हकीम वैद्य आणि डॉक्टर..

आजच्या मुंबई मिररमधे वाचलं की आयएमएने (इंडियन मेडिकल असोसिएशनने) अशी मागणी केली आहे की "डॉक्टर" किंवा "डॉ." हे बिरुद / पदवी फक्त अ‍ॅलोपथी (मॉडर्न मेडिसिन) डॉक्टर्सनीच वापरली पाहिजे. बाकीच्या वैद्यकीय पॅथीजना आपापली इनिशियल्स वापरणं बंधनकारक व्हावं.

ऑनलाईन लिंक सापडत नाहीये. छापील मिररमधे वाचलं आहे.

त्यांचं म्हणणं थोडक्यात असं की भारतात मोठ्या संख्येने नवनवे डॉक्टर्स तयार होत आहेत. यातले बरेचजण आयुर्वेदिक , युनानी आणि होमिओपॅथीमधे पदव्या / पदविका इत्यादि घेऊन प्रॅक्टिस करतात आणि प्रत्यक्षात अ‍ॅलोपथी औषधंच लिहून / बांधून देतात.

भारतातली बहुतांश जनता डॉक्टर इतकाच शब्द जाणते आणि सर्वांना एकच समजते. त्याउपर अ‍ॅलोपॅथी औषधेच दिली जात असल्याने बर्‍याचश्या रुग्णांना त्यांच्या डॉक्टरचं खरं क्वालिफिकेशन समजतही नाही. डिग्री वगैरे फार थोडे पेशंट पाहतात.

तस्मात आयुर्वेदिक तज्ञांनी आपल्या नावामागे "डॉक्टर" न लावता "वैद्य" लावावं, युनानींनी "हकीम" आणि होमिओपॅथ्सनी "होमिओपॅथ" असे शब्द प्रीफिक्स करावेत असं अ‍ॅलोपॅथीप्रधान आयएमएचं म्हणणं आहे. हे स्टेटमेंट त्यांनी युनानी, आयुर्वेदिक आणि होमिओपथी अशा सर्व असोसिएशन्सना पाठवलं तेव्हा त्यातल्या कोणीच त्याला तत्वतः मान्यता दिली नाही.

आयएमए म्हणतं की डॉ. ऐवजी हकीम इत्यादि शब्द लावले की सामान्य नागरिकांना सहज ओळखता येईल आणि त्यांचा फायदा (इन्फॉर्म्ड डिसिजन) होईल.

"सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी"चे अध्यक्ष म्हणतात :"आम्ही आगामी मीटिंगमधे याचा विचार करु. ते (आयएमए) काहीही मागणी करतील, याचा अर्थ आम्ही गिव्ह इन करावं असा होत नाही."

युनानी आणि आयुर्वेदिक व्यावसायिकांचा प्रतिनिधी म्हणाला की "डॉक्टर" हे वैद्य किंवा हकीम या शब्दांचं फक्त भाषांतर आहे. (हकीम, वैद्य असे शब्द वापरुन) सामान्य माणसासाठी उगीच कॉम्प्लिकेटेड कशाला करायचं?

>>>>>>>>>>>>>

अर्थातच आयुर्वेदिक, युनानी,होमीओपॅथी "डॉक्टरांना" हे मनापासून मान्य होईलसं वाटत नाही.

मला आयएमएचं म्हणणं योग्य वाटतंय. आयुर्वेद , होंमिओपथी आणि युनानी यांच्यात खूप फरक आहे. त्यांच्या गुणवत्तेविषयी किंवा प्रभावीपणाविषयी चर्चा केली तर मोठंच चर्चासत्र होईल. पण सध्यातरी इथे आयएमएने कोणतीही उणीदुणी न काढता फक्त आद्याक्षर बदलण्याची मागणी केली आहे.

कायद्यानुसारही आयुर्वेदिक / युनानी / होमिओ व्यावसायिकांना अ‍ॅलोपथी किंवा एकमेकांच्या पथीची औषधं द्यायला परवानगी नाही. अर्थात हे कुठेच पाळलं जात नाही. एमबीबीएसची सीट मिळाली नाही तर आयुर्वेद, तेही नाही तर होमिऑपथी असा बहुतांश विद्यार्थ्यांचा प्रवास असतो. पण शेवटी लहानमोठ्या सर्व गावांत डिग्री कोणतीही असो सर्वजण मुख्यतः अ‍ॅलोपथी प्रॅक्टिसच करतात.

एकूण आयएमएची ही मागणी योग्य वाटते आहे का?

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

ही मागणी उचित नाही. अ‍ॅलिओपॅथी आणि डॉक्टर याचा संबंध काय? मला वाटते की अ‍ॅलिऑपॅथीची प्रॅक्टीस करणार्‍यानी अ‍ॅलिओपॅथ असे लावावे, होमिओपॅथनी होमिओपॅथ लावावे... मगच या मागणीला न्यायोचितता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ‍ॅलोपथी असा लेजिटिमेट शब्द आहे का? मी वाचलंय त्यानुसार आधुनिक "मेनस्ट्रीम" मेडिसिनला अन्य पथीच्या प्रॅक्टिशनर्सनी दिलेलं ते नाव आहे.

वैद्यकीय पेशा करणार्‍याला "डॉक्टर" हे खचितच पॉप्युलर कल्चरमधलं संबोधन आहे आणि ते रुढही आहे तेव्हा ते वापरत राहण्याचा हक्क वैद्यकशास्त्राच्या मुख्य प्रवाहालाच (तथाकथित "अ‍ॅलोपथी"ला) आहे असं वाटत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अॅलिओपथी नव्हे तर अॅलोपथी. बरोबर. माझे चुकले, या पॅथीच्या बाबत माझे नेहमीच चुकते, हा भाग वेगळा. Wink
'मेनस्ट्रीम मेडिसिन' नामक प्रकाराची मांडणी नेमकी कशी करण्यात आली आहे हे पाहणे रोचक आहे. ते असो.
पॉप्युलर कल्चर म्हणाल तर त्याचा अधिकार मेनस्ट्रीमलाच हे मात्र मान्य नाही. कारण पॉप्युलर कल्चरमध्येच होमिओपथी डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर असे शब्दप्रयोग आहेतच. तेव्हा, डॉक्टर हा शब्द प्रत्येकाला वापरता यावा, अट हीच असावी की त्या-त्या डॉक्टरने त्याच्या पॅथीचा उल्लेख करावा ही पदवी लावताना. इन्फॉर्म्ड डिसीजनसाठी तेच गरजेचे आहे. अशा इन्फॉर्म्ड डिसीजनच्या नावाखाली हा शब्द अप्रोप्रिएट होऊ नये.
आता इतर पॅथी या पॅथीच नाहीत वगैरे मुद्दे असू शकतात, पण त्याविषयी मी बोलणार नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयएमएची ही मागणी योग्य वाटते आहे .
तेच डेंटिस्टस च्या संबंधात देखील म्हणावेसे वाटते.

शेवटी लहानमोठ्या सर्व गावांत डिग्री कोणतीही असो सर्वजण मुख्यतः अ‍ॅलोपथी प्रॅक्टिसच करतात.

