मे दिनवैशिष्ट्य

मे

१०
११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३०
३१

१ मे
जन्मदिवस: अणुभौतिकशास्त्रज्ञ योहान बाल्मर (१८२५), न्यूरोसायन्सचा जनक सांतियागो रमोन इ कहाल (१८३४), अभिनेता बलराज सहानी (१९१३), आधुनिक हिंदी कवी 'अंचल' रामेश्वर शुक्ला (१९१५), गायक मन्ना डे (१९२०), लेखक जोजेफ हेलर (१९२३), वेस्ट इंडियन क्रिकेटपटू गॉर्डन ग्रीनीज (१९५१), तमिळ अभिनेता अजित कुमार (१९७१), अभिनेत्री अनुष्का शर्मा (१९८८)
पुण्यस्मरण: आफ्रिकेचे संशोधक डेव्हिड लिव्हिंगस्टन (१८७३), संगीतकार आंतोनिन द्-वोजाक (१९०४), उद्योगपती कमलनयन बजाज (१९७२), चित्रपट दिग्दर्शक, कवी व लेखक शांताराम आठवले (१९७५), समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे (१९९३), शिक्षणतज्ञ गंगूताई पटवर्धन (१९९८), मराठी वाङ्मयाचे अभ्यासक पंडित आवळीकर (२००२)

--

महाराष्ट्र दिन, गुजरात दिन
आंतरराष्ट्रीय कामगार दिन

१७०७ : इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्या एकत्रीकरणाचा करार होऊन ग्रेट ब्रिटनचे साम्राज्य तयार झाले
१८३४ : इंग्लंडच्या वसाहतीतून गुलामगिरीची प्रथा कायदेबाह्य
१८४० : चिकटणारा पहिला पोस्टल स्टँप इंग्लंडमध्ये निघाला
१८८६ : आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी अमेरिकेत संप सुरू झाला
१९१६ : 'जाझ' ही संज्ञा अमेरिकेत विशिष्ट संगीतप्रकाराला वापरली जाऊ लागण्याची सुरुवात.
१९२७ : विमानांमध्ये शिजवलेलं जेवण देण्याची सुरुवात इंपीरीयल एअरवेजने लंडन-पॅरिस प्रवासापासून केली
१९३० : प्लुटोचे नामकरण
१९४१ : ऑर्सन वेल्सदिग्दर्शित 'सिटिझन केन' चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित
१९४५ : हिटलरच्या आत्महत्येच्या पश्चात त्याचा उजवा हात जोजेफ गोबेल्सने आपल्या सहा मुलांना ठार मारले व पत्नीसह आत्महत्या केली.
१९४८ : उ. कोरिया अस्तित्त्वात आले
१९५६ : पोलियोची लस उपलब्ध झाली
१९६० : महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची निर्मिती
१९६१ : क्यूबाचा राष्ट्रप्रमुख फिडेल कास्त्रो याने निवडणूका रद्द करून क्यूबा साम्यवादी राष्ट्र असल्याचे घोषित केले
१९६४ : 'बेसिक' प्रोग्रॅमिंग भाषेतली पहिली प्रणाली (प्रोग्रॅम) कार्यान्वित झाली
१९९३ : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रणसिंघे प्रेमदास आत्मघातकी हल्ल्यात ठार
१९९४ : तीनदा फॉर्म्युला १ विजेता ठरलेला एयर्टन सेना एका ग्रांप्रि शर्यतीदरम्यान अपघातात ठार
१९९९ : जॉर्ज मॅलरी या गिर्यारोहकाचे शरीर ७५ वर्षांनंतर एव्हरेस्ट शिखरावर सापडले
२००३ : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशने इराकमधील युद्ध संपल्याचे जाहीर केले
२००९ : स्वीडनमध्ये समलैंगिक विवाहांना मान्यता

२ मे
जन्मदिवस: लेखक जेरोम के. जेरोम (१८५९), लेखक मिखाईल बुल्गाकोव्ह (१८९१), युरोपमधली सगळ्यात मोठी डिजिटल प्रकाशनसंस्था काढणारा ॲक्सेल स्प्रिंगर (१९१२), गायक पं. वसंतराव देशपांडे (१९२०), दिग्दर्शक सत्यजित राय (१९२१), वेस्ट इंडियन क्रिकेटपटू ब्रायन लारा (१९६९), फुटबॉलपटू डेव्हिड बेखम (१९७५)
पुण्यस्मरण: चित्रकार, शिल्पकार, वास्तुतज्ज्ञ व शास्त्रज्ञ लिओनार्दो दा विंची (१५१९), विचारवंत व संपादक प्रा. दि. के. बेडेकर (१९७३), पॉलिमर्सवर काम करणारा नोबेलविजेता गिलिओ नत्ता (१९७९), चेतापेशींमधल्या संदेशवहनाबद्दल संशोधन करणारा नोबेलविजेता जॉन एकल्स (१९९७), गोवा मुक्तिसंग्रामातील सैनिक पुरुषोत्तम काकोडकर (१९९८), उद्योगपती मोहनलाल पिरामल (२००१)

--

१८६९ : 'फोलीज बर्जर' हा म्यूझिक हॉल पॅरिसमध्ये सुरू. संगीत, गायन, नृत्य, नाट्य इ. ललित कला सादर करण्यासाठीचे युरोपातील हे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र होते
१८७२ : मुंबईत 'व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट म्यूझियम'चे (आजचे भाऊ दाजी लाड संग्रहालय) उद्घाटन
१९२५ : फरीदपूरच्या कॉंग्रेस अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी इंग्रज सरकारला सहकार्याच्या बदल्यात वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी केली
१९४५ : दुसऱ्या महायुद्धात बर्लिन रशियन फौजांसमोर पडले; इटलीचा पूर्ण पाडाव
१९५२ : जगातले पहिले जेट विमान लंडनहून जोहान्सबर्गला निघाले
१९५५ : 'कॅट ऑन अ हॉट टिन रूफ'साठी नाटककार टेनेसी विलिअम्सला पुलित्झर पुरस्कार मिळाला
१९६८ : 'मे ६८' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थी चळवळीची फ्रान्समध्ये सुरुवात. पाश्चात्य समाज, संस्कृती, शिक्षणव्यवस्था, युद्धविरोधी चळवळ यांत आमूलाग्र बदल घडवणारी ही चळवळ होती
१९८२ : 'द वेदर चॅनल'ची सुरुवात
१९८९ : ऑस्ट्रियालगतच्या आपल्या सीमा हंगेरीने खुल्या केल्या. त्यामुळे पूर्व जर्मन पश्चिमेला पळून जाऊ लागले. अखेर याची परिणती बर्लिनची भिंत पडण्यात आणि शीतयुद्धाची अखेर होण्यात झाली
२००८ : 'नर्गिस' चक्रीवादळाचा म्यानमारला तडाखा. १,३८,००० मृत व लाखो बेघर
२०११ : अमेरिकन सैन्याच्या गुप्त मोहिमेत कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा मृत्यू
२०१३ : सरबजीत या पाकिस्तानने पकडलेल्या तथाकथित हेराचा तुरुंगातल्या मारहाणीमुळे मृत्यू

३ मे
जन्मदिवस: लेखक व विचारवंत माकियाव्हेल्ली (१४६९), सिनेदिग्दर्शक भालजी पेंढारकर (१८९८), 'फोक' संगीतकार व गायक पीट सीगर (१९१९), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ स्टीव्हन वाईनबर्ग (१९३३)
पुण्यस्मरण: विचारवंत मॉरिस मर्लो-पाँटी (१९६१), उर्दू कादंबरीचे जनक नजीर अहमद (१९६२), माजी राष्ट्रपती झाकिर हुसेन (१९६९), अर्थतज्ञ आणि विचारवंत धनंजयराव गाडगीळ (१९७१), मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई (१९७७), अभिनेत्री नर्गिस (१९८१), व्यंगचित्रकार वसंत गवाणकर (१९९६), कुटुंब नियोजनात रधोंची साथ देणाऱ्या समाजसेविका शकुंतला परांजपे (२०००), उद्योगपती एम. एस. ओबेरॉय (२००२), लेखक राम शेवाळकर (२००९)

---

जागतिक श्वसनदाह दिन
आंतरराष्ट्रीय सूर्य दिन
जागतिक पत्रकारिता अभिस्वातंत्र्य दिन

राष्ट्रीय दिन : संविधान दिन - पोलंड, जपान
१४९४ : ख्रिस्तोफर कोलंबसला पहिल्यांदा जमैकाचा किनारा दिसला
१७९१ : आधुनिककालीन युरोपातील पहिले लिखित संविधान पोलंडमध्ये कार्यान्वित झाले
१९१३ : पहिला भारतीय चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' मुंबईत प्रदर्शित
१९३९ : गांधीजींच्या अहिंसेच्या धोरणाविरोधात सुभाषचंद्र बोस यांनी 'ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक'ची स्थापना केली
१९५० : चीनने स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व अधिकृतरीत्या अंगिकारले
१९५२ : जोसेफ ओ. फ्लेचर व विल्यम पी. बेनेडिक्ट या अमेरिकन वैमानिकांनी उत्तर ध्रुवावर विमान उतरवले
१९७८ : पहिली स्पॅम मेल पाठवली गेली
२००१ : संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क समितीवरील (UNCHR) सदस्यत्व अमेरिकेने गमावले. १९४७मध्ये समितीची स्थापना झाल्यानंतर प्रथमच असे घडले

४ मे
जन्मदिवस : मध्यकालीन समाजसुधारक बसवेश्वर (११३४), मुघलांशी लढणारा महाराजा छत्रसाल बुंदेला (१६४९), कर्नाटक संगीतकार त्यागराजू (१७६७), उत्क्रांतीच्या सिद्धांताचा खंदा पुरस्कर्ता जीवशास्त्रज्ञ थॉमस हक्सले (१८२५), लेखक ज्योतिंद्रनाथ टागोर (१८४९), गायिका उम कलतूम (१९०४), लेखक बाबा कदम (१९२९), अभिनेत्री ऑड्री हेपबर्न (१९२९), लेखक एमॉस ऑझ (१९३९), 'द हिंदू'चे माजी संपादक एन. राम (१९४५)
पुण्यस्मरण : इंग्रजांविरोधात लढणारा म्हैसूरचा राजा टिपू सुलतान (१७९९), लेखक अनंत काणेकर (१९८०), अलिप्ततावादात भारताचे साथीदार, युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो (१९८०), तबलावादक किशन महाराज (२००६)

----

राष्ट्रीय कोळसा कामगार दिन
आंतरराष्ट्रीय अग्निशामक कर्मचारी दिन
जागतिक दमा दिन
स्वातंत्र्य दिन : लात्व्हिया

१६७५ : 'रॉयल ग्रीनीच वेधशाळे'च्या बांधकामाची आज्ञा दिली गेली.
१७१५ : पहिली घडीची छत्री फ्रान्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध.
१९०४ : अमेरिकेने पनामा कालव्याचे काम सुरू केले.
१९३० : ब्रिटिश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले.
१९४५ : पाच वर्षांच्या नाझी गुलामीनंतर डेन्मार्क पुन्हा स्वतंत्र.
१९५३ : 'The Old Man and the Sea' कादंबरीसाठी अर्नेस्ट हेमिंग्वेला पुलित्झर पुरस्कार.
१९५९ : ग्रॅमी पारितोषिकांची सुरुवात.
१९६७ : त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात पूजा करण्याचा अधिकार सगळ्यांना असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय.
१९७९ : मार्गारेट थॅचर ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
१९९४ : गाझा पट्टी आणि येरिको या पॅलेस्टिनी भागाच्या स्वायत्ततेसाठी इस्राएली नेते यित्झाक राबिन आणि पॅलेस्टिनी नेते यासर अराफत यांच्यात शांती करार.
१९९५ : ‘बॉम्बे’चे अधिकृत नाव बदलून ‘मुंबई’ करण्याचा भाजप-सेना युतीच्या राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय.

