Skip to main content

एक प्रयोग

काल रात्री बराच वेळ पडून, इन्स्ट्रुनेम्टल म्युझिक (https://www.youtube.com/watch?v=WxDJsMQCSzQ&list=PLo4u5b2-l-fBE7Yg_v5XW…) ऐकलं. रागांमधलं काहीच कळत नाही पण नोट केलेले की 'हंसध्वनी' हा राग आपल्याला फार आवडतो आहे. कदाचित संस्कॄतप्रचुर नावाच्या मोहातच पडले असेन, त्यातही शुभ्र हंस इमॅजिन केल्याने दूधात साखर. ते काहीही असो पण मन खूप शांत झाले. बराच वेळ गेल्यानंतर आपोआप मनात एक विचार आला. जशी पाच इंद्रिये असतात तसे आपले सहावे इंद्रिय असते आपले मन. अर्थात बाह्य सॄष्टीमधून ज्ञान अर्जन करण्याचे मार्ग या इंद्रियांपाशी असतात. त्वचेला स्पर्शाचे, डोळ्यांना दॄष्टीचे, शृतींना ध्वनीचे ज्ञान होते आदि. मग मनाला कोणत्या रुपात ज्ञान मिळते तर इन्ट्युशन.
मनाची एकाग्रता, शक्ती तपासण्याकरता, मी एक प्रयोग काल केला. तो इथे देते आहे. हा मनाचा खेळ असेलही पण माझ्यापुरता तो कन्व्हिन्सिंग आहे. पुरेसा रोचक व उपयोगी आहे.
व्यवहारात संबंध येणारी एक एक व्यक्ती आठवत गेले आणि रेकीमध्ये करता तशीच पण मानसिक उर्जा, प्रार्थनेच्या माध्यमातून त्यांच्याकडे संक्रमित करत गेले. त्या त्या व्यक्तीला मनाने 'फील' करत गेले. मग मला जाणवले मी ही जी उर्जा देऊ पहाते आहे तिचा स्वीकार करण्याची पद्धत प्रत्येक व्यक्तीची भिन्न आहेच परंतु मलाही सब घोडे बारह टक्के करता येत नाहीये. मला हां 'गॉड ब्लेस येरी', 'गॉड ब्लेस मारिया', 'गॉड ब्लेस अ‍ॅलेक्स' असे सरसकट करता येत नाहीये. उदा - अ‍ॅलेक्स्बद्दल विचार करताना मला त्याला आरोग्यविषयक शुभेच्छा द्याव्याश्या वाटतात. कदाचित मला हे माहीत आहे की तो वरचेवर डॉक्टरांकडे जाण्याकरता टाईम ऑफ घेतो. त्यामुळे असेल. काही का असेना पण प्रत्येकाकरता दिल्या गेलेल्या शुभेच्छांचा, वेल विशेस, प्रार्थनेचा आत्मा भिन्न भिन्न आहे. मिकेलाला आणि माईक नंबर १ ला मी सहज ओघवत्या रीतीने माझी प्रार्थना देउ शकते आहे. ते एखाद्या कोर्‍या कॅनव्हाससारखी आहेत याउलट 'मारिया' मी काही शुभेच्छा दिल्या तरी घेत नाही. शी इज स्टिफ. शी हॅज अ माईल्ड व्हेरी माइल्ड रिसेन्ट्मेन्ट. कदाचित परवा मी तिला सर्वांसमोर तिच्या कोडबद्दल टोकायला नको होते. प्रश्न विचारायला नको होता. प्रत्येकच जण आपल्या कामाबद्दल खूप हळवा असतो. असो. येरीला नुकतेच मूल झालेले आहे पण येरीला शुभेच्छा देताना मला मुलाला इन्क्लुड करता येत नाहीये. ते मूल डिस्टन्ट आहे. याउलट त्याच्या पत्नीस सहज शुभेच्छा देता येताहेत.
आणि हा प्रयोग मी झोपेपर्यंत चालू ठेवला व थोड्याच वेळात झोपी गेलेसुद्धा. अजुन एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे अशी प्रार्थना करणे हे ऑफिसच्या किंवा त्रयस्थ/परिचित लोकांबद्दल सहज शक्य झाले. पण पास्ट वॉज लोडेड! भूतकाळातील व्यक्तींकरता सहज माझ्या मनातून उद्गार निघाले नाहीत. तेव्हा मन आरस्पानी न रहाता ढवळले जात होते. हा असा वागला, ती तशी वागली, मला ही व्यक्ती आवडता नाही आदि विचार मनात लाटांसारखे येउ लागले. त्यामुळे मी भूतकाळातील माझ्या प्रियजनांवरती हा प्रयोगच केला नाही. मुलीकरता व नवर्‍याकरता अशा प्रार्थना दिवसातून २० वेळा तरी होतात. नकळत, किंचित कंपल्सिव्हली. त्यामुळे मुलीस व नवर्‍यासही वगळले.