याचा अर्थ असा घ्यायचा का, की त्यांना स्वतःच्याच वैद्यक शास्त्रावर विश्वास नाही , म्हणून ते आलोपॅथीचीच औषधे प्रिस्क्राईब करतात? काही जण म्हणतात की इमर्जन्सी केसेस मधे आलोपॅथीचीच औषधे वापरणे हितकारक असते कारण त्यांचा परिणाम लवकर होतो म्हणून. मग असं असेल तर होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टर्स ना त्या औषधां संबधीची माहिती त्यांच्या आभ्यासक्रमात दिलेली असते का? आणि नसेल तर देणे जरूरी आहे असे वाटत नाही का? कारण पेशंट तुमच्यावर विश्वास ठेवून औषध घेत असतो तर त्या संबधीचा आभ्यासक्रम अशा डॉक्टर्सनी पूर्ण करणे जरूरी आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

तेच डेंटिस्टस च्या संबंधात देखील म्हणावेसे वाटते.

काय म्हणावेसे वाटते?

पूरक माहिती : डेन्टिस्ट सर्व रोगांवर उपचार करत नाहीच... तो आपला दातांवरच ट्रीटमेन्ट देतो... त्यामुळे हा आय एम ए चा बाण डेन्टिस्टवर नाहीच...
डेन्टिस्टाच्या मागे डॉ.काढून डें. किंवा दं. असे लावले तरी त्याला किंवा पेशंटला काही फरक पडत नाही.(तिकडे ऑप्शन नाही / स्पर्धा नाही).. हा आयएमए चा बाण अर्थातच आयुर्वेद आणि होमिओप्याथीवरच आहे ...

आपला
डें. भडकमकर मास्तर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाला दुखवायचा अथवा कमी लेखायचा हेतू नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

पीएचडी झालेले लोक पण डॉ.च आहेत. डॉक्टर म्हणजे औषध देणारा डॉक्टर का? असे स्पष्टीकरण आवश्यक असतेच. काही आयुर्वेदाची अभिमानी लोक स्वतःला डॉ न म्हणता जाणीवपुर्वक वैद्य म्हणवतात. युनानी मधे पण तसे हकीम म्हणवणारे असतील. ते पुर्वी देवीचे डॉक्टर लोक असायचे. ते देवीची लस टोचणारे होते. खेडेगावात देवीची निर्मूलन मोहिम त्यांनी चांगली राबवली होती.
उपाधी ही वै किंवा ह लावावी ही बाब खर तर तांत्रिक आहे. होमिओपाथि व आयुर्वेद वाले सर्रास अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करतात. तरी देखील भारतात आरोग्य सेवा जनसामान्यांपर्यंत सक्षमपणे पोहोचत नाही हा मुद्दा उरतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंक शोधून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहिसा संभ्रमीत करणारा प्रश्न आहे.
असॅ डॉ ऐवजी वै, ह, हो वगैरे लाऊन काही फरक पडेल का? ज्याला 'इन्फॉर्म्ड' रहायचे असेल ते नावाखालील पदवी वाचतात इतरांना त्या एबीसीडी (जी काही पदवी असेल) त्याने फारसा फरक पडत नाही.

नक्की मत बनवु शकलेलो नाही. विचार करतोय

मी एका पाटीवर S.S.C. H.S.C. M.B.B.S. असे लिहिलेले खुद्द मुंबईत वाचलेले आहे. तेव्हा आधी काहीही लिहा नावाखाली किती मोठी जंत्री देताय त्यावरही धंद्याचे वॉल्युम ठरत असावे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या चर्चेला पूरक म्हणून कोणी वेगळाल्या वैद्यकीय पदव्यांचे फुलफॉर्म /अर्थ इथे दिले तरी निदान हा धागा वाचणार्‍यांना तरी कोणता डॉक्टर कसला आहे तेवढं ओळखायला मदत होईल.

एलसीईएच, एफआरसीएस, आरएमपी, एमबीबीएस, एमएस, एमडी, डीएनबी, कंसात अमुक फेलो, डीजीओ, डीसीएच, बीडीएस, डीऑप्ट, डीएचएमएस, बीएएमएस, बीपीटी, अशा काही पदव्या वाचल्याचं आठवतं.डी-एनपी किवा तत्सम (नेचरोपथी असावं)

त्यातल्या नेमक्या कोणत्या जेन्युईन आहेत. इलेक्ट्रिक मेडिसिन वगैरेही मधे निघालं होतं.

केवळ "डी" ने सुरु होणारे डिप्लोमाज असतात का? फक्त डिप्लोमा करुन प्रॅक्टिस करणं कायदेशीर आहे का? की डिप्लोमा फक्त एमबीबीएस नंतर मिळतो.?

युनानी डिग्रीचं नाव काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गविंच्या या मागणीचे समर्थन करतो

आड्कित्ता, भडकमकर, धनंजय (इतरही या क्षेत्राशी थेट किंवा दुरून संबंधितांनी) आदींनी सगळ्या नाही तरी बर्‍याचदा दिसणार्‍या डिगर्‍यांविषयी इथे लिहिले तर आमचा अधिक फायदा होईल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

श्री.रा.रा. भिडस्त यांनी माझ्या खरडवहीत लिहिलेल्या मजकुरात उत्तम माहिती आहे ती इथे डकवतो आहे. धन्यवाद.
-------------------------------------------
एलसीईएच-लायसियन्सेट ऑफ कॉलेज ऑफ ईले़क्ट्रो-होम्योपथी
एफआरसीएस-फेलो ऑफ रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स.
आरएमपी-रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टीशनर.
एमबीबीएस-बॅचलर ऑफ मेडिसिन,बॅचलर ऑफ सर्जरी
एमएस-मास्टर ऑफ सर्जरी.
एमडी- डॉक्टर ऑफ मेडिसीन
डीएनबी-डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड.

डीजीओ-डिप्लोमा इन गायनेकॉलोजी अँड ऑबस्ट्रेटिक्स.
डीसीएच-डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ
बीडीएस-बॅचलर ऑफ डेण्टल सर्जरी
डीऑप्ट-डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री.
डीएचएमएस-डिप्लोमा इन होम्योपॅथिक मेडिसिन्,सर्जरी.
बीएएमएस-बॅचलर ऑफ आयुर्वेदि़क मेडिसिन,सर्जरी.(यातही पूर्वीच्या प्रॅक्टीशनरकडे बी.ए.एम अँड एस ही पदवी असे.आणि त्यात अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेद यांचा इंटीग्रेटेड अभ्यासक्रम असे.)
बीपीटी-बॅचलर ऑफ फिजीओथेरपी
डी-एनपी ...ते एनएटी असावं-नॅचरोपॅथीच.

आता एलसीईएच,आरएमपी,डीएचएमेस,आणि बी.ए.एम.&एस. या पदव्या impart केल्या जात नाहीत.

केवळ "डी" ने सुरु होणारे डिप्लोमाज असतात का?- नसावेत.
फक्त डिप्लोमा करुन प्रॅक्टिस करणं कायदेशीर आहे का? की डिप्लोमा फक्त एमबीबीएस नंतर मिळतो.?--त्या त्या शाखेच्या बॅक्यॅलूरेट पश्चात पदवी आणि पदविका सर्व पॅथीत उपलब्ध असतात.

युनानी डिग्रीचं नाव काय?--बॅचलर ऑफ उनानी मेडिसीन,सर्जरी. अर्थात बीयुएमएस.

याशिवाय,
डीएम-Doctorate in Medicine
एमसीएच-Master of Chirurgical (हे लॅटीन दिसतंय.अर्थात मेडिसीनमधल्या बव्हंशी टर्मिनॉलॉजी लॅटीन-ग्रीकोद्भव्च आहे.)हे सुपरस्पेशालायझेशनही आहेच.
शिवाय पोस्ट्-डॉक्टोरल फेलोशिप असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Doctor या शब्दाचा दोन शब्दकोषांमधे अर्थ पाहिला.
dictionary.com नुसार
a person licensed to practice medicine, as a physician, surgeon, dentist, or veterinarian.