५ मे
जन्मदिवस : तत्त्वज्ञ सोरेन कीर्कगार्ड (१८१३), तत्त्वज्ञ कार्ल मार्क्स (१८१८), क्रांतिकारक प्रीतिलता वाडेदार (१९११), राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग (१९१६), विनोदी अभिनेता आणि प्रवाससंदर्भात माहितीपट बनवणारा मायकल पेलिन (१९४३)
पुण्यस्मरण : बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोमरे (१९१८), गायक रामकृष्णबुवा वझे (१९४३), महाराष्ट्राचे पहिले विमा गणिती ग. स. मराठे (१९४५), उद्योगपती नवल एच. टाटा (१९८९), मुलांच्या प्रश्नांचे अभ्यासक व ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ वि. मा. कुलकर्णी (२०००), संगीतकार नौशाद अली (२००६), क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ (२०१२), दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ (२०१७)

---

आंतरराष्ट्रीय दाई दिवस

१८०९ : स्वित्झर्लंडच्या आर्गाउ प्रांताने ज्यू व्यक्तींना नागरिकत्व नाकारले.
१८०९ : अमेरिकेत पेटंट मिळालेल्या पहिल्या महिला मेरी कीस यांना रेशीम आणि धागे वापरून गवत विणण्याच्या कल्पनेचे पेटंट मिळाले.
१८७७ : अमेरिकेच्या सैन्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून सिटिंग बुल या स्थानिक नेत्याने आपल्या लाकोटा जमातीचे कॅनडात स्थलांतर केले.
१८९५ : 'द यलो किड' ही पहिली कॉमिक स्ट्रिप प्रकाशित होऊ लागली.
१९०१ : पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
१९०५ : खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी हाताच्या ठशांचा प्रथम वापर.
१९२१ : कोको शानेलने Chanel Nº 5 हा परफ्यूम बाजारात आणला.
१९४४ : महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका.
१९६३ : यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी. प्रत्यारोपण झालेला हा पहिला अवयव होता.

६ मे
जन्मदिवस : मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्रॉईड (१८५६), स्वातंत्र्यसैनिक मोतीलाल नेहरू (१८६१), फॉस्जीन वायू बनवणारा नोबेलविजेता व्हीक्तर ग्रीनार (१८७१), 'डार्क मॅटर'चं अस्तित्व नोंदवणारा विलम डी सिटर (१८७२), चित्रकार अर्न्स्ट लुडविग किर्शनर (१८८०), सिनेदिग्दर्शक ऑर्सन वेल्स (१९१५), संगीतदिग्दर्शक बुलो सी. रानी (१९२०), प्रकाश हे माध्यम वापरणारा कलाकार जेम्स टरेल (१९४३), अल्पपरिचित कर्तृत्ववान व्यक्तींचा मराठीत परिचय करून देणाऱ्या लेखिका वीणा गवाणकर (१९४३), विचारवंत मार्था नसबॉम (१९४७), टेनिसपटू बियॉं बोर्ग (१९५६), अभिनेता जॉर्ज क्लूनी (१९६१), ऑलिंपिक पदकविजेता नेमबाज गगन नारंग (१९८३)
पुण्यस्मरण : लेखक हेन्री डेव्हिड थोरो (१८६२), समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज (१९२२), पूर्व-प्राथमिक शिक्षणपध्दतीसाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षणतज्ञ मारीया माँटेसरी (१९५२), अभिनेत्री मार्लेन डीट्रिच (१९९२), अभिनेत्री निगार सुलताना (२०००), लेखिका मालती बेडेकर अर्थात विभावरी शिरूरकर (२००१), सतारवादक उस्ताद रईस खां (२०१७), गायक अरुण दाते (२०१८)

--

आंतरराष्ट्रीय "नो-डाएट" दिवस.

१५४२ : फ्रान्सिस झेविअर भारतात (जुने गोवा) इथे पोचला.
१७३९ : चिमाजीअप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली वसई मोहीम फत्ते; उत्तर कोकण मराठेशाहीत.
१८४४ : ग्लासिरीयम या कृत्रिमरित्या बनवलेल्या आईस-रिंकचे उद्घाटन.
१८८९ : आयफेल टॉवर अधिकृतरीत्या जनतेसाठी खुला.
१९४० : जॉन स्टाईनबेकलिखित ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ या कादंबरीस ‘पुलित्झर’ पुरस्कार मिळाला.
१९५४ : रॉजर बॅनिस्टर १ मैलाचे अंतर ४ मिनिटांत पार करणारा पहिला धावपटू ठरला.
१९८४ : कृत्रिम श्वसन न करता एव्हरेस्ट पादाक्रांत करणारा फू दोरजी हा पहिला भारतीय ठरला.
१९९४ : ब्रिटन व फ्रान्सला जोडणाऱ्या चॅनल बोगद्याचे उद्घाटन.
१९९९ : महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांना ३० टक्के आरक्षणाचा निर्णय; असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.

७ मे

जन्मदिवस: अर्थतज्ज्ञ व इतिहासकार डेव्हिड ह्यूम (१७११), कवी रॉबर्ट ब्राऊनिंग (१८१२), संगीतकार योहानस ब्राह्मस (१८३३), संगीतकार चायकॉव्हस्की (१८४०), चित्रकार कास्पर डेव्हिड फ्रीडरिक (१८४०), शिक्षणतज्ज्ञ, नोबेलविजेते लेखक व चित्रकार रविंद्रनाथ टागोर (१८६१), कायदेपंडित आणि प्राच्यविद्या संशोधक भारतरत्‍न पां. वा. काणे (१८८०), अभिनेता गॅरी कूपर (१९०१), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक पन्नालाल पटेल (१९१२), अभिनेता, दिग्दर्शक व लेखक आत्माराम भेंडे (१९२३), लेखिका व पटकथाकार रूथ प्रावर झाबवाला (१९२७)
पुण्यस्मरण: आदिवासींना जंगलात जाण्याचा हक्क मिळण्यासाठी लढणारा क्रांतिकारक अल्लुरी सीता राम राजू (१९२४), समाजसुधारक शिवाजीराव पटवर्धन (१९८६), धृपदगायक नासीर झहीरुद्दीन डागर (१९९४), लोकसंस्कृती, लोकसाहित्याच्या संशोधिका, विचारस्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या लेखिका दुर्गा भागवत (२००२), सीसीडी शोधणाऱ्यांपैकी एक, नोबेलविजेता विलार्ड बॉयल (२०११)

--
एड्समुळे अनाथ झालेल्यांचा जागतिक दिवस
१८२४ : बेथोव्हनच्या नवव्या सिंफनीचे पहिले सादरीकरण
१८७८ : पुण्यात पहिले मराठी ग्रंथकारांचे संमेलन (आताचे साहित्य संमेलन) भरविण्यात आले
१८९५ : अलेक्झांडर पोपॉफने प्राथमिक रेडिओ रिसीव्हर वापरून रेडिओ संदेशवहनाचा प्रयोग यशस्वी केला
१८९९ : रँड वधाच्या प्रकरणी फितुरी करणार्‍या द्रविड बंधूंना ठार मारणाऱ्या वासुदेव चाफेकर यांना फाशी
१९०७ : मुंबईमध्ये विजेवर चालणारी पहिली ट्राम सुरु झाली
१९४५ : जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती. युरोपमधील युद्ध समाप्त - युरोप विजय दिन
१९५२ : जेफ्री डमर याने आधुनिक संगणनाचा आधार असलेल्या 'इंटिग्रेटेड सर्किट्स'ची संकल्पना प्रकाशित केली
१९५४ - १९५५पासून सर्व विषयांसाठी मराठी माध्यम आणण्याचा ठराव पुणे विद्यापीठाच्या विधिसभेत एकमताने मंजूर करण्यात आला
१९७३ : अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरचा पायाभरणी समारंभ
१९७८ : एव्हरेस्टची पहिली ऑक्सिजनरहित मोहीम यशस्वी
१९८० : जागतिक आरोग्य संघटनेने देवी रोगाचे उच्चाटन झाल्याचे जाहीर केले
१९९२ : अंतराळवाहक 'एन्डेव्हर'च्या पहिल्या मिशनला प्रारंभ
१९९४ : नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी

८ मे
जन्मदिवस : इतिहासकार एडवर्ड गिबन (१७३७), 'रेडक्रॉस' सुरू करणाऱ्यांपैकी एक आँरी द्यूनाँ (१८२८), नोबेलविजेता अर्थतज्ज्ञ फ्रीडरिक हायेक (१८९९), सिनेदिग्दर्शक रोबेर्तो रोसेलिनी (१९०६), ग्राफिक डिझायनर सॉल बास (१९२०), पर्यावरणवादी डेव्हिड अटेनबरा (१९२६), गायिका गिरिजा देवी (१९२९), लेखक थॉमस पिंचन (१९३७), लेखिका व सामाजिक कार्यकर्ती नेओमी क्लाईन (१९७०), गायक, अभिनेता एन्रिके इग्लेस्यास (१९७५)
पुण्यस्मरण : अर्थतज्ज्ञ जॉन स्टुअर्ट मिल (१८७३), लेखक ग्युस्ताव्ह फ्लोबेर (१८८०), थिऑसॉफिक सोसायटीची एक संस्थापक सदस्य हेलेना ब्लाव्हात्स्की (१८९१), स्वातंत्र्यवीर वासुदेव चाफेकर (१८९९), चित्रकार पॉल गोगँ (१९०३), छायाचित्रकार इ. मयब्रिज (१९०४), कवी अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे (१९८२), बौद्ध वाङ्मयाचे भाषांतरकार चिंतामण राजवाडे (१९२०), विज्ञानकथालेखक थिओडोर स्टर्जन (१९८५), अभिनेता डर्क बोगार्ड (१९९९), ‘भारतीय व्यवहार कोश’ आणि ‘भारतीय कहावत संग्रह’चे संपादक, कोशकार विश्वनाथ दिनकर नरवणे (२००३), संस्कृत व प्राकृत भाषासाहित्यांचे अभ्यासक अमृत घाटगे (२००३), लेखक मॉरिस सेंडक (२०१२), धृपदगायक झिया फरिदुद्दिन डागर (२०१३)

--

जागतिक रेडक्रॉस दिवस.
वर्धापनदिन : रवींद्र भारती विद्यापीठ, कोलकाता (१९६२)
१७९४ : फ्रेंच राज्यक्रांती - आधुनिक रसायनशास्त्राचा उद्गाता आँत्वान लाव्ह्वाझिएला गिलोटिनवर मृत्युदंड दिला गेला.
१८८६ : डॉ. जॉन पेंबरटन याने 'कोका-कोला'ची निर्मिती केली.
१९१२ : 'द गॉडफादर' व 'श्रेक'सारख्या चित्रपटांचे वितरण करणाऱ्या पॅरामाऊंट पिक्चर्सची स्थापना.
१९३३ : म. गांधींचे २१ दिवसांचे उपोषण सुरू.
१९७८ : रेनहोल्ड मेस्नर व त्याचा सहकारी ऑक्सिजनच्या नळकांड्याविना एव्हरेस्टवर पोहोचले.
१९८४ : शीतयुद्ध - लॉस अँजेलिस येथे होऊ घातलेल्या ऑलिंपिक खेळांवर सोव्हिएत युनियनने बहिष्कार घातला.
२००० : लंडनमध्ये टेट मॉडर्न गॅलरी प्रसारमाध्यमांसाठी खुली झाली. आधुनिक कलेच्या जगातील सर्वात महत्त्वाच्या संग्रहालयांपैकी टेट हे एक आहे.

