गरजूला मदत करावी काय?

गरजूला मदत करावी काय? ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्यापैकी काहीजण लगेच "हो" असे देतील.
आता हा गरजू जर "पाकिस्तान" असेल, तर आपले धोरण काय असावे?
http://72.78.249.107/esakal/20111102/5137155085083760384.htm इथे छोटिशी बातमी वाचायला मिळाली.
पाकिस्तान आपल्याकडे वीजेची मागणी करु शकते.
अर्थातच आपण वीज देणार म्हणजे निव्वळ जनहितार्थ देणार असे नाही. ती वीज"विक्री"च असेल. पण सध्या आपले आणि "त्यांचे" संबंध लक्षात घेता, हे करणे पटते का? आपण स्वतःच पाकिस्तानमार्गे येणार म्हणून इराणच्या अत्यंत उपयुक्त, किफायतशीर इंधनाच्या पापलाइनला टाळतोय. ह्याहून अधिक सांगण्याची ती काय गरज? शेजारी देश आणि आपले संबंध कसे आहेत, ह्यावार आधीच जालावर प्रचंड चर्चा झाली आहे. ते पुन्हा लिहायची गरज वाटत नाही.

एक गट भावनिकतेतून म्हणतो की हा आपला शत्रू आहे. शत्रूशी संबंध ठेउ नयेत.
दुसरा मुत्सद्द्यांचा गट म्हणतो की असे हितसंबंध गुंतवणे हा कलह शांतपणे सोडावायचा व कलहात आपली कमीत कमी हानी करून घेण्याचा राजमार्ग आहे. जर आपली भरपूर देवाण घेवा॑ण असेल, तिथली अर्थव्यवस्था व समाजजीवन मोठ्या प्रमाणावर आपल्यावर अवलंबून असेल, तर तिथल्या जनतेलाच आपल्याशी वैर परवडणार नाही. शिवाय योग्य त्या वेळी आपल्याला त्यांचे नाक दाबायचीही सोय होइल.(कारण आपली अर्थव्यवस्था कैकपट मोठी आहे.)
साधारणतः ह्याच भावनेतून पाश्चात्त्य देशांनी, "दोस्त राष्ट्रांनी" दुसर्‍या महायुद्धानंतर आपले आर्थिक संबंध गुंतवून घ्यायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रिओय पातळीवर ह्या गोष्टीचा पुरस्कार केला.

एक उदाहरण म्हणजे आज ते वीज घेताहेत व हळुहळु संबंध वाढत जाउन त्यांची निदान काही भागातली का असेना जनता मोठ्या प्रमाणात आपल्यावर अवलंबी होणार. त्यावेळेस जर ह्यांनी कुरापत काढली, तर एक गोळीही न चालवता आपण फक्त सप्लाय थांबवून त्यांना बेजार करु शकतो.(अमेरिका-चीन आपसात असेच काही करत कुरघोडी करायचा छुपा प्रयत्न करताना सतत दिसतात.)तसेही प्रत्यक्ष युद्ध होण्याची शक्यता आपण नगण्ञच धरून चाल्लोत.थोडक्यात, वीज हे एक अदृश्य हत्यार असेल.

अजून एक आयाम म्हणजे, मुळात भारतात स्वतःलाच पुरेल इतकी वीज नाही. मग दुसरीकडे कशाला द्यावी? ह्या अजस्त्र विक्सनशील अर्थव्यवस्थेची उर्जाभूक दिवसेंदिवस तशीही वाढनारच आहे.

तुम्हांस काय ठीक वाटते?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

असं नकों व्हायला की आपलीच विज आपल्यावरच हल्ला करण्याच्या प्रशिक्षणासाठी वापरली जावी. तसही गरजू आणी सदानकदा हात पसरणारे यात फरक आहेच. सांभाळा, रात्र वैर्‍याची आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आँ.. बाहेर विकण्यासारखी वीज शिल्लक असल्यास पाकिस्तानऐवजी धुळे जळगावकडे वळवा की जरा..

धन्यवाद..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा वाचून अगदी हाच प्रतिसाद टंकायला जात होते.
आजही जळगाव-धुळ्याकडे जिल्ह्यांच्या शहरातच दररोज दिवसाला ७ तास लोड शेडिंग असते. ग्रामिण भागाबद्दल तर काही बोलूच नये. हेच मोठी शहरे सोडता सगळ्या देशभर आहे.
आपल्या देशात अशी परिस्थिती असताना कितीही मुत्सद्दी राजकारण वाटले तरी पाकिस्तानच काय, कोणालाही वीज विकू नये असं मला वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

वीज ही साखरेसारखी गोण्या भरून हवी तेव्हा हवी तिथे पाठवता येते का? मला वाटतं येत नसावी. तज्ञांनी यावर प्रकाश टाकावा.

