(डील ऑर नो डील?)
प्रेरणा
I have an offer you can't refuse!
मी तुम्हाला इथूनतिथून उचलणार, मनात ठेवणार
कळफलकावर टंकून मस्त शेप-बिप देणार
कसाही का असेना...
.
एका चांगल्या फाइलमध्ये ठेवणार, सेव्हबिव्ह करून
युनिकोड-एंडियन, बगू झेपेल तसं.
त्यांना कविताबिविता म्हणणार,
ठीकठाकशा साइटवर, ब्लॉगवर टाकून भावना पोचवणार
.
.
तुम्ही काय करायचं...
आपलं रेप्युटेशन सेफ,
दणकून वाव्वा प्रतिसाद, क्रिटिक्सचा गेम करायचा
कष्टबिष्ट, अनभूती का कायते आपल्याकडून नाय मागायचं
आपुन अभ्यास करत नाही, तेवढा विसरून टाकायचा
आणि बाकी काय पडेल ती कामं
.
.
मं?... काय म्हंटा?
डील ऑर नो डील?
घाईघाईत लिहिल्यासारखे वाटले ः)
मस्त शेप-बिप देणार
या वाक्याने तयार होणाऱ्या अर्थाशी
कसाही का असेना...
ही ओळ जुळत नाही
कष्टबिष्ट, अनभूती
या शब्दांनी तयार होणाऱ्या व्यक्तिरेखेशी
आपुन
हा शब्द जुळत नाही. आता विडंबक असं म्हणू शकतो की हे अनेक वेगवेगळ्या क्रिटिक्सनी म्हटलेलं आहे. पण मला हे घिसाडघाईने, तीस सेकंदात केलेले विडंबन वाटले.
सर्वसाधारण कविता पाडताना कवी सुमारे चार मिनिटे तरी घालवतात. विडंबन लिहिताना तितकी मेहनत घ्यावी ही अपेक्षा रास्त वाटते. नुसत्याच भावना कशाबशा पोचवायच्या असतील तर विडंबन का लिहावं?
Disclaimer - राजेशसाहेब, हा केवळ गमतीने लिहिलेला प्रतिसाद आहे. आपल्या आक्षेपांबद्दल मूळ धाग्यावर नंतर लिहीन म्हंटो ः)
आजकाल येणार्या नवीन
आजकाल येणार्या नवीन प्रकारच्या कवितेप्रमाणे सदर कवी/विडंबकाने इंग्लिश शब्द कवितेत/विडंबनात घुसडले आहेत. शेप-बिप असे शब्द भंजाळलेल्या शहरी तरूणाईच्या तोंडी शोभतात पण "ऐसी अक्षरे"सारख्या नवीन विचार देणार्या संस्थळावर शोभत नाहीत. विडंबकाने हे पुढच्या वेळेस लक्षात ठेवावे.
असो. पुविशु.
टोकदार काव्य
एखाद्या कवीची शब्द्सारणी, विचार अनेकदा मनातल्या भावना यांचे थिटेपण आपल्याला त्याच्या अनेक कवितांमधुन जाणवते. एखादी ओळ आवडली असता तिच्या वर आणि खाली ४-५ ओळी मांडुन कवितेची पायाभरणी होते.ठरलेले तेच तेच शब्द फिरवुन वापरले जातात. अशा कवितांचे अर्थ दारिद्र्य त्या कवीची केवळ झळकण्याची/मिरवण्याची मानसिकता स्पष्ट करते. प्रस्तुत विडंबन काव्य या अशा उथळ मानसिकतेवर टोकदार भाष्य करते. कवितेची मांडणी एक उथळ कवी आणि जाणकार रसिक यांच्या संवादावर आधारित आहे. त्यामुळे त्यातल्या देव-घेवीच्या भाषेवरुन कलेचे घसरणारे मूल्य आणि त्याला प्राप्त होणारा व्यवहारिक दर्जा (कविता आणि प्रतिक्रियांचा मोलभाव) हा कविला अभिप्रेत असलेला संदेश ठळकपणे जाणवतो.
पक्का!
मी तुम्हाला वाव्वा म्हणणार, तुम्ही मला वाव्वा म्हणायचं!!!