Merriam-Webster नुसार
a person skilled or specializing in healing arts; especially : one (as a physician, dentist, or veterinarian) who holds an advanced degree and is licensed to practice

थोडक्यात परवाना असल्यास अगदी प्लासिबो देऊनही रूग्णांना बरं करणार्‍याला तांत्रिकदृष्ट्या डॉक्टर म्हणता येईल. एकंदर 'पथ्यां'बद्दल मतं काहीही असोत, आधुनिक वैद्यक संघटना उगाचच आक्रमक झाल्यासारखी वाटते आहे. याच्या मागे काही कारण असेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अमेरिकेत कोणीही फिजिकल थेरपिस्ट हे नांवामागे डॉक्टर लावत नाहीत. भारतात मात्र ही पॅरामेडिकल ब्रँच असूनही सगळे फिजिओथेरपिस्ट आपल्या नांवामागे डॉक्टर असे लावतात. घासकडवी म्हणतात त्याप्रमाणे इतर पाथींच्या प्रॅक्टिशनर्सना, अ‍ॅलोपाथिक मेडिसिन्स, पेशंटला देण्यास प्रतिबंध केला पाहिजे कारण त्यांच्या अभ्यासक्रमात ते, हा विषय शिकलेले नसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आय् एम ए च्या शेपटावरती कोणाचा तरी पाय पडलेला दिसतो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सत्यमेव जयते! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Allopathic medicine is an expression commonly used by homeopaths and proponents of other forms of alternative medicine to refer to mainstream medical use of pharmacologically active agents or physical interventions to treat or suppress symptoms or pathophysiologic processes of diseases or conditions.[1] The expression was coined in 1810 by the creator of homeopathy, Samuel Hahnemann (1755–1843). Never accepted as a mainstream scientific term, it was adopted by alternative medicine advocates to refer pejoratively to mainstream medicine.[2] In such circles, the expression "allopathic medicine" is still used to refer to "the broad category of medical practice that is sometimes called Western medicine, biomedicine, evidence-based medicine, or modern medicine".[3]

आपण जे शब्द वापरतो, त्यांचा अर्थ समजून न घेता, किंवा त्यांचा इतिहास समजून न घेता, केवळ सत्यमेव जयते ला भाळून बोलणार्‍यांची मला कीव अन घृणा, एकाच वेळी वाटते.

मी अ‍ॅलोपॅथ नाही, मी मॉडर्न मेडिसिनचा "डॉक्टर" आहे.

हा प्रतिसाद, मा. श्रा.मो. महोदय, आपल्या या धाग्यावरील पहिल्या प्रतिसादास(अ‍ॅलोपथी अन डॉक्टरचा काय संबंध?"), ज्याला येथे 'मार्मिक' असे ५ रेटिंग्ज आहेत, त्या देणार्‍या सर्वांनाही व, या स्पेसिफिक प्रतिसादास धरून आहे.
'pejorative' म्हणजे तु:च्छतेने,..
तिथे थोडा सहमत झालो होतो, giving you benifit of doubt, that u are objecting to calling any doctor an allopath in this fashion. but reading this response, my opinion changed.
असो, डिक्शनरी पहा व अभ्यास वाढवा. शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

विश्वनिर्मितीचा जो बहुमान्य सिद्धांत आहे, महास्फोट, त्याला big bang असं नाव तुच्छतेनेच दिलेलं होतं. हे नावही चूक आहे, स्फोट या शब्दाचा जसा अर्थ (सामान्यतः) समजला जातो तसं काहीही या सिद्धांतात मांडलेलं नाही; निरीक्षणांनी सिद्ध झालेलं नाही. पण १९४० च्या दशकापासून हे नाव असंच आहे. या नावावरून तुच्छ लेखण्याचाही प्रयत्न झाला असा समज आहे पण बिग बँग/महास्फोट सिद्धांत आपल्या या एकेकाळच्या म्हणे तुच्छतादर्शक असणार्‍या नावासह मान वर करून उभा आहे.

एकेकाळी म्हणे ढोर हा शब्द अवमानदर्शक नव्हता, पण आता तो तसा समजला जातो. च्यायला, आयला, साला हे शब्द आजकाल थोडे खालच्या दर्जाचे पण तरीही आई-बहिणीवरून असणार्‍या शिव्यांसारखे समजले जात नाहीत.

सामान्य लोकांच्या वापरातले शब्द शब्दकोषांमधे घातले जातात म्हणूनही इंग्लिश भाषा अधिक लोकप्रिय समजली जाते.

मग मॉडर्न मेडिसिनला सामान्य लोकांनी अ‍ॅलोपथी हे नाव वापरलं तर काय फरक पडतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इथे चर्चा, "डॉक्टर" हा शब्द अमक्यांनी वापरावा किंवा कसे? याबद्दल सुरू आहे.

अ‍ॅलोपथी ची Etymology पाहिलीत, तर त्यात पॅथी म्हणजे मार्ग असे नाहीये. Let the others suffer. असा तो अर्थ आहे. यात, अ‍ॅलोपॅथ्स रक्तमोक्षण, विरेचन, बस्ती इ. रुग्णास पीडादायक ठरणारे प्रकार अवलंबितात असा आक्षेप होता. हे मात्र आपल्या 'पूर्वजांचे श्रेष्ठ ज्ञान' वाल्या लोकांना ठाऊक नसते. (हे प्रकार आयुर्वेदातून युनानीत अन तिकडुन युरोपात जाऊन फोफावले. त्याला उत्तर म्हणून होमिओपथी निघाली, जिच्यात निरुपयोगि का होईना 'औशध' खऊन किमान पडून रहाण्याची सोय होती. बाकी मग निसर्ग बरा करीत असे. असो. हिस्टरी ऑफ मेडीसीन हे इथे अवांतर आहे.)

मुद्दा हा, की अमुक शब्द तमक्यासाठी वापरावा की नाही?

म्हणून मी शब्दांचे अर्थ नीट पहा, असे सुचविले. अर्थात कुणी कशाला काय म्हणावे, हे ज्याच्या त्याच्या मर्जीवर आहे. अनिरुद्ध बापूंना डॉक्टर बापू म्हटलेत तर त्यांच्या अध्यात्माला डॉक्टरकीचा बाज येत नाही, किंवा डॉ. लागूं च्या अभिनयाला डॉक्टर म्हटल्याने लाज येत नाही. तसे तर रामदेवबाबा ही "डॉक्टरकी" करतात, अन वृंदा करातांना कायदेशीररित्या त्याबद्दल काहीही करता येत नाही.

इथे अमुक पदवीदर्शक प्रिफिक्सने होणारी जनसामान्यांची दिशाभूल हा प्रश्न आहे.

