मी आहे मेंढपाळ - फर्नांडो पेसो

मी मेंढपाळ आहे

मेंढ्या म्हणजे माझे विचार
आणि प्रत्येक विचार म्हणजे संवेदना.
मी माझ्या डोळ्यांनी आणि माझ्या कांनांनी
आणि माझ्या हातांनी-पायांनी
आणि नाकाने व तोंडाने विचार करतो.

फुलाचा विचार करणं म्हणजे ते पाहणं आणि हुंगणं
फळ खाणं म्हणजे त्याचा अर्थ समजून घेणं

म्हणूनच या गरम दिवशी
या सगळ्याचा भरपूर आनंद घेतल्यावर
मी दुःखी होतो
आणि मी गवतावर आडवा होतो
आणि माझे उष्ण डोळे बंद करतो
मग मला जाणवतं माझं शरीर सत्यस्थितीमध्ये पहुडलंय
मला सत्य कळते, आणि मी आनंदी होतो

- मूळ कवी -Fernando Pessoa
अनुवाद - प्रणव

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ कवितेसारखी आहे, खरी. पण मूळ कविता सुद्धा मला थोडीशी अति-स्पष्टीकरणात्मक वाटली. कवितेतून मला तत्त्वज्ञान अनुभवावेसे वाटते : शिकवल्यासारखे भासले तर ती कविता तितकीशी आवडत नाही.

- - -

तरी मुळातल्या कवितेत काही प्रमाणात शब्दांच्या निवडीमुळे अनुभवकथनाचा भास अधिक होतो.
भाषांतरात "मेंढ्या म्हणजे माझे विचार \ आणि प्रत्येक विचार म्हणजे संवेदना." यातील "म्हणजे" मला बोचते आहे. मात्र मुळातले
O rebanho é os meus pensamentos
E os meus pensamentos são todos sensações.
यांत "म्हणजे" सारखा स्पष्टीकरणात्मक शब्द नाही. हे पोर्तुगीजला मानवते, मराठीला मानवत नाही. मान्य. पण मग मराठीत रूपक अधिक थेट केले तर चालले असते. "प्रत्येक" हा अतिस्पष्टीकरणात्मक शब्द टाळायलाच हवा होता... ("विचार सगळे= संवेदना" आणि "प्रत्येक विचार = संवेदना" यांत अर्थाचा फरक फारच आहे.)

मी आहे धनगर/मेंढपाळ
माझा कळप विचारांचा
नि विचार अवघे संवेदनाच...
(असे काहीसे)
...

दुसरे कडवे :
Pensar numa flor é vê-la e cheirá-la
E comer um fruto é saber-lhe o sentido.
फूल बघणे-हुंगणे हाच फुलाचा विचार
नि फळ खाणे हेच त्याचा अर्थ जाणणे

मुळातच रूपकापेक्षा थीसिस मांडण्याकडे जाणार्‍या ओळी आहेत. पण पोर्तुगीजमध्ये बोचरा "म्हणजे" शब्द नाही, त्यामुळे "ज्ञान-संवेदना एकवद्भावाचा प्रत्यक्ष अनुभव कवीला आला, ते कवी सांगतो आहे" असे खपून जाते. ("म्हणजे" किंवा तत्सम शब्द योजल्याशिवाय - मी येथे हा/हे"च" योजले - ही वाक्ये मराठीत मांडता येत नाहीत. त्यामुळे भाषांतरकाराचा दोष म्हणून सांगत नाही.)

तिसर्‍या कडव्याच्या सुरुवातीला :
Por isso quando ...
मुळातच कवी "या कारणासाठी जेव्हा..." वगैरे कारणमीमांसेचा युक्तिवाद कवितेत देतो. मुळातच आवडलेले नाही. भाषांतर चांगलेच आहे.

- - -
चांगला अनुवाद आहे. पण मूळ कविता तितकीशी माझ्या रुचीची नसल्यामुळे भाषांतरही तितकेसे आवडले नाही. मुळात मला जे अंधुक दोष [वैयक्तिक आस्वादापुरतेच दोष] वाटत होते, ते भाषांतरात अधिक गडद झाले. (कविता अभिजात, सुप्रसिद्ध, विद्यार्थ्यांना शिकवण्याजोगी मानतात, हे मला ठाऊक आहे. तरी कविता वैयक्तिक आवडीची नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0