माझे डॉक्टर होणे : १ (क्रमशः)

१(अ). अ‍ॅडमिशन : फॉर्म भरणे.

२०वं शतक संपायला बरीच वर्षं शिल्लक असतील, मी नुकतीच बीजे ला अ‍ॅडमिशन घेतली होती.. हां, डॉक्टर कसा झालो ते सांगायचं म्हंजे तिथे अ‍ॅडमिशन घेण्यापासूनच सुरुवात करावी लागेल. बाकीचा फ्लॅशबॅक नंतर कधीतरी, सध्या अ‍ॅडमिशन फॉर्म भरण्याची स्टोरी सांगतो.

तर, १२वी दिली. तोपर्यंत ती एन्ट्रन्स बिन्ट्रन्स ची भानगड सुरू झाली नव्हती, अन खासगी मेडीकल कॉलेजेस पण सुरू झालेली नव्हती. निक्काल(!) लागल्यानंतर, मार्कं बरे पडलेत हे पाहून इंजिनेरींग अन मेडिकल दोन्हीकडे अ‍ॅडमिशन साठी फॉर्म भरले. तसं आमच्या केमिस्ट्रीच्या खडूस डीडीडी मास्तरांनी दात विचकत सांगितलेलं, 'आडकित्त्या, जेमतेम लागेल नंबर तुझा.' मग मात्र फॉर्म भरणे गरजेचे होते.

माझ्या अख्ख्या खानदानात एम्बीबीएस कुणी झालेला नव्हता तोपर्यंत. (आजपर्यंतही नाही. माझा 'साला' सोडल्यास. अन तो 'खानदाना'त इन्क्लूड होत नै.) अन बी.ई. आजपासून नेक्ष्ट इयर पहिली पुतणी होईल. हां, एक काका "व्हेटरनरी" गायनॅक सर्जन होऊन कोकणात शासकीय सेवेत होते खरे. अन दुसरा एक चुलत भाऊ बी.ए.एम.एस. झालेला होता तोपर्यंत. पण या दोघांपैकी कुणीही मला इन्स्पिरेशन वै दिलेली नव्हती, की आडकित्त्या, डाक्टर हो! हां, म्हणायला माझ्या ताईला फार वाटायचं मी डॉक्टर व्हावं म्हणून. तिने फॉर्म वगैरे भरला होता, अन १-२ मार्कांनी अ‍ॅडमिशन गेलेली वगैरे होती. पण ती माझ्यापेक्षा १३ वर्ष (!) मोठी. तेंव्हा तिला फारसं दु:ख वगैरे झालेलं नव्हतं.(बहुतेक. -त्याकाळी डॉ होता आलं नाही, तर फार दु:ख होत नसे.) ती नेहेमी सांगायची मला. तुझी बोटं लांब आहेत. उत्तम कलाकार किंवा सर्जन होशील. असो. सर्जन च झालोय, अन थोडी चित्रं वगैरेही काढतो.

तर फॉर्म वगैरे असाच वर्गातल्या मित्र लोकांनी मिळून आणून भरला(ले). म्हणजे एक इंजिनेरिंग चा, अन एक मेडिकल चा. (अजून एक बीएएमएस चा भरलेला. टिळक आयुर्वेद कॉलेजचा. त्याची गम्मत नंतर) त्याकाळी कॉलेजचे चॉईस २. एक बी.जे. मेडिकल अन दुसरं सी.ओ.ई.पी. (यथावकाश दोन्हींच्या लिस्टा लागल्या. दोन्हीकडे -टिळक आयुर्वेद कॉलेज धरून तिन्ही कॉलेजच्या- नंबर लागलेला होता.) फॉर्म भरण्यासाठी आम्ही तिघे मित्र घरून 'रातराणी' एस्टीत बसून पुण्यास रवाना झालो. तेंव्हा ताई खडकवासल्याला (आय.ए.टी.) रहायची. तिचे मिस्टर (मी त्यांना कायमच बाळासाहेब म्हटत असे.) तिथे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशनला कार्यरत होते. पहाटे पोहोचून तिच्या कडे जाऊन उतरलो. दुपारी पुण्यात जाऊन फॉर्म भरायचा होता.

