'दारु पिण्या'तला भ्रष्टाचार

सामना'च्या 2011 दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. अंकात जागेच्या उपलब्धतेनुसार काही मजकूर गाळला गेला आहे. येथे दिलेला लेख पूर्ण आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नुकताच एका मित्राच्या आग्रहामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या, अण्णांच्या, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात भाग घ्यायला जे. एम. रोड वर गेलो होतो. नुसतंच घोषणाबाजी करायला बरं का, हे उपोषण वगैरे माझ्या कुपोषित तब्येतीला मानवत नाही. तर तिथे एक घोषणा ऐकली ‘एक दोन तीन चार, बंद करा हा भ्रष्टाचार’. ही घोषणा ऐकली आणि हसून हसून मुरकुंडी वळली. डोळ्यात पाणी येईपर्यंत हसत होतो. बाकीचे आंदोलक ‘अरे! वेडे लोकही आंदोलनात सहभागी होत आहेत, अण्णांचा विजय असो’ असा भाव असलेल्या नजरेने माझ्याकडे बघायला लागल्यावर माझ्या मित्राने मला तिथून जवळजवळ खेचतच घरी आणले. घरी पोहोचे पर्यंत मी आपला हसतच होतो.

एक दोन तीन चार, बंद करा हा भ्रष्टाचार! अरे, तो भ्रष्टाचार काय घरच्या फडताळात लपलेले झुरळ आहे झाडू हालवून हुसकावून लावायला? भ्रष्टाचार आपल्या भारतीयांच्या नसानसात भिनला आहे. इतका भिनला आहे की जसे आपण श्वासोच्छ्वास नकळत करतो, लक्षात न ठेवता तसेच आपण भ्रष्टाचार करतो आहोत. बघा हं, म्हणजे, ऑफिसात जाऊन ऑफिसची मालमत्ता वापरून वैयक्तिक कामे करणे, खूप काम करतो आहे असे भासवून पाट्या टाकणे, मुलांना 'नेहमी खरे बोलावे' असे शिकवून 'अरे बाबा घरात नाहीत म्हणून सांगा काकांना' असे सांगणे, ऑफिसात खूप काम आहे उशीर होईल घरी यायला असे सांगून मित्रांबरोबर पार्ट्या झोडणे, दुकानदाराने चुकून एक नोट जास्त दिल्यावर 'जाऊदे असाही लुटतोच तो मला' असा विचार करून ती नोट तशीच दडपवणे हे असले भ्रष्टाचार आपण कळत न कळत दररोज करतोच. मला सांगा, एक दोन तीन चार असे म्हणून हे सगळे बंद होणार आहे का?

हे सगळे मी माझ्या लांब नाकवाल्या मित्राला सांगत होतो, ‘ऑन द टेबल’ बरं का, आमच्या आवडत्या बारमधे. त्याचे नाक लांब असल्यामुळे त्याला थेट विधात्याने ज्यात त्यात नाक खुपसायला अवनीवर धाडले आहे असे त्याचे मत आहे. त्यामुळे त्याला बर्यााच आतल्या गोटातल्या गोष्टी माहिती असतात, ह्याचमुळे त्याला मी माझा मित्र कम मार्गदर्शक कम हितचिंतकही मानतो. तोही ती घोषणा ऐकून छप्परफाड हसण्यात मशगुल झाला. आता त्याचे हसणे 7-8 मिनिटे तरी थांबणार नव्हते. त्यामुळे मग मी आजूबाजूला बघायला सुरुवात केली आणि समोरच्या टेबलावर लक्ष गेले.

त्या टेबलावर, चिकन लॉलीपॉपच्या फस्त झालेल्या डीश, चिकन चिली ड्रायची अर्धवट संपलेली डीश, उकडलेली अंडी, उकडलेले शेंगदाणे, शेव, चकली आणि त्याबरोबर इम्पिरिअल ब्लुच्या दोन रिकाम्या झालेल्या चपट्याआणि थम्स अपच्या दोन तीन रिकाम्या बाटल्या असा 'खान-पान'चा अद्भुत संगम झालेला होता.

