विश्वरूपदर्शन - ३

भाग १, भाग २

वैश्विक प्रारणांचा नकाशा कसा वाचायचा आणि ही प्रारणं कशी तयार झाली हे पहिल्या दोन भागांमधे पाहिलं. कोबे, डब्ल्यूमॅप आणि प्लँकच्या नकाशांमधे आपसांत फार फरक नाही हे ही चित्रातून दिसतं आहे. मग मुळात कोबेनंतर आणखी कष्ट आणि पैसा खर्च करण्याचं कारण काय?

विश्वनिर्मितीचा महास्फोटाचा सिद्धांत विश्वाचे दोन गुणधर्म आहेत या गृहितकावर आधारित आहे; एकजिनसीपणा (homogeniety) आणि समदैशिकता (isotropic - सर्व दिशांना समान). आपल्याला डोळ्यांनी किंवा साध्या दुर्बिणींनी विश्वाचा जो चिमुकला भाग दिसतो त्यात हे दोन्ही गुणधर्म दिसत नाहीत. आपल्या जवळच्या अवकाशात ग्रह आणि त्यांचे उपग्रह आहेत, आणि सूर्य आहे. त्याबाहेर गेलो तर तारे, वायू, तार्‍यांचे गुच्छ अशा गोष्टी आहेत. प्रकाशाचा वेग विश्वात सगळ्यात जास्त असतो हे सापेक्षतावादातलं मुख्य गृहीतक. तर या वेगाने कोणत्याही दिशेने काही हजार वर्ष प्रवास केला तरीही आपल्याला हेच तारे, वायू वगैरे दिसतात. पण आपल्या दीर्घिकेची मर्यादा पार करून गेल्यानंतर विश्वात सगळीकडे दीर्घिका पसरलेल्या आहेत असं दिसतं. एक प्रकारे हे अणूच्या रचनेसारखंच आहे. अणूची रचना पाहिली तर अणूकेंद्रकात प्रचंड प्रमाणात वस्तूमान, कण ठासून भरलेले असतात. पण त्याबाहेर मोठ्या जागेत फार कमी आकार आणि वस्तूमानाचे इलेक्ट्रॉन्स भरलेले आहेत. विश्वात अणूकेंद्रासारखं केंद्र असं नाही. पण बाहेर 'छोटे' इलेक्ट्रॉन जशी प्रचंड जागा व्यापतात तसाच काहीसा प्रकार आहे. एकजिनसीपणा आणि समदैशिकता असल्यामुळे आपण ज्या दिशेला दुर्बीण फिरवू त्या दिशेना दीर्घिका समप्रमाणात पसरलेल्या आहेत हे दिसतं. अपवादात्मकरित्या काही ठिकाणी रिकामे भागही दिसतात.

विश्वनिर्मितीचा हा सिद्धांत प्रत्यक्षात असण्यासाठी विश्वाचे गुणधर्म आदर्श कृष्णपदार्थासारखे (blackbody, इथे कृष्णविवराशी black hole गल्लत होऊ देऊ नका.) असणं आवश्यक आहे. आपला सूर्य, प्रत्येक ताराही एक आदर्श कृष्णपदार्थ आहे. कृष्णपदार्थ / black body ठरवताना दोन गोष्टी पाहिल्या जातात. एकतर सर्व तरंगलांबीची प्रारणं त्या वस्तूने शोषून घेतली पाहिजेत; असं असल्यास हे नाव ठीक आहे. पण पदार्थाच्या गुणधर्मांचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की शोषून घेणं आणि उत्सर्जन या अगदी परस्परविरोधी क्रिया आहेत. त्यामुळे फक्त धनचं ऋण केलं की काम भागतं. चिन्हाचा फक्त फरक. या पदार्थांचे गुणधर्म समान असतात असं लक्षात आल्यामुळे या पदार्थांचं नाव एकच आहे. सूर्य, तार्‍यांच्या बाबतीत हे नाव वरवर पहाता misnomer, चूक ठरतं. पण एकदा नाव पडलं की ते सहसा बदलत नाही. 'महास्फोट' हे नावही तसं पहाता चूकच आहे. पण ते असंच वापरलं जातं. मायक्रोवेव्हमधे वस्तू मध्यभागी ठेवण्याऐवजी मध्यापासून थोडी लांब ठेवा असं सुचवलं जातं, ते याच गोष्टीचा विचार करूनच. जी काही मायक्रोवेव्ह प्रारणं आतमधे उत्सर्जित केली जातात ती आतल्या पदार्थाने पूर्णतया शोषून घेतल्यास वीजेचा अपव्यय टळतो, आणि आतली पोकळी कृष्णपदार्थ आहे असं म्हणता येतं.

