एका बाहेरच्याने?

अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनाच्या जोडीला राजकीय आखाड्यात उतरून चार हात करण्याची घोषणा केली आहे हे आपण जाणतोच. भारतात अनेक नवे राजकीय पक्ष समोर येत असतात. काहि काळातच त्याच्यात 'नवीन' असे काहि उरत नाही किंवा असलेच तर ते हवेसे असते असे नाही. मात्र साधारणतः भारतीय राजकारणाचा आणि राजकीय पक्षांचा एक ठाम किंवा ठोस असा तोंडावळा बनलेला आहे. एक सैलसर असली तरी बर्‍यापैकी स्थिर चौकट आहे. आणि राजकारणी कोणत्याही पक्षाचा असो त्या चौकटीला भेदायचा प्रयत्न क्वचितच करतो.

अरविंद केजरीवाल यांनी बर्‍याच काळा नंतर ही चौकट भेदून आत शिरायचाच नाही तर आत शिरून खेळाचे नियम बदलायचा घाट घातलेला दिसतो. त्यांच्या या नव्या पावित्र्यामुळे अनेक राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावलेल्या दिसत आहेत. मग ते बी बी सी चे सौतीक बिस्वास असोत (लेख) किंवा बिझनेस स्टँडर्ड्मधील मिहिर शर्मांचा हा लेख असो किंवा आदित्य निगम यांचा हा लेख असो.

अरविंद केजरीवाल या 'बाहेरच्याने' -एका आऊटसायडरने - या खेळाचे नियमच बदलायला सुरवात केली आहे असे बर्‍याच जणांचे म्हणणे आहे. अर्थात याचे पडसाद व्यंगचित्रकारांनी नेमके पकडले आहेत: (पुढील व्यंगचित्रे अनुक्रमे सुरेन्द्र, सुरेन्द्र, केशव यांची असून ती द हिंदू या वृत्तपत्रात प्रकाशित झालेली आहेत)

तर याबाबत तुम्हाला काय वाटते?

-- अरविंद केजरीवाल यांनी एकामागून एक प्रकरणे बाहेर काढून केलेला राजकारण प्रवेश हे केवळ सुरवातीचे ढोंग आहे की नेमके राजकीय उद्देश त्यामागे आहेत असे तुम्हाला वाटते?
-- या नव्या प्रकाराने भारतीय राजकारणातील नियम बदलले आहेत असे तुम्हाला वाटते का?
-- अश्या प्रकारचे सर्व पक्षीय हल्ले करून केजरीवाल यांना केवळ प्रसिद्धी मिळेल की त्याचा राजकीय फायदा देखील होईल असे वाटते?
-- केजरीवाल यांचा मुख्य लक्ष्य २०१४ निवडणूका आहेत असे वाटते का २०१३ मधील दिल्ली विधानसभा निवडणूकीवर त्यांचा डोळा असेल असे वाटते?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

१. नवीन काही आढळले नाही. नेहमीप्रमाणेच नवा खेळाडू आधीच्या खेळाडूंचा रंग कसा काळा आहे हे दाखवत आहे. (असे दाखवल्याने आपण पांढरे आहोत हे "ऑपॉप" सिद्ध होते अशी या नव्या खेळाडूचीसुद्धा कल्पना दिसते.

२. राजकारणातील नियम बदलले आहेत / बदलतील असे सांगवत नाही. थोडेफार इलेक्टोरल रिफॉर्म सोडले तर नियमाविषयी चित्र स्पष्ट होत नाही.

३. सध्या तरी केवळ भ्रष्टाचार हा एकच मुद्दा या नव्या खेळाडूकडे आहे. बाकी विषयातील धोरणे -आर्थिक, सामाजिक, परराष्ट्रविषयक, औद्योगिक- सगळीच गुलदस्त्यात आहेत. लक्षात घेण्याचा मुद्दा हा की स्वातंत्र्यानंतर सत्तेत आलेली काँग्रेस काय किंवा ९० च्या दशकात सत्तेच्या उंबरठ्यावर आलेला भाजप काय, प्रत्यक्ष सत्तेच्या जवळ पोचण्यापूर्वी किमान १० वर्षे त्यांची वरील बाबतीतली धोरणे काय असतील (ती बरोबर की चुकीची हा मुद्दा वेगळा), याची पुरेशी कल्पना सर्वांना होती.

