दोन कविता

प्रचंड स्फोटानंतर
नवं विश्व तयार होतं म्हणे!
हि-याचे आवरण
असलेला नवा ग्रह
दिसतो आहे
किंवा तशी शक्यता आहे
म्हणून तू वाट
बघू शकतेस!
पण
प्रदक्षिणेचे काय?
ती किती काळात होते?
मार्ग कसा आहे?
त्याच्या बरोबरीनं /मागून /
ठरवलेल्या मार्गावर
चालणं.... वगैरे..
शेवटी तो ग्रहही
ता-याभोवती फिरतो!
हे लक्षात असू दे!

फर्टिलायझिंग फ्रोजन एग्ज
ट्रेंड आहे सध्याचा..
(म्हणून तू स्वीकारणार नाहीसं)
(शेळ्या मेंढ्यांच) क्लोनिंग
कधीच करून झालय!
त्यात काही मजा नाही!
यू आर स्पेशल
यू आर नेक्ट!

------------------

कोणं आहेस तू?
वेडंवाकडं,
लक्ष वेधणारं,
अव्यवहारी,व्यवहारी
वागणं
म्हणजे तू नाहीस!
तुझं हसणं,
तुझे फोटो,
तू केलेलं काम,
तुझी भूमिका,
तुझी प्रत्येक कृती,
माझ्यासाठी
फक्त कला!
कला म्हणून बघितलं
की पटतं-
ही घरे,
या इमारती, रस्ते,
कागद, पेन,
आयपॅड,
हा निसर्ग,
तू, तुझं डेटिंग,
डिनर,फ्लर्टिंग...
खोडसाळपणा..
कलेची विविध रूपेच!
जस्ट टु मेक इट सिंपल
माणूस म्हणून
तुझं अस्तित्वच
नाकारलं आहे मी...

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

दोन्ही आवडल्या.. सविस्तर प्रतिसाद नंतर देतोच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दोन्हि कविता आवडल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0