११ वाजेच्या सुमारास "भिकारदास मारूतीला" पीएमटी बसमधून उतरून आम्ही तिघे शीलेदार फॉर्म भरण्यासाठी निघालो. मी, अवड्या अन टिट्या. तिघे सोबत. मला त्यातल्या त्यात पुण्याची थोडी माहीती होती. ९वी अन ११वी च्या 'व्हेकेशन क्लास'ला मी पुण्यात राहिलो होतो. अवड्या अन टिट्या दोघेही पुण्यात पहिल्यांदाच आलेले. भिकारदास मारूतीवरून बाजीराव रोड पकडला, अन डावीकडे वळून चालायला सुरुवात केली, की शनिवार वाड्यासमोरचा पूल ओलांडल्यावर शिवाजीनगर येते, अन तिथे एस्सेसी बोर्डाकडून उजवी कडून रेल्वे पुलाच्या बाजूला इंजिनियरिंग कॉलेज आहे. तिथून नदी ओलांडून पल्याड गेले, की "जवळच" स्टेशनजवळ "कुठे"तरी बीजे आहे इतपत भौगोलिक माहिती मला होती.

त्यानुसार तिघे पायी पायी (नॉट जोकिंग. मला आजही या शारिरीक कर्तृत्वाचा /Physical feat/ जाम अभिमान वाटतो, पण हे खरंच केलंय. अजूनही खूप काही केलंय, पण ते यथावकाश.) चालत सीओइपी ला पोहोचलो. तिथे त्या डिस्ट्रिक्ट जज च्या बंगल्याशेजारी कोणतं डिपार्टमेंट आहे? तिथे व्हरांड्यातच टेबल मांडून फॉर्म्स घेत होते. तिथे लाईनीत उभे राहून फॉर्म भरला. काय तरी २८ रुपये वगैरे फी होती ती भरली. पावत्या खिशात ठेऊन बीजे च्या दिशेने कूच केले.

तिथून पायी निघून संगम पुलावरून सरळ स्टेशनला पोहोचलो.

स्टेशनापासून उजव्या बाजूने ससून हॉस्पिटलला चकरा सुरू झाल्या. रस्त्यात येणार्‍या जाणार्‍यास अन दुकानदारांसही विचारणा सुरू होती. बी. जे. मेडीकल कॉलेज कुठे आहे हो? ससून कुणी ही सांगायचं. पण बीजे?? छ्या! अन मुख्य लोचा म्हणजे आम्हा तिघांपैकी कुणालाही हे ठाऊक नव्हतं, की ससूनशी संलग्न आहे तेच बीजे मेडिकल : बैरामजी जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालय! एकच कॅम्पस आहे. कारण परत तेच. तिघांच्या खानदानात डॉक्टरकी कुणी पाहिलेली नव्हती.

चक्कर मारताना उजवीकडे कंपाऊंड. आत पाहिलं की एक भलं मोठ्ठं हॉस्पिटल. लोक इकडे तिकडे फिरताहेत. मधेच एखाद दुसरा एप्रन(पांढरा कोट) घातलेला तरूण/तरुणी लगबगीने धावत जाताना दिसताहेत. डावीकडे गर्दीचा रस्ता. रस्त्यापलिकडे भरपूर टपर्‍या. काही चपलांच्या. बाकी जुन्या पुस्तकांच्या. त्यामागे सेंट्रल बिल्डिंग. पुढे आंबेडकर उद्यानाजवळ एक नीरेचं अन लिंबूसरबताचं दुकान. ट्रॅफिकभरला रस्ता. फूटपाथवर वेगवेगळे पथारीवाले. स्वेटर, जॅकेट विकणारे 'नेपाळी'. कंपाऊंडमधल्या गेटस जवळ रिकाम्या बाटल्या विकणारे लोक. (त्या काळी या बाटलीत भरून ससून मधून खोकल्याचे इ. पातळ औषध 'डिस्पेन्स' केले जाई. बाटली पेशंटाने आणावी लागे. ५-१० पैशात आकारानुसार बाटली मिळे. स्वच्छ धुतलेली, बुचासकट. मोस्टली दारुची बाटली.) पण ते @#$ बीजे कुठे दिसेना.

एव्हाना थकायला झालेलं. पाय ओढत या अक्ख्या कॅम्पसला ३ फेर्‍या मारल्या, क्लॉकवाईज. स्टेशन टु मालधक्का टू स्टेशन परत. कॉलेज सापडेना. विचारून थकलेलो. चालून दमलेलो. पोटात कावळे कोकलताहेत. फॉर्म भरायला कॉलेज सापडत नाहीये. एस्टीडी/लोकल फोन बूथ चा जमाना उगवायचा बाकी आहे. कुणाला फोन करून विचारायची सोय नाही. रस्त्यात ज्याला विचारतोय तो, 'ये बीजे मेडिकल' कौन्सा मेडिकल स्टोर होता है भाई? असा चेहेरा करून 'पता नै' सांगतोय.. डॉक्टर व्हायला आलोय ४०० मैलावरून.. फॉर्म कुठे भरू?? जहाल डिप्रेशन.