हे दृश्य बघून एकदम चमकलो. भारतीय कुठल्या-कुठल्या प्रकारचे भ्रष्टाचार करतात ह्यावर मी आणि माझ्या लांब नाकावाल्या मित्राने नुकतीच चर्चा केली होती पण भारतीय माणूस दारूचा पण ‘भ्रष्टाचार’ करतो हे माझ्या लक्षातच आले नव्हते. हा दारूचा भ्रष्टाचार म्हणजे ‘खोपडी’ तयार करणे नव्हे किंवा फुग्यांतून दारू शहरां-शहरांत ‘इंपोर्ट – एक्स्पोर्ट’ करणे नव्हे तर चक्क 'दारू पिण्यात' भ्रष्टाचार. तुम्हालाही लांब नाकावाल्या मित्रासारखे छप्परफाड हसावेसे वाटायला लागले ना!

दारू पिण्यात कसला आलाय भ्रष्टाचार? असे वाटणे साहजिकच आहे. भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचरण. दारू पिण्यातला हा भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट पद्धतीने दारू पिणे. हे आपण करतो दारूबद्दल तपशीलवार माहिती नसल्यामुळे. आपण बहुतेक भारतीय खिशाला परवडणारी दारू (फक्त) चढण्यासाठी पितो, दारूच्या चवीशी आणि एकंदर दारूच्या तपशिलाशी काही देणे घेणे नसते. चार मित्रांबरोबर बसून सुख दुःख शेअर करण्यासाठी आपणदारूचा आधार घेतो आणि मग अजून एक येऊदे, अजून एक येऊदे असे करत करत आपण दारू पिण्याऐवजी दारूच आपल्याला प्यायला लागते.

आपण सरबतं पितो वेगवेगळ्या मोसमात त्या त्या मोसमाला साजेशी, ते आनंद मिळवण्यासाठी, त्या मोसमातल्या मिळणार्याग फळांच्या चवीची अनुभुती घेण्यासाठी, त्या मोसमातल्या वातावरणाला जुळवूनघेण्यासाठी. दारूचेही तसेच असते. दारूचे वेगवेगळे प्रकार हे प्रसंगानुरुप ‘चाखायचे’ असतात. दारू पिण्यापेक्षा अनुभवण्यातच खरी गंमत असते.

आता बघा ना, व्हिस्कीचे इतके प्रकार आहेत, सिंगल मॉल्ट आणि ब्लेन्डेड त्यात पुन्हा स्कॉच, आयरिश, बर्बन, कॅनडीअन, जॅपनीज आणि भारतीय अश्या व्हरायटीज. पण असल्या तपशिलांची काहीही तमा न बाळगता 'भर गिलास, कर खलास' असा आपल्या खाक्या असतो. ह्या सगळ्या व्हिस्कींना त्यांची अंगभूत चव असते, गंध असतो, रंग असतो. हा रंग, गंध आणि विशिष्ट चव ओक वृक्षाच्या लाकडापासून बनवलेल्या पिंपात व्हिस्की वर्षानुवर्षे मुरवत ठेवून मेहनतीने आणलेली असते. पिताना त्यांची अनुभुती घ्यायची असते. त्यातला आनंद लुटायचा असतो. पण आपण काय करतो? व्हिस्की कडू-कडू म्हणून, हाय रे कर्मा, तिच्यात कोला सदृश सॉफ्ट ड्रिंक्स (पेप्सी, थंम्स अप, कोक) मिसळून तिची मूळ चवच घालवून टाकतो आणि पितो मद्यार्क (अल्कोहोल) असलेले मादक द्रव्य. हे तर जाऊद्या पण व्हिस्कीला गोड करण्यासाठी मिरिंडा घालून पिणारा महाभाग बघितला आणि तेव्हा 'देवा, हाच दिवस बघण्यासाठी जिवंत ठेवलेस का रे?' असे कळवळून ओरडावेसे वाटले होते.