'कोबे'कडून मिळालेली माहिती विश्वाचा एकजिनसीपणा, समदैशिकता आणि कृष्णपदार्थाचे गुणधर्म आहेत असं सांगणारी होती. वैश्विक प्रारण नकाशात दिसतं आहे त्याप्रमाणे सर्वत्र एकसमान नाही. सुमारे ३ केल्व्हीन किंवा उणे २७० सेल्सियस तापमान सर्वत्र आहे, पण त्यातली अनियमितता एक लाखात एक एवढी आहे. ही अनियमितता आहे म्हणून आपण अस्तित्त्वात येऊ शकलो. हेच ते बॅरीऑनजेनेसिस जे दुसर्‍या भागात पाहिलं. 'कोबे'ने याचं प्रत्यक्षात मोजमाप केलं. त्याशिवाय 'कोबे'ने तार्‍यांच्या नवनिर्मितीचा दर शोधला आणि काही नवीन दीर्घिका सर्वप्रथम पाहिल्या. गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात आकाशात गेलेल्या 'कोबे'चं तंत्रज्ञान, तो प्रत्यक्षात अवकाशात जाईपर्यंतच जुनं झालेलं होतं.

पण विश्वरचनाशास्त्रातली गुंतागुंत यापेक्षा बरीच जास्त आहे. त्यातले इतर दोन अतिशय महत्त्वाचे घटक म्हणजे dark matter (DM) आणि dark energy (DE). यातल्या DM चा पत्ता इतर शोधांमधून लागलेला होता. मुळात एखाद्या गोष्टीबद्दल बोलायचं, नवीन संकल्पना सांगायची तर त्याची व्याख्या करावी असा एक सामान्य दंडक आहे. पण DM आणि DE च्या बाबतीत तो पाळता येत नाही. कारण हे नक्की काय आहे हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे त्याची गोष्टच पाहू या.

डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी:

ग्रहांचा सूर्याभोवती फिरण्याचा एक ठराविक वेग आहे. पृथ्वी ३६५ दिवस किंवा एका वर्षात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते. मंगळाला साधारण १.८ वर्ष (पृथ्वीवरचे ३६५ दिवस = १ वर्ष) लागतं. जसंजसं सूर्याच्या जवळ जावं तसा हा 'वर्षा'चा कालावधी कमी होतो; किंवा सूर्याभोवती फिरायला लागणारा वेळ कमी होतो. आणि सूर्यापासून लांब जावं तसा वर्षाचा कालावधी वाढत जातो. इथे वर्ष हा शब्द थोडा गडबडवणारा आहे. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारायला ग्रहाला लागणारा वेळ म्हणजे एक वर्ष. आणि हे वर्ष आपण पृथ्वीवरच्या, आपल्या एका वर्षाच्या किती पट मोठं किंवा लहान आहे ते मोजतो. मग असा विचार करू की आपल्या वाढदिवसाला वर्षाची सुरूवात होते. तर पृथ्वीवर आपले साधारण दोन वाढदिवस होतील (खरंतर दुसर्‍या वाढदिवसाला तीनेक महिने उरलेले असतील) तेव्हा मंगळावर एक वर्ष पूर्ण होईल. शनीवर गेलो तर पृथ्वीवरचे दहा वाढदिवस होतील तेव्हा तिथे एक वर्ष वाढेल. समजा आपल्याला सूर्याचं वस्तूमान, ग्रहाचं वस्तूमान, ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर आणि ग्रहावरचं वर्ष किती दिवसांचं असतं या चारपैकी तीनच गोष्टी माहित असतील तर चौथी गणित करून काढता येते. खालच्या डाव्या बाजूच्या चित्रात सौरमालेतल्या ग्रहांचं सूर्यापासून असणारं अंतर आणि त्यांचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग यांचा परस्परसंबंध दर्शवला आहे.

galaxy rotation curve चे हे दोन्ही आलेख इथून घेतले आहेत.

