Skip to main content

श्रीमद् भगवद् गीता: यज्ञ आणि कृषी

श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाला श्रीमद् भगवद् गीतेचा उपदेश दिला होता. हा उपदेश फक्त अर्जुनासाठी नव्हे तर सर्वांसाठी होता. श्रीकृष्णाने गीतेत या मृत्यू लोकात कर्म करत कसे जगावे, याचे मार्गदर्शन केले आहे. गीतेत यज्ञ या शब्दाचा व्यापक अर्थ आहे. जगाचा व्यापार सुचार रूपेण सुरु राहण्यासाठी, केलेले कर्म यज्ञ आहे. कृषी कर्महि यज्ञ आहे. यज्ञाने प्रसन्न होऊन भूमाता शेतकर्याला भरपूर अन्न प्रदान करते. काही महिन्यांपूर्वी पंजाबात कैन्सर वाढण्याचे कारण या विषयावर एक लेख वाचला होता. त्यात रासायनिक शेतीहि एक मुख्य कारण दिले होते. पंजाबच्या प्रसिद्ध कैन्सर रेलचे उदाहरणहि दिले होते. भगवद् गीता वाचताना तिसर्या अध्यायातील १२व्या श्लोकाने माझे लक्ष वेधले आणि तो लेख आठवला, श्रीकृष्ण म्हणतात:

इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः ॥
३.१२

यज्ञाने प्रसन्न होऊन देवता तुम्हाला इच्छित भोग प्रदान करतात. पण देवांनी प्रदान केलेल्या भोगांत त्यांच्या हिस्सा न देणे हि चोरी आहे.

मनात प्रश्न येणारच शेतकरी भूमातेला काय परत करू शकतो. ती आपल्या सारखी जेवत नाही, अन्नातला तिचा हिस्सा तिला कसा देता येईल. उत्तर सौपे आहे, अन्नापासून निर्मित मनुष्य आणि जनावरांची विष्ठा खताच्या रूपाने भूमातेला परत करता येते. तसेच शेतीसाठी वापरलेले पाणीही पुन्हा तलाव, अडवा-जिरवा इत्यादी अनेक माध्यमाने तिला परत करता येते. प्रत्येक व्यवहार हा द्विपक्षीय असतो. एक पक्षीय व्यवहार म्हणजे चोरी. आपण पाहतोच आहे, शेतकरी पराली पुन्हा जमिनीला परत करण्याएवजी जाळून टाकतात, कारण शेत पुन्हा लवकर तैयार करायचे असते. अन्न निर्मित शेणखत आणि विष्ठा जमिनीला परत मिळत नाही. अधिक अन्नासाठी शेतकरी विषाक्त रासायनिक खतांचा वापर करतात, पण हि खते धरती माता प्रदत्त अन्न नाही.

देवांचा न्याय कठोर असतो, चोरांना क्षमा नाही. दरवर्षी अप्रिल, मई आणि ऑक्टोबर महिन्यात पंजाब हरियाणा सहित दिल्लीकरांचाहि भयंकर प्रदूषणमुळे दम घुटू लागतो. रासायनिक शेतीमुळे आज पंजाबच्या अधिकांश भागात जमिनीतले पाणी पिण्यालायक राहिलेले नाही. पुढील काही वर्षांत बहुतेक आंघोळीलायकहि राहणार नाही. कुपित धरती विषाक्त अन्न प्रदान करू लागली आहे. दरवर्षी फक्त पंजाबात हजारो लोक कैन्सरग्रस्त होऊन मरतात. विषाक्त अन्न खाऊनहि कोट्यावधी लोक विभिन्न असाध्य रोगांनी ग्रस्त होत आहे. भारतात कैन्सर ने मरणाऱ्यांची संख्या दरवर्षी तीव्र गतीने वाढत आहे. असो. तात्पर्य एवढेच किमान कृषी विशेषज्ञांनी श्रीमद् भगवद् गीता वाचली पाहिजे. कर्म सिद्धांत समजला पाहिजे.

