आपरेशन सिंदूर : ट्रंप तात्या कोमात
ओपेरेशन सिंदूर नंतर ट्रंप तात्या कोमात गेले असे वाटू लागले आहे. तात्या एखाद्या मतिभ्रष्ट माणसासारखे बरगळू लागले आहे. नुकतेच ते म्हणाले भारत-पाक युद्धात अनेक जेट पडले. पण कोणाचे ते मात्र सांगू शकले नाही. अमेरिकेचे शेकडो आकाशात गमन करत हेरगिरी करणारे उपग्रह आणि सीआयए त्यांना खरी माहिती देऊ शकले नाही. बहुतेक खरी माहिती मिळाल्यानंतर त्यांना कळून चुकले असेल की भविष्यात भारताला ब्लॅक मेल करणे संभव नाही याचा मानसिक धक्का बसला आहे, हे मात्र निश्चित.
माझा एक मित्र कट्टर मोदी विरोधी आहे, काल त्याने मला फोन करून म्हंटले, पटाईत, ट्रंप तात्या पुन्हा म्हणाले आहे, भारताचे जेट पडले. असे म्हंटताना त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मी उत्तर दिले, भारताचे युद्धक विमाने पडली आणि तुला आनंद होत आहे. बाकी तात्या खरे बोलले, पाकिस्तान ने आपल्या आक्रमण करणार्या युद्धक विमानांना पाडले. वैमानिकांनी पेराशूट उघडले. ते पाकिस्तानच्या जमिनीवर उतरले. तिथून त्यांनी ओला-उबेर पकडली आणि ते भारतात परतले. तो म्हणाला, पटाईत काहीतरी बरगळू नको. मी म्हणालो, गाढवा मग काय म्हणू. विमान पडले असते तर त्यांनी अभिनंदन सारखे भारतीय वैमानिक ही पकडले असते किंवा त्यांचे प्रेत तरी मीडिया वर दाखविले असते. किमान एवढी तरी अक्कल तुला असायला पाहिजे. तू काही राजनेता नाही ज्याला असत्य प्रचार करून लोकांची मते घ्यायची आहे. काहींची इच्छा तर भारत पराजित झाला पाहिजे अशी होती. बाकी भारतीय युद्धक विमान भारतात पडले असते, तरीही इथला मीडिया त्या जागी पोहचला असत. स्थानीय लोक आणि मीडियाने विडियो टाकले असते. या शिवाय भारतात शहीद होणार्या प्रत्येक सैनिकाला मानाची वंदना दिली जाते, एवढे माहीत आहे ना, तुला. आता त्याचे सूर बदलले. तो म्हणाला, मग तात्या खोटे का बोल्ले. मी उत्तर दिले, तात्या कोमात गेले आहे. किराणा हिल्स वर बहुतेक तात्यांचे आण्विक अस्त्रांचा साठा असू शकतो. भारताने किराणा हिल्स वर मिसाईल हल्ला केला नाही, असेच विधान केले असले तरी तिथल्या स्फोटांचे उपग्रह फोटो मीडियावर आहे. नंतर त्याच भागात जमिनीच्या आत अनेक भूकंप ही आले. नूरखान बेस वर ही जमिनी खाली असलेले शस्त्र भंडार ही नष्ट झाले. बहुतेक भारताने दाखविले पाकिस्तानचे अस्त्र भंडार सुरक्षित नाही. पण इथे ठेवलेले अस्त्र- शस्त्र भंडार तात्यांचे असेल तर तात्या कोमात जाणारच.
पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ एका प्रेस कोन्फ्रेंस मध्ये म्हणाले होते, ते भल्या पहाटे भारतावर हवाई हल्ला करणार होते, त्या आधीच अडीच वाजता भारताने ब्रम्होस मिसाईलने आमच्या विमानतळांवर हल्ले केले. आम्हाला प्रतिकार करण्यासाठी 30 सेकंड ही नव्हते. भारताच्या हल्ल्यात तिथल्या हवाई पट्ट्या आणि तिथे उभी असलेली अनेक विमाने नष्ट झाली. त्यांची विमाने आक्रमण करण्यासाठी तैयारी करत असल्याने त्यांची विमाने असुरक्षित होती. किमान 30-40 विमानांना निश्चित नुकसान झाले असेल, खरी संख्या काही वर्षांनी पाकिस्तान उघडी करेलच. भारता जवळ शत्रूवर पिन पॉइंट आक्रमण करण्याची क्षमता पाहून तात्यांना धक्का बसणे स्वाभाविक होते.