९ मे
जन्मदिवस: सम्राट राणा प्रताप (१५४०), मराठी व्याकरणकार, लेखक व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८१४), 'ओपल' कारकंपनीचा संस्थापक, अभियंता अॅडम ओपल (१८३७), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१८६०), स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक गोपाळकृष्ण गोखले (१८६६), तुतेनखामेनची कबर शोधणारा पुरातत्वज्ञ हॉवर्ड कार्टर (१८७४), विचारवंत ओर्तेगा इ गॅसे (१८८३), कामगार चळवळ कार्यकर्ते लेखक वसंत नीळकंठ गुप्ते (१९२८), नोबेलविजेता जैवरसायनशास्त्रज्ञ मॅन्फ्रेड आयगन (१९२७), गायक, संगीतकार व पियानोवादक बिली जोएल (१९४९)
पुण्यस्मरण: लेखक फ्रीडरिक शिल्लर (१८०५), कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक (१९१९), प्रकाश निर्वात पोकळीतून प्रवास करतो हे सिद्ध करणाऱ्यांपैकी अल्बर्ट मायकलसन (१९३१), 'रयत शिक्षण संस्थे'चे संस्थापक व समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील (१९५९), एडमंड हिलरीबरोबर एव्हरेस्ट सर करणारा शेर्पा तेनसिंग नोर्गे (१९८६), सिनेदिग्दर्शक अनंत माने (१९९५), गायक तलत मेहमूद (१९९८), गायक पं. फिरोज दस्तूर (२००८)

--

जागतिक थॅलेसिमिया दिवस
स्वातंत्र्य दिन : रोमानिया
मुक्ती दिन : जर्सी, गर्न्सी व ईतर चॅनेल द्वीपे.

१८७३ : जागतिक महामंदीची व्हिएन्नात सुरुवात. ही मंदी पॅरिस, बर्लिन व न्यू यॉर्कपर्यंत झपाट्याने पसरली व तिच्या झळा जगभर लागल्या. ती १८९६पर्यंत चालली.
१८७४ : मुंबईत प्रथम घोड्यांची ट्राम सुरु झाली.
१९४१ : एका जर्मन बोटीतले 'एनिग्मा' सांकेतिक संदेशयंत्र ब्रिटिशांच्या हाती पडले. अ‍ॅलन ट्यूरिंग आणि इतर संशोधकांनी त्याद्वारे जर्मन संदेशांचे कोडे उकलले.
१९५० : युरोपियन युनियनची सुरूवात होण्यासाठी महत्त्वपूर्ण 'शूमन डिक्लरेशन' सादर झाले.
१९५५ : शीतयुद्ध - प. जर्मनीचा नाटोमध्ये प्रवेश. त्याच वर्षी सोव्हिएत रशियानं वॉर्सॉ करारांतर्गत नाटोविरोधात आपली फळी उभारली.
१९५८ : अल्फ्रेड हिचकॉकचा 'व्हर्टिगो' चित्रपट प्रदर्शित.
१९६० : अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या विकण्यास परवानगी. तोंडावाटे घेण्याच्या संततीनियमनाची प्रथम विक्री.
१९७० : व्हिएतनाम युद्धाविरोधात अमेरिकेच्या राजधानीत एक लाखापर्यंत लोकांनी निदर्शने केली.
१९७६ : 'बादर-माइनहॉफ गँग' ह्या विद्रोही टोळीची सदस्य युलरिक माइनहॉफ हिनं तुरुंगात आत्महत्या केली.
२००१ : जगातील सर्वात लांब घरगुती वापराच्या गॅसची लाइन जामनगरपासून लोणीपर्यंत घालण्यात आली. याची लांबी १२४० किलोमीटर आहे.
२००२ : भारतातील अभिमत विद्यापीठांची संख्या ५५पर्यंत पोहोचली.

१० मे
जन्मदिवस: संगीतकार, लेखक आणि चित्रकार उपेंद्रकिशोर राय (१८६३), जगातील सर्वात प्राचीन सिनेकंपनीचा जनक लेआँ गोमाँ (१८६४), सिनेसंगीतकार मॅक्स श्टाइनर (१८८८), नर्तक, अभिनेता व गायक फ्रेड अ‍ॅस्टेअर (१८९९), सिनेनिर्माता डेव्हिड सेल्त्झनिक (१९०२),संगीत‌कार‌, गाय‌क‌ व‌ अभिनेता पंक‌ज‌ म‌लिक‌ (१९०५), गीतकार जगदीश खेबूडकर (१९३२), कवी ग्रेस उर्फ माणिक गोडघाटे (१९३७), लेखिका नयनतारा सहगल (१९२७)
पुण्यस्मरण: चित्रकार होकुसाई (१८४९), संगीतज्ञ जहांगीर खाँ (१९७७), नाटककार पीटर वाइस (१९८२), पत्रकार आणि ‘साधना’ साप्ताहिकाचे माजी संपादक यदुनाथ थत्ते (१९९८), कवी ना. घ. देशपांडे (२०००), कवी, गीतकार, पटकथाकार, संवादलेखक कैफी आजमी (२००२), संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा (२०२२)

--

महाराष्ट्र जलसंधारण दिन.
इ.पू. २८ : सौरडागांचे पहिले ज्ञात निरीक्षण चीनमध्ये नोंदले गेले
१८१८ : तहाद्वारे रायगड इंग्रजांच्या ताब्यात
१७७३ : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला अमेरिकन बाजारपेठेची मक्तेदारी देणारा टी अ‍ॅक्ट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संमत झाला. १६ डिसेंबरची विख्यात 'बॉस्टन टी पार्टी' त्याविरोधात होती
१७७४ : फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान ज्यांची राजवट जनतेने उलथली ते सोळावा लुई व मारी ऑन्त्वानेत फ्रान्समध्ये सिंहासनाधिष्ठित
१८२४ : लंडनमधील जागतिक कीर्तीचे संग्रहालय 'नॅशनल गॅलरी' जनतेला खुले झाले
१८५७ : ब्रिटिशांविरोधात उठावाची पहिली ठिणगी मीरतला पडली
१९३३ : हिटलरच्या राजवटीत ज्यांच्या लिखाणावर बंदी घातली गेली अशा लेखकांची २५,००० पुस्तके नाझींनी बर्लिन येथे सार्वजनिकरीत्या जाळली
१९४० : दुसरे महायुद्ध : विन्स्टन चर्चिलची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती
१९४८ : चीनमध्ये राष्ट्राध्यक्षाला विशेषाधिकार बहाल. ते १९९१पर्यंत टिकले
१९६२ : 'इन्क्रेडिबल हल्क'चे पहिले कॉमिक पुस्तक उपलब्ध
१९६८ : 'नाइट ऑफ द बॅरिकेड्स' - पॅरिसच्या लॅटिन क्वार्टरमध्ये विद्यार्थी व पोलिसदलात रात्रभर चकमकी
१९७५ : सोनीने बेटामॅक्स व्हीसीआर जपानमध्ये बाजारात आणला. ऐंशीच्या दशकात व्हीएचएस फॉर्मॅटने त्यावर बाजी मारली
१९८१ : मुंबईत पहिला विद्युतप्रकाशातला क्रिकेट सामना खेळला गेला
१९९४ : दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या बहुवांशिक विधिमंडळाने प्रचंड बहुमताने नेल्सन मंडेलांना राष्ट्राध्यक्ष निवडले

११ मे
जन्मदिवस: नृत्यांगना मार्था ग्रॅहॅम (१८९४), चित्रकार साल्वादोर दाली (१९०४), लेखक सादत हसन मंटो (१९१२), गायिका व अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे (१९१४), नोबेलविजेता लेखक कॅमिलो होजे सेला (१९१६), नृत्यांगना मृणालिनी साराभाई (१९१८), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाईनमन (१९१८), संगणकशास्त्रज्ञ एट्सखर डाईक्स्ट्रा (१९३०), अभिनेता सदाशिव अमरापूरकर (१९५०)
पुण्यस्मरण: गणितज्ञ व खगोलज्ञ जॉन हर्शेल (१८७१), गायक व संगीतकार बॉब मार्ले (१९८१), अभिनेता शाहू मोडक (१९९३), लेखक डग्लस अ‍ॅडम्स (२००१)

--

तंत्रज्ञान दिन (भारत)

१८२० : उत्क्रांतीच्या सिद्धांताचे पुरावे ज्या जगप्रवासात मिळाले तो प्रवास चार्ल्स डार्विनने 'बीगल' या जहाजावरून सुरू केला.
१८५७ : ब्रिटिशांविरोधात उठाव करणाऱ्या भारतीय सैनिकांचा दिल्लीवर ताबा.
१८८८ : ज्योतिबा फुले यांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली.
१९६० : कुख्यात नाझी अधिकारी अ‍ॅडॉल्फ आईशमन अर्जेंटिनात पकडला गेला.
१९७३ : अमिताभ बच्चन याची 'अॅन्ग्री यंग मॅन' प्रतिमा उभारणारा 'जंजीर' चित्रपट प्रदर्शित.
१९८७ : गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
१९९७ : बुद्धिबळातील जगज्जेता गॅरी कास्पारोव्ह आय.बी.एम.च्या डीप ब्लू या संगणकाकडून पराभूत.
१९९८ : पोखरण येथे भारताची अणुचाचणी. अमेरिकेसह अनेक देशांनी भारतावर आर्थिक निर्बंध लादले. २८ मे रोजी पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून अणुचाचणी केली.
१९९९ : टेनिसपटू स्टेफी ग्राफने आपल्या कारकीर्दीतील हजारावा सामना खेळला.
२००१ : विजेवर चालणारी पहिली भारतीय मोटार 'रेवा'चे उद्घाटन.

१२ मे
जन्मदिवस: क्लोरोफॉर्मचा शोध लावणारे एक संशोधक जस्टस फॉन लीबिक (१८०३), लिमरिक आणि वैय्यर्थी गीतकार एडवर्ड लिअर (१८१२), आधुनिक शूश्रुषाशास्त्राच्या जनक परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल (१८२०), कवी व चित्रकार दांते गॅब्रिएल रोजेट्टी (१८२८), पियानोवादक व संगीतकार गाब्रिएल फोरे (१८४५), आठवणीकार सदाशिव विनायक बापट (१८८७), 'मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज'चे संस्थापक आत्माराम रावजी भट (१९०५), अभिनेत्री कॅथरिन हेपबर्न (१९०७), नोबेलविजेती रसायनशास्त्रज्ञ डोरोथी हॉजकिन (१९१०), इन्स्टॉलेशन कलाकार जोसेफ बय (१९२१), लेखिका तारा वनारसे (१९३०), बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर (१९३३), चित्रकार फ्रँक स्टेला (१९३६), वास्तुरचनाकार डॅनिएल लिब्सकिंड (१९४६)
पुण्यस्मरण: कवी व नाटककार जॉन ड्रायडेन (१७००), सिनेदिग्दर्शक एरिक फॉन स्ट्रोहाइम (१९५७), नोबेलविजेती कवयित्री नेली सॅक्स (१९७०), च‌रित्र‌कार‌ ध‌न‌ंज‌य‌ कीर‌ (१९८४), चित्रकार व शिल्पकार जाँ द्युब्युफे (१९८५), चित्रकार व शिल्पकार रॉबर्ट रॉशेनबर्ग (२००८), लेखिका तारा वनारसे (२०१०), सिनेदिग्दर्शक के. बिक्रम सिंग (२०१३)
--

जागतिक परिचारिका दिन

९०७ : चीनमधील तांग साम्राज्याची अखेर.
१५५१ : अमेरिका खंडातील पहिले विद्यापीठ National University of San Marcosची लिमा (पेरू) येथे स्थापना.
१६६६ : शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची एकमेव भेट.
१९०९ : पुणे येथे अनाथ विद्यार्थी गृहाची (आताचे पुणे विद्यार्थी गृह) स्थापना.
१९१५ : क्रांतिकारक रासबिहारी बोस जपानला रवाना.
१९२६ : रोअल्ड अ‍ॅमंडसेन याच्या नेतृत्वाखाली नॉर्ज या विमानाने उत्तर ध्रुवापर्यंत पहिली विमानफेरी केली.
१९४९ : सयामचे नाव बदलून थायलंड करण्यात आले.
२००२ : माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांची क्यूबा भेट. फिडेल कॅस्ट्रोच्या क्रांतीनंतर (१९५९) आजी/माजी अमेरिकी अध्यक्षाने क्यूबाला भेट देण्याचा हा पहिला प्रसंग.
२०१७ : 'वॉना क्राय' रॅन्समवेअरचा जगभरातील सुमारे दोन लाख विंडोज संगणकांवर हल्ला.