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

2 minutes

माचीवरला बुधा Wed, 22/09/2021 - 23:09

वरील लेख एका दांभिक प्रवृत्तीचे अव्वल उदाहरण असल्यामुळे, (व्यक्तिशः पटाईतकाकांची क्षमा मागून) हे लिहिलेच पाहिजे असे मला वाटते:

बांडगुळांची चलती असलेल्या शहरात आयुष्य काढून, “इंडिया” च्या सत्ताकेंद्राजवळ, राजकारण्यांच्या वळचणीस राहून, बाबूगिरीच्या सर्व सोयीसवलती उपभोगून झाल्यावर, कार्यक्षमतेच्या कोणत्याही निकषांशिवायच, नवनवीन वेतन आयोगांनुसार चक्रवाढ गतीने फुगणारे वेतन - आणि नंतर पेन्शन, तहहयात जवळपास फुकट मिळणारी वैद्यकीय सेवा, इ.इ. मलिदा - करदात्यांच्या (ज्यांत शेतकरी बहुसंख्य!) पैशातून खात-खात, राहिल्या वेळेत समाजामाध्यमांवर शेतकऱ्यांना शेतीचे आणि नैतिकतेचे धडे देणार. अगदी त्यांना चोर म्हणण्यापर्यंत मजल गाठणार, त्यांना देवाकडून शिक्षा मिळावी म्हणून बोटे मोडणार, आणि त्यासाठी दाखला भगवद्गीतेचा देणार! वा!

'न'वी बाजू Thu, 23/09/2021 - 02:11

In reply to by माचीवरला बुधा

(व्यक्तिश: मोदीजींची क्षमा मागून)

मोदी है, तो मुमकिन है... चालायचेच.

विवेक पटाईत Sat, 09/10/2021 - 10:20

In reply to by माचीवरला बुधा

तुमची क्षमा मागून. अति शहाण्या माणसाचा प्रतिसाद कसा असतो त्याचे उत्तम उदाहरण. विषय गीतेत शेती विषयी काय संगितले आहे त्याची माहिती. त्यावर प्रतिसाद देण्यासेवजी तुम्ही सरल माझ्यावर व्यक्तीगत हल्ला केला. बाकी सरकारी बाबू ही सोळा सोळा तास काम करतात बिना ओवर टाइम. (एका मी ज्या विभागात अर्थात गृह मंत्रालय, SPG, प्रधानमंत्री कार्यालय काम करून दाखवा). बाकी मी एकटाच मराठी माणूस होतो ज्यांने जवळपास 18 वर्ष प्रधान मंत्री कार्यालयात कार्य केले. बाकी हे बाबूंचे कार्य आहे ज्यामुळे आज शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे येतात. मोर्थ मध्ये ही आज बाबू 16 तास काम करतात त्यामुळे वेगाने रास्ते बनत आहे. रेल्वे मंत्रालयात तर 24 तास काम सुरू असते. गेल्या महिन्यात मी 13 तासांत आगगाडीने नागपूरला पोहचलो. कारण रेलेवे रूळ मोठ्या प्रमाणात बदलले, सिग्नल व्यवस्था आधुनिक झाली. यामागे बाबूंचीहि तपस्या आहे. बाकी तुम्ही स्वत: रात्री अवेळी येऊन रायसिना पाहडवर बघून खात्री करू शकता.

माचीवरला बुधा Sun, 10/10/2021 - 16:53

In reply to by विवेक पटाईत

१. "विषय गीतेत शेती विषयी काय संगितले आहे त्याची माहिती"

तुम्ही दिलेल्या श्लोकात शेतीबद्दल काहीही सांगितलेले नाही. शेती हा यज्ञ नव्हे, तो एक उपजीविकेचा व्यवसाय आहे. बहुसंख्य शेतकरी गरीब असतात आणि त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते. "जगाचा व्यापार सुचार रूपेण सुरु राहण्यासाठी केलेले कर्म" वगैरे फालतूपणा करण्यास त्यांच्याकडे बिलकुल वेळ नसतो.

यज्ञ ही सत्ताधीश आणि भटभिक्षुक यांनी इतरांच्या जीवावर खेळलेली भातुकली होय. बाकी कृष्ण, अर्जुन, महाभारत, गीता ही सगळी पुराणातली वांगी आहेत.

२. सरकारी बाबू ही सोळा सोळा तास काम करतात बिना ओवर टाइम

सो व्हॉट? उपकार करतात का? खाजगी क्षेत्रातील काही लोकही तसे करतात. आणि हंगामात शेतकरी सुद्धा!

३. (एका मी ज्या विभागात अर्थात गृह मंत्रालय, SPG, प्रधानमंत्री कार्यालय काम करून दाखवा). बाकी मी एकटाच मराठी माणूस होतो ज्यांने जवळपास 18 वर्ष प्रधान मंत्री कार्यालयात कार्य केले

सो व्हॉट?