सूर्य आणि बाकीचे सगळेच तारे आपल्या दीर्घिकेच्या केंद्राभोवती फिरतात. सूर्याला आपल्या दीर्घिकेच्या केंद्राभोवती फिरायला वीस कोटी वर्ष लागतात. सूर्याच्या आसपासच्या तार्‍यांनाही तेवढाच वेळ लागतो. मगाशी ग्रह-सूर्य या संदर्भात जो विचार केला, तोच करता येतो. तार्‍याचं वस्तूमान, त्याचं दीर्घिकेच्या केंद्रापासून असणारं अंतर, तार्‍याचं 'वर्ष' किती मोठं आहे किंवा तार्‍याचा दीर्घिकेभोवती फिरण्याचा वेग काय आहे हे माहित असेल तर दीर्घिकेच्या केंद्राशी किती वस्तूमान असेल याचं गणित करता येतं. वरच्या उजव्या बाजूच्या आकृतीमधे अशा प्रकारचं गणित लिहीलेलं आहे. या आलेखात क्ष-अक्षावर तार्‍यांचं दीर्घिकेच्या केंद्रापासून असणारं अंतर मांडलं आहे. याचं एकक पार्सेक असं आहे. एक पार्सेक=३.२६ प्रकाशवर्ष य-अक्षावर याच तार्‍यांची दीर्घिकेच्या केंद्राभोवती गती किती ते लिहीलेलं आहे. (दीर्घिकेचा आकार किती हे मोजता येतं; तार्‍यांची गती मोजली की वर्ष किती मोठं हे काढता येतं.) या आलेखात आपल्या जवळच असणारी दीर्घिका NGC 3198 हिचा आलेख आहे. याला galaxy rotation curve असं म्हणतात. यात तीन रेघा आहेत. सगळ्यात 'वर' जी आहे तिच्यावर काही बिंदू आहेत. ही प्रत्यक्षात केलेली मोजमापं आहेत. या बिंदूंवर काढलेल्या उभ्या रेघा म्हणजे या मोजमापांमधली त्रुटी आहे. ही रेषा जेवढी लहान तेवढी आपली मोजमापातली त्रुटी कमी. त्याशिवाय इतर दोन रेघा (curve) या आलेखात आहेत. यातल्या एका रेघेला नाव दिलेलं आहे disk. त्या रेघेचा अर्थ असा की जर दीर्घिकेचं वस्तूमान फक्त दीर्घिकेच्या तबकडीतल्या तारे, वायू इत्यादी प्रकाशमान वस्तूंएवढंच असेल तर हा आलेख आपल्याला त्या रेषेसारखा दिसला पाहिजे. वरचा आलेख आणि disk हा आलेख समान नाहीत आणि मोजमापंही या आलेखासारखी नाहीत हे उघडच आहे. तिसरी रेघ आहे तिचं नाव दिलेलं आहे halo. मोजमापं आणि अपेक्षा यांच्यातला फरक दिसण्याचं कारण "डार्क मॅटर हेलो" असेल असं समजलं जातं. हेलोचं वस्तूमान दीर्घिकेच्या केंद्रापासून बाहेरच्या दिशेला वाढत जातं. केंद्रापासून साधारण १० किलोपार्सेक (३३००० प्रव) अंतरापासून बाहेर तार्‍यांची संख्या खूप कमी होते. हेलोचं वस्तूमान साधारण त्याच्या दुप्पट अंतरावर हेलोचं वस्तूमान वाढण्याचा वेग बराच कमी झालेला दिसतो आहे. त्यापुढे ही रेघ आडवी, क्ष-अक्षाला समांतर होत जाते. याला प्रत्यक्ष निरीक्षणाचा असा पुरावा नाही; तारे जसे दिसतात तसा हा हेलो दिसत नाही. त्यामुळे त्याचं प्रत्यक्ष निरीक्षण शक्यच नाही. पण गणित करून त्याची अटकळ बांधता येते. हे हेलो दीर्घिकेच्या चित्रांसमोर कसे दिसतील हे खालच्या चित्रांमधे दाखवलेलं आहे.

सर्पिलाकार दीर्घिकेचा हेलो - कल्पनाचित्र आपल्या दीर्घिकेच्या हेलोच्या कल्पनाचित्रात सूर्याचं स्थान
दोन्ही कल्पनाचित्रं इथून घेतली आहेत.