फिजिओथेरपिस्ट व ऑप्टोमेट्रिस्ट या पॅरामेडिक लोकांनी भारतात स्वतःला डॉक्टर म्हणवणे सुरू केले आहे. यांचा वैद्यकाशी दूरान्वयेही संबंध येत नाही. या सभ्य लोकांना "डॉक्टरकी" करण्यापासून रोखण्यासाठी आयएमएने हे पाऊल उचलले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

वरचा माझा प्रतिसाद फक्त अ‍ॅलोपॅथी या शब्दासाठी होता. भले हा शब्द (अजून सर्व) शब्दकोषात नसेल पण सामान्य लोकांना समजतो, तर तो तुच्छ लेखू नये किंवा बेदखल करू नये एवढाच माझा मुद्दा होता. हा शब्द बेदखल करायचा असेल तर डॉक्टर शब्दाच्या मुळाशीच जायचं का? (जयदीप यांचा प्रतिसाद)
इथे एक बातमी मिळाली ज्यात IMA ने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात याचिका दाखल केल्याचं म्हटलं आहे. तीन वर्षांचा कोर्स एका वर्षात करून होमिओपॅथ्स, आयुर्वेदीक आणि युनानी डॉक्टर्स 'अ‍ॅलोपथी'ची औषधं रूग्णांना देऊ शकतात असं त्यात म्हटलेलं आहे.
डिक्शनरी.कॉमवर allopathy, मेरियम-वेबस्टरवर allopathy.

इथे अनेक लोकं लिहीतात ज्यांना स्वतःला म्हणवून घ्यायचं तर डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीही म्हणवून घेता येईल, अगदी कायदेशीरपणे. मग त्यांच्या शिक्षणाचा शिकवणे, औषधं शोधणे, बनवणे, देणे किंवा फिलॉसॉफीशी काडीमात्र संबंध नसेल तरीही!

पण मूळ लेखात उल्लेख केलेली ही बातमी मलाही सापडली नाही. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.


पण मूळ लेखात उल्लेख केलेली ही बातमी मलाही सापडली नाही.

अगो,वरती श्री.रा.रा. संदेश यांनी शोधून दिली आहे की लिंकः

http://lite.epaper.timesofindia.com/getpage.aspx?pageid=11&pagesize=&edi...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला हा प्रतिसाद कळलाच नाही. 'सत्यमेव जयते'ला मी भाळलो आहे, असे तुमचे मत असावे असे दिसते. 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमात जे काही मांडले गेले त्यात नवे काहीच नाही. त्यामुळे त्याला भाळण्याचे काही कारणच नाही. 'सत्यमेव जयते' इथं मी 'जय हो' असंही लिहिलं आहे. त्यात उपरोध आहे.
माझी मूळ विषयावरील मते कायम आहेत. अॅलोपथीतील डॉक्टरांची डॉक्टर या शब्दावर मक्तेदारी नाही. यासंदर्भात वरचाच माझा दुसरा प्रतिसादही पहावा. त्यात प्रत्येक पॅथीच्या डॉक्टरने त्या-त्या पॅथीचा उल्लेख करावा असे मी म्हटले आहे.
आधुनिक वैद्यक, म्हणजेच अॅलोपथी, इतर वैद्यक पद्धतींना मेडिसिन मानत नाही. तरीही 'डॉक्टर ऑफ मेडिसिन' यात डॉक्टर हा शब्द वैद्यक उपचार करणारा डॉक्टर अशा अर्थी आला आहे का, असा एक प्रश्न माझ्या मनात आहे. तसे असेल तर तो शब्द अॅलोपथीने शिक्षणशास्त्राच्या व्यवस्थेतून अप्रोप्रिएट केला आहे, की शिक्षणाशास्त्राच्या इतर व्यवस्थेने तो आधुनिक वैद्यकाकडून अॅप्रोप्रिएट केला आहे, असाही प्रश्न आहेच. बॅचलर - मास्टर - डॉक्टर अशी चढती भाजणी मला माहिती आहे. त्या दृष्टिकोनातून हे प्रश्न आले आहेत.
डॉक्टर हा शब्द पदवीनिदर्शक आहे की वृत्तीनिदर्शक? वृत्तीनिदर्शक नाही, असे मला माझ्या अल्पअभ्यासानुसार वाटते. ते चुकीचे असेल तर तसे दाखवावे ही विनंती.
तुम्ही लिहिले आहे की, तुम्ही अॅलोपॅथ नसून "मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर" आहात. एक तथ्य म्हणून मी ते स्वीकारायचे असे ठरवले तरी, डॉक्टर या शब्दाविषयी मी उपस्थित केलेले प्रश्न तूर्त तरी कायम राहतात. त्याविषयी तुमचे उत्तर काय ते समजून घ्यायचे आहे. त्यासोबतच उद्या एखाद्याने मी "होमिओपॅथीचा डॉक्टर" (इथेच इतरही पॅथी टाकता येतात) आहे असे म्हटले तर आपली भूमिका काय असली पाहिजे, हेही मांडा. आता इथे पॅथी या शब्दाची व्याख्या आली. तिच्या कसोटी आल्या. त्या कसोटीचे आधार व मापदंड आले. हे सारे आधुनिक विज्ञान म्हणून स्वीकारतील त्यांना लागू नाही. जे आधुनिक विज्ञानाचा असा स्वीकार, डोळसपणेच, करत नाहीत त्यांच्यासाठी त्या पॅथी आहेत, असे मानावे लागेल ना?
अॅलोपथीचा उल्लेख इतर वैद्यक शाखांनी पेजोरेटिव्ह - तुच्छतेने - केला असला तरी तो उल्लेख लोकांनी स्वीकारलेला दिसत नाही. म्हणजे, लोकांनी आधुनिक वैद्यकाचा बहुतांशाने स्वीकार करून या इतर वैद्यक शाखांना त्या मुद्यावर उत्तर दिले आहे. मी तरी 'अॅलोपथी' हा उल्लेख तुच्छतेने करत नाही. माझ्यालेखी ती एक वैद्यक शाखा आहे. बऱ्याच ठिकाणी ती यशस्वी होते, उर्वरित ठिकाणी फसते. इतरही शाखांची अशीच शक्तीस्थाने आणि मर्यादा आहेत. माझे हे मत कुणीही अमान्य करू शकते.
आयएमएच्या शेपटीवरचा पाय म्हणजे 'सत्यमेव जयते' कार्यक्रमात झालेली टीका. त्या टीकेवरून एकूण वैद्यक व्यवसायाविषयी (या एकूणात साऱ्याच पॅथीतील अनुचित प्रकार आले) जे चित्र निर्माण झाले आहे त्यावरून लक्ष अन्यत्र नेण्यासाठीचा आयएमएची ही सूचना आहे, असे मला वाटते. हे वाटणे तात्कालीक आहे. नवी नीट विपरित तथ्ये नीटपणेच समोर आली तर माझ्या वाटण्याला अर्थ रहात नाही, इतके ते खुले आहे.
च्यायला, उगाच माझी सुपारी केलीत राव. Wink
चला, आता माझ्या अभ्यासात भर टाका. Smile
आणि खरे तर, माझा वाद आधुनिक वैद्यकाशी नाही. आधुनिक वैद्यकातील मर्यादा न स्वीकारता त्याचे तत्त्वज्ञान करण्याशी आहे. पण तो वेगळा मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आदितीतैना दिलेला वरील प्रतिसाद वाचून तुमच्या मनातील शंकांचे निरसन झाले नसल्यास सांगा,
जास्त इस्कटून अन बारीक कातरून सांगतो.

(बिनशेपटीचा, मर्यादित) आडकित्ता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

निःशंकपणे माझे मत असे: मॉडर्न मेडिसिनची 'डॉक्टर' या शब्दावर (वृत्तीनिदर्शक अर्थाने) मक्तेदारी नाही. मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिशनर हा शब्दप्रयोग या क्षेत्रातील व्यावसायिकांनी स्वतःच्या हिंमतीवर रूढ करावा. तीच गोष्ट आयुर्वेद, होमिओपथी यांना लागू. लोक ते शब्दप्रयोग स्वीकारतील तेव्हा हा वाद निकालात निघेल. जोवर तसे होत नाही तोवर होमिओपथी किंवा आयुर्वेद किंवा युनानीतील प्रॅक्टिशनर मॉडर्न मेडिसिनच्या प्रॅक्टिशनरप्रमाणे सारख्याच न्यायाने 'डॉक्टर' हा शब्द वापरू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे अमुक पदवीदर्शक प्रिफिक्सने होणारी जनसामान्यांची दिशाभूल हा प्रश्न आहे.

