
चक्रनेमिक्रम त्याचा
अनादि नी निरंतर

तिरशिंगराव Mon, 08/02/2021 - 20:50

कविता शेवटपर्यंत इतक्या उंचीवर जाते की वाचक थक्क होऊ लागतो. पण शेवटच्या 'चक्रनेमिक्रम' या शब्दाने वाचक पुन्हा जमिनीवर येतो. त्या जागी सुयोग्य शब्द वापरायची विनंती.