असदुद्दीन ओवैसी
भारतातील राजकीय परिप्रेक्ष्यात असदुद्दीन ओवैसी हे एक महत्त्वाचे नाव आहे. ते "ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लेमीन" (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष असून, मुस्लिम समुदायासाठी कार्य करणारे एक प्रमुख नेते आहेत. ओवैसी यांनी देशाच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला काही फायदे होऊ शकतात. या निबंधात आपण त्यांचे पंतप्रधान झाल्यास भारताला काय फायदे होऊ शकतात हे पाहणार आहोत.
धार्मिक समता आणि सामाजिक न्याय
असदुद्दीन ओवैसी हे कायमच मुस्लिम समुदायाच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी लढत आले आहेत. त्यांचा पंतप्रधान झाल्यास भारतात धार्मिक समतेचा आणि सामाजिक न्यायाचा आदर्श जास्त ठोस होऊ शकतो. ओवैसी यांनी नेहमीच "धार्मिक भेदभाव" आणि "समाजात असमानता" विरोधात आपले मत व्यक्त केले आहे. मुस्लिम समाजाच्या समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांच्या अधिकारांची रक्षा करणे, त्यांचे पंतप्रधानपदातील एक मोठे उद्दिष्ट ठरू शकते.
आंतरधार्मिक संवाद आणि सलोख्याचा प्रचार
भारत एक बहुधार्मिक देश आहे, आणि प्रत्येक धर्माच्या अनुयायांना समान हक्क देणे हे महत्त्वाचे आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली भारतात विविध धर्मांतील संवाद वाढू शकतो. ते नेहमीच परस्पर सुसंवादाचे समर्थन करतात आणि विविध धर्मीय समुदायांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्यावर भर देतात. पंतप्रधान झाल्यावर ते भारतातील विविध धर्मीय समुदायांसाठी एकात्मतेचा संदेश देऊ शकतात.
धार्मिक आस्थेवर आधारित राजकारणाचे विरोध
ओवैसी हे धार्मिक आस्थांवर आधारित राजकारणाच्या विरोधात आहेत. त्यांची भूमिका स्पष्ट आहे की, राजकारण आणि धर्म यांना वेगळे ठेवावे लागेल. पंतप्रधान झाल्यावर ते धर्मनिरपेक्षतेचा पक्का आधार घेऊन भारतात कायद्याच्या समतोलतेला महत्त्व देतील. हे समाजातील धार्मिक तणाव कमी करण्यात मदत करू शकेल.
आर्थिक विकास आणि मुस्लिम समुदायाच्या सशक्तीकरणासाठी उपाय
असदुद्दीन ओवैसी यांनी कायमच मुस्लिम समुदायाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक स्थितीत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. ते शैक्षणिक संधींमध्ये सुधारणा, व्यवसायातील सहभागीता वाढवण्याचे, तसेच सामाजिक सुरक्षा वाढवण्याचे प्रयत्न करतात. पंतप्रधान झाल्यावर, ते त्यांचा प्रभाव वापरून मुस्लिम समाजासाठी अधिक समृद्धी आणू शकतात.
जातिवादाच्या विरोधातील संघर्ष
ओवैसी हे जातिवादाच्या आणि दलित समुदायांच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करतात. ते कायमच "हिंदू-मुस्लिम" भेदभाव आणि जातिवादाच्या विरोधात उभे राहतात. त्यांच्या नेतृत्वाखाली, भारतात जातिवादाच्या विरोधात कडक धोरणे तयार केली जाऊ शकतात, ज्यामुळे समाजातील सर्व वर्गांना समान संधी मिळतील.
महिला सशक्तीकरण
असदुद्दीन ओवैसी यांनी नेहमीच महिलांच्या हक्कांचा पुरस्कार केला आहे. त्यांचा विश्वास आहे की मुस्लिम महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना शिक्षण आणि स्वावलंबनाची संधी द्यायला हवी. त्यांच्या नेतृत्वाखाली, महिलांच्या हक्कांसाठी प्रभावी उपाययोजना लागू केली जाऊ शकतात. पंतप्रधान म्हणून ते महिलांसाठी संधी, सुरक्षेचे वातावरण आणि समर्पित धोरणे तयार करू शकतात.
राष्ट्रीय एकतेला चालना
भारत हा एक विविधतेने परिपूर्ण देश आहे, आणि असदुद्दीन ओवैसी यांचे नेतृत्व विविधतेत एकतेचा संदेश देऊ शकते. ते देशाच्या एकतेला महत्त्व देतात आणि त्यांचे पंतप्रधानपद भारतातील विविधतेला आदर देणारे ठरू शकते. भारताच्या राष्ट्रीय एकतेसाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरू शकते.
