Skip to main content

कथा-कविता

घडलेल्या घटनांच्या कथा झाल्या
उरलेल्या शक्यतांच्या कविता झाल्या.

कपाळावरची बट मागे सारायची होती
कपाळावरच्या बटांच्या गझला झाल्या.

हातघाईची लढाई अनिर्णित राखली पण
माझ्याच पराभवाच्या बखरा झाल्या.

नाती गोती आप्त इष्ट मित्र वगैरे
पेपरातल्या जुन्या बातम्या झाल्या.

मी किनारी आहे तसाच अजून बसूनी
तुझ्या आठवणींच्या नद्या झाल्या.