नुकतेच झालेल्या इजराईल आणि इराण युद्धात हजारून जास्त किमी दूरून येणार्या मिसाईल आणि द्रोण अमेरिकेचे आधुनिक डिफेंस सिस्टम थांबवू शकले नाही. दुसरी कडे 25-50 किमी दुरून येणारे द्रोण आणि मिसाईल भारताने रोखले. ह्याचा आघात ही त्यांना जबरदस्त बसला असेल.
बाकी तात्यांप्रमाणे भारतात ही अनेकांना दारुण धक्का बसला आणि त्यांचे ही मानसिक संतुलन बिघडले. भारताने 9 आतंकी तळ उध्वस्त केले. तिथे इतके आतंकी मेले की एक आतंकी म्होरक्या म्हणाला, "आम्ही प्रेत मोजता मोजता थकून गेलो. आमचे दुख कुणाला ही कळू शकत नाही". 11 विमान तळे उध्वस्त झाल्याने पुढील वर्षभर तरी पाकिस्तान पुन्हा गडबड करू शकत नाही. एवढे नुकसान झाल्यावर पाकिस्तान ने बदला न घेता युद्धविराम स्वीकार केला अर्थात सरेंडर केले/ तरीही आपले काही नेता "भारताने सरेंडर असा शब्द प्रयोग करतात". बहुतेक पाकिस्तानच्या दारुण पराजयाचे पाकिस्तानपेक्षा त्यांनाच जास्त दु:ख झाले असावे आणि ते ही तात्या प्रमाणे बरगळू लागले.
बाकी आता भारतासोबत सर्व व्यापारीक सौदे बरोबरीच्या नात्याने करण्याची मानसिक तैयारी ही तात्यांनी ठेवली पाहिजे. त्यासाठी तात्यांना कोमातून लवकर बाहेर यावे लागेल. पंतप्रधान मोदींच्या भारताला आता कुणीही हलके घेऊ शकत नाही.
.
तेव्हा तात्या शेठचे दोस्त होते हो!
(आता बहुतेक दोघांत फाटलेले दिसतेय.)
(तेव्हासुद्धा बोललो होतो (आठवत असेल, तर): तात्या काय, किंवा शेठ काय, ही स्वतःच्याच आवाजाच्या प्रेमात पडलेली मंडळी आहेत. ही मंडळी खऱ्या अर्थाने कोणाची “दोस्त” कधीच होऊ शकत नाहीत.)
(तसेही, आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीही कोणाचेही कायमस्वरूपी दोस्त किंवा कायमस्वरूपी शत्रू नसते; असतात, ते फक्त कायमस्वरूपी स्वार्थ/मतलब/हितसंबंध, असे म्हटले जाते. ते ठीकच आहे, परंतु, या दोघांचे अंमळ लवकरच फाटले, म्हणायचे.)
(बाकी, शेठचेच तात्यांशी फाटले, म्हटल्यावर, चमचे तोंड फिरवणारच! शेवटी, ते चमचे शेठचे आहेत, तात्यांचे नव्हेत.)
असो चालायचेच.
हो ना
खरं आहे
शेठच्या विजयाची कामना करणाऱ्या भक्तांनी तात्यासाठीही यज्ञ केले होते.
एप्रिल पर्यंत तात्या जे करतात ते "कुछ सोचके ही किया होगा" असे मंडळींकडून ऐकावे लागत होते.
"लॉँग टर्म मध्ये हे "आपल्या" फायद्याचं असेल" हे सांगितले जाई. ("आपल्या" म्हणजे कुणाच्या ते कळलं असेलच)
(आणि आवाजाचे म्हणाल तर शेठच्या आवाजाच्या प्रेमात कोणी कसा पडू शकतो (स्वतः: शेठ धरून) हे एक आश्चर्य आहे )
वरील सर्वच प्रतिसाद…
वरील सर्वच प्रतिसाद हास्यास्पद आणि बिना डोके वापरता दिले आहे. सर्वांचे उत्तर एकत्र देतो. तात्या ऑपरेशन सिंदूर मध्ये कोमात केले कारण लवकर युद्धविराम झाल्याने अमेरिकेला काहीही फायदा झाला नाही. उलट अमेरिकेचे नुकसान झाले. बहुतेक त्यांचा शस्त्र भंडार नष्ट झाला. या शिवाय पाकिस्तानचा एयर फील्डचा उपयोग किमान सहा महीने तरी इराण विरोधात करणे त्यांना शक्य नाही. भारत कधीच आपले एयर फील्ड अमेरिकेला वापरू देणार नाही.