१३ मे
जन्मदिवस : मलेरियाच्या जंतूंचा शोध लावणारे नोबेलविजेते रोनॉल्ड रॉस (१८५७), चित्रकार व शिल्पकार जॉर्ज ब्राक (१८८२), राष्ट्रपती फक्रुद्दीन अहमद (१९०५), लेखिका दाफ्ने द्यु मोरिए (१९०७), राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी (१९१३), नर्तिका बालसरस्वती (१९१८), समीक्षक भालचंद्र फडके (१९२५), समीक्षक गो. मा. पवार (१९३२), लेखक आर्मिस्टेड मॉपिन (१९४४), गायक स्टीव्ही वंडर (१९५०), संगीतकार आनंद मोडक (१९५१)
पुण्यस्मरण : 'बकिंगहॅम पॅलेस'चा वास्तुरचनाकार जॉन नॅश (१८३५), अभिनेता गॅरी कूपर (१९६१), जाझगायक व वादक चेट बेकर (१९८८), लेखक आर.के.नारायण (२००१), नाट्यकर्मी बादल सरकार (२०११), छायाचित्रकार जगदीश माळी (२०१३)

--

१६३८ : दिल्ली येथील लाल किल्ल्याचे बांधकाम सुरू.
१८८८ : ब्राझिलमध्ये गुलामगिरीविरोधात कायदा अमलात आला.
१९४० : दुसरे महायुद्ध : जर्मन सैन्य फ्रान्सच्या भूमीवर. ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी पार्लमेंटमध्ये 'Blood, toil, tears, and sweat' हे आपले सुप्रसिद्ध भाषण केले.
१९५० : ब्रिटनमधील सिल्व्हरस्टोन येथे पहिल्या फॉर्म्युला वन स्पर्धेची सुरुवात.
१९५२ : प्रजासत्ताक भारताच्या पहिल्या संसदेचे (राज्यसभेचे) पहिले सत्र सुरू झाले.
१९५८ : 'वेल्क्रो'ची ट्रेडमार्क म्हणून नोंदणी.
१९६८ : फ्रान्समधील विद्यार्थ्यांच्या विद्रोही चळवळीला साथ देत कामगारांनी देशव्यापी संप पुकारला. आठ लाख विद्यार्थी आणि एक कोटी कामगार यांची ही युती अभूतपूर्व होती.
२००८ : जयपूर येथे बॉम्बस्फोट; १२ मृत

१४ मे
जन्मदिवस: छत्रपती संभाजी (१६५७), चित्रकार थॉमस गेन्सबरो (१७२७), लैंगिक तज्ज्ञ व समलैंगिकांच्या हक्कांसाठी लढणारा मॅग्नस हिर्शफेल्ड (१८६८), संगीतसंयोजक ऑटो क्लेम्परर (१८८५), वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधन करणारा पिएर ओजे (१८९९), सिनेदिग्दर्शक मृणाल सेन (१९२३), 'स्टार वॉर्स'चा निर्माता, दिग्दर्शक जॉर्ज लुकस (१९४४), 'बॅक टू द फ्यूचर'मुळे प्रसिद्ध दिग्दर्शक रॉबर्ट झेमेकिस (१९५१), अभिनेत्री केट ब्लँचेट (१९६९), सिनेदिग्दर्शिका सोफिया कोपोला (१९७१), संगणकतंत्रज्ञ प्रणव मिस्त्री (१९८१), फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग (१९८४), मॉडेल, अभिनेत्री झरीन खान (१९८४)
पुण्यस्मरण: नाटककार ऑगस्ट स्टिंडबर्ग (१९१२), लैंगिक तज्ज्ञ व समलैंगिकांच्या हक्कांसाठी लढणारा मॅग्नस हिर्शफेल्ड (१९३५), कायदेपंडित व समाजसुधारक ना. ग. चंदावरकर (१९२३), भाषाकोविद आणि कोशकार डॉ. रघुवीर (१९६३), लेखिका जीन ऱ्हीस (१९७९), अभिनेत्री रीटा हेवर्थ (१९८७), गायक, अभिनेता फ्रँक सिनात्रा (१९९८), समाजसुधारक असगर अली इंजिनियर (२०१३), मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके (२०२०)

---

स्वातंत्र्यदिन : इस्राएल

१७७६ : एडवर्ड जेन्नरने पहिली देवीची लस टोचली.
१८४४ : मोर्स कोडचा जनक सॅम्युअल मोर्स याने अमेरिकेतील टेलिग्राफद्वारा पहिला संदेश पाठवला.
१८७९ : भारतातल्या वेठबिगारांचा पहिला समूह फिजी बेटावर आला.
१९२५ : व्हर्जिनिया वूल्फची कादंबरी 'मिसेस डॅलोवे' प्रकाशित झाली.
१९२९ : प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये विल्फ्रेड ऱ्होड्सने ४०००वा बळी घेतला.
१९४८ : डेव्हीड बेन गुरीयन यांनी इस्राएल या स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीची घोषणा केली. लगेचच शेजारच्या अरब राष्ट्रांनी त्याच्याशी युद्ध सुरू केले.
१९५५ : शीतयुद्ध : सोव्हिएत संघ आणि पूर्व युरोपातील साम्यवादी देशांनी वॉर्सा करार मंजूर केला. 'नाटो'च्या निर्मितीला हे प्रत्युत्तर होते.
१९७० : 'बादर-माईनहॉफ गट' या कट्टर डाव्या विचारांच्या विद्रोही गटाची प. जर्मनीत स्थापना.
१९७३ : पहिले अमेरिकन अवकाशस्थानक 'स्कायलॅब'चे यशस्वी प्रक्षेपण.
१९७६ : भारत-पाकिस्तानमध्ये मैत्रीला चालना देण्यासाठी आपसांत विमान आणि रेल्वेवाहतूक सुरू करण्याचा निर्णय.
१९९८ : 'साईनफेल्ड' या टीव्ही मालिकेच्या शेवटच्या भागाचे प्रसारण.
२००२ : भारत सरकारने मारुती उद्योग लिमिटेड या कंपनीमधील आपल्या हिश्शाची रक्कम कमी केली आणि तो भाग सुझुकी मोटर कॉर्पोरेशनला एक हजार कोटी रुपयांना विकला.
२०१३ : 'बोको हराम'च्या दहशतवादी कृत्यांमुळे नायजेरियात आणीबाणीची घोषणा.

--

१५ मे
जन्मदिवस : संगीतकार मोंतेव्हेर्दी (१५६७), समाजसुधारक, तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर (१८१७), 'ऑझ'लेखक एल. फ्रँक बॉम (१८५६), क्यूरी परिणाम आणि रेडीयम शोधणारा नोबेलविजेता पिएर क्यूरी (१८५९), 'मेकॅनो' शोधणारा फ्रँक हॉर्नबी (१८६३), लेखक मिखाईल बुल्गाकोव्ह (१८९१), समीक्षक रा. श्री. जोग (१९०३), क्रांतिकारक हुतात्मा सुखदेव थापर (१९०७), अभिनेता जेम्स मेसन (१९०९), एव्हरेस्टवर पहिली यशस्वी चढाई करणाऱ्या एडमंड हिलरीचा सहाय्यक तेनसिंग नोर्गे (१९१४), अभिनेता जॉनी वॉकर (१९२३), छायाचित्रकार रिचर्ड अ‍ॅव्हेडॉन (१९२३), नाटककार पीटर शॅफर (१९२६), चित्रकार व शिल्पकार जॅस्पर जॉन्स (१९३०), अभिनेत्री माधुरी दिक्षित (१९६७), अभिनेता शायनी आहुजा (१९७४), टेनिसपटू अँडी मरे (१९८७)
पुण्यस्मरण: कवयित्री संत जनाबाई (१३५०), कवयित्री एमिली डिकीन्सन (१८८६), चित्रकार व शिल्पकार कासिमिर मालेव्हिच (१९३५), चित्रकार एडवर्ड हॉपर (१९६७), स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फिल्ड मार्शल करिअप्पा (१९९३), लोककवी आणि शाहीर वामनदादा कर्डक (२००४), लेखक कार्लोस फ्युएन्टेस (२०१२), वारली चित्रकार जिव्या सोमा मशे (२०१८)

---

विश्व कुटुंबसंस्था दिन
जागतिक सदसद्विवेकी आक्षेप (Conscientious Objection) दिन
स्वातंत्र्यदिन : पराग्वे (१८११)
१२५२ : पोप इनोसंट चौथा याने फतवा काढून ख्रिश्चन धर्म न पाळणाऱ्यांचा शारीरिक छळ करण्याची मुभा दिली.
१६१८ : योहानेस केप्लरने आधी अग्राह्य मानलेल्या ग्रहगतीच्या तिसऱ्या नियमाची पुष्टी केली.
१७१८ : जेम्स पकल याने मशीनगनचे पेटंट घेतले.
१८३६ : फ्रान्सिस बेली याने सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्रावरच्या दऱ्यांमधून येणारा प्रकाश (बेलीज बीड्स) याचे प्रथम निरीक्षण केले.
१८६९ : अमेरिकन स्त्रियांना मताधिकार मिळण्यासाठी सुझन अँथनी आणि एलिझाबेथ स्टँटन यांनी संघटना स्थापन केली.
१८८९ : आयफेल टॉवर जनतेसाठी खुला.
१९०८ : लो. टिळकांवर ज्यामुळे राजद्रोहाचा खटला चालला तो अग्रलेख ('देशाचे दुर्दैव') केसरीत प्रकाशित झाला.
१९११ : 'स्टँडर्ड ऑईल'च्या एकाधिकारशाहीच्या विरोधात न्यायालयाचा निवाडा; कंपनीचे पुढे सात तुकडे झाले.
१९२८ : 'प्लेन क्रेझी' या लघुपटाद्वारे वॉल्ट डिस्नेच्या मिकी आणि मिनी माऊस ह्या व्यक्तिरेखांचे पडद्यावर पदार्पण.
१९४० : मॅकडॉनल्डने आपले पहिले उपहारगृह सॅन बर्नार्डिनो येथे सुरू केले.
१९४१ : दोस्त राष्ट्रांच्या पहिल्या जेट विमानाचे उड्डाण.
१९४८ : इजिप्त, ट्रान्सजॉर्डन, सिरिया, इराक व सौदी अरेबियाने इस्राएल निर्मितीमुळे इस्राएलवर हल्ला केला.
१९५७ : यु.के.ने हायड्रोजन बॉंबची चाचणी केली.
१९५८, १९६० : रशियानं स्पुतनिक ३ आणि ४ या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केलं.
१९७२ : १९४५पासून अमेरिकेच्या सामरिक अधिपत्याखाली असलेल्या ओकिनावा बेटसमूहाचा ताबा परत जपानकडे गेला.
१९८० : गोदावरी या संपूर्ण देशी पाणबुडीचे जलावतरण.
१९८८ : आठ वर्षांपेक्षा जास्त काळाच्या लढाईनंतर अफगाणिस्तानातून सोव्हिएत लाल सैन्याच्या माघारीची सुरुवात.
२००८ : कॅलिफोर्नियात समलिंगी विवाहांना मान्यता. मॅसॅच्युसेट्सनंतर अशी मान्यता देणारे ते अमेरिकेतील दुसरे राज्य ठरले.