फिजिओथेरपिस्ट व ऑप्टोमेट्रिस्ट या पॅरामेडिक लोकांनी भारतात स्वतःला डॉक्टर म्हणवणे सुरू केले आहे. यांचा वैद्यकाशी दूरान्वयेही संबंध येत नाही. या सभ्य लोकांना "डॉक्टरकी" करण्यापासून रोखण्यासाठी आयएमएने हे पाऊल उचलले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मॉडर्न मेडिसिन आणि डॉक्टर या शब्दांचे एक्स्क्लूजिव्ह नाते सिद्ध झाले की आपोआप आयएमएची मागणी मान्य करावी लागू शकते. म्हणून मी डॉक्टर या शब्दाची व्याख्या विचारली आहे. ती सिद्ध झाली की ते एक्स्क्लूजिव्ह नाते सिद्ध होईल, किंवा नाते नाही हे सिद्ध होईल. विषयाचा निकाल माझ्यापुरता मी केलेला असेल. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रामोजी,
भडकमकर मास्तरांच्या वाक्याखाली तुमचे सत्यमेव जयते वाचून मग मी माझे आगखाउ लिहिणे सुरू केले होते. तुमच्याशी व्यक्तिगत दुश्मनी/भांडण नाही.
आयएमए ने जी भूमीका घेतली त्याबद्दलचा मूळ लेख आहे.
"डॉक्टर" कुणी म्हणवून घ्यावे याबद्दल ती भूमीका आहे. एतद्देशिय जनसामान्यांत डॉक्टर म्हणजे माझ्या रोगावर औषधोपचार करणारा अशी समजूत आहे. याचा गैरफायदा घेत, त्यांना लुटणारे अनेक आहेत. ते होऊ नये असा यामागे उद्देश आहे.

अवांतर म्हणजे, इंग्लंडात सर्जन्स स्वतःला डॉक्टर म्हणवून घेत नाहीत. ते मिस्टरच असतात. फिजिशियन अन सर्जन यांतील भांडण आदिम आहे, अन सर्जन्स व बार्बर्स एकाच पारड्यात तोलले जातात अन फिजिशियन्स कसे मठ्ठ असे किस्से सर्जन्स चघळतात.

कुणी स्वतःला काय म्हणवून घ्यावे याबद्दल मला काही कर्तव्य नाही. सर्वपरिचित रेड क्रॉस : लाल फुली डॉक्टर लोक गाड्यांवर लावीत. याविरुद्ध रेडक्रॉस सोसायटीने आक्षेप नोंदविल्यावर आयएमएनेच हे लाल फुली लावणे बंद केले. आजकाल डॉक्टरच्या (नव्या) गाडीवर लाल फुली दिसत नाही. (अपवाद, रेडक्रॉस सोसायटीचा मेंबर) परंतू लाल फुलीवाली गाडी डॉक्टर नसलेल्या (पर्सन व्हू कॅन ट्रीट इलनेस) माणसाची असू शकते..

जाता जाता अती अवांतर : पुन्हा कोप्य पस्ते : + थोडी भर -->

अर्थात कुणी कशाला काय म्हणावे, हे ज्याच्या त्याच्या मर्जीवर आहे. अनिरुद्ध बापूंना डॉक्टर बापू म्हटलेत तर त्यांच्या अध्यात्माला डॉक्टरकीचा बाज येत नाही, किंवा डॉ. लागूं च्या अभिनयाला डॉक्टर म्हटल्याने लाज येत नाही. तसे तर रामदेवबाबा ही "डॉक्टरकी" करतात, अन वृंदा करातांना कायदेशीररित्या त्याबद्दल काहीही करता येत नाही. (म्हणजेच त्यांचा माज थांबवता येत नाही, अन स्वतःला डॉक्टर म्हणविण्याची कुणाचीच खाज थांबविता येत नाही..)

*बाज खाज माज लाज इ. यमकाच्या आहारी जाऊन लिहिले आहे*

- श्री. आडकित्ता. (सर्जन. डॉ. नव्हे.)

ता.क.
तुमची सुपारी नै हो केलेली.. च्याय्ला टाळ्कं गरम आहे, चुकून वैयक्तीक रोखाने संताप केला गेला, राग मानू नका..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मला राग आला नाही. वैयक्तिक टोचेल असं लिहिलंच किंचित. तरीही, राग आला नाही. कारण मौज वाटली. मौज वाटण्याचेही कारण आहे. तुमची टिप्पणी प्रामुख्याने, तुमच्या भूमिकेतून ती आली असली तरीही, आयएमएशी निगडीत अधिक दिसते. म्हणजे ते लॉंग लीव्ह आयएमए वगैरे. त्यापेक्षा तुम्ही "डॉक्टर हा शब्द वैद्यक वृत्तीत प्रस्थापित केला तोच मुळी मॉडर्न मेडिसिनने, म्हणून त्याच मेडिसिनची प्रॅक्टीस करणाऱ्यांनी तो लावला पाहिजे," असे काही म्हणायला हवे होते. ते अधिक समजून घेता आले असते. असो.
आता मूळ मुद्याकडे. डॉक्टर या शब्दाचा वापर कुणी करावा याविषयी आयएमएने केलेली सूचना विचारात घेत इतर पॅथीचे म्हणणे ऐकून डॉक्टर या शब्दाची व्युत्पत्ती व अर्थ तपासून, त्याचा मॉडर्न मेडिसिनशी असलेला किंवा नसलेला अन्योन्य संबंध पाहून याविषयीचा निर्णय झाला पाहिजे. त्यासाठी ही चर्चा आहे. निदान आपल्यापुरते आपण काही मापदंड ठरवू शकतोच.
अॅलोपथी हा उल्लेख मी तुच्छतेने करत नाही, हे पुन्हा एकदा. हो... 'तुमच्या' गावात तुमच्याचकडे उपचारासाठी यावं लागेल ना! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा कशाबद्दल आहे?
मागणी आयएमएची आहे.
ती का केली व एक्झॅक्टली कोणत्या कारणासाठी केली ते मी वर लिहिलेच आहे. यावर तुमचे अवांतर आले म्हणून मी धाग्यावर लिहिता झालो.
पुन्हः सांगतो, आयएमएची ती मागणी, भारतात पॅरामेडिक लोक ती पदवी लावून 'प्र्याक्टीस' करू लागले आहेत म्हणून आहे.

उद्या तुम्ही स्वतः डॉ. श्रावण मोडक अशी पाटी लावून, मी पुष्प-उपचार करतो असे जाहीर केलेत व ५-५० फुलांची नावे वेगवेगळ्या आजारांवर उपचार म्हणून जाहीर केलीत, तरी तुमचे फारसे वाकडे इथे (या देशात) होणार नाही. कदाचित माझ्यासारखा कुणी माथेफिरू तुमच्या विरुद्ध 'अँटीक्वॅकरी अ‍ॅक्ट'खाली तक्रार करायला पोलिसांपर्यंत जाईल, अन ते महाभाग मला हाकलून देतील. तुमचे दुकान चालू राहील. (आशा करतो, की 'तुमचे' मधील दृष्टांत ध्यानी घ्याल, व्यक्तीगत रोखाने नाही.)

