माजी पईली बायकु - भाग २
सकालच्याला जाग आली तवा उन कासराभर वर आलेलं. मी पांघरून बाजुला फेकला आन हुटलो. आज घरात कुनीच नव्हतं. चंदी चा बनवत आसल म्हून मी कीचान मदी ग्येलो त कुटं काय. त्वालेतला बसली आसल आसा इचार क्येला आन मंग मी ग्यास पेटीवला आन चाचं आदन ठिवलं. बायकुला सर्पराइज दावू मंजी येकाद मुका घेती का देती त्ये पघु असा इचार केला आन गरम पान्यात साकर आन चाची पौडर टाकली. अवं सर्प-राइज म्हंजी साप हुबा रातो आसं नव्हं, उगा गेर समजुत करून घिऊ नगा. चा उकल्ला तवा त्यामदी दुद वतलं आन मग दोन कपात गाललं. टेबलावं ठीउन चंदीची वाट पाऊ लाग्लो. माजा चा पिऊन जाला तरी बी चंदी येयना. चंदी जर का मुका घेनार आसल त आपलं त्वांड साफ पायजे म्हून मी दानकन हुटलो आन ब्रस कराय लाग्लो, मौतवॉस नी चुला केल्या. चेरा आन त्वांड सोच्च धून पुसून काढला.दाडीचं क्येस टोचत्याल म्हून दाडी बी क्येली. वल्ड स्पाईस बी लावला. चंदी आजुन बी आली नवती. “और कितने इमतीहान लेगा वखत तु ,जीन्दगी मेरी हय, फिर मरजी तेरी क्यु? “ असा योक उरदू सेर मनामंदी हजेरी लाऊन ग्येला. येक डाव तेरे व्हट मेरे व्हटको लागु दे, मग बग ह्यो गडी तुजे कैसा तडपाता हय मी मनात म्हनलो. चंदीच्या व्हटला व्हट लागल तवा तिला जवल वढायची आन कानामंदी लईई सावकास “आयलवू” म्हनायचं. मानंच्या मागं व्हट लावले की बायच्या देहामंदी इज संचार्ते आसा फारमुला मी मर्षी वातसायननी लिवलेल्या सुत्रात वाचलं हुतं. तसं कराचं. कानाच्या पालीला, मंजी जितं डूल घालत्यात तीतं हलूच चावाचं मंजी देहात जी इज संचार्लेली अस्तीया ती कंबरेत जमा व्हतीया आन मंग कंबर हलतीया. देह जर का देवाचं मंदिर असल तर कंबर म्हंजी गर्बगृह आसं बी वाचलं हुतं. कोकसास्त्र बी वाचलं हुतं. कोकसास्र म्हंजी डायेट कोक वालं पियाचं कोक न्हवं. ह्ये कोकसास्र बुक् म्हंजी म्यानुअल असतं बायच्या सरीराचं. पयल्याच रातच्याला ती जवा बोल्ली व्हती की, " मी लई थकली हाय, " आन दुसऱ्या मिंटाला घोरायलाबी लागली व्हती तवा मी तिचं सरीर नजरनं पेत हुतो. टक जागं हुतो. ती येका साईडला वलून झोपल्याली.तिची साडी जराभर वरच्या बाजुस सराकली व्हती. पायातलं पैजन घोट्याला अक्शी चीतकुन बसल्याली की मला त्या पैजनीचा हेवा वाटाय लाग्ला हुता. माजी नजर हलू हलू वर सर्कुन पुठ्ठ्यावं स्तिर जाली. आयला आपलं मन बी लय वंगाळ हाय. माज छाताड रेलवे इंजानवानी ताड ताड उडाय लाग्ल हुतं आन त्ये मला आयकु बी येत हुतं. पुठ्ठा गोल व्हता आन जराक मोट्टा. इशाs sल महीला नव्हं, पन त्याच्यावं गोलाई अक्शी भरल्याली की माज्या अंगामदील रगत गुरुतवाकरसन करून कंबरेकडं व्हावू चाललं. सुद्ध म्हराटीत काय म्हनत्यात पुठ्ठ्याला? हा, नितांब, नितंब. नितांबिनी. आवं नाय, मुकेसंबानीची