व्हिस्की हा तसा बराचसा मर्दानी, रांगडा प्रकार. सर्वांचाच तो झेपेल असे नाही. व्हिस्की, जगातल्या सर्वच भागांमध्ये सर्वात जास्त प्यायला जाणारा दारूचा प्रकार आहे. तरीही सर्वत्र खर्याा अर्थाने व्हिस्की पिण्याची पद्धत सारखीच आहे. वर्षानुवर्षे मुरवत ठेवलेली व्हिस्की तशीच म्हणजे ‘नीट’ किंवा ‘स्ट्रेट’ पिऊन तिचा आस्वाद घेण्याची चीज आहे. तिच्यातल्या मद्यार्काच्या प्रमाणामुळे आणि तीव्र(स्ट्रॉन्ग) चवीमुळे ‘नीट’ घेणे तसे जरा अवघडच आहे, ‘कच्च्या (रॉ)’ चवीशी नाळ जुळेपर्यंत. असे असल्यास व्हिस्कीत किंचित पाणी घालून तिला थोडे खुलवून (Bruise) प्राशणं करण्यातला आनंद हा शब्दातीत आहे. पाण्यामुळे चव थोडी सौम्य तर होतेच पण व्हिस्कीचा स्वाद आणि गंध खर्याद अर्थाने खुलून येते आणि थेट इंद्राच्या दरबारात बसून वारुणी चाखल्याची अनुभुती येते. ‘नीट’ घेणे जमत असेल आणि पाणी नको असेल तर व्हिस्की ऑन द रॉक्स घेण्यातही असीम आनंद आहे. ऑन द रॉक्स साठी साधारण 4-5 बर्फाचे खडे ग्लासमध्ये टाकून त्यावरून व्हिस्की ओघळत ओतायची. व्हिस्की बर्फावरून ओघळताना बर्फाचा थंडपणा घेऊन थंड होते आणि बर्फ वितळून थोडे पाणी व्हिस्कीमध्ये मिसळून स्वाद आणि गंध खुलतो. हे जर खूपच कठीण असेल तर सोडा आणि पाणी टाकूनही आस्वाद घेता येऊ शकतो. सोड्यामुळे व्हिस्कीचा स्वाद खुलून येतो. पण सिंगलमॉल्ट सारख्या उच्च दर्ज्याच्या व्हिस्कीत पाणी किंवा सोड्याची भेसळ चव आणि गंध दोन्ही मारून टाकते. तेव्हा सोडा फक्त ब्लेंडेड व्हिस्कीबरोबरच.

व्हिस्की कधी प्यायची ह्यालाही महत्त्व आहे. जेवण्याच्या आधी व्हिस्कीचे एक दोन पेग मस्त जठराग्नी प्रज्वलित करतात. रविवारची दुपार, मटण मस्त रटरटून शिजते आहे, त्याचा सुगंध घरात दरवळतो आहे आणि हातात ऑन द रॉक्स व्हिस्की, अशी काही भूक प्रदीप्त होईल की काही विचारू नका. जर भरपूर प्यायची असेल तर मात्र रिकाम्या किंवा अनश्या पोटी पिण्यासारखा दुसरा भ्रष्टाचार नाही. हलके जेवण घेऊनआतड्यांना कामाला लावा आणि मग तुम्ही तुमच्या कामाला लागा. पोट भरलेले असल्यामुळे मद्यार्क शरीरात भिनायला अथवा शोषला जायला वेळ लागतो आणि भरपूर प्रमाणात दारू प्यायली जाऊ जाते. अजून एक करायचे छोटे पेग बनवायचे आणि ‘लंबी रेस का घोडा’ ह्या न्यायाला जगून अगदी हळूहळू पीत जायचे, उगाच ‘भर गिलास, कर खलास’ असे करून पिण्यातली गंमत घालवण्याला काय अर्थ आहे?

व्हिस्की खालोखाल जास्त प्रमाणात प्यायला जाणारा प्रकार म्हणजे रम. मस्त पावसात चिंब भिजून ओलेचिंब झाल्यावर शरीराबरोबरच मनालाही उबदार करणारी ही अस्सल चीज. अंगात भिनणार्याब ह्या रमला स्वतःचे अंग असते बरं का. ऊसापासून बनणार्याउ ह्या रमचा स्वाद अंमळ गोडसर असतो. ह्या गोडसर स्वादाबरोबरच अतिशय तीव्र गंध असतो रमला आणि तो रम प्यायच्या आधी उपभोगायचा असतो. रमचाग्लास भरून मनसोक्त हुंगायचा हा गंध. मग एक एक घोट घेऊन चटकन न गिळता, जिभेवर घोळवत घोळवत प्रत्येक ‘टेस्ट बडला’ स्वाद देत प्यावी ही रम. अश्या प्रकारे प्यायल्यावर अश्या काही चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात की पावसात ओलेचिंब झाल्याचे सार्थक होते आणि पुन्हा एकदा भिजण्याची आस लागून राहते.

