ती
अगदी पाचवीत की सहावीत असताना तिने एकदा मला सांगितलं होतं की मुलींनी स्वयंपाकघरात लक्ष द्यावं. पुस्तकं वाचण्यात गुंगून जाऊ नये. जास्त पुस्तकं वाचल्याने मुली वेड्या होतात बरं का. मग पुढे कधीतरी तिने मला अन्यायाविरुद्ध बोलण्याचा प्रयत्न करू नको असं पण शिकवलं. मग कधीतरी मुलींनी मोठे धाटे कपडे घालावेत, उलट उत्तर देऊ नये, मुलींनी जास्त लांब लांब फिरू नये, जास्त बोलूच नये, मोठ्याने हसू नये, खरं तर मान खाली घालून जगावं, मुलग्यांची बरोबरी करायला जाऊ नये, मुलांशी जास्त बोलूच नये, मुलांविरुद्ध तर कधीच बोलू नये, कुणी छेड काढत असेल तर दुर्लक्ष कराव, सरळ पळूनच यावं न असं सगळं शिकवलं. मग कधीतरी तिने माझ्याबरोबर मुलगी म्हणून एखादी शोषणाची घटना घडली तर ती कधीच माझ्या वडीलांना कळली नाही पाहिजे असा नियम केला. मग तिने मला पाळी यायला लागल्यापासून हळूहळू वडिलांपासून दूर राहायला शिकवलं. मग तिने मला पाळीविषयी काहीच बोलू नये अस शिकवलं. ती स्वतः आजही स्त्रीच्या आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोलूच शकत नाही. मग तिने कधीतरी प्रेम, राग, माया अशा भावना कशा दडपून टाकाव्या आणि स्त्रियांनी कसं भावनारहित चेहऱ्याने वावरावं, जगावं हे शिकवलं. मग मी तिच्यासारख्या अनेक स्त्रियांना भेटले. सगळ्यांना आजुबाजूच्या प्रत्येक पुरुषाला (प्रत्येक म्हणजे अगदी सर्व त्यांच्या वडील, भाऊ यांच्यापासून ते नवरा, सासरे, दीर, जावई, मुलगा, अगदी दोन पाच वर्षाचा मुलगा सुद्धा) परमेश्वर मानताना पाहिले. आणि हे सगळं पाहिल्यावर तीही घरी येऊन म्हणायची बघा अमुक अमुक नातेवाईक स्त्री कशी आदर्श आहे. जरा शिका तिच्याकडून ती कशी शांतपणे सगळ्यांची बोलणी ऐकून घेते. बघा जरा वागा तिच्यासारखं.
तिने शिकवलं लग्न झालं तरच आयुष्याला अर्थ आहे. पुरुषाशिवाय नुसत जगलं तर आनंदी राहूच शकणार नाही तू. मग कधीतरी तिने जे जे नातेवाईक पुरुष वाईट आहेत असा माझा ठाम विश्वास आहे ते सगळे खरतर चांगलेच कसे आहेत हे समजावून सांगितलं. खरतर पुरुषांची नजर वाईट वगैरे नसतेच मुलीच बावळट असतात असे अनेक विचार तिच्या मनात ठासून भरलेले आहेत. तिला घरातील कुठलेच काम न करणाऱ्या नातेवाईक मुलग्यांविषयी नेहमीच प्रेम वाटते. तिला बायकाना मारणाऱ्या पुरुषांबद्दलही आदरच वाटतो. बायकाना अत्यंत घालूपाडून बोलणारे पुरुषही तिच्या दृष्टीने आदर्शच आहेत. तिला पुरुषांनी स्वयंपाक घरात येणं हे पाप वाटते. मी लहानपणापासून तिला अनेक प्रश्न विचारले आणि तिने मला मुलींनी गुपचूप ऐकून घ्यावे, प्रश्न विचारूच नयेत हे शिकवले. मी माझी बंडखोरी आजही सोडलेली नाही पण तिने तिचे कान केव्हाच बंद करून घेतले आहेत. तिच्यासारख्या कान आणि मन सुद्धा बंद करून घेतलेल्या अनेक स्त्रिया मला माहित आहेत. कुठेही कुठलीही घटना घडली की मुलीचीच कशी चूक आहे इथपासून ते तिचे कपडे कसे चुकीचे, ती गेलीच कशी, बोललीच कशी याबद्दल अनेक जणी आजूबाजूला बोलत राहतात. ती देखील मुलांनी कसं वागावं यापेक्षा मुलीची चूक कशी असे म्हणून मुलाचं आणि पुरुषांचच नाही तर कधीकधी नकळत गुन्हेगारांचही समर्थन करत राहते. दुःख एकच गोष्टीच आहे ती माझी दुसरी शिकलेली, खेड्यात वाढलेली आजी नाहीये, ती शहरात शिक्षिका असलेली माझी आई आहे.