सर्व राजकारणी भ्रष्ट आहेत (आणि ते जे काही करतात- योजना, धोरणे, नियम - ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे भ्रष्टाचाराशी जोडता येतातच) या प्रेमिसवर विश्वास ठेवणारे लोक संख्येने कमी आहेत. त्यामुळे या एका मुद्द्यावर राजकारणात किती यश मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे राजकारणाचे नियम बदलण्याची शक्ती प्राप्त होईल असे वाटत नाही. (सध्या जे चालू आहे त्याने फक्त मशीद पाडण्यात यश मिळेल. मंदिर बनेल की नाही हे याबद्दल काहीच सांगता येत नाही. मंदिर "बांधावे लागेल" आपोआप उभे राहणार नाही याची कल्पना केजरीवाल यांना आहे असे वाटते. कारण त्यांनी यापूर्वी विधायक कामे केली आहेत).

४. २०१४ इज टू अर्ली फॉर अ‍ॅन अपस्टार्ट टु मेक एनी डिफरन्स*. पण त्याच बरोबर २०१४ इज देअर बेस्ट चान्स. २०१९ पर्यंत एकमुद्दीय पक्ष तग धरू शकेल की नाही याबद्दल शंका आहे.

*यापूर्वी एन टी रामाराव यांच्या तेलगू देसमने २ वर्षात सत्तासोपान चढण्याची किमया केली आहे. पण माझ्या आठवणीत तेलगू देसमने काँग्रेसवरील टीकेपेक्षा अधिक पॉझिटिव्ह आउटलुक (२ रु किलो तांदूळ) देऊन निवडणुका जिंकल्या असे वाटते.

कॉन्स्पिरसी थिअरी : काँग्रेसविरोधातली मते विभागली जावीत म्हणून काँग्रेसनेच हे भूत उभे केले आहे. Smile

अवांतर : शेवटच्या चित्रात केजरीवाल नसून व्ही पी सिंग आहेत असे भासले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नवीन काही आढळले नाही.

नवे असे की या आधी नव्याकोर्‍या - कोणतीही राज्कीय पार्श्वभूमी नसणार्‍या- पक्षाची स्थापना होताना राष्ट्रीय सर्वोच्च नेत्यांच्या पंचाला हात घातलेला पटकन आठवत नाहिये.
शिवाय स्थिरावलेल्या पक्षांमधे 'कोड ऑफ कन्डन्ट' असतो -कोड ऑफ सिक्रसी म्हणा हवं तर- जो साधारणतः मोडला जात नाही. याचे एक कारण काच के घर मे रहनेवाले.. वगैरे होते.

काचेच्या घरात राहणारे एकमेकांवर दगड मारायचे तोपर्यंत ठिक चालले होते. आता, स्वतःकडे घरच नसणारा सगळ्यांच्या काचेच्या घरांवर दगड भिरकावू लागला आहे असे काहिसे चित्र दिसू लागले आहे

नेहमीप्रमाणेच नवा खेळाडू आधीच्या खेळाडूंचा रंग कसा काळा आहे हे दाखवत आहे. (असे दाखवल्याने आपण पांढरे आहोत हे "ऑपॉप" सिद्ध होते अशी या नव्या खेळाडूचीसुद्धा कल्पना दिसते

तुर्तास तरी याच्याशी सहमती आहे. पण यावेळी फरक असा आहे की आरोप करणार्‍याची प्रतिमा तरी बर्‍यापैकी शुभ्र आहे, त्यामुळे तो करतोय ते आरोप स्वतःला पांढरे सिद्ध करण्यासाठी आहेत असे सध्यातरी चित्र जनतेपर्यंत पोचत नाहिये असे वाटते.