मूळ चर्चेच्या बाबतीत मला दुसरा विचार अधिक आवडला. प्रतिस्पर्ध्याला आपल्यावर अवलंबून ठेवता आलं तर ताणतणाव कमी होऊन शत्रुत्व कमी व्हायला मदत होते. अनेक महास्वाभिमानी समजल्या जाणाऱ्या रजपूत राजांनी दिल्लीतल्या बादशहाला आपली मुलगी देऊन नातं प्रस्थापित केल्याची उदाहरणं आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओ गविभौ! तुमीबी खानदेशी शेतस कावो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

वीज भारतासाठीही (देश म्हणून सर्व स्तरावर) जीवनावश्यक आहे. तिची टंचाई आहे तेव्हा देऊ नये.
बाकी मुद्दे मांडलेत ते तार्किक दृष्ट्या बरोबर वाटतात, मात्र....
वीज हे हत्यार होऊ शकेल असे वाटत नाही.
दिलेल्या वीजेचा उपयोग शेती/घरगुती वापरा ऐवजी "लष्करी कारखानदारीकडे" केला गेला तर त्यास कोण कसा आळा घालणार? शक्य नाही ते.
असे काही देऊन, कोणालाच, शत्रु वा मित्र, मिन्धे करता येत नसते, शत्रुला तर नाहीच नाही.
वीज दिली गेलीच तर पन्चावन्न कोटीन्चे बळी विसरल्याचे लक्षण मानावे लागेल.
त्या ऐवजी, थोडी हानी झाली तरी चालेल पण अफगाणीस्तानवर जास्त लक्ष केन्द्रीत करावे. बगल तरी मारा वा पाठीवर धोन्डा ठेवा.
हे होईल का? तर उत्तर = नाही!, तेवढी राजकीय इच्छाशक्ती, सत्ताधार्‍यान्कडे वा लोकान्कडे, दोघान्कडेही अस्तित्वात नाही.
स्पष्ट सान्गायचे तर पाकिस्तानला वीज वगैरे पुरवुन "उण्टाच्या कासेचा मुका घ्यायला जावू नये" असे माझे मत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच्या घडीला इतरांना विकण्याइतकी वीज फक्त मोदी काकांकडे आहे. खाली अत्ताच महाराष्ट्राला विकली त्यांनी ती अव्वाच्या सव्वा दराने. (सरदार सरोवराची 'त्यांच्या' वाटेची) हो. दिवाळीत लोड शेडींग नव्हतं नं २ दिवस. तेच विकतील थोडी (आयमीन विकू शकतील) वर अन डावी कडे. जवळच पडतो पाकिस्तान विकायला. मोदीकाका बनिया आहेत. विकायचीच ठरवली, तर काहीही विकता येते Wink नफा मिळाला की झाले.

(त्यांच्या चकाचौंध प्रगतीने आंधळा झालेला)
आडकित्ता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

स्पष्ट सान्गायचे तर पाकिस्तानला वीज वगैरे पुरवुन "उण्टाच्या कासेचा मुका घ्यायला जावू नये" असे माझे मत!

काष्टा घातलेले धोतर/९-वार घालून पाकिस्तानी उंट अन उंटीण डान्स करिंग हे दृष्य डोळ्यासमोरून जातच नाहिये ROFL
कासेचा मुका :-j

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>>> काष्टा घातलेले धोतर/९-वार घालून पाकिस्तानी उंट अन उंटीण डान्स करिंग हे दृष्य डोळ्यासमोरून जातच नाहिये ROFL
>>> कासेचा मुका :-j
अहो तुम्हाला तो विषय माहित नाही का? नसावा बहुतेक, म्हणून तर तुम्हाला "कासेचा" म्हणल्यावर काष्टाधोतर्/नऊवारी आठवली.
या कि दुसर्‍या कोणत्या तरी साईटवर "भले तर देऊ कासेची लन्गोटी..." यातिल कासेची च्या जागच्या मूळ शब्दावर चर्चा झालेली, की कोणी का बदलला मूळ शब्द, अन तो मूळात काय होता.
तोच तो शब्द तिकडे जसा बदलला तसाच इथेही बदलुन वापरला की "उण्टाच्या कासेचा मुका...."
जमतोय की नाही नॉलेजचा लगोलग वापर? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सकाळमधील बातमी म्हणजे 'सोयीस्कर सत्य' आहे Smile या घडामोडीला थोडी पार्श्वभुमी अशी.
या वाटाघाटी अचानक चालु झालेल्या नसून पाकिस्तानी मिडीयामधे गेले काहि महिने पाकिस्तानच्या पॉवर क्रायसिसवर जोरजोरात चर्चा चालु आहे. विषेशतः भारत-अमेरिका अणूउर्जा करार झाल्यापासून पाकिस्तानला आपल्या 'एनर्जी'टंचाईची जाणीव अधिक जोमाने झाले. पाकिस्तानने मग असा करार व्हावा म्हणून अमेरिका, चीन वगैरेंशी संधान साधल. अमेरिकेने साफ नकार दिला तर चीन ने 'तोंडी' जोरदार पाठिंबा दिला व प्रत्यक्षात किडूकमिडूक करार करून बोळवण केली.