१६ मे
जन्मदिवस : गणितज्ञ केरो लक्ष्मण छत्रे (१८२४), सिनेदिग्दर्शक केन्जी मिझोगुची (१८९८), अभिनेता हेन्री फोंडा (१९०५), गायिका माणिक वर्मा (१९२६), लेखक अनंत मनोहर (१९३०), सिरॅमिक्समधली अतिवहनशीलता शोधणारा नोबेलविजेता जॉर्ज बेडनॉर्झ (१९५०), अभिनेता पीअर्स ब्रॉझनॅन (१९५३), गायिका जॅनेट जॅक्सन (१९६६), टेनिसपटू गॅब्रिएला साबातिनी (१९७०)
पुण्यस्मरण: 'सिंडरेला' आणि इतर कथांचा लेखक शार्ल पेरो (१७०३), गणितज्ज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फूरिए (१८३०), जीवनसत्त्वे शोधणारा नोबेलविजेता फ्रेडरिक हॉपकिन्स (१९४७), समाजसुधारक अण्णासाहेब लठ्ठे (१९५०), गिटारवादक जँगो राईनहार्ड (१९५३), गायक भोलानाथ भट्ट (१९७०), 'मपेट'कार जिम हेन्सन (१९९०), लेखक, समीक्षक माधव मनोहर (१९९४), सिनेदिग्दर्शक फणी मझुमदार (१९९४)

---

१५२७ : फ्लॉरेन्सच्या जनतेने मेदिची घराण्याची राजवट उलथवली व प्रजासत्ताक राजवट लागू केली.
१६४९ : हिंदू राजांना मदत करण्याबद्दल शहाजीराजेंना झालेली कैद समाप्त.
१७०३ : पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग शहराची स्थापना केली. युरोपमध्ये रशियाला स्थान मिळवून देण्याच्या दिशेने हा प्रयत्न होता.
१७१७ : राजाविरोधात व्यंगात्मक काव्य लिहिल्याबद्दल विचारवंत व्होल्तेअरची कुप्रसिद्ध बास्तिय तुरुंगात रवानगी.
१८८८ : निकोला टेस्लाने ए.सी. विद्युतवहनाबद्दल व्याख्यान दिले.
१८९१ : फ्रांकफुर्टमध्ये आंतरराष्ट्रीय विद्युततांत्रिक प्रदर्शनात तीन फेजमधले विद्युतवहन दाखवले गेले.
१९१८ : अमेरिकेत सरकारवर टीका करणे हा तुरुंगवासास पात्र गुन्हा ठरवण्यात आला.
१९२९ : हॉलिवूडमध्ये पहिला 'अॉस्कर'प्रदान समारंभ.
१९६० : पहिल्या दृश्य लेझरचे प्रात्यक्षिक थिओडोर मेमनने दाखवले.
१९६६ : चीनच्या कम्युनिस्टपक्षाने "मे १६ ची नोटिस" प्रकाशित केली; सामाजिक क्रांतीची सुरूवात.
१९६९ : सोव्हिएत संघाचे अंतराळयान व्हेनेरा ५ शुक्रावर उतरले.
१९७५ : जुनको ताबेई ही एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला ठरली.
१९७५ : सार्वमताने सिक्कीमचे भारतात विलीनीकरण.
१९८८ : तंबाखूत असलेल्या निकोटिनचे गुणधर्म हेरॉईन किंवा कोकेन यांच्या मादक गुणधर्मांप्रमाणे आहेत असा अहवाल अमेरिकेच्या सर्जन जनरल यांनी प्रकाशित केला.
१९९६ : अटलबिहारी वाजपेयींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. हे सरकार १३ दिवस टिकले.
२००५ : कुवेतमध्ये स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क.
२००९ : श्रीलंकेत दीर्घकाळ चाललेल्या यादवीची अखेर; तमिळ वाघ नामोहरम. १९७२पासून या यादवीत सुमारे ७०,००० ठार झाले.
२०१४ : लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर; नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप स्पष्ट बहुमतात.

१७ मे
जन्मदिवस : देवीची लस शोधणारा एडवर्ड जेन्नर (१७४९), सूर्याच्या वर्णपटाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावणारा नॉर्मन लॉकयर (१८३६), 'रियासत'कार गो. स. सरदेसाई (१८५६), 'डॉज'चा एक प्रणेता होरस डॉज (१८६८), चित्रकार शंकर पळशीकर (१९१७), गायिका बिर्जिट नील्सन (१९१८), 'ॲपल' संस्थापकांपैकी एक रॉनल्ड वेन (१९३४), अभिनेता डेनिस हॉपर (१९३६), क्रिकेटपटू बी. एस. चंद्रशेखर (१९४५), मुष्टियोद्धा शुगर रे लेओनार्ड (१९५६)
पुण्यस्मरण: चित्रकार सांद्रो बोत्तिचेल्ली (१५१०), मराठी वृत्तपत्रव्यवसायाचे जनक 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर (१८४६), शेतीसाठी यंत्र बनवणारी 'डीअर आणि कं.' स्थापन करणारा जॉन डीअर (१८८६), मुंबई चौपाटीवरील लोकमान्य टिळकांचा भव्य पुतळा बनवणारे शिल्पकार र. कृ. फडके (१९७२), वकील, समाजसेविका कमिला तय्यबजी (२००४), लेखक, कवी टी. के. दोरायस्वामी (२००७), गायिका डॉना समर (२०१२), लेखक रत्नाकर मतकरी (२०२०)

---

जागतिक दूरसंचार दिवस
जागतिक समलैंगिकता, द्विलैंगिकता, लिंगबदल भयनिर्मूलन दिन (International Day Against Homophobia and Transphobia - IDAHO)
स्वातंत्र्यदिन / राष्ट्रीय दिन : नॉर्वे, नाऊरू, डीआरसी (काँगो)

१७८२ : इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह.
१७९२ : न्यू यॉर्कमधल्या शेअर बाजाराची स्थापना.
१८६५ : आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) ची स्थापना.
१९४९ : भारताचा राष्ट्रकुलामध्ये राहण्याचा निर्णय.
१९५४ : वंशभेद - अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात 'ब्राऊन वि. बोर्ड ऑफ एज्युकेशन' खटल्याचा ऐतिहासिक निर्णय; सार्वजनिक शाळांतला वांशिक अलगतावाद (racial segregation) त्यानुसार बेकायदेशीर ठरवला गेला.
१९७२ : मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस सुरू झाली.
१९९० : आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने (WHO) समलैंगिकतेला मानसिक विकृतींच्या यादीतून काढून टाकले.
२००४ : अमेरिकेतला पहिला कायदेशीर समलैंगिक विवाह मॅसॅच्युसेट्समध्ये संपन्न.
२००८ : जयपूर स्फोटांमुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 'फेडरल क्राईम एजन्सी' स्थापण्याची सूचना केली.
२००९ : तमिळ वाघांचा नेता प्रभाकरन् याला श्रीलंकेच्या सैन्याने ठार मारले.
२०१३ : फ्रान्समध्ये समलैंगिकांना विवाह करण्यास आणि मुले दत्तक घेण्यास कायदेशीर मान्यता.

१८ मे
जन्मदिवस : पर्शियन कवी उमर खय्याम (१०४८), छ. संभाजी आणि येसुबाई यांचे पुत्र छत्रपती शाहू (१६८२), गणितज्ञ, क्रियाशील विचारवंत, युद्धविरोधी प्रचारक, नोबेलविजेता बर्ट्रांड रसल (१८७२), कथाकार विठ्ठल सीताराम गुर्जर (१८८५), सिनेदिग्दर्शक फ्रँक काप्रा (१८९७), पिच्युटरी ग्रंथीतील स्त्रावांवर संशोधन करणारे नोबेलविजेते व्हिन्सेंट द्यु व्हिन्यो (१९०१), माजी पंतप्रधान एच्. डी. देवेगौडा (१९३३), अभिनेत्री फरीदा जलाल (१९४९), क्रिकेटपटू ग्रॅहॅम डिली (१९५९)
पुण्यस्मरण : मलेरियाचे रोगजंतू शोधून काढणारे नोबेलविजेते आल्फोंस लाव्हेराँ (१९२२), नागार्जुनसागर धरणाचे स्थापत्य अभियंता कानुरी लक्ष्मण राव (१९८६), पहिल्या भारतीय सिनेअभिनेत्री कमलाबाई गोखले (१९९७), पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे (१९९४)
---

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस.
आंतरराष्ट्रीय एड्स लसीकरण दिवस.
१९१० : पृथ्वी हॅले या धूमकेतूच्या शेपटातून गेली.
१९१२ : दादासाहेब तोरणे यांचे नाट्यचित्रीकरण "श्री पुंडलिक"चे मुंबईत प्रदर्शन.
१९४० : 'संत ज्ञानेश्वर' चित्रपट मुंबई-पुण्यात प्रदर्शित.
१९४४ : क्रीमिआतील तातार लोकांना सोव्हिएत रशियाने हाकलून लावले. उझबेकिस्तान व इतर ठिकाणी त्यांचे स्थलांतर केले. त्यामुळे आज क्रीमिआत रशियन लोकांचे प्रमाण अधिक आहे.
१९७२ : कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना.
१९७४ : पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी; आण्विक शस्त्र असणारा भारत जगातला सहावा देश बनला.
१९९८ : पुण्याच्या सुरेंद्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. ही कामगिरी करणारा तो पहिला मराठी युवक ठरला.

१९ मे
जन्मदिवस : चित्रकार याकोब योर्डाएन्स (१५९३), तत्त्वज्ञ योहान फिश्ट (१७६२), लेखक माणिक बंदोपाध्याय (१९०८), राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी (१९१३), कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढा देणारा माल्कम एक्स (१९२५), लेखक रस्किन बॉन्ड (१९३४), लेखक, दिग्दर्शक, अभिनेता गिरीश कार्नाड (१९३८)
पुण्यस्मरण: चरित्रकार जेम्स बॉसवेल (१७९५), लेखक नथेनिएल हॉथॉर्न (१८६४), उद्योगपती जमशेदजी टाटा (१९०४), लेखक टी. ई. लॉरेन्स उर्फ लॉरेन्स ऑफ अरेबिया (१९३५), इतिहासकार यदुनाथ सरकार (१९५८), संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते कॉम्रेड विष्णुपंत चितळे (१९६१), इतिहाससंशोधक आबा चांदोरकर (१९६९), भारतीय नवनाट्याचे प्रणेते शंभू मित्रा (१९९७), लेखक विजय तेंडुलकर (२००८)
---

१७४३ : जाँ-पिएर क्रिस्तँ याने पारा वापरून केलेल्या सेंटिग्रेडमधील तापमापकाची रचना प्रकाशित केली.
१८९७ : समलैंगिकतेसाठी कारावास भोगणारा लेखक ऑस्कर वाइल्ड कैदमुक्त.
२००१ : पहिले अ‍ॅपल स्टोअर उघडले.