ते कोमात आहे याचे एक उदाहरण. कालच ते बरळले भारताची अर्थव्यवस्था मेलेली आहे. आता अर्थव्यवस्थेचे गेल्या पाच वर्षाचे आंकडे पहा:
Here's a snapshot of India's GDP in US dollars for the years you asked about:
🇮🇳 Indian Economy in USD Terms
| Year | GDP (USD Trillion) | Notes |
| 2019 | ~$2.9 trillion | India became the 5th largest economy globally, though growth slowed to ~5% due to weak demand. |
| 2024 | ~$3.7–4.0 trillion | Estimated size as of FY 2024–25; India is on track to surpass $4 trillion soon. | आता 4.0 trillion झाली आहे.
या शिवाय तात्या पाकिस्तान मध्ये तेल शोधणार. पाकिस्तान ते तेल भारताला विकेल. तात्यांचे हास्यास्पद विधान ते कोमात गेलल्याचे लक्षण आहेत.
बाकी तात्यांची इच्छा आहे, त्यांच्या देशात उद्योग लागले पाहिजे, त्यांचा माल विकला गेला पाहिजे या साठी ते प्रयत्न करत आहे. त्यात काहीही गैर नाही. आपण ही अनेक विदेशी वस्तूंवर भारी भरकम कर लावलेले आहे. बाकी भारत रशियाकडून स्वस्त तेल घेतो ते ही अमेरिकेपेक्षा 11 पट जास्त. ते तात्यांना खटकले आहे. पण आपण अमेरिकेसाठी रशियाला सोडू शकत नाही. डॉलरच्या वर्चस्वासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इच्छा असो की किंवा नसो सीआयएच्या आणि शस्त्र विक्रेत्या कंपन्यांच्या तालावर नाचावेच लागते. त्यासाठी जगात युद्ध सुरू राहिले पाहिजे ही अमेरिकेची गेल्या 80 वर्षांची राष्ट्रीय नीती आहे. ती राबविण्यासाठी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीने भारताला पाकिस्तान मोठे आक्रमण करणार याची सूचना दिली.
On May 9, Vance made multiple attempts to contact Prime Minister Narendra Modi, eventually reaching him after Modi finished a meeting with military officials. Vance warned Modi directly that Pakistan was preparing a major strike against India.
याचा अर्थ पाकिस्तानचे नुकसान झाल्यावर पाकिस्तान आणिक त्वेषाने युद्ध करेल असे तात्यांना वाटले असेल. जसा युक्रेन रशिया विरोधात लढतो आहे. पण पाकिस्तानी मूर्ख नाहीत आणि मुनीर झेलेंस्की ही नाही. अमेरिकी शस्त्र कंपन्यांना काही लाभ झाला नाही. पण जगात भारतीय वायु सुरक्षा शस्त्रांची मागणी मात्र वाढली. सीआयएच्या अंतराष्ट्रीय धोरणानुसार जे रशियाचे मित्र ते अमेरिकेचे शत्रू. बायडेन समोर द्विधा नव्हती. पण तात्यांना भारतसोबत संबंध चांगले ठेवायचे आहे आणि तालावर नाचायचे ही आहे. त्यामुळे भारताबाबत रोज त्यांचे विधान बदलत राहतात. यालाच कोमात जाणे म्हणतात.
तात्या!
भारत कधीच आपले एयर फील्ड अमेरिकेला वापरू देणार नाही.
Well, for India’s sake, I certainly hope so.
नाही म्हणजे, भारताच्या धोरणाचा (थेट स्वातंत्र्यापासून, पार नेहरूंच्या काळापासून) आजवरचा trend पाहता, आपल्या म्हणण्यात बहुधा तथ्य असावेसे वाटते. (आणि, ते (भारताच्या दीर्घकालीन हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून) योग्यच आहे, याबद्दल दुमत नाही.) परंतु, कसे आहे ना, की, मोदी है, तो साला कुछ भी मुमकिन है; त्यामुळे… सांगवत नाही.