लेख म्हणजे
लेख म्हणजे फक्त रडारड आहे.100 वर्ष पूर्वी लेखात लिहल्या सारखी अवस्था नव्हती.
स्त्री आणि पुरुष बरोबर मानवी वंश जो पृथ्वी वर अस्तित्वात आहे पण पुढे धोक्यात आहे.
रडारड म्हणजे स्त्री वादी असा चुकीचा गैर समज
समाजात काही लोकांचा झाला आहे.
मला तर अजिबात अशा लोकांची मत अजिबात पटत नाहीत.
स्त्री पुरुष साहजिवन म्हणजे सुखी मानवी जीवन.
लेखिकेच्या भावनांशी सहमत आहे.
(अंमळ उशिरानेच हा लेख वाचनात आला.)
लेखिकेच्या भावनांशी सहमत आहे.
"स्त्री ही पुरुषाच्या अर्ध्या बुद्धीची असते. स्त्री ही पुरुषाची शेती असते, त्याला वाटेल तेंव्हा तो तिला नांगरु शकतो. स्त्रीला (खरंतर बालिकेला) पाळी सुरु होताच तिच्याशी पुरुषाला विवाह करता येतो. पुरुषाला चार स्त्रियांशी विवाह करण्याची परवानगी असते. पुरुषाला वाटेल तेंव्हा त्याच्या पत्नीला काडीमोड देता येतो. पण स्त्रीला मात्र वाटेल तेंव्हा आपल्या पतीला काडीमोड देता येत नाही. एकदा एकाद्या पत्नीला तिच्या पतीने काडीमोड दिला तर त्याला तिच्याशी पुन्हा थेट विवाह करता येत नाही, त्यासाठी काही विशिष्ट विधी करावे लागतात. कुटुंबनियोजन साधने वापरण्याची स्त्रियांना परवानगी नाही. स्त्रीने एकटे घराबाहेर पडू नये. तिचा कुणीतरी पुरुष नातेवाईक सोबत असावा लागतो. स्त्रीने नेहमी आपके केस आणि चेहरा झाकून ठेवावा लागतो. आपल्या पतीला शरीरसुख हवे असेल तर स्त्रीला नकार देण्याची परवानगी नसते. लग्नाच्या रिसेप्शन समारंभातही स्त्री-पुरुषांसाठी वेगवेगळे विभाग असतात. युद्ध-लढाईत पकडलेल्या शत्रूंच्या स्त्रिया या संभोग-गुलाम किंवा नुसत्याच गुलाम म्हणून वापरण्याची परवानगी पुरुषांना असते..."
या आणि अश्या इतरही असंख्य जीवन-नियमांच्या परंपरेत वाढलेल्या स्त्रीने तिच्या मुलीला, लेखात सांगितलेले मार्गदर्शन करणे अगदी स्वाभाविक आहे, नाही का?
अमेरिकेत आजवर एखादी स्त्री अध्यक्ष होऊ शकली नाही. पण वरील परंपरेत वाढलेल्या दक्षिण आशियातील काही स्त्रिया पंतप्रधान झालेल्या आहेत. समाजात सकारात्मक बदल होत आहे. थोडा वेळ लागेल पण होईल.