निष्कर्ष:
असदुद्दीन ओवैसी हे एक दिग्गज नेते आहेत ज्यांचे राजकारणामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या पंतप्रधानपदावर असलेल्या प्रभावामुळे भारताला अनेक फायदे होऊ शकतात. त्यांच्या नेतृत्वाखाली, भारतात धार्मिक समता, सामाजिक न्याय, जातिवादाच्या विरोधात कडक उपाय, आर्थिक सुधारणा आणि महिला सशक्तीकरण यांचा ठोस प्रभाव पडू शकतो. ओवैसी यांचे पंतप्रधानपद भारताच्या समृद्ध भविष्यात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरू शकते.
(लेखन सहाय्य - कृबु)
सर्व मान्य केले तरी
एक गोष्ट सत्य आहे अगदी कटू सत्य आहे.
भारत फक्त कागदावर च धर्मनिरपेक्ष देश आहे.
रिअल मध्ये बिलकुल नाही.
भारतात फक्त कागदावर च कायदा सर्वाना एक सारखा आहे किंवा कायद्या समोर सर्व सामान आहे.
पण रिअल मध्ये भारतात ती स्थिती नाही.
फक्त कागदावर च भारत लोकशाही देश आहे.
रिअल मध्ये बिलकुल नाही.
त्या मुळे ओवासी कधीच भारताचे पंतप्रधान बनू शकत नाहीत hi रिऍलिटी आहे
उपयोग काय?
ओवैसी हे भारताचे पंतप्रधान होण्यास पात्र१ आहेत किंवा नाहीत, भारतीय पंतप्रधान होण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय पातळीवर त्यांचा अथवा त्यांच्या पक्षाचा राजकीय clout/दबदबा/प्रभाव आजमितीस पुरेसा आहे किंवा नाही, झालेच तर, AIMIMसारख्या उघडपणे मुख्यतः एका विशिष्ट संप्रदायाच्या उदयाकरिता तथा हक्कांकरिता झटू पाहणाऱ्या२ एखाद्या राजकीय पक्षास बहुमताने निवडून देण्यास३ भारतीय मतदार तयार होईल, किंवा कसे, किंवा, फार कशाला (डॉ. मनमोहनसिंहांचा अपवाद सोडून द्या, परंतु) एखादा बिगरहिंदू (आणि, त्यातही — तौबा, तौबा, परंतु — मुस्सलमान!) पंतप्रधान पचविण्यास भारतीय समाजमन अद्याप तयार झालेले आहे की नाही४…
…या सर्व फार पुढच्या (आणि फ़िज़ूलच्या) गोष्टी आहेत. (ते पंतप्रधान बनल्यास भारतास त्यातून फायदा होईल, किंवा कसे, ही तर त्याहूनही पुढची गोष्ट.)
मुळात पंतप्रधानपदात (वा त्या दृष्टीने प्रयत्नसुद्धा करण्यात) आपल्यास काडीमात्र रस नाही, असे स्वतः श्री. ओवैसी यांनी घोषित केलेले आहे, म्हटल्यावर…
प्रस्तुत लेखाचा पाया फ़िज़ूल आहे (चूभूद्याघ्या.), इतकेच अतिशय विनम्रपणे सुचवावेसे वाटते.
असो चालायचेच.
(टीप: प्रस्तुत प्रतिसाद लिहिताना कृबुचे यत्किंचितही साहाय्य घेतलेले नाही. (ते कसे घ्यायचे, याबद्दल मला आजमितीस यत्किञ्चितही कल्पना नाही — नि माहीत करून घेण्याचा प्रयत्नदेखील करून पाहिलेला नाही — ही बाब अलाहिदा.) मात्र, कृबुबरोबर — Artificial Intelligenceबरोबर — आपल्या Natural Stupidityनिशी टक्कर देण्यात वेळ अथवा शक्ती व्यतीत करण्यात इतःपर अजिबात रस नाही.
(आपले स्वतःचे मुद्दे अवश्य मांडावेत; त्यांचा वाटल्यास, जमल्यास, नि यथाशक्ति परामर्श घेण्यास आनंदच आहे.)
तूर्तास इतकेच.)
१ म्हणजे, केवळ त्यांच्या राजकीय कर्तृत्वामुळे (whatever that may be), अन्य काही नाही. अन्यथा, ते भारताचे एक नागरिक आहेत, या दृष्टीने काहीच अडचण नसावी.