(विशेषेकरून, नेहरूंच्या काळापासून हे असेच धोरण आहे, म्हटल्यावर, (१) नेहरूंना (नि काँग्रेसला) शिव्या घालण्याची, नि (२) स्वतःस श्रेय घेण्याची, सुविधा नाहीशी होते, म्हटल्यावर…)
तरीही, तुम्ही म्हटले आहेत, त्याप्रमाणेच होईल, अशी आशा व्यक्त करतो.
कालच ते बरळले भारताची अर्थव्यवस्था मेलेली आहे.
तात्या कधीही, काहीही बरळू शकतात. (आणि, आज एक बरळले, तरी, उद्या त्याच्या नेमके उलट असेही काही बरळू शकतात.) ही (निदान आमच्याकरिता तरी) नवी बातमी नाही. त्यांचे कोठलेही म्हणणे आम्ही कधीच गंभीरपणे घेत नाही, की त्यांच्या कोठल्या म्हणण्याला कधी काही विशेष अर्थ लावीत नाही.
(तात्यांच्या तुलनेत, तुमच्या शेठनासुद्धा आम्ही (तसूभर का होईना, परंतु) अधिक अक्कल असल्याचे क्रेडिट देतो, यातच काय ते समजा.)
सांगण्याचा मतलब, तात्या काहीही बरळोत, त्याने (१) भारताची अर्थव्यवस्था (अ) मेलेली आहे, किंवा (ब) जिवंत नि धडधाकट आहे, यांपैकी काहीही सिद्ध होत नाही, नि (२) तात्यांचे बरळणे हे ते कोमात गेल्याचे द्योतक नाही. (असे बरळणे हे त्यांच्याकरिता ‘नॉर्मल’ आहे, नि नित्याचे आहे.)
(हं, तात्या कायमस्वरूपी कोमातच असतात, असा जर का तुमचा दावा असेल, तर गोष्ट वेगळी.)
(आणि, हो. तात्या तुमच्या शेठचे दोस्त नाहीत, नि कधीही नव्हते. And vice versa.)
या शिवाय तात्या पाकिस्तान मध्ये तेल शोधणार. पाकिस्तान ते तेल भारताला विकेल. तात्यांचे हास्यास्पद विधान ते कोमात गेलल्याचे लक्षण आहेत.
पुन्हा: तात्यांकडून येणारे कोणतेही, कितीही हास्यास्पद विधान हे ते कोमात गेल्याचे लक्षण नाही. किंबहुना, हे तर ते नॉर्मल असल्याचे लक्षण आहे!
(त्यांच्याकडून याहून वेगळी अपेक्षा आम्ही ठेवीत नाही. किंबहुना, ते जर कधी काही sensible बोलले, तरच आम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.)
बाकी तात्यांची इच्छा आहे, त्यांच्या देशात उद्योग लागले पाहिजे, त्यांचा माल विकला गेला पाहिजे या साठी ते प्रयत्न करत आहे.
असा आव तात्या आणतात खरे. (काश हे खरे असते!) (अतिअवांतर: ‘काश’करिता कोणी एखादा चांगला मराठी प्रतिशब्द सुचवेल काय?)
प्रत्यक्षात, तात्या हे स्वतःच्या इगोला तात्कालिक बूस्ट देण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी कधीही नि काहीही करत नाहीत. देश (त्यांचा स्वतःचा, किंवा इतर कोणाचाही) खड्ड्यात जरी गेला, तरी त्यांना त्याचे काहीही पडलेले नाही.
(एकच अपवाद आहे. दुसऱ्या एकाच कारणाकरिता ते कधी काही करू शकतात. ते कारण म्हणजे, त्यातून त्यांना जर काही वैयक्तिक आर्थिक लाभ होणार असेल, त्यातून त्यांच्या स्वतःच्या खिशात थेट जर काही पैसे पडणार असतील, तर. आणखी तिसरी शक्यता संभवत नाही.)
पण पाकिस्तानी मूर्ख नाहीत
याबद्दल नक्की खात्री नाही. पाकिस्तानी अवाम (जनता) महामूर्ख आहे, याबद्दल आमच्या मनात फारसा संदेह नाही. पाकिस्तानी establishment (सेना, राजकारणी, आणि पंजाबी elite) ही अत्यंत स्वार्थी, आपमतलबी, अविश्वासार्ह, कातडीबचावू (आणि बाय डीफॉल्ट खोटारडी!) आहे, एवढे निश्चित; मूर्ख… आता तुम्ही म्हणताय, तर नसेलही कदाचित, परंतु… मूर्ख समजा जरी नसली, तरी फारशी brightही नसावी. (चूभूद्याघ्या.)