दुसरीकडे पाकिस्तानची वीजेची गरज खरोखरच वाढते आहे. चीनने कबुल केलेला आझाद काश्मिर मधील प्लांट (कोह्ला प्लांट ११००MW) अजुन बनतोच आहे, शिवाय बहुचर्चित महत्त्वाकांक्षी ९३९MW देणारा नीलम-झेलम प्रकल्पाची किंमत वाढत वाढत पाकिस्तानच्या कह्याबाहेर जाऊ लागली आहे. शिवाय नंदीपूर प्रकल्प किंवा तरबेलाचं महत्त्वाकांक्षी विस्तार प्रकल्प असे अनेक केवळ कागदावर किंवा अती कूर्म गतीने चालु आहेत.

अश्यावेळी पाकिस्तानने आपल्या वीजेची गरज भागवण्यासाठी अणूभट्टीचा पुन्हा चीनच्या मागे तगादा लावला होता. भारताने (कदाचित अमेरिकेच्या सहाय्याने) अश्या काहि अंतर्गत घडामोडी केल्या (नक्की तपशील अर्थातच उपलब्ध नाहीत) की पाकिस्तानची अणूभट्टीची रट कमी झाली व गिलानी यांनी भारताबरोबर ५००MW व्यापाराला मंजूरी दिली आहे.

अर्थात याचा भारताला दुहेरी किंवा तिहेरी फायदा आहे. एक पाकिस्तान तुर्तासतरी अणूभ्ट्ट्या व पर्यायाने अधिकच्या अणूइंधनापासून वंचित राहिल. भारताचा व्यापार वाढेल व पाकिस्तानातील एका मोठ्या व महत्त्वाच्या पायाभुत सुविधेवर भारताचा शिरकाव होईल व नियंत्रणही राहिल. तिसरे असे की या निमित्ताने संबंध अधिक चांगले होतील.

अवांतरः "आपण स्वतःच पाकिस्तानमार्गे येणार म्हणून इराणच्या अत्यंत उपयुक्त, किफायतशीर इंधनाच्या पापलाइनला टाळतोय" हे सत्य असले तरी त्याने आपला फायदा आहे. अणूइंधन व अणूकरार मिळवण्यासाठी केलेली ही तडजोड मला योग्य वाटते. शिवाय परवाच पाकिस्तान-ताजिकिस्तान-इराण ही पाईपलाईन आता ताजिकिस्तान अफगाणिस्तान इराण होणार असल्याने इराणला पाकिस्ताननेही बाजुला केल्याचे वाचले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सध्याच पाकिस्तानने भारतास हा दर्जा देण्याबद्दल बातमी उडत उडत वाचली. याबाबत थोडा रेडिमेड इन्फो-कॅप्स्यूल मिळाला तर बरे होईल Wink
(ऐतखाऊ) आडकित्ता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

काही हरकत नाही, आपल्याला पुरून उरत असेल आणि पैसे मोजत असतील तर जरूर...

हे बघा
http://www.guardian.co.uk/environment/2011/nov/01/india-thorium-nuclear-...

इकडे तर आपण गिर्‍हाइकं शोधतोय एनर्जी सेक्टरमधे
>>Sinha added that India was in talks with other countries over the export of conventional nuclear plants. He said India was looking for buyers for its 220MW and 540MW Pressurised Heavy Water Reactors (PHWRs). Kazakhastan and the Gulf states are known to have expressed an interest, while one source said that negotiations are most advanced with Vietnam, although Sinha refused to confirm this

तसंही कांदे/साखर्/गहू/डाळी आपण विकतोच की आपल्याकडे उपासमार असताना. कधीकधी तर स्वस्तात विकतो आणि ६ महिन्यांनी त्याच गोष्टी महागात विकतघेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय ठरलं मग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0