स्मार्ट मिटर समस्या - एक उपाय
श्री० नरेन्द्र मोदी
पंतप्रधान
भारतीय संघराज्य
स०न०वि०वि०
देशात सध्या अनेक मुद्द्यांवरून देशवासीयांचा उद्रेक बघायला मिळत आहे. त्यातल्या स्मार्ट मिटर वरून होणार्या उद्रेकामुळे मी एक सामान्य नागरिक म्हणून मी चिंतित आहे.
स्मार्ट मिटरच्या संस्थापनाचा (इन्स्टॉलेशन) कार्यक्रम जर स्मार्टपणे राबवला गेला असता तर आज असा उद्रेक बघायला मिळाला नसता.
पण आज देशात राजकारण्यांना कल्पक लोकांना नामोहरम आणि नाउमेद करण्यात धन्यता वाटत असल्याने देशापुढचे प्रश्न हाताबाहेर गेले आहेत.
सध्याच्या समस्येचा माझ्या दृष्टीने उपाय एकच - आज तंत्रज्ञान इतके प्रगत आहे की टप्प्याटप्प्याने स्मार्टनेस वाढवत नेणारी (increamental smartness i) मिटरर्स निर्माण करणे तत्त्वत: शक्य आहे. बर्याचवेळा डॉ० हळूहळु औषधाचा डोस वाढवतात तसेच...
एकाही आय० ए० एस० अधिकार्याला जर हे सुचले नसेल तर ते त्यांना अतिशय लांछनास्पद आहे.
आपण माझ्या कल्पनेचा गंभीरपणे विचार कराल अशी आशा करतो...
कळावे
राजीव उपाध्ये
Prepaid मीटर ला विरोध aahe
Prepaid मीटर ला लोक विरोध करत आहेत आणि तो योग्य च आहे.
स्मार्ट मीटर हा prepaid मीटर च आहे असे खूप लोकांना वाटत.
आणि भारतीय व्यवस्थे चे nature बघता स्मार्ट मीटर prepaid मीटर च असणार.
कारण detail माहिती अधिकृत सरकारी निवेदनात नाही.