त्यापेक्षा तुम्ही "डॉक्टर हा शब्द वैद्यक वृत्तीत प्रस्थापित केला तोच मुळी मॉडर्न मेडिसिनने, म्हणून त्याच मेडिसिनची प्रॅक्टीस करणाऱ्यांनी तो लावला पाहिजे," असे काही म्हणायला हवे होते. ते अधिक समजून घेता आले असते.

तुमच्या मनात काय आहे ते ओळखून मला लिहिता आले असते, तर मी परमेश्वरापेक्षा जास्त हुस्शार झालो नसतो का? आपणाला बरे वाटावे म्हणून लिहिणे कठीण. मी माझ्या मनातले लिहिण्याचा प्रयत्न करतो.

रच्याकने:
माझ्या गावात माझ्याच कडे आलात, किंवा कुणाच्याही गावात कोणत्याही 'अ‍ॅलोपथी'च्या डॉक्टरकडे गेलात, तरी तो तुमची जात/धर्म/धंदा न बघता त्याच्या योग्यते नुसार, तुमच्या आजारास बरे करण्यासाठी सर्वोत्तम आधुनिक उपचार देण्याचाच प्रयत्न करील. व त्या मोबदल्यात, तुमच्याकडून पैसे मागून, अन मोजून घेईल, हे छातीठोकपणे सांगू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉक्टर (doctor) या शब्दाचा लॅटिनमध्ये मूळ अर्थ 'शिक्षक' असा होतो (धातू: docere = शिकवणे), अाणि उच्चार 'डॉक्टॉर' असा होतो. तेव्हा सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी एकत्र येऊन IMA ला अशी मागणी करावी की हे बीरूद वापरण्याचा हक्क फक्त अाम्हाला असल्यामुळे तुमच्यांपैकी मेडिकल कॉलेजात शिकवणारे सोडून बाकी कुणीही ते वापरू नये. मग IMA च्या सदस्यांना वेगळं बीरुद शोधून काढावसं वाटलं तर तो त्यांचा प्रश्न अाहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

ज्या क्षेत्रात शिक्षण झालेलं असेल त्याच क्षेत्रातली औषधं देण्याची सक्ती का करू नये? म्हणजे आयुर्वेदिक कोर्स केलेल्यांनी केवळ आयुर्वेदिक औषधं द्यावीत. मग कोणाचा गुण येतो त्यावरून आपोआप ठरेलच. ज्यांनी प्रस्थापित डॉक्टरकीचा पूर्ण कोर्स केलेला नाही, त्यांनी त्या ज्ञानावर आधारित उपचार प्रणालींचा वापर करू नये या मताचा मी आहे.

पदवीमध्ये बदल केल्याने अधिक इन्फॉर्म्ड डिसिजन होईल हे थोड्या प्रमाणात पटतं. मात्र अनेक पेशंट्सचा प्रणालीपेक्षा व्यक्तीवर विश्वास अधिक असतो हेही खरंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आयुर्वेद, अ‍ॅलोपथी, होमिओपथी, योगोपचार या विविध उपचार पद्धतींची गरज आहे. या प्रत्येक क्षेत्रात चांगली-वाईट माणसं आहेत. यातल्या प्रत्येक मार्गाच्या काही मर्यादा आहेत आणि काही बलस्थानं आहेत. हे सगळे जर त्यांच्या क्षेत्रातले ज्ञान वापरुन उपचार करत असतील तर त्यांना डॉक्टर का नाही म्हणू आणि फक्त अ‍ॅलोपथीची पदवी घेतलेल्या व्यक्तीला का म्हणायचं डॉक्टर हे नीट कळलं नाही.

अवांतरः गाय-म्हैस यांना कृत्रिम रेतन करणा-या तंत्रज्ञालाही गावात डॉक्टर म्हणतात. माझ्या अशा तंत्रज्ञ सहका-याना मी डॉक्टर म्हणत नसल्याने बहुतेक वेळा गावकरी माझ्यावर नाराज होत असत (आणि मी सहका-यांना डॉक्टर म्हणायला लागत असे) याची आठवण आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिअवांतर होईल..
पण माझ्या महिला "डॉक्टर" सहकार्‍यांना पेशंट्स 'सिस्टर' म्हणून हाक मारीत तेव्हा पेशंटवर व इन जनरल झालेली चिडचिड आठवली..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

शब्दाची व्युत्पत्ती कशी आहे, किंवा शब्दाचा प्रचलित (पण चुकीचा) अर्थ काय आहे यावर वाद घालणे व्यर्थ आहे. आयुर्वेदात वैद्य आहेतच, इतर ठिकाणी हकिम वगैरे आहेत. तसंच डॉक्टर हा मॉडर्न मेडीसीनवाला आहे हे सरळ आहे.

होमीअपथी किंवा इतर मेडीसीनच्या वैज्ञानिकतेबद्दल प्रश्न उभे असताना स्पष्ट वर्गवारी असणे गरजेचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

वाद शब्दांवर नाही.

भारतासारखी प्रचण्ड संख्येने व अतीशय बिनडोक व उत्तम क्रयशक्ती असलेली गिर्‍हाइके असलेली बाजारपेठ जगात कुठेच नाही.

उदा;.
टायटनच्या शोरूममधे 'फुकट' नंबर तपासून तुम्ही जेव्हा ५ हजाराचा चष्मा एका पॉलिश्ड सेल्स'पर्सन' कडून घेता, तेव्हा तो 'फुकट' नंबर तपासणारा माणूस कोण? हे तुम्हाला ठाऊक असते काय? त्या ऑप्टोमेट्रीस्टने दिलेल्या नंबरने कमीअधिक दिसत असेल तर नक्की काय आजार आहे? तुम्हाला डायबेटिक रेटिनोपथी, किंवा कॅटरॅक्टची सुरुवात किंवा इतर अजून काही आहे किंवा कसे? हे कळण्याची त्याची कुवत आहे काय? याचा विचार तुम्ही तुमच्या कष्टाचे ५ हजार रुपये फेकताना करता काय? जर याप्रकारच्या ऑरगॅनिक डिमिनिशन ऑफ व्हिजनची चिकित्सा योग्य वेळी झालीच नाही तर तुमची नजर कायमची जायबंदी होऊ शकते हे तुम्हाला ठाऊक आहे काय? परदेशी नेत्रतज्ञ काय करतात याचा प्रोटोकॉल पाहिला आहेत काय?

आता मला सांगा, आयएमए शब्दांवर वाद घालते आहे, की पब्लिक वेल्फेअर साठी काम करते आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

भारतासारखी प्रचण्ड संख्येने व अतीशय बिनडोक व उत्तम क्रयशक्ती असलेली गिर्‍हाइके असलेली बाजारपेठ जगात कुठेच नाही.

ब्रिटनमधे NHS (सरकारी खर्चाने लोकांना औषधोपचार उपलब्ध करून देणारी संस्था) अजूनही होमिओपथी उपचारांना मान्यता देते.
http://www.nhs.uk/news/2010/July07/Pages/nhs-homeopathy.aspx

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी मांडलेला मुद्दा लक्षात आला नाही, की केवळ चर्चेसाठी विधान केले आहात?
हे स्पष्ट केलेत तर पुढे बोलणे होईल.

