तुटलेल्या मैत्रीणीस......

Natalie,

पावसाची हाक कानावर पडतेय.बाहेर अंधारुन आलंय. पण मला या अंधाराची तमा नाही. कारण अंधार हे एक संवेदनशील पण सुसंगत सत्य आहे, हे जाणतो मी. But the darkness could also be a myth! या दुसरया आभासाचे प्रयोजन मला काहि केल्या सापड्त नाहीये. तसेच, जर दंतकथंवरचे प्रारुप आवरण विलग करता आले,तर सत्य सापडेल? आणि अंधाराचे काय? एका मागुन एक प्रश्न ...हिवाळ्यातल्या पानगळीसारखे! पण आता अंधार चाचपण्यापुरतेही बळ शिल्लक नाही माझ्यात, कारण तु इथे नाहीस.

दिवस आणि रात्र! या द्वयींचा अन्वयार्थ लावता येईलही कदाचित. परंतु संधिकालाचे काय? तो कसा काय थोपवुन धरणार? असे असले तरी प्रत्यक्षात संध्याकाळ मला उद्विग्न करुन सोडत नाही. उलट ती माझ्या स्रुजनाचा आणि आत्ममग्नतेचा कैवार घेते. म्हणुन संध्याकाळीच मी स्वःताला पाहु शकतो, तुझ्या नजरेने! अशावेळी माझ्या प्रेम,वासना आणि क्रौर्याचे सारे हुंकार ओंजळीत जमा होतात, आणि माझ्या सगळ्या अपेक्षां-उपेक्षांचे ओझे मीच भिरकावुन देतो. पण संधिकाल हा शेवटी आवेगी संभोगाच्या बंदिस्त काव्यासारखा...A twilight with a bliss! ही संध्या मला अजाणतेपणीच ओलांडुन नाहीशी होते, मात्र मागे ठेऊन जाते.....एक सम्रुदध पानगळ! ती काही केल्या थोपवता येत नाही मला. कारण नव्या अंकुराच्या हव्यासातुन मी स्वःताला मुक्त करु शकत नाही.

असेच मागे एकदा तु मला Lennon आणि त्याच्या पत्निचे 'Two Virgins' नावाचे नग्न चित्र दाखवलेस. I said instantly,"Bloody insane...that must have made him a lot of money!" पण या अनभिद्न्य वाक्यानंतर मी ही काहीसा हादरलो.तुझ्या नजरेत माझ्या वांझपणाचा उदधार होता. Lennon समझायला मला हीच पानगळ सोसावी लागली. त्याचबरोबर ग्रेसच्या काही ओळी स्पर्शुन गेल्या....

'Teaching of the enlightened Buddha embrace much.....but the one thing that is clear, worthy instructions does not contain what illustrious himself experienced!' Lennonच्या खुनाने या ओळी अधिकच गडद झाल्या आहेत.

मागे मला भेटायला आली होतीस तु....माझ्या मुलीबरोबर. तेव्हा तुझ्या एका हाताने तिचे मला निरखणारे कुतुहलाने ओथंबलेले डोळे झाकुन मोमीनच्या ओळी माझ्यावर भिरकावुन दिल्यास...

'उम्र सारी कटी इश्क बितानेंमे मोमीन

आखरी वक्त में क्या खांक मुसलमान होंगे?

SO MY LOVE, she is your daughter by body but never be yours with soul!'

conspiracy!माझ्या स्वप्नांचा आणि कवितेचा असा अपभ्रंश? माझ्या अस्तित्वाच्या द्वैती प्रतिमांना आपल्या बाईपणाच्या भौतिकवादी संकल्पनांची चुड लावुन त्यांना सहज भेसुर केलंस तु. इथे माझा पुरुषार्थही मी पणाला लावु शकतो. पण माझ्या मुलीच्या प्राणलयीत मी पुरता अडकलो आहे ना.

and Natalie तु माझ्यासारख्या देहाला चटावलेल्या आदिम जनावरची मादी नाहीस, तर... 'you have always been a myth for me,like a ancient biblical woman with her virginity underlined!' माझ्या प्रतारणा स्वःताच्या गळ्यात बांधुन तु, तुझ्या बाईपणाचा माझ्यावर सर्वतोपरी वर्षाव केलास. so it made my all poems look stupid without pain, without you!

