Skip to main content

प्रभाकरन्.

माझी डायरी
दि. २२/५/२००६

प्रभाकरन्:

व्हॉट अ जीपीएम्! डिपार्टमेंट कायम ओव्हरहेडेड. २० वर्षांचा अनुभव आहे म्हणतात. वय ५०.त्याचे सर्व जुने सहकारी इतर कंपन्यांमध्ये जवळ जवळ सीईओ झालेले आहेत पण हा अजूनही इथे त्याच पदावर आहे. लाईक अ बँक क्लर्क. एकाच ठिकाणी बसून राहणारा, आव्हाने नकोत. ओह, बट ही स्पीक्स फ्ल्युएंट इंग्लिश. टिपिकल दक्षिण भारत. दर सोमवारी टाय घालतो. त्याच्या हाताखाली किती लोकं काम करत असतील? मी, विजया, संजाना, नागेश आणि विनय. सिर्फ पांच.

तो तुमच्या सेलवर काळवेळ न बघता कॉल करेल. त्याचे कॉल तुम्ही पहिल्याच रिंगला उचलाल असा एक प्रोटो"कॉल" असतो. तुमची पत्नी, तुमचा पती, मुले, आई, बहीण, भाऊ तुमच्याशी त्या वेळी फोनवर बोलत असतील तरी त्याचा कॉल उचलायलाच हवा.
"ये रेवथी, वाय्य डीडंट यू फिक् माय खोल् एस्टरडे यिम्मीडेटली? ढेडलैन यिज स्याटर्रडे, वाट अबौट योर रिफॉर्ट?" ते ऐकून संजाना फिस् करुन हसली. नंतर तिला मी का हसलीस असं विचारलं तर म्हणाली, " मला रिफॉर्टचं रिफार्ट ऐकू आलं."

" ज्युनियर आहेस तू अजून", मी म्हणाले, " मीटिंग मध्ये तोच फार्ट करतो सर्वात जास्त. तो तुला सर्व काम करायला लावेल आणि नंतर क्रेडिट घेण्यासाठी तुझी प्रोजेक्टमधून काही दिवस आधी हकालपट्टी करेल.
१९९० च्या दशकात त्याला इन्फोसिसमध्ये नोकरी मिळाली और फिर क्या, उसकी किस्मत का ताला खुल गया! कदाचित त्याने नारायण मूर्तींच्या घरासमोर चहाची टपरी टाकली असावी. रोज बारा तास तो काम करत असल्यामुळे नारायण मूर्तींनी त्याला इन्फोसिसमध्ये नोकरी दिली आणि चहाच्या बिलाऐवजी शेअर्स दिले. माहितयं?"

….

Node read time
1 minute
1 minute

विजुभाऊ Thu, 02/11/2023 - 11:11

असे प्रभाकरन एकाच पदावर रहात नाहीत. ते नेहमी वरच्या लोकांची तळी उचलतात. किंवा गुलटे असतील तर एकमेकां सहाय्य करत वर वर चढत जातात.

अहिरावण Thu, 02/11/2023 - 11:12

प्रात:समरणीय, पितृतुल्य, वंदनीय, महान, कर्तबगार, भारताचा नावलौकीक जगभर पसरवणा-या, पैसा म्हणजे काय हे मध्यमवर्गीयांना दाखवणा-या, कसे जगावे हे भारताला शिकवणा-या, श्रीमंत असूनही संडास साफ करणा-या एका महान विभुतीच्या रोज १२ तास काम करावे ह्या सल्याची अवहेलना केलीत की काय असे क्षणभर वाटले आणि ख-याची काही किमत नाही हो म्हणून ड्वोळे पाणावाले. आता मी ७० तास मौन धारण करतो.