२० मे
जन्मदिवस : कादंबरीकार ओनोरे द बाल्झाक (१७९९), अर्थतज्ज्ञ, तत्त्वज्ञ जॉन स्टुअर्ट मिल (१८०६), वेल्स-फार्गो बँक आणि अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डांचा एक संस्थापक विल्यम फार्गो (१८१८), आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार विष्णुशास्त्री चिपळूणकर (१८५०), किण्वनाचा शोध लावणारा नोबेलविजेता एदुआर्ड बश्नर (१८६०), ज्ञानपीठविजेते कवी सुमित्रानंदन पंत (१९००), अभिनेता जेम्स स्ट्युअर्ट (१९०८), सिनेदिग्दर्शक बालू महेंद्र (१९३९), पॉप गायिका शेर (१९४६)
पुण्यस्मरण : कवी संत चोखामेळा (१३३८), दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस (१५०६), मराठा साम्राज्याचा एक शिल्पकार मल्हारराव होळकर (१७६६), भाषांतरकार व लेखक कृष्णशास्त्री चिपळूणकर (१८७८), स्वातंत्र्यसैनिक बिपीनचंद्र पाल (१९३२), शिल्पकार बार्बारा हेपवर्थ (१९७५), भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक लीला मुळगावकर (१९९२), उद्योगपती एस. पी. गोदरेज (२०००), जीवशास्त्रज्ञ स्टीफन जे गोल्ड (२००२)
---

स्वातंत्र्यदिवस - क्यूबा (१९०२), पूर्व तिमोर (२००२)
जागतिक मीटरमापन दिन
१४९८ : वास्को द गामा भारतात कोझिकोडे (कालिकत) येथे येऊन पोचला.
१६०९ : शेक्सपिअरची सुनीते प्रथम प्रकाशित.
१८७३ : लेव्ही स्ट्राऊस आणि जेकब डेव्हीस यांना तांब्याच्या रिव्हेट्सवाल्या निळ्या जीन्ससाठी पेटंट मिळाले.
१८७५ : १७ देशांनी 'मीटर कन्व्हेंशन'मध्ये एककांच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणाची (International Standard Units) सुरुवात केली.
१८९१ : एडिसनच्या किनेटेस्कोपमधून चित्रपट बघण्याची सुरुवात.
१८९९ : वेगमर्यादेचे उल्लंघन करत ताशी १२ मैल वेगाने टॅक्सी हाकणाऱ्या टॅक्सीचालकाला पहिले ट्रॅफिक तिकीट मिळाले.
१९३२ : अ‍ॅमेलिया एअरहार्ट विमानातून अटलांटिक पार करण्यासाठी निघालेली पहिला महिला ठरली.
१९४० : आउशवित्झ छळछावणीत पहिल्या कैद्यांचे आगमन.
१९५७ : 'अप्सरा' ही आशियातली पहिली अणुभट्टी देशाला अर्पण करून 'अटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट'ची सुरुवात.
१९७७ : भारतात पहिले बिगर कॉंग्रेसी सरकार देणाऱ्या जनता पक्षाची स्थापना.
१९८० : कॅनडातून वेगळे होण्याविरोधात केबेकच्या जनतेने कौल दिला.
१९८३ : 'सायन्स' जर्नलमध्ये HIV व्हायरस बद्दल माहिती प्रथम प्रकाशित.
१९८९ : चिनी सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीवादी निदर्शकांविरोधात मार्शल लॉ जाहीर करून तियानानमेन चौकातल्या हत्याकांडाची पूर्वतयारी केली.
१९९६ : अमेरिकेतल्या कोलोरॅडो राज्यात समलैंगिकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा रस्ता अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंद केला.
२००६ : बांगलादेशात कापड कारखान्यांमध्ये कामगारांच्या संपाची सुरुवात.

२१ मे
जन्मदिवस : लेखक दांते अलिघिएरी (१२६५), चित्रकार आल्ब्रेख्त ड्यूरर (१४७१), कवी अलेक्झांडर पोप (१६८८), तुरुंगातील कैद्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून धडपडणाऱ्या एलिझाबेथ फ्राय (१७८०), 'कोरियलिस परिणाम' शोधणारा गास्पार-गुस्ताव द कोरीयलिस (१७९२), पुराजीवशास्त्रज्ञ मेरी अ‍ॅनिंग (१७९९), चित्रकार आँरी रूसो (१८४४), व्यावहारिक ECG शोधणारा नोबेलविजेता विलम आईंथोवन (१८६०), रशियन हायड्रोजन बॉंब बनवणारा, शांततेचा पुरस्कर्ता नोबेलविजेता आंद्रेई साखारॉफ (१९२१), कलासमीक्षक, लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी (१९२८), हिंदी लेखक व पत्रकार शरद जोशी (१९३१), अभिनेता मोहनलाल (१९६०), मॉडेल अदिती गोवित्रीकर (१९७६)
पुण्यस्मरण: भारताचे पहिले जलदगती गोलंदाज अमरसिंग (१९४०), लेखक क्लाऊस मान (१९४९), अणूंमधला पुंजवाद दाखवणाऱ्यांतला नोबेलविजेता जेम्स फ्रँक (१९६४), मुद्रक, प्रकाशक बाळकृष्ण ढवळे (१९७३), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९९१), अभिनेता जॉन गिलगुड (२०००)
---

राष्ट्रीय दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस.
आंतरराष्ट्रीय "सुसंवाद व प्रगतीसाठी सांस्कृतिक विविधता" दिवस
स्वातंत्र्यदिन - मॉंटेनेग्रो (२००६)
१८५१ : कोलंबियातून गुलामगिरी हद्दपार
१९०४ : पारी (पॅरिस) मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना (FIFA) ची स्थापना
१९२७ : अटलांटिक पार करणारे पहिले विमान घेऊन वैमानिक चार्ल्स लिंडबर्ग पारीमध्यल्या ले बोर्जेमध्ये उतरला.
१९३२ : विमानातून अटलांटिक पार करणारी पहिली महिला वैमानिक अमेलिया एअरहार्ट उत्तर आयर्लंडमध्ये उतरली.
१९४० : आचार्य अत्रेंच्या 'साप्ताहिक नवयुग'चा पहिला अंक प्रकाशित.
१९७९ : सॅन फ्रान्सिस्कोमध्ये समलिंगींच्या हक्कांसाठी झगडणारा लोकप्रतिनिधी हार्वे मिल्क याच्या खुन्याला शिक्षा; शहरात दंगली.
१९९१ : माजी पंतप्रधान व काँग्रेसचे अध्यक्ष राजीव गांधी यांची निवडणूक प्रचारादरम्यान आत्मघातकी तमिळ वाघांकडून हत्या.
२०११ : सौदी अरेबियातल्या जनआंदोलनामुळे आर्थिक सवलती आणि २०१५ मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार घोषित.

२२ मे
जन्मदिवस : समाजसुधारक राजा राममोहन रॉय (१७७२), संगीतकार रिचर्ड वाग्नर (१८१३), नेत्रशल्यशास्त्राची पायाभरणी करणारा आल्ब्रेख्त फोन ग्राफ (१८२८), चित्रकार मेरी कसाट (१८४४), शेरलॉक होम्सचा 'निर्माता लेखक आर्थर कॉनन डॉयल (१८५९), संस्कृत-मराठी भाषांतरकार विष्णू वामन बापट (१८७१), टिनटिन’चा जनक हर्जे (१९०७), अभिनेता लॉरेन्स ऑलिव्हिए (१९०७), सिनेनिर्माते व दिग्दर्शक होमी वाडिया (१९११), क्रिकेटपटू इरापल्ली प्रसन्ना (१९४०), टेनिसपटू नोव्हाक जोकोविच (१९८७)
पुण्यस्मरण : लेखक व्हिक्टर ह्युगो (१८८५), लेखक लँग्स्टन ह्यूजेस (१९६७), कलासमीक्षक बाळकृष्ण दाभाडे (१९७९), RNA शोधणारा नोबेलविजेता आल्बेर क्लॉड (१९८३), कॉम्रेड श्रीपाद डांगे (१९९१), समीक्षक, संपादक, लेखक डॉ. मधुकर आष्टीकर (१९९८), हृदरोगतज्ज्ञ डॉ. नीतू मांडके (२००३), गणितविषयक लेखक मार्टिन गार्डनर (२०१०)
---

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस.
हार्वे मिल्क दिवस (कॅलिफोर्निया)
१८४८ : मार्टिनिकमधून गुलामगिरी हद्दपार.
१९०६ : राईट बंधूंना त्यांच्या "उडणाऱ्या यंत्रा"चे पेटंट देण्यात आले.
१९३९ : जर्मनी व इटलीत पोलादी तह.
१९५८ : श्रीलंकेत वांशिक भेदाचे बीज असणारे, ३०० तमिळ लोकांचा बळी घेणारे वांशिक दंगे सुरू
१९६० : आजतागायत नोंदण्यात आलेला सगळ्यात तीव्र भूकंप (९.५ रिश्टर) चिले (चिली) देशात झाला.
१९७२ : सिलोनचे नाव बदलून श्रीलंका केले; नवीन संविधान अंगिकारले.
१९८० : पॅकमॅन या खेळाचा जन्म.
१९८७ : मीरत शहरात हाशिमपुरा हत्याकांडात ४२ मुस्लिम तरुणांचा बळी; २१ मार्च २०१५ला सर्व आरोपींची पुराव्यांअभावी मुक्तता.
१९८७ : रग्बीचा पहिला विश्वचषक सुरू झाला.
१९८९ : 'अग्नी' या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण.
१९९० : उत्तर यमन व दक्षिण यमन 'यमन प्रजासत्ताक' या नावाने एकत्र झाले.
१९९० : विण्डोज-३.० बाजारात आले.
२००३ : अनिका सोरेनस्टाम गोल्फच्या पीजीए टूरमध्ये खेळलेली पहिली स्त्री ठरली.
२०१० : एअर इंडियाच्या विमानाला मंगलोर विमानतळावर अपघात, १५८ बळी, ८ लोक वाचले.