बाकी, सकाळीसकाळी ऑफ ऑल द पीपल तुमच्याकडून ऑफ ऑल द पीपल पाकिस्तान्यांबद्दल compliment वाचून आश्चर्य वाटले. असो.
आणि मुनीर झेलेंस्की ही नाही.
यातून नक्की काय म्हणायचे आहे, ते कळले नाही. झेलेन्स्की स्वतःच्या देशाकरिता लढत आहे; मुनीरबाबत तसे म्हणता येणार नाही, हा (माझ्या मते) या दोघांमधला महत्त्वाचा फरक आहे. असे जर काही सुचवीत असाल, तर बहुधा सहमत आहे.
पण तात्यांना भारतसोबत संबंध चांगले ठेवायचे आहे
भारताचे आणि अमेरिकेचे संबंध सुधारले, किंवा बिघडले, यांपैकी काहीही जरी झाले (आणि त्यातून अमेरिकेचा फायदा किंवा नुकसान यांपैकी काहीही जरी झाले), तरी तात्यांना त्याचे काहीही पडलेले नाही; त्यांना त्याचे सोयरसुतक नाही.
(पुन्हा सांगतो: तात्या कोठलीही गोष्ट फक्त दोनच कारणांकरिता करू शकतात: एक तर वैयक्तिक इगोसाठी, नाहीतर वैयक्तिक लाभासाठी. तिसरी शक्यता संभवत नाही.)
आणि तालावर नाचायचे ही आहे.
(तुम्हाला ‘नाचवायचे’ म्हणायचे असावे, असे गृहीत धरतो.)
हं, हे बरोबर आहे. त्याने तात्यांचा इगो प्रचंड सुखावतो! (इतर कोणतेही कारण नाही.)
त्यामुळे भारताबाबत रोज त्यांचे विधान बदलत राहतात.
भारताबाबतची (किंवा फॉर्दॅटमॅटर कशाहीबाबतची) तात्यांची विधाने रोज बदलत राहतात, याचा तुम्ही म्हणता त्यापैकी कशाशीही संबंध नाही. तात्या रोज विधाने बदलतात, ही तात्यांची पद्धत आहे (किंवा सवय आहे म्हणा); अन्य काहीही नाही.
तुम्ही त्यांच्या विधानांतून नको तितका अर्थ वाचू पाहात आहात, एवढेच नम्रपणे सुचवावेसे वाटते.
यालाच कोमात जाणे म्हणतात.
याबद्दल साशंक आहे. परंतु, मराठी तरुणाईच्या lingoशी, (१) मी महाराष्ट्रात राहात नसल्याकारणाने, आणि, (२) त्या वयोगटातील नसल्याकारणाने, मी तितकासा परिचित नाही, अत एव, त्यातला मी तज्ज्ञ तर निश्चितच नाही. त्यामुळे, माझी समजूत कदाचित चुकीचीही असू शकेल. कदाचित तुम्ही त्या lingoशी माझ्याहून अधिक परिचित असणे अगदीच असंभव नाही. (तुम्हीसुद्धा महाराष्ट्रात राहात नसलात, नि तुम्ही माझ्याहूनही अधिक वयोवृद्ध असलात, तरीही.) त्यामुळे, तुमचे म्हणणे बरोबर नाहीच, असे मी खचितच म्हणू शकत नाही. सबब, I bow to possibly superior knowledge.
असो. बाकी तुमचे चालू द्या.
(अतिअवांतर: Correct me if I’m wrong, परंतु…)
भारत कधीच आपले एयर फील्ड अमेरिकेला वापरू देणार नाही.
देऊ नये, याबद्दल सहमत आहे. परंतु, आता कधीच देणार नाही म्हणताय, तर…
माझी आठवण जर मला दगा देत नसेल, तर, ९/११ जेव्हा घडले, त्याच्या लगेच नंतरच्या काळात (मला वाटते वाजपेयींचे सरकार होते तेव्हा. (चूभूद्याघ्या.)), तत्कालीन भारत सरकारने, अफगाणिस्तानातील तत्कालीन तालिबान सरकारच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले करण्याप्रीत्यर्थ, आपली विमानक्षेत्रे अमेरिकेस तात्कालिक स्वरूपात वापरू देण्याची ऑफर केली नव्हती काय? (तत्कालीन वर्तमानपत्रांतून वाचल्याचे अंधुकसे आठवते.)