प्रत्यक्ष निरिक्षण करता येत नाही त्यामुळे या हेलोत नक्की काय असतं किंवा डार्क मॅटर म्हणजे काय हे आपल्याला माहित नाही. या वस्तूला वस्तूमान आहे असं निश्चित सांगता येतं, कारण त्याच्या गुरूत्वाकर्षणाचं बल आपल्याला galaxy rotation curve मधून दिसतं. पण त्याशिवाय या पदार्थाचा विद्युतभार किती, घनता किती, अशा काहीही गोष्टी आपल्याला माहित नाहीत. डार्क मॅटर शोधण्याचे इतरही मार्ग आहेत. त्यांच्यातला galaxy rotation curve हा सगळ्यात प्रसिद्ध आहे. त्याशिवाय गुरूत्वीय भिंग या परिणामाचा वापर करूनही डार्क मॅटर शोधतात. डार्क मॅटरच्या गुरूत्वाकर्षणाचा वापर करणे हीच पद्धत त्या बाबतीत वापरता येते. डार्क मॅटरचा शोध मुख्यतः या अन्य पद्धतींनी लागला. त्याचं मुख्य कारण हे प्रयोग करण्यासाठी लागणार्‍या दुर्बिणी आधी बनल्या.

आपल्या विश्वात किती डार्क मॅटर आहे याचा अंदाज अन्य प्रयोगांसोबत वैश्विक प्रारणांच्या निरीक्षणातूनही करता येतो. 'कोबे'च्या निरीक्षणांमधली त्रुटी खूप जास्त होती. डब्ल्यूमॅपने ही त्रुटी खूप कमी केली आणि विश्वात ४% साधं वस्तूमान, तारे, वायूमेघ रूपात आहे आणि २४% वस्तूमान डार्क मॅटरचं आहे हे सांगितलं. चार आणि चोवीस मिळून फक्त २८% होतात. उरलेल्या ७२% चं काय? ही आहे डार्क एनर्जी.

इथेही डार्क या शब्दावरून लक्षात येईल की या ऊर्जेबद्दलही आपल्याला काहीच माहित नाही. डार्क मॅटरला निदान वस्तूमान आहे, त्यामुळे त्याचं गुरूत्वाकर्षण आपल्याला मोजता येतं. वस्तूमान-ऊर्जा यांचं परस्परांत रूपांतर करता येतं, त्यामुळे विश्वाचा ७२% भाग या डार्क एनर्जीने भरलेला आहे असं म्हणता येतं. हा ७२% आकडाही डब्ल्यूमॅपने त्रुटी कमी करून मोजला. विश्वासंदर्भातल्या अन्य निरीक्षणांमधून मिळालेले आकडे आणि हे आकडे परस्परांशी मिळतेजुळते आहेत. पण मग ही डार्क एनर्जी आहे याचा शोध कसा लागला?

गेल्या काही दशकांमधे दुर्बिणींच्या तंत्रज्ञानात बरीच सुधारणा झाली. सेमिकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्समुळे यात एडविन हबलला जो मूळ शोध लागला त्याची मोजमापं फारच अचूकरित्या करता येऊ लागली. एडविन हबलला १९३१ च्या सुमारास असा शोध लागला की ज्या दीर्घिका आपल्यापासून लांब आहे त्या आणखी लांब जात आहेत. आणि जेवढं अंतर जास्त तेवढा त्यांचा दूर जाण्याचा वेग जास्त. थोडी गणिती भाषा वापरायची तर, दीर्घिकांच्या दूर जाण्याची गती त्यांच्या अंतराच्या प्रमाणात वाढते. पाढा म्हणावा तसं. फक्त हा पाढा नक्की कितीचा म्हणायचा तो आकडा म्हणजे हबल स्थिरांक, H0. हा हबल स्थिरांक, H0 शोधण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. या सगळ्या निरिक्षण-गणितातून असं दिसलं की विश्वात जेवढं वस्तूमान आहे, दृष्य आणि अदृष्य वस्तूमान वापरून विश्वाच्या प्रसरणाचा वेग काढला तर तो निरीक्षणातून दिसणार्‍या वेगाएवढा नाही. विश्वाचं वस्तूमान आहे त्यापेक्षा जास्त असलं पाहिजे; पण हे वस्तूमान गुरूत्वाकर्षण या 'यंत्रा'ला दिसत नाही. म्हणून हे वस्तूमान ऊर्जास्वरूपात असलं पाहिजे. (पुन्हा आठवा, आईनस्टाईनचं प्रसिद्ध समीकरण E=mc2.) हीच ती डार्क एनर्जी. विश्वाचं वय हबल स्थिरांक, डार्क मॅटर, डार्क एनर्जी यांच्यावर अवलंबून असणारी संख्या आहे.