रमच्या तीव्र गंधामुळे श्वास रोखून झटकन गिळून टाकणारे दर्दीही (?) बघितले आहेत. तेव्हा का पितोस रे बाबा असा प्रश्न विचारायची तीव्र (रमच्या गंधाइतकीच तीव्र) इच्छा झाली होती. पण रम खर्या अर्थाने अनुभवायची तर ‘नीट’च घ्यायला हवी असे काही नाही. तशी घ्यायला जमले तर मग काय हो सोन्याहून पिवळेच. रम सोडा, कोक ह्यांच्या जोडीनेही तेवढाच आनंद देते. व्हिस्कीसारखी शिस्त किंवा औपचारिकता जास्त नाही रमची. फक्त जिभेवर घोळवत घोळवत प्यायची शिस्त पाळली की मग ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा.

बाकीचे श्वेतवर्णिय प्रकार म्हणजे व्हाईट रम, व्होडका, जीन हे सगळे प्रकार बहुतकरून कॉकटेल्स मध्येच जास्त खुलतात आणि परमानंद देतात. त्यांच्या श्वेत रंगामुळे रंगेबिरंगी कॉकटेल्स बनवताना ह्यांचा वापर केला जातो. आपल्याकडे ह्या प्रकाराला तितका लोकाश्रय नाहीयेय. पण ह्या सगळ्या श्वेतवर्णिय दारू प्रकारांचा आस्वाद घ्यायचा तर ‘नीट’ घेण्याशिवाय पर्याय नसतो. श्वेत रंगासाठी हे सगळे प्रकार बरेच फिल्टर केलेले असतात. शिवाय मूळ ज्या धान्यापासून बनवलेले असतात त्यात बरेच स्वाद मिसळलेले असतात आणि ते अजिबात तीव्र नसतात. जसे की जीन मध्ये जुनिपर बेरी ह्या फळाचा स्वाद असतो. व्होडका तर आता असंख्य प्रकारच्या स्वादात मिळते. व्हाईट रम संत्र्याच्या स्वादात मिळते. हे स्वाद जर मुळात अनुभवायचे तर ‘नीट’ घेण्याशिवाय गत्यंतर नसते. तरीही हे सर्व प्रकार सोडा आणि सायट्रस चवीच्या सॉफ्ट ड्रिंक्सबरोबर(च) चवदार लागतात. त्यांच्यात कोक किंवा तत्सम कोलाजन्य पेय मिसळून पिणे म्हणजे कडक चहा बनवून त्या वरून सायीचे दूध घालून पिण्यासारखे आहे.

एकंदरीतच कुठलाही दारू प्रकार मूळ स्वाद, रंग आणि गंध ह्यांचा आस्वाद घेऊन पिण्यातच मजा आहे. एक दोन पेन नंतर हळूहळू चित्तवृत्ती प्रफुल्लित व्ह्यायला लागतात. कानाच्या पाळ्यांना मुंग्या येऊनएकदम पिसासारखे हलके वाटायला लागून एक सहजावस्था प्राप्त होते. तिथेच थांबले पाहिजे आणि त्या हलक्या आणि तरल अवस्थेची अनुभुती घेत घेत धुंद व्हायचे असते. आपले हलके झालेले विमान जमिनीपासूनदोन बोटे वर जाण्यातच खरी गंमत, दारू पिण्याचे शुद्ध आचरण, ते आकाशापासून दोन बोटे खाली इतके वर जाऊ देणे म्हणजे दारू पिण्याचे भ्रष्ट आचरण.

