भारतीय विद्यार्थ्याचे अमेरिकेत उच्चशिक्षण..
परवा एका मित्राचा खूप दिवसांनी फोन आला. त्याचा मुलगा इंजिनियर होऊ घातलाय. पुढे काय करावं या विचारात आहे. हा मित्र भारताबाहेर फक्त फिरायला गेला आहे, कधी देशाबाहेर काम केलेले नाही. त्याला त्याच्या मुलाने प्रवेश मिळतोय तर अमेरिकेत MS करायला जावे का असा प्रश्न पडला आहे.
मी अनेक वर्षे भारताबाहेर राहिलो म्हणून त्याला वाटलं की मला बरंच कळतं, पण तेही खरं नाही. मी युरोप आणि आशियात बऱ्याच देशांमध्ये काम केले, पण कधी अमेरिकेत गेलोही नाही. त्यामुळे ऐकीव माहिती वरून त्याला काही सांगू शकत नाही. त्याला माझं मत जाणून घ्यायचं आहे पण मलाच माहिती नाही.
माझे तीस वर्षापूर्वीचे काही वर्गमित्र अमेरिकेत स्थायिक झाले पण आता ते संपर्कात नाहीत.
चांगल्या ठिकाणी पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि जमल्यास अमेरिकेतच राहणे हे गेली पन्नास किंवा अधिक वर्षे होत आले आहे. पण त्याचे बरेवाईट परिणाम आम्ही भारतात रहात असलेले लोक ऐकतो आणि सोडून देतो. शिकून काही कारणाने परत आलेल्यांना हल्ली काम मिळत असलेले दिसते. पूर्वी त्यांना इकडे नोकरी मिळत नाही असे पाहिले होते. एकदोन वर्षे तिथे परवानगी असेल तितके काम करून शिक्षणाचा अंशतः खर्च वसूल करून घ्यावा असे लोक म्हणतात. हल्ली एकूणच भविष्यातली अनिश्चितता वाढली आहे. मग देश कुठलाही असेल. सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत तिकडे शिकून इकडे परत येण्याची तयारी असेल तर ते त्याने करावे का?
भारतात निवडक चांगल्या संस्था सोडल्यास (जिथे सहसा प्रवेश मिळत नाही) इतर विद्यापीठात शिक्षणाचा दर्जा राहिला नाही म्हणतात. त्यामुळे भारतात पदव्युत्तर करण्यापेक्षा नोकरी करून अनुभव मिळवण्याचा ट्रेंड दिसतो. इथली खासगी विद्यापीठे स्वायत्त झाली पण तिथे अनागोंदी आणि बेशिस्त सुरू आहे असे वाचनात येते.
त्यामुळे आता या बदलत्या काळात अमेरिकेस शिकायला जावे का? सामाजिक दृष्ट्या येत्या तीन दशकात काय समस्या असू शकतात? (खरं तर मुलं त्याचं ते पाहून घेतील पण पालकांना फारच प्रश्न पडतात!) अमेरिका हा चांगला पर्याय नसल्यास उच्च शिक्षणासाठी अन्य काय पर्याय असू शकतात यावर कृपया माहिती द्यावी.
अमेरिकेत राहणाऱ्या किंवा तिथे शिकून भारतात परत आलेल्या लोकांचे अनुभव कळले तर पुढील उमेदवारांना मोठी मदत होईल!
एकच एक उत्तर नाही
आपल्या देशातील शिक्षण, खासकरुन उच्चशिक्षण अत्यंत कमी संस्थात चांगल्या दर्जाचे मिळते, ही वस्तुस्थिती आहे. पण सगळी अमेरिकन विद्यापिठे काही ग्रेट आहेत, असे नाही. त्यामुळे 'कुठे' प्रवेश मिळतो, त्यावर बरेचसे अवलंबून असते. गेल्या काही वर्षांत अमेरिकेत उच्चशिक्षण घेतलेल्या अनेक मुलांना नोकरी न मिळाल्यामुळे परत यावे लागले आहे. त्यांना भारतात नोकरी मिळते, पण वेळ लागतो आणि अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी जी गुंतवणूक केली ती वसूल होइतो बराच वेळ लागतो.
तरी पण पी एच डी, संशोधन इ. करण्याची इच्छा असेल, तर अमेरिका, किंवा इतर प्रगत देशात उच्चशिक्षण घेणे हा पर्याय अजून तरी चांगला आहे.
दर्जा हवा असेल तर
दर्जा हवा असेल तर अति उच्च शिक्षण हे कमी पैशात च हवं.
एक डॉक्टर बनायला भारतात 1 करोड लागतात.
सरकारी हॉस्पिटल खूप कमी डॉक्टर निर्माण करतात.
अति अति हुशार मुलांना फक्त पैसे नाहीत म्हणून डॉक्टर होता येत नाही.
सर्वाना सामावून घेण्यास सरकारी संस्था असमर्थ आहेत.
1 करोड देऊन जो डॉक्टर होणार त्याच दर्जा न्यूनत्यातम च असणार.
भारताला हुशार डॉक्टर, इंजिनीर, खेळाडू, राजकारणी, हवे असतील तर योग्य किमतीत अति उच्च शिक्षण आणि त्यांना संधी मिळण्या चीं हमी द्यावीच लागेल.