सध्या तरी केवळ भ्रष्टाचार हा एकच मुद्दा या नव्या खेळाडूकडे आहे. बाकी विषयातील धोरणे -आर्थिक, सामाजिक, परराष्ट्रविषयक, औद्योगिक- सगळीच गुलदस्त्यात आहेत

सहमत आहेच मात्र या झाकल्या मुठीबद्दल प्रश्न विचारायची उसंतही न देण्याचं चातुर्यही आहे.

दुसरे असे की एका मुद्द्यावर लढणारे पक्ष राष्ट्रिय राजकारणात फारसे नसले तरी राज्य स्तरावर हा एक मुद्दा अधिक चालु शकतो. म्हणून प्रश्न विचारला होता की एकच मुद्दा उचलताना बघुन टार्गेट विधानसभा आहे की लोकसभा? इतर पातळ्यांवर जराही स्थान- सत्ता / जागा- नसलेल्या पक्षाने थेट राष्ट्रीय राजकारणात पडल्याचे उदाहरणही नाही

बाकी, सलग २ आठवडे अश्या पॉसिटिव्हीटिने मथळ्यांवर आरूढ असणे देखील कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला आज्वर जमले असल्याचे आठवत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>इतर पातळ्यांवर जराही स्थान- सत्ता / जागा- नसलेल्या पक्षाने थेट राष्ट्रीय राजकारणात पडल्याचे उदाहरणही नाही

एक ल ग थत्ते (कर्तारसिंग थत्ते) राष्ट्रपतीच्या निवडणुकीला नेहमी उभे रहायचे. मी राष्ट्रीय राजकारणात पडलो आहे असे म्हणायला काहीच लागत नाही. त्यामुळे ते थेट राष्ट्रीय राजकारणात आले आहेत म्हणजे नक्की काय? लोकसभेच्या निवडणुकीला हजारो अपक्ष उमेदवार उभे राहतात. म्हणजे ते राष्ट्रीय राजकारणात असतात असे म्हणणे धाडसाचे होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझी शब्दयोजना चुकली आहे.
"थेट राष्ट्रीय राजकारणात यशस्वी झाल्याचे उदाहरण नाही" असे वाचावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्व बाजूंनी कोंडले गेल्यावर एखाद्या मांजराने कोंडणार्‍याच्या नरडीवर झेप घ्यावी तसे केजरीवालांचे वर्तन आहे.
देशातील भ्रष्टाचार सामान्य माणसाला असह्य झाल्यावर 'जनलोकपाल' नावाचा मसीहा त्याचा उद्धार करेल अशी (भाबडी?) आशा काही लोकांना आणि संघटनांना वाटत होती.
कारण माहिती अधिकाराच्या कायद्यामुळे लोकशाहीच्या पडद्याआड चालणारे मनमानी गैरकारभार उघड तर होत होते पण न्यायालयात त्यांविरुद्ध लढणार्‍या बाजूला नामोहरम करण्याची सर्व साधने राज्यकर्त्यांकडे उपलब्ध होती. या राजकीय यंत्रणेपासून पूर्णपणे वेगळी असणारा जनलोकपाल काही करू शकेल ही अपेक्षा होती.
परंतु, जनक्षोभाला झुलवत ठेवून जनलोकपाल मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. हे सर्व होईतोवर हजारे - केजरीवाल प्रभृतींना राजकारणात यायचे नव्हते.
पण , 'कायदे करणे हा फक्त निवडून आलेल्या जनप्रतिनिधींचा हक्क आहे. तुम्हाला जनतेने निवडून दिलेले नाही, त्यामुळे तुम्ही कितीही आकाशपाताळ एक केलेत तरी त्याचा काहीही उपयोग नाही' असे त्यांना सर्वच पक्षांकडून निक्षून सांगितले गेले.म्हणूनच केजरीवाल यांना राजकारणात येणे भाग पडले. त्यांच्या या नव्या पक्षाला संसदेत २० ते ३० जागा जरी मिळाल्या तरी त्यांना डावलून कोणतेही सरकार चालू शकणार नाही. हा चंचूप्रवेश असला तरी केजरीवालना फायद्याचा आहे.
पण राजकारण म्हटले की फक्त स्वच्छ प्रतिमा एवढे भांडवल पुरत नाही. (तिसरे, म्हणजे केशव यांचे व्यंगचित्र केजरीवाल आणि व्ही.पी. सिंग यांच्यात साधर्म्य दाखवते.)व्ही.पी. सिंग यांना जनता दल आणि भाजपा यांचा पाठिंबा होता, त्यांनी काँग्रेस सोडून इतर पक्षांवर शरसंधान केले नव्हते पण केजरीवालांनी तेही केले आहे. हा या दोघांमधला मोठा फरक आहे. त्यामुळे केजरीवालांचा पक्ष एकाकी पडला आहे. त्यांच्याकडे फारसे आर्थिक पाठबळ नसावे. त्यामुळे त्यांना स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी जनतेसमोर एक भव्य चित्र निर्माण करायचे आहे. (लार्जर दॅन लाईफ इमेज). त्यातूनच त्यांनी हा गौप्यस्फोटांचा सपाटा लावला आहे.

