Calcutta brothel (वेदना क्र. ३२)

Calcutta brothel मधुन
अस्फुट स्वरांचे ढग लहरत येतात..
मी सुन्न पायरीशी बसुन असतो,
फिडल वाजवत..
माझ्या व्रणांना लागलेलं
वीर्य चाटुन घेतात, फिडलच्या लाटा..
भुकीने भारलेल्या
वासनेच्या पायथ्याशी
भातुकलीचा खेळ ऎन रंगात असताना...
दग्ध वेदना जोजवत असतो
मनातला उपाशी प्रेषित!
बाहुलीचे सोनेरी केस हुंगुन,
शरीर सांधुन...तो उठतो.
करवादणारया लाकडी पायरयांवरुन
मला स्पर्शुन जातं एक आदिम जनावर...
त्याचे उरले सुरले गरम उच्छ्वास
माझ्या सुरात ठेऊन जातात
काही पेनीज आणि वेदना क्र. ३२...
तेव्हाच ती दारात येते
चिरंतन प्रश्नांचे पदर सावरत.
अंधारातली छद्मी हास्यं
वासनेनी उतु जाणारी रंध्रं
गढुळ सत्वाची स्तोत्रं
हवाली करते शांतपणे
मुक्या स्वप्नांच्या समुद्रात....
तिला न बघताच उमजतं
माझी fertile भुक हिस्सा मागतेय.
ओथंबलेली नाणी माझ्यावर
फेकुन ती म्हणते...
Go son, fetch the bread!

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

प्रतिक्रिया

तुमची कविता वाचताच आवडते,का ते कळत नाही.
अस्सल वाटते.

पुलेशु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयुष्याच्या आर्त जखमांमधून सिंफनी क्रमांक अमुकतमुक असे वेदनांचे स्वर अधूनमधून बाहेर येतात ही कल्पना आवडली. या कवितेतही इंग्लिश शब्दांची पेरणी आशयासाठी अत्यावश्यक का आहे हे कळलं नाही. मग semen ऐवजी वीर्य हा शब्द का वापरला असाही प्रश्न पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडण्याबद्दल धन्यवाद. आयुष्याच्या आर्त जखमांमधून सिंफनी क्रमांक अमुकतमुक असे वेदनांचे स्वर अधूनमधून बाहेर येणे ही भावना त्यामागे आहेच. त्या नावाला तसे दुसरे अंग ही आहे. आपल्या नेहमीच्या आयुष्यात अशा मनं पिळवटुन टाकणारया भयंकर वेदना क्षणोक्षणी पिच्छा पुरुवत नाहीत. त्यामुळे दु़खाच्या केवळ साध्या दर्शनाने आपण साफ कोलमडुन पडतो. क्षुल्लक गोष्टींचा नको तितका बाऊ करतो. त्यामुळे अशा उद्वेगी आणि खितपत पडलेल्या प्रश्नांना आपण कितीसा स्पर्श करु शकतो. नुसत्या रेड लाईट एरिया मधुन जाताना आपली पांढरपेशी नजर काय न्याहाळ्त असते? आपण हळहळ व्यक्त करुन नंतर विसरुन जातो. परंतु प्रस्तुत कवितेतील मुलाच्या कोवळ्या आयुष्यातील वेदनांच्या सततच्या ओघामुळे त्याला दिले जाणारे महत्व आणि त्याचा समजत्या होणारया मनावर पडणारा प्रभाव कमी होत चालला आहे. इज्जत-अब्रु आदि प्रकार आपल्यासाठी नाहित..आपल्याला असते ती फक्त भुक..एक चिरंतन प्रश्न! त्यातुन त्याचा कोडगेपणाकडे होणारा प्रवास यात रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. सु़ख किंवा दुख या जाणिवा असतात. त्याची आकड्यांमध्ये नोंद आपण कधीच ठेवत नाही. पण याचं कोडगं मन तांत्रिकपणे वेदना मोजतयं. त्यांना अनुक्रमांक देतंय. उत्तरासाठी प्रश्नांचा पाठलाग करणं त्यानं सोडुन दिलंय. म्हणुन वेदना क्र ३२
कवितेतले शब्द इंग्रजीमध्ये केवळ कवितेला धार यावी (माझ्या मते) यासाठी वापरलेत. शब्दांचे नाद जसे मला भावले तसे मी शब्द वापरले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं शेवटची ओळ इंग्रजी असण्याने कवितेची लय साधली गेली आहे. त्याचे मराठीकरण केले असता कविता अनुवादित आहे की काय असा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वाटते. परंतु ते सोडता कवितेत अन्य २-३ इंग्रजी शब्द आहेत. त्यांचा समावेश का केला गेलाय, ते अजुन समजले नाही.
आपण सांगितलेला कवितेचा गाभा आवडला. भु़क ज्याला नव्याने समजतेय अशा कोवळ्या मनातुन आलेले स्वर आणि त्याची वेदनेकडे कोडगेपणे पहाणारी दृष्टी या गोष्टी या विषयाला वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0