Skip to main content

आंतरजाल

मराठी सर्च इंजीन

Taxonomy upgrade extras

तुमच्या पैकी कोणी Google वर मराठीतून सर्च करता का? तुमचे इंग्रजी सर्च च्या तुलनेत मराठी सर्च terms/विषय वेगळे असतात का? Relevant पाने सापडतात का नेहमी?

मला वाटतं लोकं काही शब्द वेगवेगळ्या प्रकारे (वेलांटी, अनुस्वार) देवनागरीत लिहीत असल्याने सर्चला अवघड जात असेल. मराठी वर्तमानपत्रातील लेख, ऐसी सारख्या वेबसाइट्स मधल्या चर्चा, वैयक्तिक ब्लॉग शोधायला सोपे जाण्यासाठी काय करता येइल. एक मार्ग म्हणजे लिखाणासोबत English Tags वापरणे. अजून काही..?

आज पुन्हा प्रकाशित करतोय -- खरडफळ्याची वेडसर वळणं!

Taxonomy upgrade extras

*************************सहभागी कलाकाराम्ची परवानगी घेउन धागा पुनः प्रकाशित करत आहे************************************
****अर्थात गवि, चिंज ह्यांनी नुसतच कॉपी-पेस्ट करण्यापेक्षा काही टिप्पणी करायची सूचना केली होती, ते मात्र जमलं नाही बराच विचार करुनही. त्यामुळे तस प्रकाशित करतोय.******

प्रमुख सहभागी कलाकार :-
घनु,बॅटमॅन, मनोबा,अनु राव, मेघना, अनुप ढेरे,विक्षिप्त अदिती, चिंज ,गवि
बोलताना कुठून कोणता विषय कुणीकडं जाइल ह्याचा नेम नसतो. म्हणजे आपण सुरु करतो एक विषय; त्यातून दुसरा उलगडत जातो; दुसर्‍यातून तिसरा.

औरंगाबद, चिंचवड आणि मुंबईच्या लोकांना शिकायचय मराठी !

Taxonomy upgrade extras

इंग्लिश विकिबुक्सच्या माध्यमातून इंग्लिश मधून मराठी शिकण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे. https://en.wikibooks.org/wiki/Marathi हा दुवा आपण पाहू शकता. Marathi language portal/translations येथील आलटून पालटून माहितीच्या माध्यमातून कोणतीही एक माहिती https://en.wikibooks.org/wiki/Marathi येथे आपोआप निवडली जाते.

आंतरजालावरील मराठी माणसांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि सहभागाचे स्वरूप कसे आहे ?

Taxonomy upgrade extras

आंतरजालावरील मराठी माणसांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि आंतरजालावरील एकुण आणि विशेषतः मराठी आंतरजालावरील सहभाग हे समजून घेण्याचा प्रयत्न करण हा या चर्चा प्रस्तावाचा मुख्य उद्देश्य आहे. हे का समजून घेऊ इच्छितो आहे या मागे काही कारणे आहेत पहिल, मराठी संकेतस्थळांच्या माध्यमातून जे काही शैक्षणिक,सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान होतय त्या मागे सहभागी लोकांच्या कोणत्या शैक्षणिक पार्श्वभूमींनी अधिक प्रभावी राहील्या आहेत, जर विशीष्ट शैक्षणिक पार्श्वभूमी अधिक प्रभावी असतील तर ते प्रभाव नेमके कोणते.

मदतीची चौकशी

Taxonomy upgrade extras

नमस्कार,

मी ऐसी अक्षरे वर प्रथमच लिखाण करीत आहे, कोणी मला लिखाण करताना मध्ये काही फोटो कसे टाकावे आणि तत्याच्या खाली संदर्भ कसा लिहावा या संबधी मार्गदर्शन करू शकेल काय..? मी ऐसी अक्षरे ची ‘ insert image ‘ म्हणून बटन वापरून पाहिली पण तिथे मला फोटोच्या लिंक विचारली गेली आणि लिंक टाकल्यावरही ‘प्रीव्यू’ मधे फोटो दिसले नाहीत..

उदाहरणार्थ
- लेखन
- मग काही फोटो
- परत लेखन

धन्यवाद.

'ऐसीला विचारा ' : घरगुती व जनरल प्रश्न - भाग ३

Taxonomy upgrade extras

याआधीचा भागः-२

व्यवस्थापकः अश्या लहान प्रश्नांसाठी माहितीसाठी हे सदर ऐसीवर सुरू असतं. वाचकांच्या सोयीसाठी या धाग्याचे रुपांतर त्या सदराच्या पुढिल भागात करत आहोत
========

मला Japanese interior design याबद्दल माहीती हवी आहे.
कमीत कमी सामान आणि जागेचा अधिक वापर अशाप्रकारच्या design चा कुणाचा अभ्यास असेल तर कळवावे.

हा धागा 'माहीती' मध्ये टाकायला हवा होता का?पण मला माहिती द्यायची नसून माहिती घ्यायची आहे. त्यामुळे चर्चामध्ये टाकलाय.