२०१३ दिल्ली विधानसभा निवडणूक असो किंवा २०१४ लोकसभा निवडणूक, केजरीवालांना लगेचच सर्वंकष सत्ता हवी आहे असे नाही तर संसदेच्या आत एक हक्काचा दबावगट निर्माण करायचा आहे. त्याही पुढच्या निवडणुकांपर्यंत हा दबावगट आपला वेगळेपणा टिकवतो ('पार्टी विथ अ डिफरन्स') की त्यांचाही एक भाजपा होतो ('पार्टी विथ डिफरन्सेस') हे पाहणे रोचक ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांच्या या नव्या पक्षाला संसदेत २० ते ३० जागा जरी मिळाल्या तरी त्यांना डावलून कोणतेही सरकार चालू शकणार नाही. हा चंचूप्रवेश असला तरी केजरीवालना फायद्याचा आहे.

हे विधान म्हणून योग्य आहे. मात्र अश्या २०-३० च्या कॅटेगरीतल्या जागा अनेक मोठमोठ्या पक्षांना (NCP, तृणमूल, डीएमके) कशाबशा मिळत असताना, कानामागून आलेल्या अरविंदरावांना लोक इतकी मते का व कशी देतील?

केवळ भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवणारा नेता म्हणून या इतक्या जागा मिळतील असे वाटते का?

माझ्यामते सद्यस्थिती बघता जर केजरीवाल पक्ष स्वतः लोकसभेच्या आखाड्यात उतरला तर दिल्ली, चेन्नै आणि बंगळूर इथे चांगले उमेदवार उभे करू शकला तर एखाद-दुसरी जागा मिळ(व)ण्याची धुसर शक्यता आहे. अर्थात निवडणूकीपर्यंत त्या पक्षाकडून अधिक विस्तृत भुमिका व आश्वासक कृती घडली तर अर्थातच चित्र वेगळे असेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्या अरविंदने गेल्या आठवड्यात खुर्शीद्,जावयबापूचा पंचा खेचला होता. आज गडकर्‍यांच्या नितिनची वेळ आलेली दिसते.

अरविंद केजरीवाल यांनी एकामागून एक प्रकरणे बाहेर काढून केलेला राजकारण प्रवेश हे केवळ सुरवातीचे ढोंग आहे की नेमके राजकीय उद्देश त्यामागे आहेत असे तुम्हाला वाटते?

राजकिय उद्देश आहेच. भ्रष्ट राजकारणी लोकांच्या **वर लाथ मारणे हे पुण्य आहे असे मला आणि ह्यांनाही पूर्वीपासून वाटत आले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सलमान खुर्शीद यांची 'रक्त सांडण्याची धमकी वाचल्यावर केजरीवालांच्या जिवाला धोका आहे असे वाटते. त्यांनी एकदमच अनेक लोकांशी शत्रुत्व घेतले आहे. सगळे मिळून त्यांचा 'गेम' करण्याची शक्यताच जास्त वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही वेगळा प्रयत्न चालू आहे - म्हणून आशा आहेत. केजरीवालांच्या पद्धतीबाबत मी तितकी सहमत नाही - पण माणूस प्रामाणिक आहे, तळमळीचा आहे असं अजून तरी दिसतंय. त्यांच्या 'टीम'बाबत असं म्हणता येईल का हे सध्या माहिती नाही. शिवाय नोकरशाही आणि सामाजिक संस्था असा दुहेरी अनुभव केजरीवालांच्या गाठीशी आहे - त्याचा उपयोग त्यांना होईल राजकीय कामातही. 'जनलोकपाल' आंदोलनात दिल्लीतले युवक-युवती केजरीवालांच्या सोबत आहेत असं एक चित्र दिसलं - जे क्षणिक असू शकतं.