'कोबे'मधे असलेल्या उपकरणांतून हबल स्थिरांक, डार्क मॅटर आणि डार्क एनर्जीची अचूक मोजमापं करणं शक्य नव्हतं. डब्ल्यूमॅप आणि आता प्लँकने ही मोजमापं दिलेली आहेत. ती अशी:

डब्ल्यूमॅप प्लँक
विश्वाचं वय (अब्ज वर्ष) १३.४ १३.८२
हबल स्थिरांक (km/Mpc·s) ७२ ६७.११
दृष्य वस्तूमानाचं प्रमाण ४.५% ४.९%
डार्क मॅटरचं प्रमाण २२.७ २६.८
डार्क एनर्जीचं प्रमाण ७२.८ ६८.३%

डब्ल्यूमॅपनंतर प्लँकच्या निरिक्षणांमधून आपल्या विश्वाबद्दल असणार्‍या माहितीत, समजुतीमधे खूप जास्त भर पडलेली नाही. अर्थात प्रत्यक्षात प्रयोग करून बघितल्याशिवाय हे समजणं अशक्य होतं. मुळात डब्ल्यूमॅपच्या घवघवीत यशानंतर प्लँकची आवश्यकता काय होती? प्लँकची मुख्य उद्दीष्ट काय होती?

  • वैश्विक तेजीच्या सिद्धांतासाठी पुरावे शोधणे - प्लँकच्या मोजमापांमधून तेजी कशामुळे सुरू झाली आणि त्यामुळे विश्वावर काय परिणाम झाले हे समजेल अशी अपेक्षा आहे.
  • तरूण विश्वातल्या गुरूत्वीय लहरींचा शोध घेणे - गेल्या काही वर्षात गुरूत्वीय लहरी असतील असं सिद्धांतांमधून सांगितलं गेलेलं असलं तरी प्रत्यक्षात या लहरी आपण अजूनपर्यंत 'बघू' शकलेलो नाही. प्लँकच्या विदेतून या प्रकारची माहिती मिळवता येईल.
  • लांब आणि काळात मागे डोकावून विश्वाची संरचना आणि गुणधर्म पहाणे.
  • विश्व एकजिनसी आहे का नाही हे तपासणे.
  • आपली आकाशगंगा आणि इतर दीर्घिकांचा तपशीलवार अभ्यास करून त्यांच्या चुंबकीय क्षेत्राचा नकाशा बनवणे.

यापैकी पहिलं उद्दिष्ट, वैश्विक तेजीचे पुरावे, ते प्लँकला मिळालेले नाहीत. प्लँक अजूनही आकाशात कार्यरत आहेच. आणि २०१४ मधे, पुढच्या वर्षी अजून माहिती आणि तिचं पृथ्थकरण समोर येईल तेव्हा इतर उद्दिष्टांमधे प्लँक किती सफल झाली हे समजेलच.

प्लँकला इतर काही नवीन गोष्टी सापडल्या आहेत.

१. कार्बन मोनॉक्साईडचे रेणू शोधून नवीन तारे कुठे तयार होत असतील याचा अंदाज घेतला जातो. विश्वात बहुतांश हायड्रोजन आणि हेलियम आहे आणि नगण्य प्रमाणात रेणू आहेत. त्या रेणूंपैकी कार्बन मोनॉक्साईडचे रेणू थंड वायूमेघांमधे सापडतात. या वायूमेघांमधे नवीन तार्‍यांची निर्मिती होते. प्लँकने सर्वप्रथम विश्वातल्या कार्बन मोनॉक्साईडचा नकाशा बनवला आहे. प्लँकच्या वाढीव संवेदनशीलता आणि भेदनक्षमतेमुळे आधी माहित नसणारे कार्बन मोनॉक्साईडचे मेघ आपल्याला सापडले आहेत.
२. पहिल्या लेखाच्या आपण पाहिलं की आपली दीर्घिका वरून (किंवा खालून) पाहिली तर पेटवलेल्या भुईचक्रासारखी दिसेल. दीर्घिकेच्या मध्यभागी मोठं केंद्र आहे आणि तिथे प्रचंड प्रमाणात तारे निर्मिती, मृत्यु होत आहे. दीर्घिकेच्या केंद्राच्या वर आणि खाली प्लँकला अपेक्षेपेक्षा अधिक प्रकाश सापडला आहे. याचं नक्की कारण अजून आपल्याला समजलेलं नाही.