(अमेरिकेने ती ऑफर स्वीकारली नाही — किंबहुना, तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून, पाकिस्तानी विमानक्षेत्रे वापरून आपला कार्यभाग सिद्धीस नेला — ही गोष्ट वेगळी. तसेही, अमेरिकेच्या दृष्टिकोनातून, (१) भारतीय विमानक्षेत्रे वापरणे हे (भौगोलिक कारणांमुळे) तितकेसे सोयिस्कर ठरले नसते, तथा (२) पाकिस्तानी विमानक्षेत्रे वापरणे हे (अनेक कारणांमुळे) सोयिस्कर तथा फायदेशीर होते, ही गोष्ट पूर्णपणे वेगळी. मुद्दा तो नाही. (माझी आठवण चुकीची नसल्यास) तत्कालीन (पक्षी: वाजपेयींच्या) भारत सरकारने अशी ऑफर केली होती, एवढेच दर्शविण्याचा माझा उद्देश होता.)
(चूभूद्याघ्या.)
असो चालायचेच.
बिना डोके वापरता
"बिना डोके वापरता प्रतिसाद लिहिले आहेत" असे आपण म्हणता ते माझ्याबाबतीत अगदी खरे आहे. गेल्या अकरा वर्षांपासून मी स्वतः विचार करणे बंद केले आहे. WhatsApp forwards आणि या लेखासारखे माहितीपूर्ण लेख वाचूनच आता कुणाची भक्ती करायची / कुणाचा द्वेष करायचा हे ठरवतो.
अशाच एका (आणि अनेक) लेखांमधून हे मत ठाम झाले होते की मा. ट्रम्प जे करतात ते "आपल्या" फायद्याचे असते (आज तसे वाटत नसले तरी) यावर शंका घेण्याचे पातक फक्त देशविघातक व्यक्तीच करतात.
पण आता हे बदलले असेल तर तसे समजून चालू.
फक्त एक विनंती अशी की उद्या माननीय विश्वगुरूंच्या कुठल्याही निर्णयाबद्दल/ धोरणाबद्दल अशी शंका घेतलीत तर ते आम्ही मान्य करूच शकणार नाही - आम्ही "रेघ" तिथे ओढली आहे!
फक्त हा धागा नाही. एकूणच इतर धागे गृहीत धरुन एक शंका
तुम्हाला एकुणात भाजपचे सारे सारे बरोबरच वाटते का? सध्या मी भाजपच्या बाजूने नाही, भारत सरकारच्या बाजूने आहे, म्हणण्याची सोय आहे. पण जरा विचार करुन बघा.
मागच्या दहा अकरा वर्षांत ह्या सरकारच्या गोष्टी खटकल्याबद्दल तुम्ही कधी उल्लेख केला आहे का? किती प्रमाणात केला आहे?
एकशे चाळीस कोटी नागरिकांचे सरकार ही मोठी, अजस्त्र , महाकाय यंत्रणा आहे. त्यात सारेच नेहमीच बरोबर कसे असेल?
त्यातले तुम्हास कधी काही खटकले का?
खटकले नसल्यास तुमच्यात अन् प्रचारपत्र, मुखपत्र ह्यात फरक तो काय?
कुठल्याही मुद्द्यावर साधारण मांडणी ही फक्त dash dash dash ...."आणि म्हणून भाजपचे/सरकारचे बरोबरच आहे" ही template असेल तर त्याला कितपत गांभीर्याने घ्यायचं?
मस्त प्रतिसाद !! आवडला !!
मस्त प्रतिसाद !! आवडला !!
थोडा बदल करुन कुठेही वापरता येईल ! :)
------------------------------
तुम्हाला एकुणात भाजपचे सारे सारे चूकच वाटते का? सध्या मी डाव्यांच्या बाजूने नाही, भारत सरकारच्या बाजूने आहे, म्हणण्याची सोय आहे. पण जरा विचार करुन बघा.
मागच्या दहा अकरा वर्षांत ह्या सरकारच्या गोष्टी आवडल्याबद्दल तुम्ही कधी उल्लेख केला आहे का? किती प्रमाणात केला आहे?