हाच तो 'दारु पिण्या'तला भ्रष्टाचार. काय पटतेय का आता?
पटलं असेल तर चला एक मस्त घोषणा देऊयात, ‘एक दोन तीन चार, बंद करा हा दारूतला भ्रष्टाचार’!

चियर्स! Smile

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (5 votes)

प्रतिक्रिया

आता रतिक्रियेतील भ्रश्टाचारावर तज्ञांनी प्रकाश टाकावा म्हणतो Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेगवेगळ्या धान्यांना(ग्रेन्सः बार्ली, गहू इ.) आंबवून वेगळाले मद्यप्रकार तयार करण्याची शिष्टीम जा.रा. यांनी सुचवलेली असली, तरी ती आपल्याइकडे अमलात यायला, अन मग तिची फळे आपल्या पोटात जाऊन तिचा आपल्यावर अंमल चढायला अजूनही अंमळ अवकाशच आहे.
आजच्या घडीला तरी भारतात मिळणारी सर्व एतद्देशिय बनावटीची व्हिस्की, रम, व्होडका, जिन इ. या सरळ साखरेच्या मळी पासून निघालेल्या मद्यार्कात (अ‍ॅबसोल्यूट अल्कोहोल) कृत्रीम वास, रंग व चवी मिसळून बनविलेली साक्षात बनवाबनवीच असते. अपवाद वाईनचा, जो परत जा.रा. यांनी सुचविलेला शेती उद्योग आहे.
तेंव्हा आधीच भ्रष्ट, त्यात तशीच पिऊन वा:क्याबात! वा:क्याबात! वा:क्याबात! करीत उड्या मारण्यात अर्थ नाही.
अपवाद काही थोड्या बाटल्या ज्या कधी मधी 'तिकडून' येऊन मग आपल्या पुढ्यात 'उघड्या' होतात Wink
मग ग्लेनविडिच ला सोडा लावणार्‍याच्या रसिकतेला पाहून कसेसेसेसेसच होते.

आपला
(जानता राजा) आडकित्ता

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अगोदर मी सामना ऐवजी साधना चा दिवाळी अंक असे वाचले. साने गुरुजींच्या साधनेत हा लेख म्हणजे साक्षात भ्रष्टाचार. अहो साधनाचे संपादक डॉ नरेंद्र दाभोलकर हे व्यसनमुक्ती च्या लढ्यात पण आहेत. एकी कडे व्यसनमुक्ती दुसरी कडे अंधश्रद्धा निर्मुलन व तिसरी कडे साधना असा द्राविडी प्राणायाम ते करतात. असो. आपले या विषयातील ज्ञान आम्ही चांगलेच ओळखून आहोत. एकदा आमच्या सहकार्‍याने डॉक्टर्स ब्रँडी ऐवजी डॉक्टर्स ब्लेंडी नावाची देशी दारु पाजली होती. सरकारी कामात मग्न असल्याने आम्हाला ते कळले पण नाही.
एकदा शास्त्रापुरत का होईना आपल्या बरोबर बसल पाहिजे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

घाटपांडे काका,
नेकी और पुछ पुछ! आपल्याबरोबर बैठक जमवायला मला केव्हाही आवडेल. Smile

- (बैठकोत्सुक) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिकडे एकाला इ-पाजली आता इकडे थेट पाजा. वा वा ! छान छान!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

सोकाजी, लेख आवडला ब्वॉ आपल्याला. तुझ्या अभ्यासाला पुन्हा एकदा _/\_

व्हिस्की, व्होडका हे प्रकार मला फारसे आवडले नाही. दारू प्यायचीच आहे आणि बियर का व्हिस्की (किंवा व्होडका) असा चॉईस असेल तर मी व्हिस्की (किंवा व्होडका) पसंत करेन. पोलंडमधली एक व्होडका मला चवीला आवडली होती. नेहेमीसारखी व्होडकाच असते, पण त्यात एका कोणत्यातरी झाडाच्या खोडाची काडी घालून ठेवतात. काय बहारदार चव असते. एखाद्या शुक्रवारी संध्याकाळी दोस्तमंडळी जमवून भरपेट जेवायचं आणि तोपर्यंत व्होडका फ्रीजरमधे थंड करायची. शॉट ग्लासेस पटापट भरत एका घोटात तो शॉट ग्लास रिकामा करायचा. आधी गार व्होडकामुळे चव काय, अल्कोहोलचं प्रमाणही समजत नाही. व्होडका पोटात उतरायला लागली की पोटात अल्कोहोलचं प्रमाण समजतं आणि तोंडात चव ... वाह वा महाराजा, काय चव असते ती!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शॉट फक्त अन फक्त तकीलाचे असतात!
व्होड्का काय दारुये का Blum 3
अग आआइ ग!

