Skip to main content

अस्फुट

नि:संग उदासीन नभ हे
धरतीला भिडते जेथे
त्या धूसर क्षितिजावरती
अस्फुट काही खुणवीते

मरुभूमीतुनी जडाच्या
चैतन्य जिथे लसलसते
त्या अद्भुत सीमेवरती
अस्फुट काही खुणवीते

शब्दांच्या निबिड अरण्यी
अर्थाचे बंधन नुरते
त्या अपार मुक्तीमध्ये
अस्फुट काही खुणवीते