<अवांतर>
"लांगूलचालन" करणार्‍या काँग्रेजी सरकारची पालिशी म्हणा, किंवा हवे ते म्हणा. आयुर्वेदाला 'सरकारी' मान्यता दिल्यामुळेच युनानी मेडीसीन नामक अती बिनडोक प्रणालीलाही या देशी सरकारी मान्यता आहे. तशीच होम्योपथीलाही आहे. युनाणी ची मेडीकल कालेजे चालतात, सरकारी सीईटी मधून तिथे अ‍ॅडमिशन होते. इ. इ.
यात 'सू ए जमजम' चे पाणी : 'त्या' पवित्र विहिरीचे पाणी 'औषध' म्हणून प्रिस्क्राईब होते. १६ व्या शतका पर्यंत ठीक होते. आजही दर्‍याखोर्‍यांतील "उनपदेवांचे" (Natural Hot Water Springs : high sulfer content of this hot water is helpful for some skin diseases, and this is what made such places, important and gave medicinal value to those places of worship.)

/अवांतर
इथे, मुद्दा पाश्चात्य रुग्णाला ज्या लेव्हलची रुग्णसेवा मिळते, जी मिळविण्यासाठी तो सजग असतो, तितकी आपण देवू शकतो का? देण्याची इच्छा आहे का? हा होता. किंबहुना, इथल्या रुग्णाला आपण काय सेवा मागायला हवी हे तरी समजते किंवा कसे? हा खरा कळीचा प्रश्न आहे. (जगातील बहुतेक पुढारलेल्या अन अनेक मागासलेल्या देशांतही मोठ्या प्रमाणावर भारतीय डॉक्टर्स आहेत, अन ते अत्युत्कृष्ट सेवा देत आहेत...)
कोणते सरकार कशाला का मान्यता देते, हा पुरावा विसंगत अन ट्रिव्हियल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

चांगली चर्चा चालू आहे... ( अ‍ॅलोपथी ही टर्म तुच्छतादर्शक आहे ही माहिती नवीन कळाली... आता कटाक्षाने आधुनिक वैद्यक असा शब्द वापरेन.. यात गंमत अशी आहे की इतर पॅथीचे लोक आपोआप बाय डिफॉल्ट पुरातन वैद्यकाचे झाले (की मागास वैद्यकाचे म्हणावे?) मग यावर आधुनिक होमिओअ‍ॅथी त़ज्ञ असले काही निघेल...

पण " निळे " म्हणाले तसे हा शेवटी नुसता शब्दच्छल होणार आणि पुढे काय निष्पन्न होणार कळत नाही...

मुद्दा गुंतागुंतीचा आहे आणि केवळ शब्दच्छलाच्याही पलिकडचा आहे. नुसता पॅथींमधल्या भांडणाचाही नसावा...

प्रत्येकाने आपापल्या शिकलेल्या अभ्यासाची औषधे द्यावीत ही थिअरी अत्यंत योग्य आहे... हे म्हणणे सोपे आहे पण प्रॅक्टिकली शक्य नाही, असे माझे मत आहे..
दूर गावात समजा एकच बी ए एम एस डॉक्टर आहे आणि त्याने आधुनिक वैद्यकाची औषधे द्यायची नाहीत असे ठरवले तर काय होईल? हा नियम करण्यासाठी तिथे एम्बीबीएस किंवा एमडी किंवा एम एस लोक हवेत ना? की प्रत्येक गावात एक एम्बीबीएस असावा / असला पाहिजे / असतो का? असा सरसकट नियम करणे शक्य आहे का? ?
( माझ्या डेन्टल कॉलेजमधल्या वर्गमैत्रिणीचे वडील होमिओपॅथ आहेत आणि ते कोकणातल्या एका खेड्यामध्ये होमिओपॅथीबरोबरच डेन्टल ट्रीटमेन्टही करायचे कारण आसपासच्या अनेक मैलापर्यंत डेन्टिस्ट नव्हता. आता हे थिअरी म्हणून चुकीचे आहे का? तर आहेच.. पण उपाय काय? त्यांच्यावर आयडीए ने काय कारवाई करावी?) की जिथे सर्व पॅथीचे लोक उपलब्ध आहेत तिथेच केवळ प्रत्येकाने आपापली पॅथीची औषधे द्यावीत असा नियम असावा?म्हणजे दुर्गम गावाला एक नियम आणि शहराला वेगळा, असे असावे? की हे फक्त शहरातले अधिक खर्च करू शकणारे ग्राहक टार्गेट करता यावेत म्हणून आहे?

आय एम ए ची ही मागणी जुनीच असावी. कित्येक दिवसांपासून/ वर्षांपासून आयुर्वेदिक आणि होम्योपॅथिक डॉक्तरांनी मॉडर्न मेडिसिनवली औषधे देऊ नयेत, असे ऐकतोय वाचतोय... साधारण २०१२ जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात काही मोठ्या मेडिकल स्टॉकिस्टना पकडले होते म्हणे ( त्यांनी चुकीच्या पद्धतीने औषधे विकली होती वगैरे वगैरे).. मग त्यांच्या संघटनेने नियम पाळायचेच तर पाळतोच, म्हणून आयुर्वेदिक डॉक्तरांची मॉदर्न मेडिसिन प्रिस्क्रिप्शन परत पाठवायला सुरुवात केली होती..( त्या काळात प्रचंड वैतागलेले एक ओळखीतले चांगले बी ए एम एस फॅमिली डॉक्तर पाहिले होते) हे असे एक दोन दिवस झाल्यावर आंदोलन, चर्चा आणि पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू झाले आहे...

माझ्या मते मॉडर्न औषधांना इतर पॅथींनी देण्यापासून बंदी करण्यापूर्वी योग्य डिग्री असलेल्यांनाच फक्त डॉक्टर म्हणणे ही कल्पना चांगली आहे...

अवांतर : " आय एम ए च्या शेपटावर पाय .." असले आचरट , मूर्ख आणि भंपक विधान केल्याबद्दल बिनशर्त माफी मागतो आणि चर्चा आता चाललीये तशीच गंभीर व्हावी आणि वाचायला मिळावी असे म्हणतो...

अतिअवांतर : माझा एक शाळेतला मित्र एम.एस. ( आयुर्वेदिक ) आहे... टिळक आयुर्वेदमधून बी ए एम एस झाला आणि दूर गावच्या कोणत्या तरी इस्पितळात त्याने एम एस ( आयुर्वेद) पूर्ण केले... म्हणजे तो आरोग्य विद्यापीठाचा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक सर्जन आहे... नव्या मागणीप्रमाणे त्याला काय म्हणावे? आयुर्वेदिक शल्यचिकित्सक , वैद्य शल्यकर्मी वगैरे वगैरे..( त्याने स्काल्पेल वापरावा की केवळ क्षारसूत्र करावे?).. पुन्हा शब्दखेळच सारा...

