Absurdle
anant_yaatree
इंग्लिशचा गंध नाही त्यात आजारी.
त्यामुळे सतत चिडचीड करत असते आजी माझ्या शब्दकोड्यात डोकं खुपसून बसण्यावरून.
मीही थोडा जास्तच नादावलोय म्हणा हल्ली.
दोन मोबाईल वर एकदम कोडं सोडवतो आपण.
पण आॅफिसला जाताना आईनं आजीकडे लक्ष ठेव सांगितलंय म्हणजे आज no escape!
हे काय? आजी सोफ्यावर धाड्कन बसली वाटतं?
COUCH
का खोकतेय आता ही?
COUGH
पाडलाच ग्लास हिनं थरथरत्या हातानं! ही डायरेक्ट बाटलीतून का पीत नै पाणी?
WATER
आता पंखा फुल फास्ट करायचा तर मला हाक मारायची नं? ही इतकी घामेजलीय की काय?
SWEAT
दहा मिनिटं झाली, काहीच आवाज नाही हिचा? आजी, u ok?
DEATH?
वाटलंच! हा attempt बरोबर असणारच!
Node read time
1 minute
रोचक!
*****