४. हे बाबूंचे कार्य आहे ज्यामुळे आज शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे येतात

शेतकऱ्यांच्या कार्यामुळे बाबूंच्या खात्यात पैसे येतात. उलट नव्हे!! तुम्ही कुठल्या ग्रहावर राहता हो?

'न'वी बाजू Sun, 10/10/2021 - 18:36

In reply to by माचीवरला बुधा

शेती हा यज्ञ नव्हे

समजा, (लेखक म्हणतात, त्याप्रमाणे) कृषिकर्म हा जर यज्ञ असता, तर मग त्या यज्ञात पेंढा ('पराली'करिता गूगल ट्रान्सलेट 'पेंढा' हा मराठी प्रतिशब्द सुचविते. चूभूद्याघ्या.) टाकण्यात नक्की काय गैर आहे?

यज्ञात गोष्टी जाळायच्याच असतात!

तिरशिंगराव Thu, 23/09/2021 - 06:42

(व्यक्तिश: चारी बाजूंची क्षमा मागून)

या चार बाजूंच्या चौकोनातच आम्ही बंदिस्त रहायचे का ?

चिमणराव Thu, 23/09/2021 - 06:52

होऊन पंजाबात गव्हाचे उत्पादन वाढले हे माहिती आहे. तेवढे प्रयत्न म्हणजे अधिक रासायनिक खते, अधिक रसायने,यंत्रांचा वापर,अधिक उत्पादन देणाऱ्या जाती हे सर्व इतर गहू पिकवणारी राज्येही करू शकत होती किंवा करू शकतीलच. मध्य प्रदेशातील काही भागातील गहू - सिहोर प्रसिद्ध आहे तो त्यांना राखायचा असेल म्हणून तेवढे बदल केले नसतील.
तर दुसरा मुद्दा पंजाब आणि मध्य प्रदेशांची तुलना किती खतं घालतात आणि किती रोग वाढतात ही आकडेवारी एक उदाहरण म्हणून अभ्यासता येईल.
तिसरा मुद्दा की भगवद गीता वाचतात का ग्रंथसाहेब वाचतात आणि या दोन ग्रंथ वाचनश्रवणांमुळेही काही फरक पडतो का?
तर हे बहुपिंडी संशोधन करण्यास वाव आहे.
---
तमिळनाडूतील भाताचं पीक - रासायनिक खतांचा वापर - आणि विष्णू सहस्रनाम ऐकणे - रोगीसंख्या याचेही संशोधन व्हावे.

नितिन थत्ते Thu, 23/09/2021 - 16:26

नव्या कृषी कायद्याला "पंजाबातले शेतकरी" विरोध करीत आहेत. त्यामुळे स्पेसिफिक "पंजाबातील शेतकरी कसे वातावरणाचे आणि पाण्याचे नुकसान करतात" हे नॉन शेतकऱ्यांना सांगणारा लेख लिहिला आहे असे वाटते.

बाकी कर्म करीत रहावे फळाची अपेक्षा करू नये हे तत्त्वज्ञान युगानुयुगे कष्ट करून पिकवलेले धान्य जमीनदार घेऊन जाईल ते सहन करा हे बिंबवण्यासाठी वापरले जात आहेच

'न'वी बाजू Thu, 23/09/2021 - 23:01

मनात प्रश्न येणारच शेतकरी भूमातेला काय परत करू शकतो. ती आपल्या सारखी जेवत नाही, अन्नातला तिचा हिस्सा तिला कसा देता येईल. उत्तर सौपे आहे, अन्नापासून निर्मित मनुष्य आणि जनावरांची विष्ठा खताच्या रूपाने भूमातेला परत करता येते.

मनुष्यदेह मृत्यूनंतर जाळण्याऐवजी थेट (खोक्याबिक्यात न घालता) जमिनीत पुरल्याने 'भूमातेला परत' करण्यात हातभार लागेल काय?

(अवांतर: गीताकाळातले सोडून द्या, परंतु, आजच्या वाढीव लोकसंख्येच्या जमान्यात, आख्खा पंजाब सकाळीसकाळी शेतात बसलेला आहे, हे काय नयनमनोहर दृश्य होईल!)

