Skip to main content

B.1.1.529

मश्गूल मानवा
थेट डिवचून
हताश करून
पुरे मास्कवून
ज्ञानविज्ञानाला
कुंठित करून
जुन्या गृहितांना
निष्प्रभ करून
चाकोर्‍या ,आडाखे
मोडून तोडून
कल्पने पल्याड
पायंडे पाडून
वाटले गेला तो
कायम निघून...

गनिमी काव्याने
माघार घेऊन
कोण हे बोलते?
अस्पष्ट, दुरून,
"पुन्हा मी येईन"
"पुन्हा मी येईन"

तिरशिंगराव Tue, 30/11/2021 - 10:27

'ओ माय गॉड, ओमायक्रॉन, ओ माय क्राऊन', असं सत्ता गमावलेलेही म्हणत असतील.