१२३४ साठी (समजतील म्हणून) डिट्टेल सांगतो.
डाव्या हाताची 'अ‍ॅनाटॉमिकल स्नफ बॉक्स' अस्ते ना? त्यात मीठ ठेवायचं चिमूटभर. त्याच हाताच्या तर्जनी अन अंगठ्यात एक लिंबाची फोड धरायची. मग उजव्या हाताने तो तकीलाचा शॉट (उक्कूसा ग्लास. त्यात ६०-९० मिलि तकीला)झोकायचा. म्हंजे एका घोटात तोंडात/पोटात्/घशात. त्या "तकीला"ला तोंडात ठेऊन-किंवा जशी जिथे असेल असू देऊन ते सगळं मीठ चाखायचं, अन मग तो लिंबू चोखायचा.
याला म्हणतात तकीला शॉट.

कधी तरी करून बघा, दर्दी असाल तर.

बादवे.
तकीला मेक्सीको ची देशी. व्होडका रशियाची देशी. आपल्या कडची देशी नवसागर अन काळा गूळ मिळून बनते. सरकारमान्य देशी दारूची दुकानं असतात. तिथे २-४ ग्लास मारून, चखन्याला खडे मीठच असतं. अस्सा ग्लास ढोसायचा, अनामिका त्या बशीत टेकून मीठ जिभेवर लावायचं. मग डाव्या हाताच्या बाहीने ओठ पुसून 'जरा झूम झूम के' करत घरी आलं की कारभारीण म्हणते, "आला मेला ताजा होऊन"

मोहाची देशी चांगली मिळाली तर छान लागते. फेणी चा भयंकर घाण वास येतो Wink (व्होडका 'नीट' प्याली तर रॉकेल सारखी लागते.)

ता.क.
मागे केरळात गेलेलो तेव्हा टॉड्डी प्यालेलो. नीरा समजून सौ.नी पण घेतली होती थोडी टॉड्डी Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नवोच्च मद्यमवर्गीय पिण्याविषयी तर माहीत असते. देशी कशी प्यावी ते थोडेसे विस्ताराने सांगावे. आम्ही सुरूवातीला कॉलेजच्या दिवसात एकदा इतकी देशी प्यायलो होतो की 'देव पाऊ दे, उलटी होऊ दे' असा हाकारा करत होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्या#$%ला!

अक्षय,
अरे, जगातली सगळीच दारू देशी आहे. गालिबने प्याली ती वाईनही देशीच, अन स्कॉटलंड मधल्या स्कर्ट घालणार्‍या बॅगपाईप वाजविणार्‍या बाप्यांनी बनवलेली स्कॉचही देशीच. किंवा रेड इंडियन 'असुर' लोकांना अमेरिकेत विकली गेलेली मूनशाईन - सो कॉल्ड व्हिस्की - जी त्यांच्या विनाशास कारणीभूत ठरली, तीही देशीच. आपली देशी तिकडे गेली की इंपोर्टेड होते Wink अन तिकडची इकडे आल्यावर.

ज्या देशात जाशील, प्र-देशात जाशील, तिथली संस्कृती बघताना, तिथलं "देशी" जेवण अन दारू चाखायला कधीच विसरू नकोस. दोघांना जवळजवळ मानवी अस्तित्वा इतकाच जुना इतिहास असतो.

म्हणजे कसं? अगदी आयुर्वेदातही कोणत्या ऋतूत, कोणती दारू, कोणत्या भांड्यातून (चांदीचे की काशाचे), कोणत्या मांसासोबत प्यावी, हे सांगितलेलं आहे.

शेवटी,

लुत्फ-ए-मय तुझसे क्या कहूँ जाहिद
हाय रे कंबख्त तूने पी ही नही!

