जोडपं/ तोमास त्रांसतोमर

जोडपं

ते दिवा विझवतात
दिव्याचा घुमट क्षणभर चकाकतो
आणि ग्लासातल्या गोळीप्रमाणे विरघळून जातो
एक उत्थान;
आणि हॉटेलच्या भिंती स्वर्गाच्या अंधारात उचलल्या जातात

जोडप्याच्या हालचाली मंदावल्यात
ते झोपलेत; पण त्यांच्या मनातली गुपितं एकत्र येऊ लागलीएत
एखाद्या शाळकरी पोराने काढलेल्या चित्राच्या
ओलसर कागदावर
मिसळून धावणार्‍या दोन रंगांप्रमाणे

बाहेर अंधार आणि शांतता भरून राहिलीए
या रात्रित शहर मात्र जवळ आल्यासारखं वाटतंय
घरे आपल्या बंद खिडक्या घेऊन आलीएत
निर्विकार चेहर्‍यांची गर्दी होऊन
दाटीवाटीने वाट पाहत उभी आहेत

तोमास त्रांसतोमर

(रॉबर्ट ब्लाय/ रॉबिन फल्टन यांच्या इंग्रजी अनुवादावर आधारित मराठी अनुवाद)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पटकथा+स्टोरीबोर्ड प्रकारचे लेखनतंत्र वापरून कविता अतिशय प्रभावी झालेली आहे.

तोमास त्रान्स्त्रमर या कवीबद्दल आजवर काहीच माहीत नव्हते. (२०११ नोबेल प्राइझची बातमी या वर्षी लक्षात आली नाही.) ही कविता वाचल्याच्या निमित्ताने विकिपेडियावर माहिती बघतो आहे.

चांगला अनुवाद केल्याबाबत आणि कवीची ओळख करून दिल्याबाबत श्री. ढवळे यांचे आभार मानतो.

- - -
इंग्रजी अनुवादात आणि ->मराठी अनुवादात काही सूक्ष्म पण महत्त्वाचे फरक आहेत. ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे.

मराठी अनुवादात जोडप्याच्या हालचाली आहेत, इंग्रजीत हालचाली of love आहेत हे शब्दांत स्पष्ट केलेले आहे. (मराठी अनुवाद वाचतानाही हालचालींच्या अनेक प्रकारांपैकी या हालचालीसुद्धा मी गृहीत धरल्या होत्या. पण दिवसभर दमल्यानंतर शरिराच्या सहज हालचाली असतात, त्या मंदावल्या, असा अर्थ मनात आला होता.)

दुसर्‍या कडव्यातील शांत-प्रीत भावनेला छेद देणारे काहीसे अस्वस्थ असे तिसरे कडवे आहे. इंग्रजी कवितेत "निर्विकार" ही भावना सांगणारे शब्द कवितेच्या शेवटी आहेत. मराठी अनुवादात "वाट बघणे" या वेगळ्या भावनेवर कवी-अनुवादक आपल्याला सोडतो. (येथे चूक म्हणून सांगत नाही. वेगवेगळे भावनिक प्रभाव आहेत, इतकाच वैयक्तिक अनुभव सांगतो आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुवादाचा चांगला प्रयत्न. असे कवी अनुवादित करणे यात अनुवादाकाचाही चांगला कस लागतो.

या कवीला नुकताच नोबेल पुरस्कार घोषित झालेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिसर्‍या कडव्यात अजून चांगल्या प्रकारची शब्दरचना करता आली असती असं वाटतंय. इथे जरा शब्दबंबाळ वाटतंय.
बाकी कविता छान अनुवादित झाली असावि असा कयास आहे. (मूळ कविता वाचली नाही,केवळ इंग्रजी अनुवाद वाचलाय म्हणून)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-धनंजय यांचा प्रतिसाद आवडला. मुळात ब्ल्याय आणि फल्टन दोहोंच्या अनुवादात अत्यंत साधे, पण महत्वाचे फरक आहेत.

-अनुवाद करताना कवितेचं ' कवितापण' कायम रहावं. आपण कवितेचा अनुवाद कवितेतून करताहोत. निव्वळ शब्दाला शब्द लिहून भागणार नाही

-कवितेला एक्संध अनुभव म्हणून पहावे. क्वचित हा अनुभव चितारताना, मूळ कवितेतील एखाद्या तुकड्याची/ विचाराची पुनर्मांडणी ( क्रमानुसार ) होऊ शकते. कवितेचा ' इम्प्याक्ट' अबाधित राखण्यासाठी हे आवश्यक बनते. अर्थात हे बर्‍याच अंशी अनुवादकाच्या भूमिकेवर देखील अवलंबून असते.

-प्रणवची ' चांगला प्रयत्न ' अशी प्रतिक्रिया आली आहे. हा प्रतिसाद त्याने थोडासा स्पष्ट करून सांगितला तर माझ्या अल्पज्ञानात भर पडेल असे वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्यांदा वाचल्यावर तिसरे कडवे असंबंद्ध असावे असे वाटले. धनंजय यांचा प्रतिसाद वाचल्यावर पुन्हा कविता वाचता 'चित्र' उलगडले. कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

कविता आवडली.. रुपांतराचे रुपांतर होताना नैसर्गिकरित्या झाले आहे.
मुळ कविता ते इंग्रजी कविता यामधे जर रुपांतर नेमके असेल तर ते भाव मराठीतही व्यवस्थित उतरले आहेत
अभिनंदन!

अश्याच अनवट कविता/कवितांबद्दल वाचायला आवडेल

ऐसीअक्षरेवर स्वागत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!