बायकु न्हवं. ती नीता अंबानी. ही अंबिनी. नित+अंब म्हंजी नित्य आंबे, म्हंजी रोज आंबे. ३६५ दीस नुस्ते आंबे! गेले तीन दिस मी हिला घरामंदीं चालताना बगित व्हतो. “तू जुमके चले तो दिलपे चले कट्यारी..” काय निसार्ग हाय आन काय कामेच्चा हाय पुरुसाची! . चंदीचा पुठ्ठा नुस्ता झाकल्येला बघितल्यावं डोस्कं भिरभिर कराय लागलं. ही पदमनी का शांकिनी का चीतरिनी का हसतीनी? वातसायन कसा काय वळकु सकायचा, नवल हाय. इशेश म्हंजी त्यो बरमचारी व्हता. माजी नजर मंग तीच्या पाठीत रुतली. छ्या! ही नाय पदमनी, नाय शांकिनी, नाय चीतरिनी का नाय हसतीनी.. ही तर आप्ली हरिनी! हरिनी? का विंग्रजीमदी हॉर्नी? नाय नाय नाय.. ही तर डाकिनी, साकिनी, भूतनी, चेतकिनी. "मी लई थकली हाय," म्हनं… कशापाई म्हनली मंग " भिकू घेनार माजा रातच्याला चांस?". ह्यो इस्त्री जातीचा भरोसा नाय. हीच्या सरीराच्या ज्याग्रपी पायी हिस्तरीत लई सिविल वार म्हंजी लडाई आन कापाकापी जाली हाय. हेलेन ऑप ट्राय, किलोपातरा, रानी रुपम्ती, पदमनी, आप्ली देसी सितामाय, न द्रौपदाबाय. द्रौपदाबायपायी अठरा लक्स सईनीक आपल्या बाय मानसांना इधवा करुन ग्येले. पर्त्यक्स बरमदेव बी आपल्याच पोरीच्या मागं लागलं. इश्वामित्तरला मेंका नाववाल्या अपसरेनं सेड्युस केला आन त्ये तीच्या मागं मागं ग्येलं आन इत्क्या वर्साची तपसचऱ्या मातीत घालूनश्यान आलं. आपलं न्हेरू बी लेडी मौंटब्याटनच्या मागं लाग्ला हुताच की. "मागं लाग्ला" सब्दाचं अनर्त करू नगा राजे हो. आपला किसोरकुम्हार गायला हाय की “जवान हो या बुडिया, या नन्नी सी गुडिया, कुच बी हो अवरत झेर की हय पुडिया.” जपूनश्यान रायला पायजे बाई पास्न. आईसवऱ्या राय नाय का, पैल्यांदा सेल्मनकान संग फिर्ली, मंग वीवेक हुब्राय संग फिरुन त्येला अंगटा दावला आन मंग अबीसेक बचन संग लगीन. थोर लोकानच्या भाशेत लग्न. मंग पयल्याच रातीला नग्न. नग्न व्हायसाटी लग्न. पन येक गोस्ट लक्सात ठीवा. नवराबायकुच्या खोलीत देवादिकांची तसबीर लावू नगा. कारन “नंगे से खुदा बी डर्ता हय.” माजी नजर चंदीच्या पाठीवर फिरून मानेजवल ग्येली तेवड्यात तीनं कुस बदालली आन उतानी जाली. माजी नजर आता तिच्या छाताडावं चीताकली, आन चीतकुनच रायली. “हय मीटी चुरी य्ये जालिम नझर हमारी”. काय नव्हंतं तीतं? तोतापुरी का हाफुस का पायरी? बदामी का लंगदा का दसेरी? मर्षी वातसायनच सांगल. काय बी आसल पन त्त्ये शासोच्चास बरुबर वरती आन खालती, हुटत व्हतं आन बशीत व्हतं, हुटत व्हतं आन बशीत व्हतं. काय करू? चोकू का हाफुस? दोन आंब्या मदल्या जागंला विंग्रजीत बॉझाम म्हनत्यात आन खालच्याला बॉटाम म्हनत्यात. येका "बॉ "आन "म" मंदी "झा" आन दुसऱ्या "बॉ "आन "म" मंदी "टा" .....त्येच्या मायला..मन म्हंजी लई वंगाळ.