(आणखी एक शंका: मग तुमचे(च) मोदीजी, ग्रामीण भागांत 'घर घर में शौचालय' मोहीम उघडून बसलेत, ते काय त्यांना खूळ लागले म्हणून की काय? नाही म्हणजे, कशाला पाहिजे 'घर घर में शौचालय'? शेतातच बसवा की सगळ्यांना!)

मार्मिक गोडसे Fri, 24/09/2021 - 00:39

विष्टेचा प्रवास शौचालय, टाकी, गटार आणि नाला असाच झाला पाहिजे, असं मोदींनी नाल्यातील गॅसवर उकळलेला चहा प्यायला तेव्हाच ठरवले.
रोज शेतात बसलं तर मुत्राने जमिनीत क्षार वाढून ती नापीक होणार नाही का?

चिमणराव Fri, 24/09/2021 - 04:37

एकूण ओडिट झालेच पाहिजे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 24/09/2021 - 21:57

... जमिनीला परत करण्याएवजी जाळून टाकतात

अर्र, किंचित जीवशास्त्र-रसायनशास्त्र-भौतिकशास्त्र शिकला असतात तर एवढ्या महान लेखात अशी ढोबळ चूक राहिली नसती!

माचीवरला बुधा Fri, 24/09/2021 - 22:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आह्मांस तुमची काय ती विविध संदिग्ध नावांची शास्त्रे शिकण्याची गरज नाही. ती पाश्चात्यांच्या बुद्धिभेद करण्याच्या षड्यंत्राचा भाग आहेत, आणि तुमच्या गुलामी मानसिकतेची निदर्शक आहेत. खरी शास्त्रे आमच्या पूर्वजांना संपूर्ण माहिती होती. आह्माला तीही येत नाहीत, पण रामदेवबाबाला येतात इतके आम्हाला पुरेसे आहे....

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 25/09/2021 - 22:57

In reply to by माचीवरला बुधा

सांगायची गोष्ट अशी की पीक झाल्यावर राब काढतात, किंवा उरलंसुरलेलं जे काही जाळतात ते सगळं पुन्हा जमिनीतच जातं. कंपोस्ट करणं हेही एक प्रकारचं ज्वलनच असतं; ऑक्सिजनशी संयोग झाला की होतं ते ज्वलन. आग दिसली, धूर निघाला की ते ज्वलन कंपोस्टापेक्षा खूप भरभर होतं. पण एवढी तक्रार करण्याएवढा फरक नाही.

आता ते जळल्यामुळे धूर होतो, त्याचा त्रास होतो; तापमान एकदम खूप वाढतं वगैरे तक्रारी अगदी योग्य आहेत. पण प्राध्यापक डॉक्टर पटाईतांना अशा तक्रारींत किती रस आहे, कोण जाणे!

अनुप ढेरे Sun, 26/09/2021 - 12:56

शेतकरी शेते जाळून आणि तो धूर इतरांना देऊन माणसांवर उपकार करत असतात हे ठाऊक नसावे लेखकाला. असा धूर माणासांच्या शरीरातील जंतूंचा नायनाट करत असतो. आपला अन्नदाता कोणत्याही अपेक्षेशिवाय आपल्याला गॅस चेंबरची सुविधा उपभोगू देतो आणि आपण त्यालाच कॅन्सर दाता म्हणतो? किती कृतघ्न झालोय आपण हे जाणवून एक माणूस म्हणून शरम वाटली.

'न'वी बाजू Sun, 10/10/2021 - 18:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गॅस चेंबर वगैरे नव्या भारतात नसतात!

हा 'नवा भारत' हा 'नया पाकिस्तान'सारखा काही प्रकार आहे काय?

Rajesh188 Mon, 27/09/2021 - 10:48

माणूस काय निसर्गाला देणार काही देवू शकत नाही.निसर्ग चक्र इतके complicated आहे की ते समजणे खूप अवघड आहे
इंडस्ट्री किंवा रासायनिक खत तर आता शंभर एक वर्षापासून आहेत
पण पृथ्वी चे वातावरण अनेक वेळा बदललं आहे तेव्हा मानवी हस्तक्षेप पण नव्हता.
मानवाने काही ही उचापती केल्या तरी पृथ्वी चे काही नुकसान होणार नाही जीव सृष्टी धंद्याला लागेल.
जीवसृष्टी असली काय आणि नसली काय किंचित सा पण फरक पृथ्वी ला पडत नाही.
माणसाला स्व स्वार्थ साठी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी अनुकूल वातावरण गरजेचे आहे.
जे काय करायचे आहे आता करत आहे ते फक्त स्व स्वार्थासाठी करायचे आहे.
भगवान श्रीकृष्ण हे ब्रह्मांड चे स्वामी आहेत त्या मध्ये पृथ्वी चे काय महत्व .

