Skip to main content

धनवर्षाव (शतशब्दकथा)

सर्वपित्रीची रात्र

गावकुसाबाहेर तीन पिंपळामधल्या जागेत माझ्या चर्मासनासमोरचं धगधगतं, वखवखलेलं आहुतीकुंड.

शेवटच्या आहुतीच्यावेळी मांत्रिकानं लालभडक पट्टीनं डोळे झाकलेयत माझे.

ही महाआहुती ..कारण ती अर्भकाची.

याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर?

आता असल्या वांझोट्या विचारांना थारा नाही. अन्यथा गुप्तधनाची संधी कायमची जाईल.

मांत्रिकानं दिलेली सुरी अर्भकदेहात भोसकली अन् तिचं ज्वालार्पण तर केलं एकदाचं..

आता फक्त एक महिना..पुढच्या अमावास्येला धनवर्षाव.....

पण अरे..हे सर्च लाईट?
ह्या शिट्ट्या?
हा मांत्रिक कुठं पळतोय?
~~~~~~~~~~~~~
ब्रेकिंग न्यूज ..
फास्टट्रॅक कोर्टाचा निकाल:
फाशी ठोठावली...
गुप्तधनासाठी
.
.
कन्याबळी देणाऱ्या बापाला

'न'वी बाजू Sun, 02/03/2025 - 19:41

याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर?

आणि

फाशी ठोठावली...
गुप्तधनासाठी
.
.
कन्याबळी देणाऱ्या बापाला

कोठेतरी लिंक लागली नाही.

म्हणजे, (गुप्तधनासाठी) अर्भकाचा बळी देणारा इसम हा अर्भकाचा बाप होता, की नव्हता?

की असाच कोणीतरी रँडम किडनॅपर होता, परंतु पोलिसांनी मात्र कोठलीही मागचीपुढची चौकशी न करता त्याला बाप ठरवून टाकले? (किंवा, worse still, किडनॅप केले याने, बळी दिला याने, परंतु फाशी दिली मुलीच्या बापाला?)

(हिंदुस्थानात हे शक्य असावे. आणि, विशेषतः, मोदी है, तो साला कुछ भी मुमकिन है।)

——————————

(बादवे, याला कोठल्या समकालीन घटनेचा संदर्भ आहे काय?)

anant_yaatree Sun, 02/03/2025 - 21:04

 मांत्रिक किडनॅपर होता. आहुती देणाऱ्याला हे माहित नव्हते की आपलीच मुलगी किडनॅपरने आपल्यासमोर बळी देण्यासाठी ठेवलीय.

'न'वी बाजू Sun, 02/03/2025 - 21:31

In reply to by anant_yaatree

भीषण!

(याला कोठल्या समकालीन घटनेचा संदर्भ आहे काय?)

anant_yaatree Mon, 03/03/2025 - 09:02

In reply to by 'न'वी बाजू

विषयक अंधश्रद्धांमधील वास्तव कल्पनेपेक्षाही भीषण व अविश्वसनीय आहे.