हा प्लँकने बनवलेला आपल्या दीर्घिकेचा नकाशा. यात नकाशाच्या मध्यात दीर्घिकेतले तारे काढून टाकल्यामुळे मधला पट्टा रिकामा दिसतो आहे. केंद्राच्या वर आणि खाली अन्य पार्श्वभूमीपेक्षा जो अधिक प्रकाश दिसत आहे त्याचं कारण अजून आपल्याला नीटसं माहित नाही.

कृत्रिम उपग्रहाचं आयुष्य संपलं ते सगळे अवकाशामधेच असणार्‍या उपग्रहांच्या दफनभूमीत पाठवले जातात आणि तिथेच रहातात. प्लँकचंही अजून वर्षानंतर तेच होईल.

----

१. उपक्रमावरच्या आयडीचा इथे काहीही संबंध नाही. बहुदा नाही.
२. विस्तारभयास्तव ते इथे लिहीत नाही.

अवांतरः डार्क मॅटरसाठी "मराठी" शब्द वापरावा का? असल्यास तो अदृष्य वस्तूमान असा चालेल का? आणि डार्क एनर्जीसाठी अदृष्य ऊर्जा?

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

समजेल अशा भाषेत असल्याने तांत्रिक/शास्त्रीय माहिती असूनही वाचून होतय. हा भाग आता वाचला. मागचे भाग पुन्हा नीट पूर्ण वाचून सविस्तर प्रतिसाद देतो.
.
अवांतर :-
ह्या भागाशी तसा थेट संबंध नाही, पण डार्क मॅटर वगैरे शब्दांवरून आठवलं.अँटी मॅटर "निर्माण" करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं होतं ना? त्याचं पुढं काय झालं? अजूनही प्रायोगिक अवस्थेतच आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तूर्त केवळ पोच. नीट सावकाश वाचून मग प्रश्न विचारतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सोप्या शब्दात आहे तरीही परत एकदा वाचावा लागेल.
एक बेसीक प्रश्न: ही सगळी निरीक्षणं भुतकाळातली आहेत. कित्येक प्रकाशवर्ष दुरचा तारा/दिर्घीका 'आता' तशीच असेल असे नाही. मग या सगळ्या अभ्यासाचा 'आपल्याला' + 'आता' नक्की काय उपयोग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समारोप? विचारलं अशासाठी की, तो झाल्यानंतरच सलगतेनं एकत्र वाचायचं आहे. तेव्हाच कुठं माझ्या मेंदूत काही थोडं तरी शिरण्याची शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अँटी मॅटर "निर्माण" करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं होतं ना?

पॉझिट्रॉन हा प्रतिकण आपल्या सूर्यातही विपुल प्रमाणात निर्माण होतो. पण मॅटरच्या संपर्कात आला की तो टिकून राहू शकत नाही.

कित्येक प्रकाशवर्ष दुरचा तारा/दिर्घीका 'आता' तशीच असेल असे नाही. मग या सगळ्या अभ्यासाचा 'आपल्याला' + 'आता' नक्की काय उपयोग?

होय. कित्येक हजारो, लाखो, कोटी किंवा अब्ज दूर असणारे तारे आत्ता आपल्याला दिसत आहेत तसे नाहीत. पण त्यामुळे भूतकाळात डोकावून बघणं सोपं होतं. जेवढी लांब असणारी दीर्घिका आपण पहातो तेवढं आपल्याला दीर्घिका कशा तयार झाल्या याचा 'लाईव्ह शो' मिळतो.
'आपल्याला' काय उपयोग या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते: भौतिकशास्त्राचा विचार केला तर एवढी प्रचंड ऊर्जा, वेग, तापमान इत्यादींना होणार्‍या भौतिकी क्रियांचा अभ्यास करता येतो. भौतिकशास्त्रातल्या काही मूलभूत प्रक्रिया, कण यांचा शोध लागण्यासाठी अशा निरीक्षणांची मदत झाली आहे. उदा: चार हायड्रोजनचे अणू एकत्र आले की त्यातून एक हेलियमचा अणू तयार होतो आणि ऊर्जा तयार होते हे आपल्याला सूर्याच्या अभ्यासातून समजलं. न्यूट्रॉन या कणाचा शोध लागण्यापूर्वी असे कण असू शकतात हे तार्‍यांच्या अभ्यासातून दिसत होतं.
त्याशिवाय आपण कोण, कसे आलो, आपलं अस्तित्त्व कशामुळे, जगन्नियंता कोणी आहे का, हे आहे हे कसं आहे आणि असंच का आहे अशा प्रश्नांची (डोळे बंद करून शोधण्यापेक्षा) उघड्या डोळ्यांनी, आणि ते अपुरे पडल्यावर कोबे-प्लँकसारखी उपकरणं वापरून शोधण्याचा प्रयत्न असतो.

