Skip to main content

शेजारचे काका इन्स्टावर खऱ्या बायका बघून चाळवले

अंबरनाथ, १८ सप्टेंबर.

शेजारचे काका आपल्या मित्रमंडळात सभ्य म्हणून प्रसिद्ध आहेत. काकांना कधीही, कुणीही परस्त्रीकडे वाकड्याच काय, सरळ नजरेनंही बघताना पकडलेलं नाही. काकांचं वर्तन बघून काका गे असल्याचा संशयही काही तरुण मुलांनी व्यक्त केला होता. काकांसमोर असं सगळं बोलण्याची परवानगी काकांनी त्यांच्या तरुण मित्रांनाही दिलेली आहे. काकांनी पोरांना समजावायचा प्रयत्न केला. "माझं वय पाहा. आमच्या काळी असं परस्त्रियांकडे बघणं अत्यंत असभ्य समजलं जात असे. भलत्या बाईकडे बघितलं तर माझ्या शीलाला धक्का पोहोचणार नाही का", असं म्हणून काकांनी मित्रांकडे टाळी मागितली!

काका गणपती विसर्जनाच्या दिवशी घरी त्यांच्या सर्ववयीन मित्रांना बोलावतात. काकांच्या घरचे लोक गणपती विसर्जनासाठी जाण्याच्या थोडे आधी काकांचे मित्र घरी येतात, आस्तिक मित्र दर्शन घेतात आणि नास्तिक मित्र फक्त प्रसाद खातात आणि मग घरचे परत येईस्तोवर काका मित्रांसोबत गप्पा मारतात. ह्या वर्षीच्या गप्पांमध्ये काकांनी फेसबुकवरच्या इन्स्टा रील्सचा विषय काढला.

सामान्य? अतिसामान्य!

"तुम्ही सगळे तर मला ओळखताच. मी काही कधी पॉर्न बघितलं नाही, किंवा काकोडकर वाचले नाहीत असं नाही. ते काही मला आवडलं नाही. तुमचं ते एमटीव्ही वगैरे तर मला काही समजतच नाही. बांबूवर कपडे लटकवलेले बघून मला मर्तिकाची आठवण व्हायची."

"पण हल्ली फेसबुकनं कमाल केली आहे माझ्या आयुष्यात. आता ती रील्स बघतो, त्यात खऱ्या बायका दिसतात. त्यांचे खरे चेहरे, खरे विभ्रम दिसतात. मला वाटतं की हा झुकरबर्ग आपल्या काळातला इंद्र आहे. मी काही कुणी वसिष्ठ, विश्वामित्र नाही, पण असतो तर या रील्सव‌रच्या अप्सरा बघून माझा तपोभंग नक्की झाला असता. त्या किती खऱ्या दिसतात, आणि त्यांचे चेहरे किती बोलके असतात. मी एकदम साधा माणूस आहे, मला या साध्या गोष्टीच आवडतात. आणि ते फेसबुकला बरोबर समजलं आहे. साध्या लोकांसाठी असलेल्या जागा मला भावतात. माझ्यासारख्या माणसाला एरवी वसिष्ठ-विश्वामित्रांचा तपोभंग कसा झाला हे कधी कळलं नसतं. पण फेसबुकमुळे ते समजलं."

काकांच्या घरच्यांनी गणपतीचं नैष्ठिक विसर्जन केल्यामुळे ते लवकरच घरी आले आणि त्यामुळे काकांना फार बोलता आलं नाही. मात्र आपल्या मनातलं इंगित व्यक्त केल्यामुळे काका अगदी भावनाशील आणि शांत झाल्याचं काकांच्या मित्रांचं म्हणणं पडलं.

प्रकाश घाटपांडे Sat, 18/09/2021 - 12:02

परधन मानावे जैसे वमण,
अगदी बरोबर
परस्त्री मातेसमान जाण
अगदी बरोबर
जर परस्त्री आली चालून...

तर धरावे तिचे दोन्ही..
ऑ ऑ
तर धरावे तिचे दोन्ही..
ऑ ऑ
चरण चरण
हं अगदी बरोबर

अस सावळ्याने काकांना सांगितले आहे

चिमणराव Sat, 18/09/2021 - 17:56

टिंबटिंबाच्या जागी काही वरच्या खिशात लपवलेल्या राण्या, राजे,आणि गुलामांचाही फोटो टाकणार!!!

---------------

सध्या अंबरनाथचे शिवमंदिर आतून दर्शनासाठी पा हण्यास बंद आहे. मग आवारात फिरून ती बाहेरची शिल्पे पाहून त्यांच्या लक्षात आलं की अरेच्चा ही आहेत हे माहितीच नव्हते.