मंग माजी नजर बेंबीवं तिकली आन मंग खाली सराकली. सेंत्रल हीतींग सिस्तीम…."सागर कित्ना म्येरे पास हय म्येरे जीवण म्ये पीर बी प्यास हय ", किसोर गायला व्हता अमानुस पिच्चर मदी. अमानुस.चंदी हायच साली अमानुस. आचार आत्रे येक डाव त्येंच्या पावन्याकड मांडे खायाला गेलते. पावन्याच्या बायकुनं त्येंच्या ताटामंदी दोन मांडे वाडले. खातानी त्या मंदी केसं निगली त आचार आत्रे तीला म्हनले, “अवो, तुमच्या दोन मांड्यामंदी लई केस हायीत बगा.” ती बाय वाडाय परतून आलीच नाय. ती दुसरे दिवसी म्हनली,”आत्रे मन्जी कूत्रे, कूत्रे भुकले, कूत्रे मुतले.” मंग आचार आत्रेनं जवाब दिला,”मुतले त मुतले फडक्यानी पुसले.” नासी फडक्याची बायकु व्हती ती भौतेक. चंदीच्या मांड्यामंदी बी लई केस आसतील का? कदी बगाय भेटल? जवा बगल तवा मी त्या जागेला त्वांड घालल आन दीरघकालापत्तुर वास घीन. जीब लावलं तरी बी चालतं आसं मर्षी वातसायननं लिवल्याचं मी सोता वाचलं हाय. तीतं मदलं ब्वाट घालाचं आन आ आ आजा आ आ आजा असं ब्वाटानं बुलवायचं म्हंजी ती बी आ आ आ आ करती म्हनं. त्येला "जी" इस्पाट म्हंत्यात म्हनं. ज्यो मानुस, म्हंजे विंग्रजीत मेल, हा इस्पाट शोदून काडतो त्येला "जी-मेल" म्हनत्यात म्हनं. ज्यो मानुस म्हंजी आम्रिकेचं ज्यो बायदन न्हवं. उगा गेरसमजुत करून घेव नगा.
काय काय वाचलं हुतं त्या सर्वे गोस्टीची टरायल घ्याची म्हंजी टेस डराईव करायची. खरं हाय, वाचाल त वाचाल. तिच्या डोल्यामंदी बगायचं आन 'हम आपकी हांकोमें,यीस दील को भसा दे तो 'आसं इच्रायचं. काय म्हनल ती? हममुंद के पलकों को यीस दिल को सजा दे तो? अर्रर्र, नगं नगं, नगं तसं इच्रायला. चंदी आता पोत्तुर सजा देतच आली हाये. तिला प्रस्न इचारायचाच नाय. दायरेक्त हूचलून आत मंदी न्यायाचं आन जबर्दस्तीला सुरू कराचं. तेच्या मायला, पाच दीस जालं आन अजून बी केयलपिडी चालूच हाय. आपलीच मोरी आन मुतायची चोरी असं कीती दीस चालून घ्यायाचं? ते काय नाय, यीवू दे तिला.
.....
ललित लेखनाचा प्रकार
.
आवरा.
नपक्षी मग, लेखाचे शीर्षक ‘मी माज्या पइल्या बायकुला कसा झउलो (नाही)’ असे काहीसे करता येईल, किंवा कसे, यावर गंभीरपणे विचार करा.