'न'वी बाजू Mon, 27/09/2021 - 12:25

In reply to by Rajesh188

भगवान श्रीकृष्ण हे ब्रह्मांड चे स्वामी आहेत

अरे वा! ISKCONवाले आता ब्रह्मांडभर जाऊन पोहोचले वाटते. प्रगती आहे.

----------

"हॅरी क्रीस्न, हॅरी क्रीस्न, क्रीस्न क्रीस्न हॅरी हॅरी|
हॅरी रॅमऽ, हॅरी रॅमऽ, रॅमऽ रॅमऽ हॅरी हॅरी||"

Rajesh188 Mon, 27/09/2021 - 13:19

In reply to by 'न'वी बाजू

काही अडचण,दुखणं,त्रास वाटत आहे का? Dr कडे जावून उपचार करणे आवशकय आहे अशी लक्षण दिसली की.

Rajesh188 Mon, 27/09/2021 - 14:43

हा प्रश्न विचारला तर कधी कोणत्या काळी कोणत्या तरी संशोधक नी जे सांगितले आहे तेच उत्तर मानव रुपी मेंढर देतील..मानवी हस्तक्षेप मुळे ते प्रमाण बदल आहे हे विसरून जातील.
आता पृथ्वी च्या वातावरणात विविध वायू चे प्रमाण काय आहे हे बुद्धिवादी जे स्वतःला समजतात त्यांनी सांगावे .
कार्बन वाढला आहे हे ध्यानात घेवून
कोणी तरी ट्रॅफिक सिग्नल वर फ्लॅश केलेले आकडे सांगतील.आणि हे विसरतील पृथ्वी चे वातावरण पृथ्वी पासून किती किलोमीटर अंतरपर्यंत पसरलेले आहे.

विवेक पटाईत Sat, 09/10/2021 - 10:26

अंधिकंश प्रतिसाद देण्यार्‍यांना विषय समजला नाही किंवा त्यांनी समजायचा प्रयत्न केला नाही. किंवा....लिहीत नाही. बाकी कर्माचे फळ सर्वांना मिळते. कॅन्सर भारतात तीव्र गतीने वाढत आहे आणि वाढत राहणार. बाकी पंजाबचे (हरियाणा आणि प. उत्तर प्रदेश) जमीन काही वर्षांत नापीक होणार आहेच. अशोक नगर मध्य प्रदेश
जमिनीत पाण्याची पातळी 300 फूट हून जास्त खोल गेली आहे. जमिनीतले पाणी पिण्या लायक राहिले नाही. सर्वांना 20-30 रु (20 लीटर बोत्तल) पिण्यासाठी विकत घ्यावी लागते. (विश्वास नसेल तर अशोकनगरला जाऊन पाहणी करू शकतात).

हिमांशू Sat, 09/10/2021 - 22:39

In reply to by विवेक पटाईत

"बाकी कर्माचे फळ सर्वांना मिळते" असे गीतेत खरेच कुठे आहे का?
म्हणजे काय कि मी पूर्ण गीता कधी वाचायला गेलेलो नाही. पण दुस-या अध्यायात "सांख्य योग" नावाच्या कोलांट्या उड्या वाचून हा सगळा डाव अर्जुनाला confuse करायला रचलेला आहे असे लक्षात आलेच.
शिवाय, स्वतः परिणामांची चिंता करून रणछोड झालेला माणूस दुस-याला फळाचा विचार सोडून युद्ध करायचा उपदेश करतोय म्हणजे आद्य फेकू गिरी.
पण हे अवांतरच होतंय.
वनस्पतींचे खरे अन्न सूर्यप्रकाश आणि CARBONDIOXIDE हे विसरायचे का? ज्या प्रदूषणाचे एवढे दुख्ख करताय तो वायू पिकांच्या भल्यासाठीच ना आहे?
मनुष्यजातीच्या त्यागाचे काहीच कसे नाही तुम्हाला?

'न'वी बाजू Sun, 10/10/2021 - 18:49

In reply to by हिमांशू

"बाकी कर्माचे फळ सर्वांना मिळते" असे गीतेत खरेच कुठे आहे का?

