Skip to main content

अंतर

तुझ्या माझ्यातलं अबोल अंतर 
प्रेम-रुसव्यापार क्षितिजाकडे जाणारं 
ते न मापता चालत राहण्याची 
रुजवात केली होतीस तू जाताना 

पोक्त शहाणपण वागवताना
खट्याळ आठवणी जागवताना 
गमतीनी खळाळून हसताना 
कधी नकळत डोळे पुसताना 

तुझं जवळ नसणं लपेटून 
आपल्याच कोषात राहताना 
भोवतालच्या जगाची लगबग 
निवांत अलिप्तपणे पाहताना 

अचानक भेटायला येतो समुद्र 
अथांग, तुझ्यापर्यंत नेणारा 
माझ्यासाठी तिथवर यायचा 
शब्द दिला आहेस निरोप घेताना..

तिरशिंगराव Mon, 25/10/2021 - 07:27

कविता आवडली. भावना छान व्यक्त झाल्यात!

shantadurga Tue, 26/10/2021 - 12:30

धन्यवाद तिरशिंगराव आणि संदीपन.