कसे आहे ना, की कथेत केएलपीडी वगैरे गोष्टींचा ज़िक्र झालेलाच आहे; झालेच, तर चांस घेणे वगैरे भानगडीही आहेतच. म्हटल्यावर, शीर्षकातसुद्धा असली भाषा जड नसणारच तुम्हाला. मग शीर्षकातच तेवढा हात आखडता घेण्याचे काही प्रयोजन नसावे, नाही काय?
बाकी, कहाणी एखाद्या (आजवर कोणीही न लिहिलेल्या) आत्मचरित्रातील ‘मला आज सकाळी कडक शी कशी झाली (नाही)’ या (प्रस्तावित) प्रकरणाइतकी(च) दिलचस्प! (किंवा, (आता विथड्रॉ केलेल्या) त्या ‘बायकोने पादताना(सुद्धा) मेकअप केल्यास ते पादणे कोशर; अन्यथा नाही’-छापाच्या गोष्टीइतकी.) अर्थातच, तिला ‘वा वा चान चान’छापाच्या भरघोस प्रतिक्रिया आल्यास नवल नाहीच. (आख़िर ‘ऐसी’ जो है।)
(अतिअवांतर: बारा वर्षांचा मुलगा असण्याचा नि असले काहीतरी लिहायला सुचण्याचा कार्यकारण(बादरायण?)संबंध समजला नाही. बोले तो, माझाही मुलगा कधी काळी बारा वर्षांचा होता. परंतु, तेव्हा मला असले काही लिहावयास सुचले नाही बुवा! आणि, जेव्हा स्फुरले, तेव्हा मुलगा बारा वर्षांचा नसतानासुद्धा – किंबहुना, मुलगा झालेला नसतानासुद्धा (किंवा, मुलगा होण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता झालेली नसतानासुद्धा) – स्फुरले. एकंदरीत, पौगंडात सहजरीत्या स्फुरणाऱ्या काही(बा)ही, अचकटविचकट, सुमार/भिकार जाँन्रमधील लिखाण आहे हे. मात्र, प्रौढत्वी निजपौगंडास जपणे बोले तो काही औरच…)
(स्वगत, अतिअवांतर: साला हा चिंज्यासुद्धा, इथे कोणाकोणाला आणून डंपेल, नेम नाही!)
(अतिअतिअवांतर: तुम्ही बायेनीचान्स सीकेपी काय हो?)
आधीच आम्ही, तशातहि…
Hats off to your detailed analysis.
डोंबलाचा ॲनालिसिस!
अहो,
१. दोहा ते अटलांटा तेरा तासांच्या फ्लैटीत,
२. आत्यंतिक अवघडलेल्या अवस्थेत बसलेलो असताना,
३. दहा डॉलर भरून घेतलेल्या आत्यंतिक बेभरवश्याच्या इनफ्लैट वायफायवरून,
४. तेसुद्धा दोन व्हिस्क्या (फुकटातल्या!) चढविलेल्या अवस्थेत
असले लिखाण जर सामोरे आले, तर त्यावर असला प्रतिसाद साहजिकच कोणालाही स्फुरेल! त्यात ते काय मोठेसे?
अर्थात, ‘योजकस्तत्र दुर्लभः’ तथा ‘तेथे पाहिजे जातीचे’ वगैरे वगैरे सर्व ठीकच आहे, परंतु तरीसुद्धा… चालायचेच!
होय. मी तुमच्या मताशी सहमत
होय. मी तुमच्या मताशी सहमत आहे. मला टीकाकार आवडतात आणि ते जर जहाल टीका करत असतील तर जास्तच प्रिय होतात. आमच्या इथे खमण ढोकळा मिळतो दोन प्रकारचा त्यात एक नायलॉन ढोकळा नावाचा प्रकार असतो तो जहाल तिखट असतो. मस्त चव असते. सुरतेची वारी करा एकदा. आमचा पाहुणचार घ्या. डिसेंबर मध्ये इथे पोंक महोत्सव असतो. जानेवारीत उत्तरायण असते. पतंग महोत्सव असतो. या नक्की. सहकुटुंब या.