२ ‘जय भीम, जय मीम’सारख्या घोषणा देऊन हिंदूंमधील दलितांना आपल्या बाजूस वळवून घेण्याचा कितीही प्रयत्न जरी केला (अथवा अगदी त्यांच्यासोबत राजकीय युती२अदेखील जरी केली), किंवा, ‘हिंदूंशी आमचे काहीही वाकडे नाही’ अशा अर्थाची कितीही जाहीर विधाने (आणि कितीही प्रामाणिकपणे२ब) जरी केली, किंवा, पहलगाममध्ये घडलेल्या प्रकाराचा कितीही जाहीर निषेध जरी केला (आणि त्यातील पीडितांप्रति कितीही जाहीर सहानुभूती जरी दर्शविली), फार कशाला, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ नि ‘भारत ज़िंदाबाद’च्या जाहीर घोषणा उच्च कंठरवानिशी कितीही जरी केल्या (आणि, अगोदर म्हटल्याप्रमाणे, हे सर्व कितीही प्रामाणिकपणे (benefit of doubt included) जरी केले), तरीसुद्धा, AIMIM हा प्राथमिकतः तथा प्रामुख्याने (१) मुस्लिम समाजाच्या विकासाकरिता, तथा (२) मुस्लिम समाजाच्या हक्कांकरिता, लढण्यास वाहून घेतलेला पक्ष आहे, हे खुद्द AIMIMसुद्धा अमान्य करणार नाही. (यात काही गैर आहे, असे म्हणण्याचा इरादा नाही, परंतु, त्या परिस्थितीत, व्यापक पातळीवरील भारतीय (आणि विशेषेकरून मुस्लिमेतर) मतदार त्यांना नक्की काय म्हणून मोठ्या प्रमाणात पाठिंबा देईल, एवढाच प्रश्न आहे.)
२अ ‘राजकीय युती’ या प्रकाराबद्दलच जर बोलायचे झाले, तर (इंग्रजीबद्दल क्षमस्व, परंतु) in the longer run, it does not mean anything one way or the other. तसे तर इंग्रजी राजवटीच्या काळात (सावरकरांच्या) हिंदुमहासभेने (जीनांच्या) मुस्लिम लीगबरोबर (सावरकरांच्या आशीर्वादाने) युती करून (प्रांतीय पातळीवर) संयुक्त सरकारे चालविल्याची उदाहरणेदेखील आहेत. किंवा, अर्वाचीन काळात, (correct me if I am wrong, परंतु) शिवसेनेने वेगवेगळ्या वेळी कधी भाजपबरोबर तर कधी काँग्रेसबरोबर युती करून (राज्यपातळीवरील) सरकारे स्थापलेली आहेत. तेव्हा, ‘राजकीय युती’ या प्रकारास ‘राजकीय पक्षांची तात्कालिक सोय’ याहून अधिक महत्त्व निदान मी तरी देणार नाही. (शिवाय, ‘Politics makes strange bedfellows’ असे जे म्हणतात, तेही खरेच.) असो.
२ब I, for one, am perfectly willing to give him the benefit of the doubt on that one.
३ भारतीय जनता पक्षास जर देऊ शकतो, तर AIMIMला का नाही, असा प्रश्न येथे उपस्थित केला जाऊ शकतोच. मात्र, येथे दोन गोष्टी लक्षात घेणे प्राप्त आहे. एक म्हणजे, भारतीय मतदार हा (राजकीय मतभेद notwithstanding) प्रामुख्याने हिंदू आहे. तो (अगोदर म्हटल्याप्रमाणे) प्रामुख्याने मुस्लिमांच्या विकासाकरिता तथा हक्कांकरिता झटणाऱ्या पक्षास (मग ही राजकीय उद्दिष्टे भले कितीही प्रशंसनीय अथवा इष्ट — अगदी व्यापक भारतीय दृष्टिकोनातूनसुद्धा — जरी असली, तरीही) नक्की काय म्हणून बहुमताने उचलून धरेल? (What’s in it for me? हा कोठल्याही मतदाराचा प्राथमिक प्रश्न नसतो काय?) हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे, भारतीय जनता पक्षाससुद्धा ‘सब का साथ, सब का विकास’ वगैरे बाता कराव्या लागतातच!
४ श्रीमती सोनिया गांधी यांना पंतप्रधान करण्याचा प्रश्न जेव्हा आला, तेव्हा त्याविरुद्ध नाही नाही ते घटनाबाह्य आक्षेप घेऊन गदारोळ उठविला गेला होता, तो अद्यापही विस्मरणात गेलेला नाही. (श्रीमती सोनिया गांधी या एक चांगल्या, सक्षम पंतप्रधान होऊ शकल्या असत्या वा नसत्या, ही बाब पूर्णपणे अलाहिदा. मात्र, भारतीय घटनेनुसार, भारताचा/ची पंतप्रधान होण्याकरिता भारताचे जन्मसिद्ध नागरिकत्व ही पूर्वअट (अद्याप तरी) नाही (केवळ भारतीय नागरिकत्व आवश्यक आहे), ही बाब लक्षात घेता, त्यात आक्षेपार्ह (अथवा गदारोळ उठविण्याजोगे) असेही काही नव्हते, एवढाच मुद्दा आहे.)
जय कृबुराम
निबंधाला १० पैकी ७.८६ गुण