हा प्रयोग माझ्या मनाचे खेळ असतीलही पण एक नक्की या प्रयोगा अंती मला स्वतःबद्दल, माझ्या नातेसंबंधांबद्दल अधिक माहीती मिळाली. हे म्हणजे बाह्य किंवा आंतरजगाचे ज्ञान होणेच नाही का? कदाचित मी सध्या जास्त मिस्टिक व्हिडिओज युट्युबवरती पहात आहे त्याचा हा परिपाक असावा. उदाहरणार्थ एंजल्स, गार्डिअन एंजल्स, इन्टुशन, एंजल नंबर्स वगैरे विषयक व्हिडीओज (https://www.youtube.com/channel/UCVoOM-cCEPbJ1vzlQAFQu1A) सध्या जास्त बघतही असेन. ते काही का असेना, मला हा प्रयोग व्यवस्थित डॉक्युमेन्ट करायचा आहे. ओव्हर अ पिरीअड ऑफ टाइम तो कसा इव्हॉल्व होतो हेसुद्धा जाणुन घ्यायचे आहे.

आपल्या मतांचा सकारात्मक/नकारात्मक आदर आहे. जरुर इनपुट द्यावे.

Node read time
3 minutes

ललित लेखनाचा प्रकार

3 minutes

माचीवरला बुधा Sat, 18/12/2021 - 23:37

तुमच्या emote करण्याच्या क्षमतेचे मला फार कौतुक वाटते. तो प्रांत माझा बिल्कुल नसल्यामुळे तसे ज्यास्तच वाटत असेल कदाचित.

तुमच्या सदिच्छा, प्राप्तकर्त्यांपर्यंत काय मार्गाने पोचत असतील? आणि ते त्या कशा receive करतात हे तुमच्यापर्यंत कसे पोहोचते? हा सर्वच प्रकार तुमच्या मनातच तर होत नाही नां?

नाही, ह्मणजे तो तुमच्या मनातच होत असला तर तो “खरा” नाही, असे मला ह्मणायचे नाहीये, कारण सर्वच गोष्टी शेवटी आपल्या मनातच होत असतात.

पण वरील लेखात तुह्मी तुमचे अनुभव इतके कणीदार पद्धतीने लिहिले आहेत, की आपले काही चुकत तर नाही ना, अशी शंका मला आली!

सामो Sun, 19/12/2021 - 20:42

हा सर्वच प्रकार तुमच्या मनातच तर होत नाही नां?

बहुतेक माझ्या मनातच होत असणार.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

तुमच्या emote करण्याच्या क्षमतेचे मला फार कौतुक वाटते. तो प्रांत माझा बिल्कुल नसल्यामुळे तसे ज्यास्तच वाटत असेल कदाचित.

खूप आभार माचीवरील बुधा.

मनीषा Sun, 19/12/2021 - 14:38

मन:शक्तीच्या प्रयोगांबद्दल पूर्वी वाचले होते थोडेफार.

हा एकप्रकारे मानासिक (मनाचा) व्यायाम म्हणता येईल का?
जाणीवपूर्वक काही विचार आपल्या मनात येऊ द्यायचे. काही त्रासदायक, काही आनंददायी.

(पूर्वी कधीकाळी) योगासन वर्गातल्या बाईंनी जाणीव पूर्वक श्वास घ्यायचे तंत्र देखिल सांगितले होते.
परंतु हे दोन्ही अर्थात स्वत:पुरतेच मर्यादित आहे. दूसऱ्या कुणाशी मानसिक संपर्क साधणे वगैरे गोष्टी माहिती नव्हत्या.

सामो Sun, 19/12/2021 - 20:41

In reply to by मनीषा

इन्ट्युशन वाढविण्याचा एक व्यायाम मी वाचलेला पूर्वी. पत्त्यांच्या कॅटमधील (बहुतेक) कमीत कमी १० पत्ते उलटे ठेवायचे . व उचलण्याआधी मनात विचार करायचा की लाल की काळा. नंतर उचलून पडताळायचे.
बाकी हा व्यायाम मी करते कारण. वाईट = रागाचा अतोनात क्रोधाचा विचार काय हॅवक माजवतो ते मला नीट माहीत आहे. मग त्या अगदी विरुद्ध करुन कदाचित मन शीतलही होउ शकेल का?
दुसऱ्याचे भले चिंतून काहीही वाईट होणार नाही हेही माहीत आहे सो वर्स्ट कम वर्स्ट काहीच होणार नाही.

मनीषा Sat, 25/12/2021 - 08:09

In reply to by सामो

इन्ट्युशन (असे काही असेलच तर) नैसर्गिक असते असा माझा समज होता.

तुमचा प्रतिसाद फार क्न्फ्युजिंग वाटतोय.

नक्की काय करायचे आहे? इन्ट्युशन वाढवायचे आहे? की मन शांत ठेवायचे आहे? की मनाला वळण लावायचे आहे? ... की ऑल इन वन उपाय आहे हा?

सामो Sat, 25/12/2021 - 10:23

In reply to by मनीषा

ज्या कोणी ते पत्त्यांचे उपाय लिहीलेले होते त्यांचे मत होते की इन्ट्युशन कॅन बी डेव्हलप्ड. ते वाढवता येतं, It can be honed
मी ते प्रयोग केलेले नाहीत.
पण वरती मी जे करते ते झोप लागण्यापूर्वी क्वचित करते. त्यामुळे झोप लवकर लागते.

स्वधर्म Wed, 29/12/2021 - 12:15

विपश्यनेच्या कोर्समध्ये 'मेत्ता' (मैत्री) देणे शिकवले जाते, ते जवळजवळ याच प्रकारे केले जाते. फक्त ते करण्याआधी आपले मन शांत असावे म्हणून ध्यान केल्यानंतर हे केले जाते. केल्यावर आपल्याला बरे वाटते, हे महत्वाचे!