लास्ट ट्राय म्हणून, किंवा स्टेशन जवळ १ रुपयात झुणकाभाकरची पाटी पाहिली होती तिथं जाऊन किमान ५० पैशात २ घास (दोघांत एक प्लेट) खाऊ तरी, असा विचार करून, मालधक्क्या पासून उल्टी चक्कर मारली. म्हंजे अँटीक्लॉकवाईज.

मधेच एका गेटपाशी डावीकडे पाहिले-

अन चिमित्कार!

अहो, त्याच फूटपाथवरून चालतांना,
त्याच कंपाऊंडच्या आत,
त्याच ४ मजली बिल्डिंगमधे,
तेच ते ३ मजली उंच शूभ्र खांब, त्यांच्यावर हत्तींची १ मजली उंच डोकी, अन जिथे ससून जनरल हॉस्पिटल असं पाटीवर लिहिलेलं पहात होतो, त्याच्या एक्झॅक्टली समोर, मिरर इमेज मधे, तिथेच, 'ससून' च्या जागी इंग्रजीतली पाटी दिसली:
"BYRAMJEE JEEIJEEBHOY MEDICAL COLLEGE"
BJMC
आम्ही तिघांनी चक्क एकमेकांना मिठ्या मारल्या.
धावत कंपाऊंडात शिरलो,
अन तिथेच परत कॉरिडॉरमधे टेबल टाकून बसलेल्या एका गृहस्थांपाशी फॉर्म भरला. मग रमत गमत स्टेशनवर जाऊन समोरच्या झुणका भाकरमधे मस्स्स्स्स्त जेवण केलं.

---------
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

अहो समव्यावसायिक्,पुढे अ‍ॅडमिशन कसं झालं ते पर लिवा.
आमचा तर जूनात रिजल्ट लागला, येगयेगळ्या केशीबिशी व्हयत सप्टेंबरात अ‍ॅडमिशन झाली एकदाची.
मग आणखी कुणीशी केस टाकल्यान तं फटदिशी सगल्यांची अ‍ॅडमिशन क्यान्सल. ऐन दिवाळीत हातवर हात धरान बसलीला काय व्हता ना काय नाय. त्यात आख्खे खानदानात न्हवं तर आख्खे घरात आमीच पयले डागदरी शिकायस गेलीला.
मंग एकदचा त्या केशीचा सत्यानाश झाला ना नोव्हेंबरात सुरू झाला कालीज.

this आमचा कालीज

सर ग्रँट मेडिकल (जमशेदजी जीजीबॉय हॉस्पिटल)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढं काय नाय.
अ‍ॅडमिशन झाली अन डॉक्टर झालो. लिहिलंय ना तिथे. सर्जन झालो म्हणून? संप्ली गोष्ट Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अॅडमिशन झाली अन् डॉक्टर झालो, असं झालं होय. बरं... मग ते कसं ते लिहा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोष्ट संप्ली तं क्रमशः काहून देऊन राईजो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१९वं शतक संपायला बरीच वर्षं शिल्लक असतील,

माझ्या माहितीप्रमाणे महात्मा गांधी,टागोर्,झांशीची राणी,तात्या टोपे वगैरे मंडळिंचा जन्म १९व्या शतकात झाला होता.
सध्या २१वे शतक सुरु आहे. मागील शतक २०वे होते.
बाकी सविस्तर वाचून टंकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तेच म्हणतो होतो,कि अजून २ दा तरी वाचायला हवा होता पोस्ट करण्याच्या आधी. करतो दुरुस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सांगितलेला काळ १९९५ ते २००० च्या दरम्यानचा वाटतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अगदी अगदी मन.
मी पण हेच लिहिणार होते. मग म्हटलं डॉक्टरसाहेब आठवणींच्या गावात पार हरवून गेलेत, विसरले असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रथमग्रासे मक्षिकापातः
अगदि पहिल्याच घासात खडा लागला की नै? Wink
घ्या गोड मानून. केलंय रिपेअर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

गमतीदार वगैरे वाटला Smile

(नेमाडे वगैरे आठवले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार वगैरे मानतो Wink
(ते जरा एका वाक्यात २ वेळा 'वगैरे' जास्तच झालंय हे उमजलं होतं पण ते एडिटायचं राहून वगैरे गेलंय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

काळ बहुदा बाबा आदमच्या जमान्याचा असावा असे वाटत आहे (आम्ही तरूण आहोत हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न वगैरे). Wink पुढील गमतीजमतीच्या प्रतिक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