अर्रर्र! त्ये वालं रावन हाय
अर्रर्र! त्ये वालं रावन हाय वो तुमी! ऐरावन आन मैरावन. म्हाईत हायीत कि ती दोगं बी. ऐरावनची बायकू नागकन्या व्हती आन तिनं न्हवऱ्याला चावायला शिकवलं. डसायला आन दंश करायला बी . "How To Bite Left Right And Centre and Especially on the Neck a la Dracula And Put Deadly Venom In The Body Of Mankind With Special Reference To The Writers On Aisi Akshare " ह्यो तुमचा पी येच डी चा पर्बन्ध व्हता आन तुमच्ये सासरेबुवाच गाईड व्हते ह्ये बी ठाऊक हाये. पन माजी समजुती अशी जाली कि तुमी अहिरावण म्हंजी त्यातलं अहि ह्ये तुमचं येनिशियल हाये. म्हंजे अ. हि. म्हंजे अक्कल हीन. म्हंजी अक्कल सून्य! तसा बी लंकापती रावण आन ऐरावंन दोघं बी अक्कल सून्यच व्हते. नाय का?
आता तुमची समजुत कशी असावी हे
आता तुमची समजुत कशी असावी हे तुमच्या आकलनशक्तीवर अवलंबुन असणार. आता आम्ही तुमच्या लेखनावर बोलतो, तुम्ही आमच्यावर बोलता.
जास्त कष्ट घेऊ नका.
दुस-या एका साईटवर आम्ही आमच्याबद्दल आधीच लिहिले आहे ते वाचा.
अहिरावण कोण आहे याचा अजिबात विचार करु नका.
अहिरावण एक तद्दन टिनपाट, सुमार आणि दळभद्री इसम आहे.
तो काय म्हणतो हे मनावर घेऊ नका.
एक रस्त्यावर फिरणारा वेडा पाहून जसे आपण वाट वाकडी करुन त्याला टाळतो, तसेच अहिरावणाला टाळा.त्यातच तुमचे भले आहे.
मोठ्या व्हा !
अं…
पन माजी समजुती अशी जाली कि तुमी अहिरावण म्हंजी त्यातलं अहि ह्ये तुमचं येनिशियल हाये. म्हंजे अ. हि. म्हंजे अक्कल हीन.
तसे नसावे बहुधा. कारण तसे असते तर त्यांचा आयडी अहीरावण असता; अहिरावण नव्हे. आणि, प्रस्तुत गृहस्थ एरवी कसेही असतील (बोले तो, चांगले किंवा वाईट; मला कल्पना नाही, नि घेणेदेणेसुद्धा नाही.); मात्र, त्यांचे शुद्धलेखन खराब असेल, असे निदान त्यांच्या आतापावेतोच्या कारकीर्दीवरून तरी वाटत नाही. (चूभूद्याघ्या.)
लेखन हे लेखकाचे / लेखिकेचे
लेखन हे लेखकाचे / लेखिकेचे अभिव्यक्त होण्याचे एक स्वतंत्र माध्यम असतें, त्याला हवे तसें तो लिहिलं, त्याची मर्जी. त्यामुळे तुमचं चूक / बरोबर, किंवा नको ते सल्ले देण्याचं मी टाळेन. त्यामुळे हि देखील एक तिखट जहाल प्रतिक्रिया असेल्स वाटून तुमचा केलपीडी झाल्यास क्षमस्व (केलपीडीस स्त्रीलिंगी काय योजावे हे जाणकारांवर सोडूया! ) आणि तुमचा अजुन एक पाहुणा कमी! असो.. भाग-१ अधिक रुचलेला, हा भाग पुढील भागांची तयारी / पायरी आहे स समजूयात. भिकूची आत्ता झालेली घुसमट समजू शकू, पण ह्या दोन्ही व्यक्तिरेखा, त्यांची कौटुंबिक, सामाजिक आर्थिक परिस्थिती, त्यांच्यातील इतर संवाद, चंद्रा असं का वागतेय इ. यावर वाचायलाही आवडेल. बाकी शेरोशायरी, तत्वज्ञान फार अप्रतिम!
