anant_yaatree Mon, 22/01/2024 - 20:20 भासे भरजरी | चिंधी जिंदगीची जेव्हा कवितेची । हाक येते ।। हाक नि:शब्द ही। पंचप्राणांवर घालते फुंकर । हलकीशी ।। हलकेच काही । आक्रीत घडते बेडी निखळते । त्रिमितीची।। तिठा त्रिमितीचा । चिंधी ओलांडते आणि मग होते । भरजरी ।। Like Dislike Log in or register to post comments871 views