डाँक्टर लेखन आवडले
लेख वाचल्यानँतर मनात पहिला विचार आला लकी आहात
ना सीईटीची कटकट ना अँडमिशनचा वैताग
तीन मित्र भलेही चुकतमाकत का होईना स्वबळावर टेबल टाकून फाँर्म भरतात हे वाचून आजच्या जमान्यातल्या अॅडमिशन राँउडच्या वेळेचे काँन्सिलर त्याच्यापुढे दीनवाण्या चेहऱ्‍याने बसलेले पालक विद्यार्थी हे दृश्य समोर आले
लाखाची गोष्ट करण्याऱ्‍या जमान्यात केवळ २८ रुपये फी वाचून अंमळ डोळे पाणावले
आता बीजेमधे काय गंमतीजमती केल्यात त्याचे अनुभव लिहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

या भागात तर फक्त कॉलेजलाच प्रदक्षिणा घातल्यात, पुढच्या भागात आणखी गमती-जमती येवू द्या. मेडिकल कॉलेजात होणार्‍या गमती किंवा तुमचे अनुभव वाचायला आवडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

मुन्नाभाई एमबीबीएस ची आठवण झाली! चांगला लेख. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉक्टरसाहेब, येऊ द्यात पुढचा प्रवास आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

सुरूवात तर चांगली ऐसपैस झालेली आहे. त्यामुळे पुढचं वाचायची उत्कंठा लागून राहिलेली आहे.

आणि हो, या चुका काढणाऱ्या छिद्रान्वेषी आयडींकडे लक्ष देऊ नका हो, लिहीत रहा. मधून मधून कातरलेली सुपारीसुद्धा टाका तुमच्या लेखनात. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंच्या गावाहुन आले ते कुडं लिवलय? जरा डिट्टेलवार येउं द्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

वाचत्ये. पुढला भाग येऊ द्या लवकर?

अवांतरः बायदवे, तुम्ही सीकेपी काय?* Smile

* हा प्रश्न ज्यांना जातीयवादी वाटेल त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाईल. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@घाटपांडेजी, प्रियाली तै
नांव गांव पत्ता सीकेपी इ. इ. शिक्रेट हैत. Wink म्हनूनशान लिव्लं न्हाय.
माझा फर्श्ट आटेम्प्ट वाच्ल्या बद्दल थ्यान्क्यू. दुस्रा झालाय लिवून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>> टेबल टाकून बसलेल्या एका गृहस्थांपाशी फॉर्म
ह्या प्रवेश प्रक्रियेची मजा वाटली. लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच लेख वाचला आणि नो वंडर अगदी थेट पु.ल. आणि नेमाडे या थोरांच्या लेखनाची आठवण झाली.

नेमाडे आठवले ते लिखाण शैलीवरून आणि 'एका गृहस्थापाशी फॉर्म..." वाचून पुलंच्या 'माझे पौष्टिक जीवन' लेखाची आठवण झाली. पण तुमच्या चित्रमय लेखनधाटणीवरून हे स्पष्ट दिसते की तुम्ही त्या काळातील विद्यार्थी-चळवळीचे म्होरकेदेखील असू शकाल. डॉ.श्रीराम लागू, जब्बार पटेल आणि कुमार सप्तर्षी आदी मंडळींनी बीजेच्या त्यांच्या काळात विविध चळवळींचे पाये घातले होते, त्याचे कुठेनाकुठे तुम्हावर संस्कार झाले असणार असे दिसत्ये. [चू.भू.द्या.घ्या.]

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुकून त्यांची (पुल.. नेमाडे) आठवण माझ्या वरून झाली यात मला परम-आनंद आहे. वरही नेमाडे वगैरे आठवले असं मिळालं आहे, मला खरंच छान वाटतंय.
त्यांची(धनंजय) अन तुमची क्रेडीबिलिटी मोठी आहे, असं मला माझ्या गेल्या काही महिन्यांतील मसंवरील वावरावरून जाणवतंय.
तुम्ही दोघांनीही पाठ थोपटली, म्हणून हुरुप जरा जास्तच आला. त्याने भान सुटून मी बरळू नये असा आशिर्वादही सगळ्यांनीच देऊन टाका!
आभार व्यक्त करूच का?
-आडकित्ता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

(कुठल्याशा ट्रकमागील हिंदी वचनावरून वृत्त घेतलेले आहे) : बरळो तो छानसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोक्यात प्रकाश पडल्याचा धप्पकन आवाज आला नाही. जरा इस्कटून सांगा मालक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तो बरळावा तर छानपैकी बरळावा अशा शुभेच्छा.

"देखो तो शानसे" का असे काहीसे वाक्य ट्रकच्या मागे वाचलेले आहे. (बहुधा "प्रशस्तपणे बघ, पण नजर लावू नको" असे ट्रककडे बघणार्‍याला विनंती आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवाजही आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

डागडरबाबू. लेख आरामात बसून वाचण्यासाठी ठेवला होता त्याचं सार्थक झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख फुलवता आला असता. गुंडाळला आहे असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.