Skip to main content

मस्त जुळतं आमचं!

 

मस्त जुळतं आमचं!

तीच ते नाजूक हसने…
ब्रेकफास्टवेळी टेबलावर हसून चांदणे सांडणे,
सगळं काही नजरेत साठवले मी!

तिची ती उंची,
गोरापान रंग, बोलण्याचा ढंग—
अप्सराच जणू!
फिदा झालो मी तिच्यावर…

तिचे ते मोकळे केस,
स्टायलिश राहणे,
इंग्लिश बोलणे—
अहाहा!

मला दाढी ठेव सुचवणे,
हेअरस्टाईल बदलायला लावणे,
“फॉर्मलपेक्षा कॅज्युअलवर छान दिसशील” सांगणे…
कसला संकेत?

सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण
आणि संध्याकाळची कॉफी—
आम्हाला एकमेकांची सवयच झालीय!

टीम्स मिटिंग असो की
एखादा इवेंट,
आमचे लाडिक विनोद सुरूच असतात.

मागे मला मिळालेले गिफ्टही
मी तिला देऊन आनंदी केले.
ऑफिस कलीग हा फक्त
आमच्यातला अडसर आहे,
खरं तर आम्ही दोघं एकच आहोत!

काय झालं माझं लग्न झालंय म्हणून?
पूर्वी नाही का लोक दोन बायका करायचे?
मी आज ठरवलंच—
हिला विचारणारच!

मनात शंभर विचार चालू होते.
तिचा रिप्लाय?
ती काय म्हणेल?
पण नाही, मला तिच्या नजरेतला तो “हो” स्पष्ट दिसतो!

हिंमत करून मी तिला मॅसेज टाकलाय.
आता दोन तासांनी व्हॉट्सअप उघडणार!
आहाहा, काय आनंद!
तोपर्यंत ही माझी तासाभराची
टीम्स मिटींगही आटपेल!

झाली एकदाची मिटिंग!
हुश्श!

अरे… पण हे एचआर हेड
माझ्या टेबलाकडे का येताहेत?
त्यांच्या हातातला हा बंद लिफाफा?
आणि… सोबत सिक्युरिटी गार्ड?

जावा फुल स्टॅक Mon, 14/04/2025 - 19:25

उत्तर माहाराष्ट्रा तील दलित चळवळी चे एक तरुण तसेच तडफदार कार्यकरते धागा लेखक आयु. अमरेंद्र बाहुबली यांचे आभार मी मानतो.

त्यांना व सर्व दलित बंधू-भगिनींना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शिव शुभेच्छा.

जावा फुल स्टॅक Mon, 14/04/2025 - 19:29

आयु. अमरेंद्र बाहुबली भाऊ,

ही पोरगी साजूक तुपा तली आहे का हे सान्गा तुमाला शोभून दिसल

तुमचे शिव अभिनंदन