श्रावणः ही मालिका संपलेली आहे. त्यावर अधिक स्पष्टीकरण, प्रश्नोत्तरं, इतर काही सूचना असतील तर पुढचे भाग लिहीता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद, आता मी सवडीनं सावकाश वाचतो. मग प्रश्न, किंवा स्पष्टीकरणं. अर्थात, या दोन्ही गोष्टी मी विद्यार्थी या नात्यानेच. न समजलेल्या गोष्टींसाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमाला खूपच आवडली. हा भाग वाचताना एक शंका आली.

विश्वात ४% साधं वस्तूमान, तारे, वायूमेघ रूपात आहे आणि २४% वस्तूमान डार्क मॅटरचं आहे हे सांगितलं. चार आणि चोवीस मिळून फक्त २८% होतात. उरलेल्या ७२% चं काय? ही आहे डार्क एनर्जी.

ही टक्केवारी नक्की करताना विश्वाचा आकार किती आहे हे गृहीत कसे ठरवतात ? अनादि, अनंत असे त्याचे स्वरुप असेल तर त्याचे आकारमान माहित असल्याशिवाय अशी टक्केवारी कशी ठरवतात ?

दुसरी शंका अशी: कार्बन मोनॉक्साइडचे रेणू अवकाशांत कार्बन पासूनच झाले असतील ना ? ते व्हायला त्याला ऑक्सिजन कुठून मिळाला असेल ? आणि तसा मिळाला असेल तर त्याचा पुढे कार्बन डायॉक्साइड का झाला नाही ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कार्बन मोनॉक्साइडचे रेणू अवकाशांत कार्बन पासूनच झाले असतील ना ? ते व्हायला त्याला ऑक्सिजन कुठून मिळाला असेल ? आणि तसा मिळाला असेल तर त्याचा पुढे कार्बन डायॉक्साइड का झाला नाही ?

ही शंका माझ्याही मनात आली होती. माझ्या समजाप्रमाणे तार्‍यांमधे फक्त हायड्रोजन आणि हेलियम असतो. तर त्यांची निर्मिती कार्बन मोनॉक्साइडच्या ढगातून कशी होते?

आणखी एक फॅन्सिफुल प्रश्नः आपल्याला माहिती असलेले मूलद्र्व्य हे फक्त पृथ्वीवर सापडणारे किंवा प्रयोगशाळेत बनवलेले आहेत. विश्वात त्याहूनही अधिक मूलद्रव्य असू शकतात का? असल्यास त्यांच्यातून येणारे प्रारणं आपणं मोजू शकतो का? की त्यांनाच डार्क मॅटर म्हणायचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

हायड्रोजन, हेलियम आणि अगदी नगण्य प्रमाणात लिथियम (अणू क्र ३), बेरिलियम (अणू क्र ४) यांची निर्मिती विश्वात सुरूवातीलाच झाली. त्यापुढची सगळी जड मूलद्रव्य तार्‍यांमधे, एकतर हलक्या मूलद्रव्यांचं फ्यूजन होताना (चार हायड्रोजनचा एक हेलियम बनला) जी ऊर्जानिर्मिती होते त्यातून तयार झालेली आहे. किंवा तार्‍यांचा मरतेसमयी स्फोट होताना उत्सर्जित होणारी ऊर्जा शोषून ही मूलद्रव्य तयार झालेली आहेत. कार्बन आणि ऑक्सिजन ही दोन्ही मूलद्रव्य फ्यूजन प्रक्रियेतूनच तयार झालेली आहेत. त्यामुळे अगदी सुरूवातीच्या पिढीतल्या तार्‍यांमधे, त्या वेळच्या विश्वात ही द्रव्य सापडणार नाहीत. कार्बन आणि ऑक्सिजन असताना कार्बन मोनॉक्साईड का झाला, कार्बन डायॉक्साईड का बनला नाही याचं पृथ्वीवर जे आहे तेच कारण. पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नसणं.

