Skip to main content

"पुण्यातील कोजागिरी"

चंद्र चंद्र जाणा/ असे मोठा मंत्र
काय त्याचे तंत्र / ओळखावे
चंद्र-दर्शनाने / वेड ते वाढते
डोक्यात चढते/ ब्रम्ह-रूप
गच्चीवर जमू / आम्ही ब्रह्ममत्त
सतरंजी फक्त / एक पुरे
पुण्यामाजी जाला / सण तो महान
स्कॉचची तहान / दुधावरी

मनीषा Tue, 26/10/2021 - 11:34

कोजागरी च्या दूधाची तुलना इतर कुठल्याही पेयाशी करणे चूक आहे.

इतर पेये कधीही घेतली जाऊ शकतात.
परंतु आटीव, मसालेदार केशरी दूध ही कोजागिरीची खासियत आहे.

'न'वी बाजू Tue, 26/10/2021 - 17:46

In reply to by मनीषा

लक्ष्मी रोडवरचे जनसेवा दुग्ध मंदिर (गेऽले बिचारे!) ठाऊक नाही तुम्हाला? तेथे एके काळी वाटेल तेव्हा (म्हणजे, अर्थात, दुकानाच्या वेळांत) केशरी मसाला दूध पिण्याची सोय होती.

मी प्यायलेलो आहे तेथे कित्येकदा. ('कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?' - पु. ल.)

मनीषा Thu, 28/10/2021 - 12:43

In reply to by 'न'वी बाजू

म्हणजे? तुम्हाला कोजागिरीला देखिल जनसेवेचे दूध चालायचे?
मग, महाशिवरात्रीला स्वीट होमची साबुदाण्याची खिचडी खात असणार तुम्ही ... नक्कीच.

चितळ्यांचे ३ लि. दूध आणुन ते दिड लि. होई पर्यंत आटवायचे. त्यात घरच्या मिक्सरवर दळलेले काजू, बदाम, पिस्ते इ. मिसळून द्यायचे नंतर त्यात घरचे खास काश्मिरी केशर घालायचे. मग त्यावर (आवडत असल्यास) जायफळ आणि वेलचीची पूड अलगद पसरायची.
हे खरे कोजागिरीचे दूध..

बाकी काय बोलणार, .. तुम्ही तितकेसे पुणेरी आणि भट पण वाटत नाही हं !

तिरशिंगराव Tue, 26/10/2021 - 11:45

गच्चीवर जमू / आम्ही ब्रह्ममत्त१
हे जनरलायझेशन कशाच्या आधारे ?

१ तसं, आम्हाला अगदी मदमत्त म्हटलं तरी चालेल!