बीज.....
निष्ठेच बीजच नाकारलंय
माझ्या गर्भान,
शय्येच वर्तुळ नाही की
योनीचा गाभाराही नाही ,पूर्वापार ...
कुण्या रामा मागून तुडवायची नाही ,
आंधळी वाट ,
की मांडायचा नाही,
शालीनतेचा बाजार ...
उत्कटतेचा सीमा ठरवायच्या आहेत ,
माझ्या मलाच ,
अन ठरवायचं आहे ,
झुळूक व्हायचं की वादळ हेही ..
निष्ठेच बीज नाकारून ,
नवा संग बहरयाचा,आहे देही .....
योजना ....
काही बदल...
छोटेखानी पण प्रखर कविता आवडली. वेगळा विषय. लैंगिकतेचा उघड पैलू सोडला तरी इतर क्षेत्रांतही लागू पडेल अशी.
भाव साधारण पोचतो, मात्र एकदोन ठेचा लागल्या. बीज गर्भाने नाकारलंय की गर्भाशयाने? मला दुसरा वापर अधिक परिणामकारक वाटेल. तिचा वापर समजावण्यासाठी मी माझ्या पद्धतीने थोडा विस्तार केला आहे. आवडतो का पहा.
माझ्या गर्भाशयाने बीजच नाकारलंय,
आणि मला समोर दिसतोय
गळून पडलेला एक गर्भ,
त्याला माझा म्हणवत नाही.
निष्ठेच्या कल्पनांनी केलेला बलात्कार
आणि सहन केलेलं नकोसं ओझं जे
लादलेल्या बाळंतपणाच्या ओकाऱ्या
काढूनही उलटून पडलं नाही
ते आता दिसतंय
डॉक्टरांनी काळजीपूर्वक तुकड्यातुकड्यांनी
बाटलीत भरलेलं
त्यांना करायचा तो अभ्यास खुशाल करोत
मी मात्र ठरवलंय..
शय्येच वर्तुळ नाही की
योनीचा गाभाराही नाही ,पूर्वापार ...
कुण्या रामा मागून तुडवायची नाही ,
आंधळी वाट ,
की मांडायचा नाही,
शालीनतेचा बाजार ...
उत्कटतेचा सीमा ठरवायच्या आहेत ,
माझ्या मलाच ,
अन ठरवायचं आहे ,
झुळूक व्हायचं की वादळ हेही ..
निष्ठेच बीज नाकारून ,
नवा संग बहरयाचा,आहे देही .....
कविता आवडली.
कविता आवडली.