असेच एकदा जुन्या वह्या धुंडाळताना एक दंतकथा हाती लागली. Natalie ती तुला अर्पण,

mirza khan is a name of the great legendary poet who wrote with the name ghalib-the dominant and asad-the lion has been called a godless lover, who defied god in his own mighty words,

"when there was nothing,there was god

if nothing had been,god would have been

my very being has been my downfall

if i hadn't been, what would it has mattered?"

but such a legendary poet, once has been obsessed with just a small couplet of momin and offered him his entire life's work in exchange with these lines,

तुम मेरे पास होते हो गोया

जब कोइ दुसरा नही होता.

या दंतकथेत पुढे काय झालं मला ठाऊक नाही पण या दोन ओळींचे वेगवेगळे निघणारे अर्थ...मला आजही कासाविस करुन सोडतात.

आत्ताच बाहेरचा पाऊस ऒसरलाय. Natalie तुझ्या आठवणींच्या पैंजणस्पर्शाने अम्रुतमय झालोय मी! तुझ्या नजरेतुन स्वःताला निरखताना, मला ''Two Virgins' मधल्या Lennon प्रमाणे नग्न झाल्यासारखे वाटतेय. अशातच माझ्या आभासी लाजेचा तोल सावरताना..माझ्या प्रतिमांचे धुके विरत चालले आहे...शेवटी उरलेली माझीच दोन निर्ल्लज्ज रुपे माझ्याभोवती फेर धरुन नाचता आहेत...त्या पडझडीतही कानी पड्लेल्या माझ्या उगमसुत्रांची ही वैराण हाक.....

'जोगियापुरुष आणि वेश्या .....धडपड आणि पडझड...शेवटी दोन्हीही सावलीच्याच कथा!'

- हरवलेल्या जहाजाचा कप्तान

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

स्वतःला क्षमा करता येणे देखील महत्त्वाचे असते, अवघड असते पण आवश्यक असते - असा काहीसा विचार हे मुक्तक वाचून आला. चू भू. द्या घ्या.

या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरुपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै,
नमस्तस्यै नमो नमः

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो मिसरा ...इश्के बुताँ में मोमिन असा आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीतरी आवडलय. पण पकडीत येत नाही. की येतं पण सांगायचं नाही? व्हॉटेव्हर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे खरोखरीच लिहिलंय की ग्रेसवरची चीड काढायला?
माफ करा, पण काहीच समजलं नाही. खरंच.
कुणी रसग्रहण करील का?

खवचट - गंधबाल्य, गंधपुष्प वगैरेची आठवण झाली आणि नान् सरंजामे आठवून तोच प्रश्न मनात आला . "ही मंडळी असं का करतात?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिहायला सुरुवात केलेल्या संवेदनशील व्यक्तीस शब्दांची प्रचंड भूल पडू शकते. आशयाच्या नेमकेपणापेक्षा वाक्यांच्या वेधक होण्याकड़े कल असतो. उफ़ाडयाचं वय की काय असं काहिसं हे लेखनातले वय. आरशात जास्त वेळ घालवणारे. त्यात गंमत असते, एक नशा फारतर. शब्दांच्या, रचनेच्या, विविध प्रयोगांकड़े ओढा असतो. अशा प्रयोगांना absurdity अनुकूल असते. त्या दिशेला जात असणारी व्यक्ति ग्रेसपाशी थांबली नाही तर नवल. तीव्र संवेदनशीलता, खूप संदर्भ, गुंतागुंतीच्या भावनांना उपमाबद्ध करणे ही ग्रेसची वैशिष्ट्ये. त्या वळणाने कुणी जात असेल तर ते वाचनबहुल व्यक्तीला सहज कळते. त्याला शक्यतोवर हिणवू नये असे वाटते. त्याचा प्रवास तो त्याला योग्य वाटेल तिकडे करेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Grace mark pan nahi milnar

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

Mala Awadal faar...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0