नाहीतर md आहे आणि इंजेकशन deta येत नाही अशी अवस्था दिसेल ( जोक नाही अशी स्थिती आहे ).
सर्व च क्षेत्रात
...
अमेरिकेतल्या विद्यापीठांच्या एकंदरीत बरेवाईटपणाबद्दल तपशीलवार टिप्पणी करण्याकरिता मी व्यक्तिशः पात्र नाही; त्यामुळे, तो विषय तत्संबंधीच्या तज्ज्ञांवर सोडून देऊन त्याविषयी मी मौन बाळगणे हेच इष्ट ठरेल.
मात्र, एक analogy दिल्यावाचून राहवत नाही.
जर्मनीत परंपरेने नावाजलेली अशी अनेक विद्यापीठे होती. (कदाचित अजूनही असतील.) तेथे उच्च दर्जाचे मूलभूत संशोधन चालत असे. (कदाचित अजूनही चालत असेल.)
मात्र, जर्मनीबाहेरच्या देशांतील विद्यार्थ्यांनी १९३०-४०च्या दशकांत (आणि विशेषेकरून १९३९ आणि १९४५च्या दरम्यान) तेथे उच्चशिक्षणासाठी जाणे हे कितपत सयुक्तिक ठरले असते?
तेव्हा, थोडे थांबा. पुढे काय होते, ते पाहा. सध्या जे ग्रहण लागलेले आहे, ते किती टिकते, त्यातून संबंधित विद्यापीठे कितपत आणि कोणत्या अवस्थेत टिकतात, झालेच तर खुद्द अमेरिका किती आणि कोणत्या अवस्थेत टिकते (and I say this as an American), ते पाहा, आणि मगच काय तो निर्णय घ्या, एवढेच सुचवू इच्छितो.
Wait and watch.
बाकी मर्जी तुमची.
धन्यवाद न बा.माझा म्हणजे…
धन्यवाद न बा.
माझा म्हणजे त्या मित्राचा पॉईंट बरोबर समजला तुम्हाला.
अमेरिकी विद्यापीठाच्या दर्जाचा प्रश्न नसून सध्याच्या परिस्थितीत शिकायला तिकडे जावे का हा आहे. कायम राहणे हा मुलाचा त्यावेळी चॉइस.. तोही संधी मिळाली तरच शक्य असेल. आपला मुद्दा शिकायला जावे का इतकाच.
इंग्लंड आणि जर्मनीत मी बराच काळ काम केले आहे. तिथे शिक्षण उत्तम आहेच, पण..
जर्मनीत शिकायला जाण्यासाठी ती भाषा शिकायची त्या मुलाची इच्छा नाही. युरोपात पुढची वीस वर्षे त्यांना बरी जातील असे वाटत नाही. त्यामुळे मी त्याला तिकडे जायला सुचवलं नाही.
अमेरिकेत चांगली विद्यापीठे आहेत, म्हणून जायचं. परत येण्याची तयारी आहेच.
बाकी अमेरिकेत सध्या दुसऱ्या महायुद्धाइतकी वाईट परिस्थिती वाटते का?
नेमके!
(किंवा, दुसर्या शब्दांत, 'भारतीय विद्यार्थ्याचे अमेरिकेत उच्चशिक्षण..' याऐवजी, 'भारतीय विद्यार्थ्याचे अमेरिकेत (अमेरिकन सरकारकडून) अपहरण.. (आणि तेथून तिसर्या देशाच्या तुरुंगांत बेकायदा रवानगी)' अशा काहीबाही विषयावर नजीकच्या भविष्यकाळात 'ऐसीअक्षरे'वर चर्चा पाहायला मिळण्याचा योग जर टाळणे असेल१, तर तूर्तास/इतःपर, भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत उच्चशिक्षणाकरिता येण्याचा विचार स्थगित करणे उत्तम! (विनाकारण अमेरिकेतल्या/तिसर्याच कोठल्यातरी देशातल्या तुरुंगातली हवा चाखायची हौस आलीय काय?))
(अहो, अमेरिकेत जन्मलेल्या अमेरिकन नागरिकांनासुद्धा जेथे बेकायदा स्थलांतरित असल्याच्या संशयावरून विनाकारण कोठडीची हवा खावी लागते, तेथे तुम्हाला (पक्षी: भारतीय विद्यार्थ्यांना) कोण विचारतो?)
१ यामागे, (१) तोवर 'ऐसीअक्षरे' हे संस्थळ अस्तित्वात असेल, आणि (२) तोवर अमेरिका हे राष्ट्र अस्तित्वात असेल, ही दोन फार मोठी गृहीतके आहेत. दोन्हीं गृहीतकांना फारसा आधार नाही.
लोकसत्ता
लोकसत्तामध्ये या विषयाबद्दल पुढच्या रविवारी (बहुतेक) काही विशेष लेखन असणार आहे. ते सध्या चिन्मय देवरेचा संपर्क शोधत आहेत - कुणाच्या ओळखीत असेल तर कळवाल का? मी त्याचा संपर्क लोकसत्ताच्या संपादक मंडळाकडे पाठवू शकते.
जे डी व्हान्स
अमेरिकेचा विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष तीन वर्षांपूर्वी तिथल्या विद्यापीठांबद्दल काय बोलला आहे ते इथे पाहा.
ज्याचा मुलगा आता अमेरिकेत शिकतो आहे अशा एका मित्राकडून :