Skip to main content

द केरल स्टोरी: परीक्षण व चर्चा

आत्ताच द केरल स्टोरी हा बहुप्रतीक्षित, बहुचर्चित चित्रपट पाहून आलो आणि थेट लिहायला बसलोय. चित्रपट परीक्षण पहिल्यांदाच लिहितोय, ऐसीवरही पहिल्यांदाच लिहितोय; मायबाप ऐसीकर वाचक सांभाळून घेतील ही अपेक्षा.

पॅरामेडिक कॉलेजात शिकण्यासाठी हॉस्टेलच्या एका खोलीत असलेल्या इतर तीन तरुणींसोबत राहायला आलेली शालिनी उन्नीकृष्णन ही चित्रपटाचे मुख्य पात्र आहे. केरळी हिंदू कुटुंबात वाढलेली निरागस शालिनी इसिस दहशतवादाच्या सापळ्यात सापडते आणि मग तिच्या आयुष्याची कशी फरफट होते ही या चित्रपटाची कथा आहे. चित्रपट भारतातील आणि भारताबाहेरील दहशतवादाचे वास्तव बटबटीत स्वरूपात प्रेक्षकांपुढे ठेवतो.

चित्रपटाचे चित्रीकरण अप्रतिम आहे. सुरुवातीचा केरळातील सुंदर हिरवा निसर्ग आणि नंतरच्या अफगाणिस्तानातील रखरखीत करड्या पर्वतरांगा शालिनीच्या जीवनप्रवासाचा मार्ग दाखवतात. अदा शर्मा (शालिनी) आणि सोनिया बालानी (आसिफा बा) यांचा आणि इतर कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट आहे. दोन काळातले फ्लॅशबॅक वापरून कथा सादर करण्याचे तंत्र चांगले जमून आले आहे. वेगवान कथानक प्रेक्षकाला खिळवून ठेवते. एक तरुणी आणि तिचा नवरा यांना त्या तरुणीने लिपस्टिक लावले या कारणामुळे क्रूर शिक्षा देण्यात येते. असे प्रसंग बीभत्स वाटले तरी परिणामकारक आहेत.

धर्मांतरणाचे भीषण रूप आणि त्याचे त्याहूनही भीषण परिणाम सादर करण्याचा सुदिप्तो सेनचा (दिग्दर्शक) प्रयत्न चांगला आहे. पण काही ठिकाणी ते प्रयत्न कमी पडतात. शालिनीला चित्रपटात दहशतवादी सिद्ध करण्यात येते. प्रत्यक्षात ती केवळ दहशतवाद्यांसोबत (स्वतःच्या इच्छेविरुद्ध) राहत असते, ती स्वतः कोणत्याही गुन्ह्यात सामील होत नाही. हा विरोधाभास जाणवण्यासारखा आहे. बलात्काराचे स्पष्ट आणि दीर्घ चित्रीकरण दाखविण्याची गरज नव्हती. काही ठिकाणचे पार्श्वसंगीतही टाळता आले असते.

चित्रपटातून प्रेक्षकांना काही दिशादर्शन मिळावे, मार्ग मिळावा ही अपेक्षा चित्रपट पूर्ण करत नाही. "ज्या देवाचा पुत्र सुळावर चढविला जातो आणि त्या पुत्राला देव वाचवत नाही असा देव तुम्हाला काय वाचवेल?", "जो देव आपल्या मृत पत्नीचे कलेवर घेऊन मदतीच्या शोधात वणवण भटकतो तो देव तुमची काय मदत करेल?" असे प्रश्न हा चित्रपट विचारतो पण त्यांच्या उत्तरांची जबाबदारी प्रेक्षकांवर सोडून देतो. अश्या प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य प्रेक्षकांना सापडतीलच असे नाही.

---

रेटिंग : ४.२/५

  • चित्रीकरण *****
  • अभिनय *****
  • दिग्दर्शन ****
  • पटकथा ****
  • परिणामकारता ****

---

द केरल स्टोरी चित्रपटाचे युट्यूब टीजर

---

हा चित्रपट आणि त्यातील संदेश यांपुरती मर्यादित चर्चा करण्याची; धाग्याला राजकीय वळण लागू न देण्याची ऐसीकरांकडून अपेक्षा.