अतिअतिअवांतर : माझा एक डेन्टिस्ट बॅचमेट आहे. सकाळने लावलेल्या कस्ल्यातरी प्रदर्शनात फिरता फिरता वेळ घालवायला त्याने डॉ. बालाजी तांब्यांच्या औषधविक्रीच्या स्टॉलवर जाऊन " डॉक्टर बालाजी तांबे यांची डिग्री कोणती? ते एम्बीबीएस की बी ए एम एस? ते कोणत्या कॉलेजातून डॉक्टर झाले? "असे टोकदार प्रश्न विचारायला सुरुवात केली... खूप उडवाउडवीची उत्तरे मिळाली, अधिक चौकशी केल्यानंतर " ते निसर्गोपचारतज्ञ आहेत, औषधे घ्यायची तर घ्या नाहीतर फुटा " असे फुटवण्यात आले..." हा कोर्स किती वर्षांचा असतो? कोर्स पास झाल्यावर डॉक्टर डिग्री लावता येते का?" असे बरेच उद्बोधक प्रश्न विचारायचे राहून गेले असे मित्र म्हणाला. मित्राचा वेळ मस्त गेला, तो किस्सा ऐकताना माझाही... ( या गोष्टीचे सार खरंतर गंभीर आहे.. ब्लॅक कॉमेडी म्हणतात ती हीच का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक नवे मुद्देही आपण मांडलेत.
श्री श्री बा.ता. व डॉक्टर म्हणवण्याची खाज,
प्रत्येक गावी एका डॉक्टरला जाण्याची जबरदस्ती करणे, (कल्पना करा, एम एस पर्यंत मेरिटने सरकारी कालेजात शिकलेल्या तुमच्या मुलाला बांदोडे(बु||) गावी प्र्याक्टीस करायची सक्ती सरकारने केली)
क्षारसूत्र अन आयुर्वेदिक 'एम एस',
केमिस्ट लोकांनी परतविलेली प्रिस्क्रिप्शन्स.
सर्व पॅथीज हे एकाच परमेश्वरापाशी पोहोचणारे मार्ग आहेत असे म्हणून भारतीय आधुनिक वैद्यकिय शिक्षणाचे धिंडवडे काढणार्‍या आमच्या येऊ घातलेल्या पॉलीसिज...
भरपूर बोलण्यासारखे आहे.
डॉक्टर कुणी म्हणवून घ्यावे, ही या लढ्यातली पहिली पायरी आहे.

लाँग लिव्ह आयएमए, इतकेच म्हणतो.

(आयएमए अ‍ॅ़क्टिव्हिस्ट) आडकित्ता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्रत्येक गावी एका डॉक्टरला जाण्याची जबरदस्ती करणे, (कल्पना करा, एम एस पर्यंत मेरिटने सरकारी कालेजात शिकलेल्या तुमच्या मुलाला बांदोडे(बु||) गावी प्र्याक्टीस करायची सक्ती सरकारने केली)

अशी सक्ती सरकारने करण्याला विरोध असेल तर सर्व पथ्यांच्या डॉक्टरांना सर्व प्रकारची औषधं देण्याची सोय असणं ठीक वाटतं.
इथे म्हटल्याप्रमाणे:

Dr Bahubali Shah, president of Homeopathic association, Maharashtra, said that during an emergency, it becomes difficult for general practitioners or rural doctors to prescribe emergency medicines. “For some emergency problems like fever, vomiting, or dehydration, allopathic drugs work faster. It becomes a problem if non-allopathic doctors cannot prescribe them even in times of emergency,” he said.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक छोटुकला प्रश्न.

तुम्हाला अचानक श्वास घेता येईनासा झाला आहे. मी, तुम्हाला माझ्या हातात धरलेली एक 'गोळी' खायला दिली. ती गोळी तुम्ही केवळ माझ्यावर असलेल्या विश्वासाच्या जोरावर खाणार आहात. (तितकाच विश्वास तुमचा त्यांच्यावरही आहे)

त्या गोळीचे गुण/अवगुण मी अन 'डॉ' बाहुबली शाह, प्रेसिडेंट ऑफ होमिओपथिक... यांच्या पैकी कुणाला जास्त नीट समजतात? याबद्दल आपले मत काय?

addendum:
मला होमिओपथीचे/होमिओपथितले शष्प समजत नाही.
माझ्या बैरामजी जिजिभॉय वैद्यकिय महाविद्यालय, पुणे या मातृसंस्थेत, पदवीपूर्व वा पदव्युत्तर काली मला होमिओपथी अजिब्ब्ब्बबात शिकविली नव्हती.

या "मा." Dr Bahubali Shah, president of Homeopathic association, Maharashtra, यांना, त्यांच्या कालेजात किती "अ‍ॅलोपथी" व कशी शिकविली होती?

गोळी गिळण्यापूर्वी आपण स्वतःचा जीव तळहाती धरला आहात हे ध्याणी घेतलेच असेल असे वाटते..

सवलत कसली?
हवे ते गिळायचे स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. मी दारू किंवा उंदीर मारायची गोळी हवी तेंव्हा गिळू शकतो Wink भारतात होमिओपथी 'डॉक्टर' सोडा, माझ्या हास्पिटलातल्या मेडिकल स्टोरमधला झाडूवाला गोळ्या प्रिस्क्राईब करतो, अन तुम्हीही तुमच्या पोटच्या गोळ्याला अंदाजपंचे औषधे खाऊ घालता...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

होमिओपथीमधे 'इंजेक्शन्स' कोणती देतात?
'इमर्जन्सी' म्हणजे नक्की काय?
श्या!
होमिओपथी वरून टाळकं सरकलं आहे. श्रामोंच्या प्रतिसादाला उत्तर लिहून या धाग्यावर येणे बंद करणार होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

बांदोडे बुद्रुकमधे जाऊन मी आजारी पडले तर मी बाहुबली शाह किंवा युनानी हकीमाकडेही कदाचित जाईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अशी सक्ती सरकारने करण्याला विरोध असेल तर सर्व पथ्यांच्या डॉक्टरांना सर्व प्रकारची औषधं देण्याची सोय असणं ठीक वाटतं

या दोन गोष्टींचा संबंध काय? सर्व प्रकारची औषधं देणं हा प्रश्न डॉक्टरच्या सार्वभौमत्वाचा नसून त्याच्या पात्रतेचा आहे. विमानासाठी लायसन्स्ड पायलट मिळत नाही म्हणून कोणीही विमान उडवले तरी चालेल असे म्हणता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

उत्तम प्रतिसाद ... ( विमान लायसन्स्ड पायलट आणि प्रवासी हे उदाहरण उत्तम...)
स ह म त...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्या-ज्या ठिकाणी नाव वाचून बाजार-निर्णय होतो, त्या-त्या ठिकाणी (पाटीवर आणि प्रेस्क्रिप्शन-पॅडवर तरी) उपचारपद्धती असावी.

ही माहिती सहज कळून यावी, म्हणून कुठले शब्द वापरायचे त्याबाबत काहीतरी प्रमाण यादी असली, तर बरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाटीवर लाल फुली लावण्याबद्दल पूर्वी लिहिलेच आहे.
कितीही दिली, तरी सगळीच माहिती (आ)कळत नाही, हाच प्रॉब्लेम माझ्या या प्रचण्ड देशाचा आहे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सर्व पॅथीज हे एकाच परमेश्वरापाशी पोहोचणारे मार्ग आहेत असे म्हणून भारतीय आधुनिक वैद्यकिय शिक्षणाचे धिंडवडे काढणार्‍या आमच्या येऊ घातलेल्या पॉलीसिज...
भरपूर बोलण्यासारखे आहे.
डॉक्टर कुणी म्हणवून घ्यावे, ही या लढ्यातली पहिली पायरी आहे.

या पहिल्या पायरीबद्दल सहमत आहे....

अवांतर :
इथे कोणी यूनानी डॉक्टराकडे गेले आहे का?
मराठवाड्यात यूनानी डॉक्टर इतर भागांपेक्षा जास्त असतात म्हणे... निजमशाही इफेक्ट असावा.. कल्पना नाही..
त्यांचे कॉलेज, अभ्यासक्रम, त्यांची पुस्तके, त्यांच्यातले थोर हकीम याबद्दल माहिती करून घ्यायची जाम उत्सुकता आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे बघा.. डॉक्टरांनी अक्षर 'सुधरावे' यासाठी बरेच जण मागे लागलेले दिसताहेत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!