२३ मे
जन्मदिवस : जैविक प्रजातींच्या नामकरणाची सुरूवात करणारा जीवशास्त्रज्ञ कार्ल व्हॉन लिने (१७०७), संमोहनविद्येचा मानसशास्त्रीय उपचारात उपयोग करणारा फ्रांझ अँटोनी मेस्मर (१७३३), दानशूर व्यावसायिक आल्फ्रेड स्लोअन (१८७५), अभिनेता डग्लस फेअरबँक्स (१८८३), संगीतकार, संगीतसमीक्षक केशवराव भोळे (१८९६), दुहेरी नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ जॉन बार्डीन (१९०८), मायक्रोबच्या जनुकशास्त्रातला नोबेलविजेता जोशुआ लेडरबर्ग (१९२५), सिंथेसायझरचा निर्माता रॉबर्ट मूग (१९३४), चित्रपट दिग्दर्शक पद्मराजन (१९४५), बुद्धिबळ जगज्जेता अनातोली कार्पोव्ह (१९५१), क्रिकेटपटू वूर्केरी रामन (१९६५)
पुण्यस्मरण: रेणूंच्या विशिष्ट उष्णतेचा नियम मांडणारा फ्रान्झ न्यूमन (१८९५), नाटककार हेन्रिक इब्सेन (१९०६), उद्योगपती जॉन डी. रॉकफेलर (१९३७), निऑन दिवा बनवणारा अभियंता जॉर्ज क्लॉड (१९६०), व्हिक्टोरिया क्रॉस मिळवणारे पहिले ले. जनरल पी. एस. भगत (१९७५), संगीतकार आनंद मोडक (२०१४), क्रिकेटपटू माधव मंत्री (२०१४)
---

जागतिक कासव दिवस
१८२९ : अकॉर्डियनचे पेटंट सिरील डेमियनला मिळाले.
१९४५ : नाझी कमांडर हाईनरिश हिमलरची आत्महत्या.
१९५८ : ऋत्विक घटक यांचा 'अजांत्रिक' चित्रपट प्रदर्शित.
१९८४ : बचेंद्री पाल एव्हरेस्ट शिखर चढणारी पहिली भारतीय स्त्री ठरली.
१९९५ : जावा प्रोग्रमिंग लँग्वेजची पहिली आवृत्ती प्रकाशित.
२००१ : भारताच्या लष्करी पथकाकडून एव्हरेस्ट सर.
२०१५ : आयर्लंडने सार्वमत घेऊन समलिंगी विवाहांना मान्यता दिली. सार्वमताने अशी मान्यता देणारा तो पहिला देश ठरला.

२४ मे
जन्मदिवस : तापमान मापनाची पद्धत सुचवणारा दानियल फॅरनहीट (१६८६), डॉक्टर शास्त्रज्ञ व ले. कर्नल कान्होबा रणछोडदास कीर्तीकर (१८४९), संगीतकार क्रांतिवादी कवी, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उद्गाते काझी नझरूल इस्लाम (१८९९), टेनिसपटू सुझन लेंग्लेन (१८९९), जादूगार रघुवीर भोपळे (१९२४), नोबेलविजेता कवी जोसेफ ब्रॉड्स्की (१९४०), संगीतकार, गायक बॉब डिलन (१९४१), पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ (१९४२), अभिनेता आल्फ्रेड मोलिना (१९५३), संगीतकार राजेश रोशन (१९५५)
पुण्यस्मरण: सूर्यकेंद्री विश्वाचा सिद्धांत मांडणारा निकोलस कोपर्निकस (१५४३), जाझ पियानोवादक व संगीतकार ड्यूक एलिंग्टन (१९७४), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्ती मार्गदर्शक गुरू हनुमान तथा विजयपाल लालाराम (१९९९), कवी मजरूह सुलतानपुरी (२०००), सौंदर्यसमीक्षक रा. भा. पाटणकर (२००४), अभिनेता तपन चॅटर्जी (२०१०)
---
स्वातंत्र्यदिन : इरित्रिया (१९९३)
राष्ट्रकुल दिवस
१६८९ : इंग्लंडच्या पार्लमेंटने 'अ‍ॅक्ट ऑफ टॉलरेशन' संमत केला. अँग्लिकन चर्च मान्य नसलेल्या प्रॉटेस्टंटांना त्यामुळे संरक्षण व मर्यादित हक्क मिळाले. कॅथॉलिक वा नास्तिकांना त्यात समाविष्ट केले नव्हते. तरीही, परधर्माविषयीच्या मर्यादित सहिष्णुतेला त्यामुळे संसदीय मान्यता मिळाली.
१८४४ : मोर्सकोड वापरून पहिला तारसंदेश पाठवला गेला.
१९४० : इगॉर सिकॉर्स्कीने सर्वप्रथम हेलिकॉप्टर उडवले.
१९७६ : लंडन ते वॉशिंग्टन डी.सी. अशी कॉँकॉर्ड विमानसेवा सुरू
१९९३ : मायक्रोसॉफ्टने विण्डोज एन. टी. ही ऑपरेटिंग सिस्टम प्रकाशित केली.
१९९९ : द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सर्बियन राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिचला कोसोव्होतील युद्धगुन्हे आणि मानवतेविरोधातले गुन्हे यांबद्दल दोषी ठरवले.
२००० : इस्रायलने २२ वर्षांनी लेबेनॉनमधून आपले सैनिक काढून घेतले.

२५ मे
जन्मदिवस : 'आझाद हिंद सेना' उभी करणारे रास बिहारी बोस (१८८६), म्यूऑन न्यूट्रीनो शोधणारा नोबेलविजेता जॅक स्टाईनबर्गर (१९२१), क्रिकेटपटू रूसी सुरती (१९३६), 'व्हजायना मोनोलॉग' लिहिणारी नाटककार ईव्ह एन्सलर (१९५३), राष्ट्रीय पुरस्कारविजेता अभिनेता मुरली (१९५४), सिनेदिग्दर्शक करण जोहर (१९७२), अभिनेता कुणाल खेमू (१९८३)
पुण्यस्मरण : शिक्षणतज्ज्ञ आशुतोष मुखर्जी (१९२४), संगीतकार बुलो सी. रानी (१९९३), लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत (१९९८), राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे माजी संचालक डॉ. बी. डी. टिळक (१९९९), गायिका नीला घाणेकर (२००१), अभिनेता व खासदार सुनील दत्त (२००५), गायिका ललिता देऊळकर फडके (२०१०), पार्श्वगायक टी. एम. सुंदरराजन (२०१३)
---
स्वातंत्र्यदिन : जॉर्डन (१९४६)
लेखक डग्लस ॲडम्सच्या गौरवाखातर टॉवेल दिवस.
ख्रि.पू. २४० : हॅलीचा धूमकेतू सूर्याच्या सगळ्यात जवळ आल्याची पहिली नोंद.
१८९५ : साहित्यिक ऑस्कर वाईल्ड याला समलैंगिक संबंधांबद्दल तुरुंगवास.
१८९८ : शि. म. परांजपे यांच्या 'काळ'चा पहिला अंक प्रकाशित.
१९१५ : महात्मा गांधींनी साबरमतीच्या आश्रमाची स्थापना केली.
१९५३ : पहिल्या सार्वजनिक प्रसारण स्टेशनची अमेरिकेत ह्यूस्टनमध्ये सुरुवात.
१९५५ : कांचनगंगा हे उंचीनुसार तिसरे शिखर जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले.
१९८५ : १०,००० पेक्षा जास्त व्यक्तींचा जीव घेणार्‍या वादळाचे बांगलादेशात थैमान.
२०११ : पंचवीस वर्षांनंतर 'द ओप्रा विनफ्री शो'ची अखेर.
२०१३ : कॉंग्रेसच्या नेत्यांवर माओवाद्यांचा छत्तीसगढमध्ये हल्ला, २८ ठार, ३२ जखमी.
२०२० : अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईडची पोलिसाकडून हत्या; पुढे कृष्णवर्णीय लोकांवरच्या अन्यायाविरोधात देशभर निदर्शने.

२६ मे
जन्मदिवस : गणितज्ञ अब्राहम द म्वाव्र (१६९७), लेखक अलेक्सांद्र पुश्किन (१७९९), नृत्यांगना इजाडोरा डंकन (१८७७), नाटककार व कवी राम गणेश गडकरी (१८८५), छायाचित्रकार डोरोथी लँज (१८९५), कृषी वनस्पती वैज्ञानिक व संशोधक बी.पी. पाल (१९०६), 'वेस्टर्न' सिनेअभिनेता जॉन वेन (१९०७), कथालेखक ग. ल. ठोकळ (१९०९), लेखक रंगनाथ मनोहर जोशी तथा निर्मळ गुरुजी (१९१६), हिंदी साहित्यिक व समीक्षक डॉ. शंकर पुणतांबेकर (१९२५), जाझ संगीतकार माइल्स डेव्हिस (१९२६), निर्माता, दिग्दर्शक के. बिक्रम सिंग (१९३८), धावपटू झोला बड (१९६६), लागोपाठ दोन ऑलिंपिक खेळांमध्ये पदकविजेता पहिला भारतीय खेळाडू कुस्तीगीर सुशील कुमार (१९८३)
पुण्यस्मरण : आधुनिक तेलुगू गद्याचे जनक, पत्रकार व समाजसुधारक रावबहादूर वीरेशलिंगम कुंदकुरी (१९१९), तत्त्वज्ञ मार्टिन हाईडेगर (१९७६), पिनकोडचे जनक आर. व्ही. मराठे (१९८३), साहित्य अकादमी पुरस्कारविजेते कवी श्रीकांत वर्मा (१९८६)
---

स्वातंत्र्य दिन - जॉर्जिया (१९१८), गयाना (१९६६)

१८९६ : चार्लस डाऊ यांनी डाऊ-जोन्स औद्योगिकी सरासरीचे प्रथम प्रकाशन केले.
१८९७ : ब्रॅम स्टोकर यांची 'ड्रॅक्युला' कादंबरी प्रकाशित.
१९०८ : मध्यपूर्वेत पहिला तेलसाठा सापडला.
१९७१ : पाकिस्तानी सैन्याने सिल्हेट, बांगलादेशमध्ये ७१ हिंदूंची कत्तल केली.
१९८६ : युरोपमधल्या देशांनी युरोपीय संघाचा झेंडा स्वीकारला.
१९९८ : ऑस्ट्रेलियात मूलनिवासींची मुले त्यांच्या कुटुंबांपासून विलग करण्याच्या धोरणाबद्दल (Stolen Generations) प्रथम 'राष्ट्रीय क्षमायाचना दिन' झाला.
१९९९ : कारगिल युद्धाची सुरुवात.
२००९ : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ आणि त्यांचे बंधू शाहबाज यांच्यावरची निवडणुका लढवण्याविषयीची बंदी हटवली.

२७ मे
जन्मदिवस : लोकभाषा अभ्यासक केशव भवाळकर (१८३१), अणुकेंद्रकाच्या विभाजनाच्या संशोधकांपैकी एक नोबेलविजेते जॉन कॉकक्रॉफ्ट (१८९७), पर्यावरणतज्ज्ञ रेशल कार्सन (१९०७), लेखक बाळ सामंत (१९२४), ज्ञानपीठविजेते लेखक भालचंद्र नेमाडे (१९३८), क्रिकेटपटू रवी शास्त्री (१९६२)
पुण्यस्मरण : क्षय, कॉलरा, अँथ्रॅक्स इ. होण्याची कारणे शोधणारे नोबेलविजेते, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक (१८४३), स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (१९६४), संगीतसमीक्षक व संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरूळकर (१९८६), एन्झाईम्स, प्रथिने आणि विषाणूंचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन नॉर्थरॉप (१९८७), इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी शोधणारा नोबेलविजेता अर्न्स्ट रूस्का (१९८८), विचारवंत, संस्कृतपंडित, ‘मराठी विश्वकोशा’चे प्रधान संपादक, साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (१९९४), संसदपटू, अर्थतज्ज्ञ व घटनापंडित मिनू मसानी (१९९८)
---

१९०८ : खिलाफत दिवस.
१९३० : त्या काळची जगातली सगळ्यात उंच असलेली ख्राईस्लर इमारत लोकांसाठी खुली झाली.
१९३९ : डी. सी. कॉमिक्सने बॅटमॅनची पहिली चित्रकथा प्रकाशित केली.
१९५१ : तारापोरवाला मत्सालयाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन.
१९६७ : ऑस्ट्रेलियाने स्थानिक मूलनिवासी लोकांना लोकसंख्यागणनेत मोजण्याचे ठरवले.
१९८६ : 'ड्रॅगन क्वेस्ट' हा पहिला 'रोल-प्लेयिंग' व्हिडीयो गेम प्रकाशित.
१९९४ : वीस वर्षे विजनवासात घालवल्यानंतर ७५ वर्षीय नोबेलविजेता विद्रोही लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन रशियात परतला.
१९९७ : अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बिल क्लिंटन राष्ट्रध्यक्ष असताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा खटला चालवण्याची परवानगी दिली.
१९९९ : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हेग येथे स्लोबोदान मिलोसेविचवर कोसोवोमध्ये माणुसकीविरुद्ध अत्याचारांबद्दल गुन्हा दाखल केला.