एकशे चाळीस कोटी नागरिकांचे सरकार ही मोठी, अजस्त्र , महाकाय यंत्रणा आहे. त्यात सारेच नेहमीच चूकच कसे असेल?
त्यातले तुम्हास कधी काही आवडले का?
आवडले नसल्यास तुमच्यात अन् नवाचा भोंगा ह्यात फरक तो काय?
कुठल्याही मुद्द्यावर साधारण मांडणी ही फक्त dash dash dash ...."आणि म्हणून भाजपचे/सरकारचे चूकच आहे" ही template असेल तर त्याला कितपत गांभीर्याने घ्यायचं?
-------------------
=))
टीका कुणावर करावी?
जन्माला आल्यापासून, काहीकिंचित कळायला लागल्यावर आपल्याला आजूबाजूची सत्तेची उतरंड समजायला लागते. घरात आई-वडलांची सत्ता चालते, हे आपल्याला समजतं. शाळेत शिक्षकांची; शिक्षकांवर मुख्याध्यापकांची; आणि नोकरीच्या ठिकाणी बॉस, बॉसची बॉस वगैरे. नागरिक म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था, आणि पंतप्रधान, गावगुंड असे सगळे सत्ताधारी असतात.
कधी आपणही सत्ताधारी असतो. घरी धाकटी भावंडं असतात; कुणी नातेवाईकांची मुलं आपल्या घरी शिकायला येतात; शाळेत कुणी मॉनिटर होतात; कधी ऑफिसात पदोन्नती होते आणि आपल्या हाताखाली लोक काम करतात.
यांत आपल्यापेक्षा वरच्या, अधिक सत्ता असणाऱ्यांवर टीका आणि विनोद करणं सर्वमान्य असतं. हल्लीच मी माझ्या एका बॉसला सांगितलं, "मला तुझ्याबरोबर काम करायला आवडतं; आणि आपण एकमेकांबद्दल काय वाट्टेल-ते-विनोद करतो हेही त्यामागचं एक कारण आहे." तर त्याचा चेहरा लाल झालेला व्हिडिओमध्येही दिसला. आम्ही एरवी नियमितपणे कामासंदर्भात वाद घालतो.
"तुम्ही कधी सरकारची प्रशंसा करता का?" किंवा "तुम्ही कधी बॉसला शाबासकी देता का?" हे प्रश्न निरर्थक आहेत. जिथे कुठे सत्तेची उतरंड आहे - म्हणजे सगळीकडेच - तिथे खालच्यांनी वरच्यांवर टीका करणं आणि वरच्यांनी ती टीका किमानपक्षी सहन करणं आणि खरं तर त्या टीकेतून योग्य बोध घेणं अपेक्षित असतं.
सध्याचं सरकार स्वतःची पाठ चिकार वेळा थोपटून घेतंच. 'वॉर रुकवा देणारे पॉपॉ' आणि त्यांची स्वस्तुती आम्हांस चांगलीच चिरपरिचित आहे. त्यासाठी आम्ही कशाला तोंडची वाफ दवडावी!
खास रे
२०१७मध्ये हे नाव वापरायला सुरुवात झाली. ऐसीच्या २०१८च्या दिवाळी अंकात 'खास रे' च्या संजयच्या मुलाखतीत त्याबद्दल काही माहिती मिळेल. (मुलाखतीचा दुवा)
अफवा (अवांतर)
या मागच्या वीकांती, तात्या वारले, अशी एक अफवा आंतरजालावर जबरदस्त पसरून गेली, असे वाचनात आले.
सुदैवाने म्हणा, वा दुर्दैवाने म्हणा, वा कसेही म्हणा, परंतु, त्या अफवेत काही तथ्य असल्याचे आढळले नाही.
मात्र, निव्वळ निराशेचे निराकरण करण्याकरिता लोक कोठल्या थराला जाऊ शकतात, याची चुणूक मिळाली, इतकेच.
असो चालायचेच.
नक्की काय?
काही महिन्यापूर्वी "बिडेन" यांच्याबद्दलच्या एका धाग्यावर असे समजले की "तात्यांना विरोध फक्त देश विघातक व्यक्तीच करतील" - ते वाचून आम्ही तात्यांचे भक्त झालो होतो - आता हे काय नवीनच?