Skip to main content

टीव्ही मालिका

सोनी टीव्ही: पेशवा बाजीराव मालिका

सोनी TV वर हिंदीतून २३ जानेवारी २०१७ पासून रोज (सोम-शुक्र) संध्याकाळी ७:३० वाजता भव्य दिव्य "पेशवा बाजीराव" मालिका सुरु झाली आहे. पहिला एपिसोड मी बघितला. एका तासाचा होता. मला खूप आवडला. एखादा भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट बघतोय असेच वाटत होते.

उत्तम आणि श्रीमंत निर्मितीमूल्ये आहेत. कलाकारांचा अभिनय छान वाटला. एडिटिंग टाईट आहे. कथा रेंगाळत नाही! यात घटना खूप नाटकीय पद्धतीने पेश केल्या आहेत तरीही त्यामुळेच बघायला इंटरेस्ट वाटतो नाहीतर मग अशा ऐतिहासिक कथा डॉक्युमेंटरी वाटण्याची भीती असते.

समीक्षेचा विषय निवडा

'डाऊनटन ॲबी' : स्मरणरंजनी कळा

'डाऊनटन अॅबी' ही मालिका संपून बरेच महिने लोटले; सगळ्या सीझन्सच्या डीव्हीड्याही आल्या. एवढ्या उशीरा ह्याबद्दल लिहिण्याचं कारण खरडफळ्यावर आदूबाळने डाऊनटनची तुलना 'सांस भी कभी बहू थी'शी केली. ह्यामुळे माझ्या ब्रिटीश स्मरणरंजनी भावना दुखावल्या आणि मी लिहिण्यासाठी उद्युक्त झाले.

समीक्षेचा विषय निवडा