.
केलपीडीस स्त्रीलिंगी काय योजावे हे जाणकारांवर सोडूया!
प्रस्तुत लिखाण करणारी व्यक्ती ही प्रत्यक्ष आयुष्यात स्त्रीलिंगी आहे, या गृहीतकास आधार काय?
(केवळ मी त्या व्यक्तीस ट्रोल करतो, हा ती व्यक्ती स्त्रीलिंगी असण्याचा पुरावा होऊ शकत नाही. किंबहुना, तो कशाचाच पुरावा होऊ शकत नाही.)
पावणे, आता प्रत्यकक्ष जीवनात
पावणे, आता प्रत्यकक्ष जीवनात त्यांचे लिंग काय याचा पुरावा कसा अनावा? आय बापास बायकोस नवऱ्यास किवा डाकट्रासस विचाराय पाहिजे, नाय मंजी तुमी असले पुरावे कशे गोळा करता? काय एकादा SOP हाय काय तुमच्याकडं? अव पावणे कशापाई आमच त्वांड वंगाळ कराय लावताय, आमी तुमचं घोडं कवा मारलं का ( जाहलंच तर उन्ट, गायबैल, गाढव, डुकरं, कुत्रं, मांजरी नी ईतर पालीव प्रानी कवा मारले का. कारन, दर वक्ताला घोडंच का मारायचं? नाय म्हंजे आमास्नी हेच वाट्त कि विंग्रजांनी (आनी राजे लोकानी) आपल्या देशात वाघ, सींव्ह, हत्ती मारले, आनी देशातला ईतर लोकानी एकमेकांची घोडीच मारली, त्यामुलं आपल्या देशाची घौडदौड थाम्बली! ) आनी आता हे पुरावा, दाकला, गृहीतक कशापाई, हे काय कोरट है वय? का तुमी पुन्यांदा गेले का कुटं ते दोहा का गोवा ( गोव्याला गेला असाल तर मज्जा करा कि, आमास्नी कशापाई गोवताय ह्यात ) का, फ्लाईटीत आत्यंतिक अवघडलेल्या अवस्थेत बसले? आनी आमची परतिक्रिया वाचली? म्हनजे नक्की कुटं बसून ( शौचकुपात कि शिटीत याचा दाकला नाय म्हनून म्हनलं ) आनी तुमास्नी अशा अवघडल्या टायमाला असं सुचतंय वह्य, मंग सवताच्या दिवानखान्यात बसून काय, लेख लीवताय वय? 'माजी पईली ट्रोल', किंवा 'मी फकस्त बायांना ट्रोल करीत नाय किवा करतो किवा करते - एक पुरावा' ( "आमच्या लिंगाचे गृहीतक का? प्रत्यकक्ष जीवनातील पुरावा काय?" नाय असे सवाल तुमीच मागाहून कराल म्हनून हे 'करतो किवा करते' घातलया ) तर, असं काय लिवलंय काय तुमि? असेल तर ठीक, नसेल तर यक काम करा, पावणे, तुमि लिवाच, कमीतकमी धा हजार तलटीपा नि दोन-तीन हजार संधरभ घाला नाय तर आम्चासनी वाचवणार नाय.
.
नाही, बाकी काही नाही, फक्त, केएलपीडीस स्त्रीलिंग योजण्याची गरज असेलच, असे नाही, एवढेच (हळूच) सुचवायचे होते.
नाय मंजी तुमी असले पुरावे कशे गोळा करता? काय एकादा SOP हाय काय तुमच्याकडं?
