Skip to main content

ठिपके

शहरदिव्यांचे पिवळट ठिपके
काळ्याकरड्या रस्त्यांवरच्या
धुरात भेसुर
चमचमण्याच्या
थोडे आधी
तिथून निघूया,

पाखरठिपक्यांच्या नक्षीला
भगव्यापिवळ्या मावळतीशी
किलबिलणारा
कंठ फुटेतो
जरा थांबूया
मग बोलूया,

चांदणठिपक्यांची रांगोळी
गारूड पाडून विस्कटण्याच्या
थोडी आधी
चंद्रधगीने
जरा वितळू दे
मग थांबूया.

'न'वी बाजू Tue, 02/03/2021 - 10:27

लय चांगली आहे. नव्हे, उत्तम आहे. मात्र, त्या उत्तम लयीच्या नादात अर्थाकडे/त्यामागील कल्पनेकडे (वाचकाचे) पूर्णपणे दुर्लक्ष होते. (अर्थ/त्यामागील कल्पनासुद्धा खरे तर चांगला/ली आहे, परंतु) त्यानंतर मग दुसऱ्यांदा वाचून (या वेळेस लय बाजूला ठेवून) केवळ अर्थाकडे/कल्पनेकडे लक्ष देऊन प्रयत्नपूर्वक आस्वाद घ्यावा लागतो, त्या प्रयत्नपूर्वकतेत रसाचा पचका होतो. एवढी झिंग आणणारी लय घेऊ नका ना राव!

नाही म्हणजे, मला कवितेतले काहीही कळत नाही, हे आगाऊ कबूल करतो. (ते तसेही जगजाहीर आहे.) परंतु, एक सामान्य वाचक म्हणून जे जाणवले, ते सांगितले.

सामो Tue, 02/03/2021 - 20:54

मस्त!!

चंद्रधगीने
जरा वितळू दे

वाह!!