दिल्ली विधानसभा ही चाचणी आहे केजरीवालांसाठी. त्यावरुन पुढच्या ब-याच गोष्टी ठरतील. दिल्लीतले ताणेबाणे पाहता आत्ता तरी केजरीवालांना 'दबाव गट' बनवण्याइतके लोक निवडून आणता येतील असे वाटत नाही. पण निवडणुकांचे गणित नेहमीच बदलत राहते - त्यामुळे ठोस विधान करण्यात अर्थ नाही.

पण व्यवस्थेचा भाग बनून व्यवस्था बदलता येते का याबाबत मनात प्रश्न आहेत. (अर्थात व्यवस्थेच्या बाहेर राहून व्यवस्था बदलता येते का? - असाही प्रश्न आहेच म्हणा!! Lol जसजसा काळ पुढे जाईल तसतसे 'बाहेरचे' 'आतले' बनतील का हीच शंका आत्ता तरी मनात आहे. असे उग्र आंदोलन किती काळ चालेल याला स्वाभाविकच मर्यादा आहेत. संघटन बांधणी आणि भ्रष्टाचारासोबतच अन्य विषयांवरची धोरणं - याबाबत केजरीवाल आणि त्यांच्या सहका-यांना लवकरात लवकर विचार करावा लागेल - तो केला असेल तर मांडावा लागेल. सध्याच्या राजकीय व्यवस्थेला पर्याय निर्माण करणं तितकसं सोपं नाही, कारण एका अर्थी ही राजकीय व्यवस्था लोकांनी त्यांच्या सोयीसाठी निर्माण केलेली आहे - म्हणूनच ती तग धरुन आहे हेही विसरता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

".....केजरीवालांच्या पद्धतीबाबत मी तितकी सहमत नाही - पण माणूस प्रामाणिक आहे, तळमळीचा आहे असं अजून तरी दिसतंय....."

~ सहमत. बाकी या देशातील राजकारणाची परंपरा असेही सांगते की, कोणतीही नदी उगमापाशी स्वच्छच असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थिअरॉटिकल डिस्कशन म्हणून वाचायला आवडले.

प्रत्यक्ष निवडणूक ही वेगळी बाब आहे.

प्रत्येक पोलिंग बूथवर पोलिंग एजंट बसवणे जाऊ द्या, प्रत्येक सीटवर फॉर्म (स्वखर्चाने) भरायला तरी माणसे मिळतील का, इथपासून मला शंका आहेत. स्वबळावर अन स्वखर्चाने बाणेदारपणे लढणे अलग. शेवटी 'स्वच्छ अन भ्रष्टाचार विरहित' म्हणून यांनी डाव मांडला आहे. अन खेळ डुकराशी कुस्ती या प्रकारचा आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

केजरीवाल हे राजकीय दृष्ट्या फार यश मिळवतील अस आत्ता तरी वाटत नाही. विचार करता मला असं वाटलं की, राजकारणाच्या बाहेर राहून, 'स्वघोषित' लोकपाल होवून आत्ता जे करत आहेत ते केलं असतं तर बरं झालं असतं. केजेरीवाल आणि कंपनीने आर. टी. आय कार्यकर्त्यांना संघटित करून त्यांना एक सुरक्षा कवच आणि भ्रष्टाचारा विरुद्ध एक संघटित लढा देणं जास्त परिणामकारक होईल्/झालं असतं हे माझं मत इथे नोंदवते.

हिंदू मधली व्यंगचित्र अगदी मार्मिक असतात याबद्द्ल पूर्ण सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0