(१: धर्मगुरू)

अन तो जाहिद उत्तर देतो,

न पियो रिंदो शराब मस्जिद में बैठकर,
एक ही बोतल है.. कहीं खुदा न माँग ले..

(१: दारूड्या)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

भारतीय देशी कशी प्यावी हा प्रश्न होता. म्हणजे वरच्या लेखात दिल्याप्रमाणे संत्री, नारिंगी असे काय काय भेद आहेत? कुठला ब्र्यांड चांगला, सोबतीला कुठले शेव/फरसाण चांगले, कुठली गाणी ऐकत प्यावी, भ्रष्टाचार न करण्यासाठी विमान किती उंचीवर ठेवावे वगैरे वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शक्य तो पिऊच नका देशी Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सुहास शिरवळकरांची 'झूम' आठवली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

शॉट फक्त अन फक्त तकीलाचे असतात!

हे अजिबात पटले नाही. असे काही नसते.
सर्व प्रकारच्या दारूचे शॉट असतात.

- (साकिया) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आडकित्ता, एकदा पोलिश व्हॉडका चाखून पहा म्हणजे समजेल काय अमृत असतं ते! श्मर्न-ऑफ आणि फिनलंडीया या दोन पोलिश नसलेल्या व्होडका मी प्यायल्या, पण लक्षात राहिल्या त्या पोलिश विबोरोवा, लुक्सुसोवा आणि झुब्रुफ्का. अर्थात या व्होडकांचा सप्लायही जास्त होता ही गोष्ट वेगळी! Wink

१. पोल्स्की (पोलंड) मधे विकत घेतलेली विबोरोवा आणि इंग्लंडात विकत घेतलेली विबोरोवा यांच्यातही फरक होता. पोल व्होडकाच जास्त छान होती.
२. माझा पोलिश मित्र ही व्होडका ज्या गावात बनते त्याच गावचा असल्यामुळे ही अंमळ जास्त वेळा चाखायला मिळायची.
३. यात एक प्रकारचं गवत घालतात त्यामुळे वेगळाच स्वाद येतो. या गवतामुळेच यू.एस.मधे या व्होडकेवर बंदी होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गम्मत म्हणून लिहिलेल्या पोस्टीचा इतका डोक्याला शॉट करून घ्याल असं वाटलं नव्हतं.
यानिमित्ताने डीट्टेल वोड्का ज्ञान मिळालं की नै?
झालं तर.

हलकेच घ्या ;;)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हे तुमचं मद्यपुराण वाचून वाचून आम्हालाही घ्यावेत एक दोन पेग असं वाटू लागतं राव!

जाउदे,पिणार नाही पण पाजेन नक्की कुणालातरी ते ही एकदम सदाचाराने हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सोकाजी, पिण्यातला भ्रष्टाचार कसा टाळावा याची माहिती देणारा लेख आवडला. आमची मजल वाईन आणि व्होडकाच्या पुढे गेलेली नसल्याने आम्ही असा भ्रष्टाचार केला नाहिये (म्हणजे कमी केलाय) हे गर्वाने सांगू शकते Wink

बाय द वे, अतिशय कडू असणारी कॉन्यॅक कशी प्यायची? मागल्या आठवड्यात हाटेलात जेवणानंतर छोटू-छोटू ग्लासात कॉन्यॅक आणून दिली पण आधी तिचा वास आणि नंतर अर्धा घोट प्यायल्यावर चवीमुळे लागलेला ठसका यामुळे मी त्याचाच धसका घेतला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

filling भारी Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

#meru

ह्याला म्हणत्यात ज्ञान . बोलायचंच काम न्हाय , काय . मदिरेचा महिमा आणि तिला फासलेला काळिमा ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हिस्कीला गोड करण्यासाठी मिरिंडा घालून पिणारा महाभाग बघितला आणि तेव्हा 'देवा, हाच दिवस बघण्यासाठी जिवंत ठेवलेस का रे?' असे कळवळून ओरडावेसे वाटले होते.

चोक्कस !

काहीपण येडच्याप पणा करते पब्लिक दारू पिताना!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आकाशानंद!