२८ मे
जन्मदिवस : पृथ्वीवरचे हिमयुग आणि इतर ग्रहांवरचे हवामान याचा अंदाज देणारा मिलुतिन मिलान्कोविच (१८७९), क्रांतिकारक, साहित्यिक वि.दा. सावरकर (१८८३), उद्योगपती शंतनूराव किर्लोस्कर (१९०३), 'जेम्स बॉंड'चा जनक इयन फ्लेमिंग (१९०८), नोबेलविजेता लेखक पॅट्रिक व्हाईट (१९१२), पहिली महिला रेडिओ खगोलाभ्यासक रूबी पेन-स्कॉट (१९१२), गायक पं. डी.व्ही. पलुस्कर (१९२१), कवी, टीकाकार के. सच्चिदानंदन (१९४६)
पुण्यस्मरण : लेखिका अ‍ॅन ब्रॉन्टे (१८४९), क्रांतिकारक भगवतीचरण (१९५०), सिनेदिग्दर्शक व निर्माते मेहबूब खान (१९६४), चित्रपट दिग्दर्शक बी. विठ्ठलाचार्य (१९९९)
---
गणतंत्र दिवस - नेपाळ
ख्रि.पू. ५८५ : ग्रीक तत्त्वज्ञ थेल्सच्या भाकीतानुसार सूर्यग्रहण घडल्यामुळे आल्याथीस आणि स्याहारेस यांची लढाई संपून शांतिकरार घडला.
१९३६ : ॲलन ट्युरिंगने 'ऑन कम्प्युटेबल नंबर्स' हा संगणकशास्त्राच्या सैद्धांतिक मांडणीतील पायाभूत शोधनिबंध प्रकाशित केला.
१९३७ : प्रसिद्ध मोटार कंपनी फोक्सवॅगनची स्थापना.
१९५२ : ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९५९ : अंतराळयात्रेत माकडे तगून राहण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न.
१९६५ : बिहारमध्ये भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा कोळसा खाण अपघात, २५० ठार.
१९९८ : भारतीय अणुचाचणीला पाकिस्तानने ५ चाचण्या करून प्रत्युत्तर दिले.
२००२ : मार्स ओडिसी या मिशनला मंगळावरील बर्फाच्या अस्तित्त्वाचे दाखले मिळाले.
२००२ : बेल्जियममध्ये स्वेच्छामरणाला कायदेशीर मान्यता.
२००८ : नेपाळमध्ये लोकशाहीची स्थापना.
२०१० : प. बंगालमधील रेल्वे अपघातात १४१ नागरिकांचा मृत्यू.

२९ मे
जन्मदिवस : 'हिस्टेरिया'वर संशोधन करणारा मानसशास्त्रज्ञ पिएर जेनेट (१८५९), पियानोवादक व संगीतकार इसाक आल्बेनित्झ (१८६०), लेखक जी. के. चेस्टरटन (१८७४), सिनेदिग्दर्शक जोसेफ व्हॉन स्टर्नबर्ग (१८९४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९०५), लेखक अशोक टिळक (१९२१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज (१९२९), वाढत्या लोकसंख्येशी निगडित समस्यांवर मूलभूत संशोधन करणारे पॉल एरलिच (१९३२), नेमबाज भुवनेश्वरी कुमारी (१९४५), अभिनेता पंकज कपूर (१९५४)
पुण्यस्मरण : शोधक बार्थलोम्यू डायस (१५००), अनेक मूलद्रव्ये शोधणारा रसायनशास्त्रज्ञ हंफ्रे डेव्ही (१८२९), अभिनेता पृथ्विराज कपूर (१९७२), माजी पंतप्रधान चरणसिंग (१९८७), साम्यवादी विचारांचे लेखक केशव गोखले (१९५२), संगीतकार स्नेहल भाटकर (२००७), विचारवंत, राजकारणी व लेखक ग. प्र. प्रधान (२०१०), अभिनेता डेनिस हॉपर (२०१०), सिनेदिग्दर्शक कानेटो शिंदो (२०१२)
---
आंतरराष्ट्रीय यू.एन. शांतीरक्षक दिवस
लोकशाही दिन : नायजेरिया.
१६५८ : चंबळ खोऱ्यातील सामूगडच्या लढाईत औरंगजेब आणि मुरादने भाऊ दारा शुकोहचा पराभव केला; पुढे औरंगजेब मुघल बादशाह बनला.
१९१३ : इगॉर स्ट्राव्हिन्स्कीचे संगीत आणि निजिन्स्कीच्या नृत्यदिग्दर्शन लाभलेला बॅले 'Sacre du Printemps' (The Rite of Spring) प्रथम सादर झाला. आधुनिक कलेतला हा एक मैलाचा दगड मानला जातो.
१९१९ : आईनस्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताचा पुरावा शोधण्यासाठी आर्थर एडिंग्टन आणि अँड्र्यू क्लॉड यांनी प्रथम निरीक्षणे केली.
१९५३ : जगातले सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर पहिले मानवी पाऊल पडले; एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी शिखर सर केले.
१९५८ : भूदान पदयात्रेच्या निमित्ताने आचार्य विनोबा भावे पंढरपूरच्या मंदिरात प्रथमच गेले.
१९६४ : पॅलेस्तिनी प्रश्नाबद्दल पूर्व जेरुसलेम येथे अरब लीगची बैठक; यातून पुढे पॅलेस्तिनी मुक्ती संघटनेची स्थापना.
१९८५ : पाय नसलेल्या स्टीव फोन्योने व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथे मॅरेथॉन पूर्ण केली. ४२ कि.मी. अंतर पार करण्यास फॉन्योला चौदा महिने लागले.
१९८५ : ब्रसेल्समध्ये युरोपियन कपच्या अंतिम फुटबॉल सामन्यात लिव्हरपूलच्या चाहत्या प्रेक्षकांनी दंगा केला; त्यात भिंत कोसळली; परिणामी ४१ प्रेक्षक मृत्युमुखी पडले व शेकडो जखमी झाले.
१९९९ : 'डिस्कव्हरी' या यानाने प्रथम आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर डॉकिंग केले.
१९९९ : भारताचा कर्णधार महंमद अझरुद्दीन याने एकदिवसीय सामन्यात ९,००० धावांचा पल्ला पार करून विक्रमाची नोंद केली.
२०१३ : फ्रान्समध्ये पहिला समलैंगिक विवाह सोहळा संपन्न.

३० मे
जन्मदिवस : भौतिकशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस (१८५८), इतिहासकार पांडुरंग पिसुर्लेकर (१८९४), प्लाझ्माप्रवाहावर संशोधन करणारा नोबेलविजेता हानेस आलवेन (१९०८), मेंदूच्या कामावर संशोधन करणारा नोबेलविजेता ज्युलियस अॅक्सलरॉड (१९१२), चित्रकार दीनानाथ दलाल (१९१६), सिनेदिग्दर्शिका आन्येस वार्दा (१९२८), अभिनेता परेश रावल (१९५०)
पुण्यस्मरण : तत्त्वज्ञ व लेखक व्होल्तेअर (१७७८), प्राच्यविद्या संशोधक देवदत्त भांडारकर (१९५०), संघटित कामगार चळवळीचे जनक ना. म. जोशी (१९५५), नोबेलविजेता लेखक बोरिस पास्तरनाक (१९६०), अणूवैज्ञानिक लेओ शिलार्द (१९६४), चित्रकार एस्. एल्. हळदणकर (१९६८), अभिनेत्री वनमाला (२००७), नाट्यकलावंत कान्होपात्रा (२००८), शरीरातल्या संप्रेरकादी द्रव्यांचे प्रमाण शोधून काढण्याची पद्धत शोधणारी, नोबेलविजेती रोझालिन यालो (२०११), स्नायूंच्या आकुंचनावर संशोधन करणारा नोबेलविजेता अँड्यू हक्सली (२०१२), सिनेदिग्दर्शक ऋतुपर्ण घोष (२०१३), लेखिका वीणा मजुमदार (२०१३)
---
१९६६ : सर्व्हेयर १ हे अवकाशयान प्रक्षेपित केले. अंतरिक्षातील वस्तूवर यशस्वी लँडिंग करणारे हे पहिले अवकाशयान.
१९७४ : एअरबस ए३०० या विमानाची प्रवासी सेवेला सुरुवात
१९८७ : गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला.
२०१२ : विश्वनाथन आनंद पाचव्यांदा बुद्धिबळ जगज्जेता बनला.
२०१३ : नायजेरियाने समलिंगी विवाहावर बंदी घालणारा कायदा पारित केला.

३१ मे
जन्मदिवस : सेल्सियस तापमापक बनवणारा गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ जाँ-पियार क्रिस्तीन (१६८३), पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (१७२५), कवी वॉल्ट व्हिटमन (१८१९), लेखक भा. रा. भागवत (१९१०), क्रिकेटपटू पंकज रॉय (१९२८), अभिनेता, दिग्दर्शक क्लिंट ईस्टवूड (१९३०), नाटकाचे अभ्यासक वि. भा. देशपांडे (१९३८), नायट्रिक ऑक्साईडवर संशोधन करणारा नोबेलविजेता लुईस इनार्रो (१९४१), सिनेदिग्दर्शक रेनर वेर्नर फासबिंडर (१९४५), क्रिकेटपंच स्टीव्ह बकनर (१९४६), अभिनेत्री ब्रूक शील्ड्स (१९६५)
पुण्यस्मरण : संगीतकार जोसेफ हाय्दन् (१८०९), प्राच्यविद्यापंडित, समाजसेवक डॉ. भाऊ दाजी लाड (१८७४), पहिली डॉक्टर महिला, पहिली एम.डी., पहिल्या महिला वैद्यकीय महाविद्यालयाच्या संस्थापक एलिझाबेथ ब्लॅकवेल (१९१०), लेखक बोरिस पास्तरनाक (१९६०), आधुनिक मराठी कथांचे प्रवर्तक दिवाकर कृष्ण केळकर (१९७३), विषाणूंवर संशोधन करणारा नोबेलविजेता जाक मोनो (१९७६), काही अणुकेंद्रांचा आकार शोधणारा नोबेलविजेता लिओ रेनवॉटर (१९८६), मल्याळी सिनेदिग्दर्शक जॉन अब्राहम (१९८७), तबलावादक पं. सामताप्रसाद (१९९४), क्रिकेटपटू सुभाष गुप्ते (२००२), संगीतकार अनिल विश्वास (२००३), चित्रकार, शिल्पकार लुईज बूर्ज्वा (२०१०)
---
जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन
स्वातंत्र्यदिन : दक्षिण आफ्रिका (१९६१)
१८५९ : लंडनच्या 'बिग बेन' घड्याळाने पहिले ठोके दिले.
१९११ : बेलफास्ट, आयर्लंडमध्ये टायटॅनिक बोटीच्या बांधणीची सुरुवात झाली.
१९२९ : पहिले बोलके मिकी माऊस कार्टून प्रकाशित
१९६१ : 'युनियन ऑफ साऊथ आफ्रिका' देश 'रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रिका' बनला.
१९७७ : भारतीय सैनिकांच्या तुकडीची कांचनगंगा शिखरावर पहिली चढाई.