Skip to main content

वात्रटिका : पीएची नौकरी

हलक्याने घ्या. दरबारी नौकरी पाहिजे तेवढी सौपी नसते. एका निष्ठावंत पीएला काय काय करावे लागते त्याची एक छोटीसी झलक

साहेबांच्या आदेश म्हणजे
काळया दगडावरची रेख.
साहेबांना जे जमत नाही
पीएला ते जमवावे लागते.
पीएच्या शब्दकोशात
असंभव हा शब्दच नसतो.

वीज पाण्याची बिले असो
वा! घरचा सगरा किराणा.
साहेबांच्या कुत्र्याचा
रोजचा मोर्निंग वाक.
पीएच्या सरकारी
नोकरीचाच भाग.

साहेबांच्या म्हातारीने
मागितले रक्ताचे दान.
पीएने स्वखुशीने केले अर्पित
माऊलीच्या चरणी अपुले रक्त.

साहेबांच्या लेकीचे
लफडे होते भारी.
परीक्षेला सोबत तिच्या
बॉडीगार्ड पीए गेला.

मॅडम होती एकटी
रात्र पाळीची ड्युटी केली.
बायको सोबत तलाकची
पाळी पीएवर आली.

चिमणराव Sat, 27/11/2021 - 18:38

छाती फाडली तर साहेबच दिसला पाहिजे.

Rajesh188 Sat, 27/11/2021 - 19:01

पण पहिली दक्षणा त्याला च मिळते साहेबाला नंतर.एक साहेब कडून काम होणार नाही पण pa लोक ते काम सहज करतात.

तिरशिंगराव Sat, 27/11/2021 - 19:40

थोडक्यांत, प्रत्येक कामात पीए ला पटाईत असावे लागते.

माचीवरला बुधा Sun, 28/11/2021 - 03:09

साहित्य अकादमीच्या निवड समितीकडे ही श्रेष्ठ कविता पाठवायलाच हवी.

मनीषा Thu, 16/12/2021 - 16:55

महादेवाच्या मंदिरात, प्रथम नंदीला नमस्कार करावा लागतोच.
दानपेटी ओलांडली की, देवाचे दर्शन घडते.
परंपराच आहे ही ... पूर्वापार चालत आलेली.

वात्रटिकेसाठी विषय अगदी चपखल आहे.