Skip to main content

कृष्णविवर

शतसूर्यांची जळती बिंबे
गिळुनी टाकण्या कृष्णविवर हे
स्थळकाळाची अदय शृंखला
तटतट तोडून हिंडत आहे

क्षुधा अपरिमित अंतर्यामी
धगधग पेटून उठली आहे
आदिम स्वाहाकार सूक्त का
पुनश्च अविरत गुंजत आहे?

विज्ञानाचे नियम तोकडे-
विपरित त्यांच्या घडते आहे
भवताला घोटात गिळुनिया
कृष्णविवर हे हिंडत आहे

"विझत्या सूर्यावरती लट्टू
नार नवेली पृथ्वी आहे"
कृष्णविवर संतप्त होऊनी
अथक स्वतःला कोसत आहे
:)