Skip to main content

निघा निघा चिऊताई

निघा निघा चिऊताई 
सारीकडे काँक्रीटले 
दाणा पाणी हरवले 
शहरी ह्या

विषारी धुरके आले
घरट्याच्या दारापाशी 
डोळ्यावर झोप कशी 
अजूनही

उरलेली पाखरे ही
भयसूचनांचे गाणे
गाऊनी टिपती दाणे 
अखेरचे

झोपू नका अशा तुम्ही
वाचविण्या मृत्युक्षणी 
येईल का मग कोणी 
बाळाला ह्या

बाळाचे मी घेता नाव 
जागी झाली चिऊताई 
बाळासकट ती जाई 
कायमची!

तिरशिंगराव Sat, 22/03/2025 - 07:06

विडंबन छानच जमले आहे. अस्वस्थ करणारेही आहे.