अगदी!

पूर्ण गीता मीदेखील वाचायला गेलेलो नाही, परंतु, (माझ्या अर्धवट ऐकीव माहितीप्रमाणे) गीतेत कृष्णाने 'कर्माच्या फळावर (जर मिळालेच तर - ही माझी पुस्ती.) तुझा अधिकार नाही' एवढेच म्हटले आहे. कर्माचे फळ मिळण्याची ग्यारंटी दिलेली नाही.

(चूभूद्याघ्या.)

माचीवरला बुधा Sun, 10/10/2021 - 17:34

In reply to by विवेक पटाईत

पर्यावरणाची स्थिती बऱ्याच ठिकाणी विदारक झाली आहेच. पण तत्संबंधी सरकारी “खात्या”तील बाबू त्यादरम्यान काय “कार्य” करत होते बरे?

'न'वी बाजू Sun, 10/10/2021 - 18:40

In reply to by माचीवरला बुधा

... (जरी प्रत्यक्षात त्या वेळीसुद्धा हेच बाबूलोक कार्यरत असले, तरीसुद्धा) अशी बोंब ठोकण्याची सुविधा उपलब्ध आहेच.

चालायचेच.

मार्मिक गोडसे Mon, 11/10/2021 - 07:43

In reply to by 'न'वी बाजू

केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांच्या काळात बाबू लोकांचा श्वास गुदमरला होता. ह्याच बाबू लोकांचे मोठमोठ्या उद्योगपतींशी घनिष्ट संबंध असल्याने रमेश ह्यांचे खाते काढून घेतले गेले असे ऐकून आहे. आता देशाला पर्यावरण मंत्री आहे की नाही अशी अवस्था आहे. विकास इतका जोरात चालू आहे की जमीन अपुरी पडू लागल्याने तो समुद्रापर्यंत पोहोचला आहे. CRZ देशाच्या सागरी हद्दीपर्यंत गेला तरी आश्चर्य वाटणार नाही.

Rajesh188 Tue, 12/10/2021 - 09:45

सूर्य प्रकाश मधील अतिनील किरणं कशी धोकादायक आहेत ह्य विषयावर पारायण ज्या देशात हा धोकाच नाही अशा देशात एक दोन वर्ष चालवायची पार्श्व भूमी तयार करायची आणि उपाय म्हणून कोणती तरी क्रीम बाजारात आणायची.
अशा प्रकार चा मार्केटिंग फंडा मीठ मोठ्या कंपन्या सर्रास वापरतात.
जमिनीत पाण्याची पातळी खाली गेली आहे ह्याला उपसा च जबाबदार आहे असा प्रचार करायचा आणि शेतकरी पाण्यापासून वंचित राहून कोणावर अवलंबून राहावं अशी व्यवस्था करायची आणि धरण उद्योगपती पण विकायची.
धंदा सेट.
जमिनी मधील पाण्याची पातळी खाली गेली आहे ह्याला पाण्याचा उपसा किती जबाबदार आहे हे माहीत नाही.
पण पाणी जमिनीत मुरण्यासाठी जी नैसर्गिक व्यवस्था होती ती माणसाने स्वार्थ पायी नष्ट केली आहे हे कारण मात्र स्पष्ट आहे आणि ह्या मध्ये शेतकरी हा घटक नाही.
पाहिले प्रचार करून पर्यावरण किती दूषित झाले आहे किती धोकादायक झाले आहे ह्याचे विदारक चित्र उभे करायचे आणि त्याला शेतकऱ्यांना दोषी ठरवत ठरवत शेती करणे हा मोठा गुन्हाच आहे असे समजून त्याची शिक्षा म्हणून शेत जमिनी वरील त्यांचा हक्क डावलून ती हडप करायची .
हाच ह्यांचा पर्यावरण वाचवण्याचा उपाय असणार.
खरे उपाय कोणालाच नको असतात म्हणून असे कोणाला तरी बळी देवून स्वार्थ साधायचा हे समर्थ लोकांचे धंदे असतात..
पोलिस पण खऱ्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी
(कारण त्यांना पकडणे खूप अवघड असते किंवा संबंध गुंतलेले असतात ) निष्पाप लोकांना पकडुन त्यांच्या वर आरोप लावत असतात.
तोच प्रकार आहे हा.