- जावा फुल स्टॅक

विवेक पटाईत Wed, 10/05/2023 - 10:01

In reply to by क्षणभंगुर

Indian express नेहमी खोट्या बातम्या देतो. एकही बातमी खरी नसते..तीन उदाहरण देणारी ही कहाणी भारतातील हजारों मुलींची आहे.एवढेच काय गेल्या हजार बाराशे वर्षांत किमान कोटीच्या वर भारतीय स्त्रिया परदेसी विकल्या गेल्या आहे. त्यातल्या अधिकांश हालहाल मारल्या गेल्या.समर्थांनी ही 'अस्मानी सुलतानी' यात वर्णन केले आहे. दासबोधात ही वर्णन आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/05/2023 - 21:02

In reply to by विवेक पटाईत

आणि मी समजत होते की भारतात सध्या सुलतानी नसून हिंदूमहासम्राट मोदीजी लोकशाही मार्गानं निवडून आले आहेत; आणि ते मुस्लिमांना चांगले काबूत ठेवतात. मोदीजींची अशी बदनामी नाही बघवत मला!

बिटकॉइनजी बाळा Thu, 11/05/2023 - 21:15

In reply to by विवेक पटाईत

गुजरातमध्ये गेल्या पाच वर्षांत ४०,००० महिला बेपत्ता आहेत. काय विवेक, डोक्यात प्रकाश पडतोय काय तुझ्या? हे आकडे सरकारीच आहेत. कुठाय तुझा मोदी आणि त्याची सुव्यवस्था? आणि गेल्या हजार बाराशे वर्षांत तुझे पूर्वज काय माशा मारत बसले होते काय? करायचं होतं संरक्षण कोट्यवधी भारतीय स्त्रियांचं! एक मिनिट, हां आलं लक्षात..स्वत:च्या स्त्रिया नवरा मेल्यावर त्याच्या सरणावर जिवंत जाळण्याचा नामी उपाय केला होता ना तुम्ही... बरोबर, ना रहेगा बास ना रहेगी बासुरी.. बायकाच जिवंत ठेवायच्या नाहीत मग कुणाची बिशाद आहे त्यांना परदेशी विकायची!!

Rajesh188 Sun, 07/05/2023 - 19:49

काही गरज नसताना देवावर कॉमेंट.
माणसा ला एकदा बनवला ना .
बुध्दी दिली आहे ना.?
तेच उपकार समजा
मग तुमचे तुम्ही बघा.
देव त्या मध्ये का लक्ष घालेल

Rajesh188 Sun, 07/05/2023 - 21:20

एजंडा असल्या शिवाय आज सभासद आणि उद्या पोस्ट कोणी टाकत नाही.
प्रशासक नी दर्जा राखवा.

अजेंडा चालविण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देवू नये

गलिव्हर Mon, 08/05/2023 - 21:46

चित्रपटातून प्रेक्षकांना काही दिशादर्शन मिळावे, मार्ग मिळावा ही अपेक्षा चित्रपट पूर्ण करत नाही. "ज्या देवाचा पुत्र सुळावर चढविला जातो आणि त्या पुत्राला देव वाचवत नाही असा देव तुम्हाला काय वाचवेल?", "जो देव आपल्या मृत पत्नीचे कलेवर घेऊन मदतीच्या शोधात वणवण भटकतो तो देव तुमची काय मदत करेल?" असे प्रश्न हा चित्रपट विचारतो पण त्यांच्या उत्तरांची जबाबदारी प्रेक्षकांवर सोडून देतो. अश्या प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य प्रेक्षकांना सापडतीलच असे नाही.

सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी -
सगळ्याच परिकथा आहेत. कोणता देव कोणापेक्षा जास्त पावरबाज वैगेर चर्चा म्हणजे कोणता पोकेमॉन जास्त पावर्फुल चर्चा केल्यासारखे आहे. निदान कोणता पोकेमॉन जास्त पावरफुल ही माहिती गेम्स मध्ये तरी उपयोगी पडते.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/05/2023 - 21:28

मात्र फेसबुकवर समविचारी स्त्रिया 'केरला स्टोरी'ची संभावना स्त्रीद्वेष्टा म्हणून करत आहेत.

सदर धाग्यातून मिळालेली माहिती अशी की, कशी ती गरीब, बिचारी, हिंदू अबला, वगैरे. माझ्या मैत्रिणींच्या बोलण्यात तथ्य असावं.

Rajesh188 Mon, 15/05/2023 - 21:09

काही गुन्ह्यात अत्याचार ग्रस्त च जबाबदार असतो.
लव जिहाद होत आहे तर स्वतःच्या मुलांची ,मुलींची जबाबदारी घेणे कोणाचे काम आहे.