मुक्त प्रकटन आवडले. अजून येऊ द्या.
या पार्श्वभूमीवर लेखिका…
या पार्श्वभूमीवर लेखिका किमान पाचवी-सहावी शिकलेली आहे व तिची आई शिक्षिका आहे हीच मोठी achievement म्हणावी लागेल.
या परंपरेत वाढलेल्या असंख्य स्त्रिया अजूनही त्या गर्तेतून बाहेर येऊ शकलेल्या नाहीत ही मोठीच दुःखाची बाब आहे. ऐसीअक्षरे स्त्री सक्षमीकरणाचा पुरस्कार करते. या परंपरेत वाढलेल्या अधिकाधिक स्त्रिया ऐसीअक्षरेवर यायला हव्यात.
जाऊद्यात! (आश्चर्य वाटले नाही.)
बोले तो, हिंदूंची ती एक पिढी बव्हंशी आत्यंतिक भिकारचोट होती. आणि, त्यातील स्त्रिया या तर बव्हंशी त्याहूनही भिकारचोट होत्या. पैकी, स्त्रियांना भिकारचोटपणाकरिता ‘शिक्षणाचा अभाव’ ही पारंपरिक सबब देण्याची सोय होती. (पुरुषांना काय सबब होती, हे तो एक सर्वज्ञाता परमेश्वरच जाणे!)
पुढे, शिक्षण आले. त्यातूनसुद्धा, स्त्रीशिक्षण आले. त्याचा फायदा काही स्त्रियांना होऊन त्यांचा पारंपरिक भिकारचोटपणा लुप्त होण्यास त्याने थोडीफार मदत झाली खरी, ही जमेची बाजू. (पुरुषांबद्दल तूर्तास न बोललेलेच बरे!) मात्र, बऱ्याच त्यातूनसुद्धा कोरड्या पाषाणच राहिल्या. फक्त, ‘सुशिक्षित’, ‘लिहितावाचता येणारी’ हे ठप्पे पडले, इतकेच. विचारांवर फरक पडला नाही. (पुरुषांचीही स्थिती याहून फारशी बरी नसावी; असली, तर वाईटच असावी. परंतु, तूर्तास तो आपला मुद्दा नाही.) हे व्हायचेच. शिक्षण हे अखेरीस एक साधन आहे; जादूची कांडी नव्हे! आणि, अश्विनीस जलाशयाप्रति नेता येते, परंतु प्राशनप्रवृत्त करता येत नाही, हाही भाग आहेच. काहींना तरी फायदा झाला, हेही नसे थोडके! पुढील पिढ्या हळूहळू अधिकाधिक सुधारत जातील, अशी आशा करायची, झाले.
एक प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. तुमचे तीर्थरूप हयात आहेत काय? (असल्यास, हा प्रयोग करण्याकरिता ते निवर्तेपर्यंत वाट पाहावी लागेल. नसल्यास, हा प्रयोग ताबडतोब करून पाहता येईल.) नसल्यास, तिला एकदा विचारून पाहा, की, तुझे सगळे ते पारंपरिक संस्कार अगदी बरोबर, परंतु, बये, मग त्याच थोर परंपरेस जागून मग तू सती का गेली नाहीस/जात नाहीस? गेला बाजार डोक्याचा चकोट करून का हिंडत नाहीस? तेवढ्यापुरती मात्र ‘सुधारणा’ पाहिजे, एरवी ‘पारंपरिक संस्कार’, हा भंपकपणा नव्हे काय? आणि, स्वतःपुरते केले, तरी एक वेळ ठीक आहे (खरे तर ठीक नाही, परंतु तूर्तास त्या वादात शिरण्यात अर्थ नाही.), परंतु, इतरांवर – त्यातसुद्धा, स्वतःच्याच मुलींवर – हे लादायचे, याला काय म्हणावे?
परंतु, चालायचेच!