इश्तियाक़
इश्तियाक़
ये दिल चाहता है
इस कि तक़लिफे
थोड़ी कम हो जाए
रुठे हुए सपने
थोड़े से खिल जाए
कोशिशें तो लाखों
की हैं हमने
के दिल को थोड़ासा
सुकून और मिल जाए
सुनी मंजिल की
राह पर
इस बिखरे दिल को
नया अस्बाब मिल जाए
तुटे हुए हर एक
सपने को
फिर से जीने कि
तमन्ना जाग जाए
-दिप्ती भगत
(२४ एप्रिल,२०२१)
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
शब्दार्थ
इश्तियाक़ : चाह, इच्छा, लालसा
अस्बाब : कारण, वजह
१. आज बऱ्याच दिवसांनी...
१. आज बऱ्याच दिवसांनी...
हो.. म्हटलं की चक्कर मारावी.. बघुया ओळख आहे की नाही.. :)
२. आज काय सकाळीसकाळीच पिसाळलेला ग़ालिब, झालेच तर ते तमाम पिसाळलेले उजवीकडून डावीकडे लिहिणारे चावले काय?
नबा अहो गालिब चावायला पण कुवत लागते.. मला तो चावलेला नाही.. :((
३. बरे, उर्दूच फाडायची होती, तर मग ते 'तुटे हुए' कायकू? 'टूटे हुए' नको काय? (बाकीही शुद्धलेखनाच्या चुका भरपूर आहेत, परंतु त्यांकडे तूर्तास दुर्लक्ष करू.)
हिंदी उर्दू मिश्रित काव्य बालबुद्धी मनाने ओरडले. तसेच मी खरडले..
असं काहीस झालं आहे.. :D
४. एकअक्षरकळलतरशपथ. (साभार: पु.ल.) संपूर्ण कविता डोक्यावरून गेली. (त्यापेक्षा अनंतयात्री किंवा शिवोऽहम् यांच्या कविता बऱ्या! कधी क्वचित्प्रसंगी का होईना, परंतु समजतात. (तेव्हा आम्ही त्यांना माफ करतो.)) कधी सवडीने आख्ख्या कवितेचे संदर्भासहित स्पष्टीकरण छापणार काय?
वेळ मिळाला तर नक्की.. नाही तर नाही..
५. कविता देवनागरीऐवजी नस्तलिक़ लिपीत छापली असती, तर आणखीही दुर्बोध, अगम्य वगैरे करण्यास वाव होता. (इथे किती जणांना मरायला नस्तलिक़ वाचायला येतेय? (मला येत नाही.)) पुढल्या खेपेस सूचनेचा अवश्य विचार व्हावा.
नक्कीच.. गेले काही महिने नज़्म गझल वैगेरे वैगेरे वाचत असल्याचे मनावर झालेले परिणाम आहेत.. पुढच्या वेळी पोस्ट करण्याआधी नक्कीच विचार करेन.. :)
कवितेत एकसंधपणा जाणवला नाही.
कवितेत एकसंधपणा जाणवला नाही. दिल थका हुआ आहे, बिखरा हुआ आहे; सपने एकदा रुठे हुए आहेत, एकदा तुटे हुए आहेत; कधी सुकून हवाय तर कधी अस्बाब - तोही सून्या मंजिलेच्या राहवर असताना. मिक्सिंग मेटाफरप्रमाणे मिक्सिंग इमेजरी किंवा मिक्सिंग गोलपोस्ट्स झालंय.
दणकट दंडस्नायू जैसे
लोखंडाचे वळले नाग
कभिन्न काळ्या मांड्या जैसा
पोलादाचा चिरला साग
या काव्यात उपमा, विशेषणं, रचना, नाद या सगळ्यांची हार्मनी आहे. तशी काहीतरी आणण्याचा प्रयत्न करा.
धन्यवाद..
कवितेत एकसंधपणा जाणवला नाही.
मनापासून धन्यवाद.. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेमुळे माझ्या या गोष्टी ध्यानात आल्या.. यापुढे या सगळ्या बाबींकडे आवर्जून लक्ष देईल मी.
या काव्यात उपमा, विशेषणं, रचना, नाद या सगळ्यांची हार्मनी आहे. तशी काहीतरी आणण्याचा प्रयत्न करा.
नक्कीच.. प्रयत्न करते आहे..:
:-)
...
१. आज बऱ्याच दिवसांनी...
२. आज काय सकाळीसकाळीच पिसाळलेला ग़ालिब, झालेच तर ते तमाम पिसाळलेले उजवीकडून डावीकडे लिहिणारे चावले काय?
३. बरे, उर्दूच फाडायची होती, तर मग ते 'तुटे हुए' कायकू? 'टूटे हुए' नको काय? (बाकीही शुद्धलेखनाच्या चुका भरपूर आहेत, परंतु त्यांकडे तूर्तास दुर्लक्ष करू.)
४. एकअक्षरकळलतरशपथ. (साभार: पु.ल.) संपूर्ण कविता डोक्यावरून गेली. (त्यापेक्षा अनंतयात्री किंवा शिवोऽहम् यांच्या कविता बऱ्या! कधी क्वचित्प्रसंगी का होईना, परंतु समजतात. (तेव्हा आम्ही त्यांना माफ करतो.)) कधी सवडीने आख्ख्या कवितेचे संदर्भासहित स्पष्टीकरण छापणार काय?
५. कविता देवनागरीऐवजी नस्तलिक़ लिपीत छापली असती, तर आणखीही दुर्बोध, अगम्य वगैरे करण्यास वाव होता. (इथे किती जणांना मरायला नस्तलिक़ वाचायला येतेय? (मला येत नाही.)) पुढल्या खेपेस सूचनेचा अवश्य विचार व्हावा.
अच्छा. शुक़्रिया. ख़ुदा हाफ़िज़. वगैरे वगैरे.