कालोऽह्ययं निरवधि:
कालोऽह्ययं निरवधि:
=========
-राजीव उपाध्ये
माझी लेक काल तिच्या एका अमराठी वर्गमित्राच्या लग्नासाठी दिल्लीवारी करून आली. आल्याआल्या हातातले सामान खाली ठेवता क्षणी मॅडमनी रिपोर्टींग चालू केले.
"बाबा, त्या दोघांनी नातेवाईकांना आणि भटजीबुवांना स्पष्ट ठण्काऊन सांगितले. आम्ही विधी करत आहोत ते नातेवाइकांच्या हौशीसाठी, पण ते होतील आम्ही सांगू तसे. ही अट मान्य असेल तरच आम्ही ’विधीवत्’ लग्न करू."
माझी उत्सुकता अर्थातच ताणली गेली. सध्याच्या ’सनातनी’ वातावरणात मला कुणी परंपरेला किंवा संस्कृतीला वाकवताना दिसलं की मला त्याचं जाम कौतूक वाटतं. त्यात सध्या मी नको नको ती अक्कल शिकविणार्यांकडून पुरता गांजून गेलो आहे.
"मग त्यांनी नक्की केलं काय?" मी विचारले.
"बाबा, त्या दोघांनी प्रथम त्यांच्या पंडिताकडून पारंपरिक विधी समजाऊन घेतले. मग त्या दोघांनी पुरुषवर्चस्वाचे निदर्शक, नवर्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला अपमानकारक अशा सर्व रिवाजांना कचर्याची टोपली दाखवली. उदा० कन्यादान नाकारले (हवे असेल तर पुत्रदान पण करा). सर्व विधींमध्ये नवरा आणि नवरी एका स्थानावर येतील अशा सुधारणा सुचवल्या. भटजीबुवाना दक्षिणेशी कर्तव्य असल्याने त्यांनी त्या आडमुठेपणा न करता मान्य केल्या, हे विशेष!"
सध्या माझ्या मनात आंबेड्करांसारखे "मरताना हिंदू म्हणून मरायचे नाही" किंवा रसेलच्या पावलावर पाऊल टाकून "व्हाय आय ॲम नॉट अ हिंदू" असे पुस्तक लिहून मरावे असे विचार बळावत असतात. किंवा इफ़ यु वॉंट मी टू बी अ हिंदू देन इट विल बी ऑन माय टर्म्स एल्स जस्ट फक-ऑफ...
भवभूति अमर रहे!