नाही बुवा, माझ्याकडे तरी नाही. परंतु, मी जास्त करून स्त्रियांना ट्रोल करतो, असे ऐकण्यात आलेले आहे. तसा दावा करणाऱ्यांना विचारून पाहिले पाहिजे, त्यांच्याकडे काही SOP असला तर. (म्हणजे, तुम्हाला SOP हवाच असेल, तर. मला तसाही फरक पडत नाही.)
बाकी, माझ्याकडे ह्त्ती, घोडे, उंट, झालेच तर राजा, वजीर, प्यादी वगैरे काहीच नसल्याकारणाने, ते तुम्ही मारण्याचा प्रश्न उद्भवत नाही, तथा तसा आरोप मी तुमच्यावर करण्याचाही प्रश्न उद्भवत नाही.
इत्यलम्|
पावनं, तुमचा नक्की कोन्चा प्रष्न हाये
पावनं, तुमचा नक्की कोन्चा प्रष्न हाये आनी कोनला हाये ते थोडं इस्कटून लिवा. कायबी कलेनं राव
'गृहीतकाचा आधार/पुरावा' हा, कि 'केएलपीडीस स्त्रीलिंग योजण्याची गरज काय' हा, कि "मी जास्त करून स्त्रियांना ट्रोल करतो" हि तुम्च्या मनातील सल? नाय म्हंजी दर येळेला तुमी येगळं-येगळंचं बोलून राहिले म्हनून म्हंटल. यक काय ते ठरवल कि बर
केएलपीडीस स्त्रीलिंग योजण्याची गरज असेलच, असे नाही
-- पण त्याची गरजच नसल असं बी नाई ना, समजा रेवती ताय / दादानी फुडं त्यांच्या कथेमंदी चंदीवर तसा परसंग आनलां म्हंजी, जाली का पचाइत, तवा केयलपीडी ला काय नाव देणार?
आनी माज्या कमेंटीत मी केएलपीडी म्हनलं कारन मी रेवतीतायच्या आयडी / छबी ला उद्देसून ते लिवलं, ते कोन हाये याचा छडा आमी का लावू, तुमी लावा, पर तुमी म्हनले "मला तसाही फरक पडत नाही" मग, उगा कशापाई बोंबलताय आन लोकाकड आधार/पुरावे कशापाई मागताय?
अ)ही घ्या स्त्रियांच्या भाव
अ)ही घ्या स्त्रियांच्या भाव विश्वाची यथार्थ वर्णन करणारी " पुरुषांनी" लिहिलेली गाणी.
१)मोरा गोरा अंग लइ ले - गुलजार
२) ओ सजना, बरखा बहार आई - शैलेंद्र
३) रात अकेली है, बुझ गये दीये - मजरुह
४) औरत ने जनम दिया मर्दोंको - साहिर
५) मुहब्बत कि झूठी कहानी पे रोए - शकील
६) अजीब दास्तां है ये - शैलेंद्र
७) न जाओ सैंया छुड़ा के बैंया - शकील
८) रसिक बलमा, हाय दिल क्यों लगाया - शैलेंद्र
९) ये शाम की तन्हाइया ऐसे मे तेरा गम - शैलेंद्र
१०) पंछी बनूँ उड़ती फिरूँ मस्त गगन में - हसरत
ब) सेक्रेड गेम्स सिरियल मध्ये ऐका अमृता सुभाषच्या तोंडून पुरुष ही माना खाली घालतील अशा फर्मास "भ" कार शिव्या.
.
उत्तम लिखाण. खूप आवडलं.
इथे ‘केयलपिडी’ हा शब्द चपखल बसतो, पण एकूणच व्यापक सांस्कृतिक विश्वाचा विचार करू जाता त्यासाठी मराठी प्रतिशब्द असायला हवा. ‘उलघा होणे’ असा पर्याय सुचवू इच्छितो. ‘उलाघाल’ शी त्याचं ध्वनिसाधर्म्य असणं हा जमेचा मुद्दा.
-----