कार्बन मोनॉक्साईडच्या ज्या फ्रिक्वेन्सीज बघितल्या जातात त्यातून किती प्रमाणात तारे निर्मिती होत असेल याचा अंदाज येतो. तार्‍यांमधे मुख्यतः हायड्रोजन आणि हेलियम यांचेच अणू असले तरीही अगदी कमी प्रमाणात अन्य मूलद्रव्य सापडतात. सूर्यासारखा एकटा तारा असणं हे ही तसं कमी प्रमाणातच दिसतं. तारे एकत्रितरित्या मोठ्यामोठ्या ढगांमधे तयार होतात, आणि कार्बन मोनॉक्साईडच्या ठराविक फ्रिक्वेन्सीजवरून त्या ढगाचं तापमान किती असेल याचा अंदाज येतो. त्यावरून त्या ढगांमधे तारे बनत असतील का, आणि एकंदरच तारे-निर्मितीचा वेग किती याचा अंदाज करता येतो. कार्बन मोनॉक्साईडमधून बाहेर पडणार्‍या ठराविक तरंगलांबीचे सिग्नल ही तारे निर्माण होत आहेत याचा एक इंडीकेटर आहेत.

विश्वात त्याहूनही अधिक मूलद्रव्य असू शकतात का? असल्यास त्यांच्यातून येणारे प्रारणं आपणं मोजू शकतो का? की त्यांनाच डार्क मॅटर म्हणायचं?

त्याहून अधिक मूलद्रव्य जरूर असू शकतात. पण डार्क मॅटरचं जेवढं वस्तूमान आहे, त्याचा ताळेबंद या मूलद्रव्यांमधून लावायचा म्हटला तर प्रचलित विश्वनिर्मितीचा सिद्धांत कोसळेल. याचं कारण सध्या आपण साधारण ३/४ हायड्रोजन, १/४ हेलियम आणि अगदी नगण्य प्रमाणात इतर सर्व मूलद्रव्य अशी विश्वातल्या बॅरिऑनची, ४.५% वस्तूमानाची विभागणी आहे असं मानतो. अणूक्रमांक ३ ते अणूक्रमांक ११८ पर्यंत नगण्य प्रमाणात मूलद्रव्य आणि अचानक पुढचे अणूक्रमांक असणारी मूलद्रव्य २८% कशी याचं स्पष्टीकरण प्रचलित सिद्धांताने देता येणं कठीण आहे.

ही टक्केवारी नक्की करताना विश्वाचा आकार किती आहे हे गृहीत कसे ठरवतात ? अनादि, अनंत असे त्याचे स्वरुप असेल तर त्याचे आकारमान माहित असल्याशिवाय अशी टक्केवारी कशी ठरवतात ?

विश्वाचा आकार सध्या १३.८ अब्ज प्रकाशवर्ष आहे असं मानतात, कारण विश्वाचं वय तेवढं आहे. खरंतर ही आपल्या निरीक्षणांची मर्यादा आहे; आपण प्रकाश हा सर्वात वेगवान 'ट्रेसर' बघून विश्व पहातो. विश्व जन्माला येऊन जेवढी वर्ष झाली असतील, तेवढी प्रकाशवर्ष ही आपल्या निरीक्षणांची मर्यादा. त्याच्या पलिकडे विश्व आहे का, असेल तर त्याला मर्यादा आहे का ते अनादि-अनंत आहे हे आपल्या निरीक्षणापलिकडचं आहे. त्यासंबंधात सिद्धांत जरूर मांडता येतो. सध्याच्या प्रचलित सिद्धांत हा १३.८ अब्ज प्रकाशवर्षाची मर्यादा सांगणारा आहे.
पण टक्केवारी सांगताना विश्वाच्या प्रसरणाचं त्वरण किती हे लक्षात घेऊन ही टक्केवारी काढली जाते. विश्वाचं 'वस्तूमान' जर दृष्य वस्तूमान आणि डार्क मॅटर एवढंच असेल तर आत्ता दिसतं आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक गतीने दीर्घिका आपल्यापासून लांब जातील. ते तसं दिसत नाही म्हणून अन्य काही ऊर्जा आहे असं समजतं. निरीक्षणातून मिळालेलं त्वरण आणि दृष्य वस्तूमान आणि डार्क मॅटर एवढंच असेल तर किती त्वरण असेल यांच्यातला फरक, टक्केवारीत डार्क एनर्जी या रूपात व्यक्त केला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान लेख. लेखमाला फार आवडली.

आणि सूर्यापासून लांब जावं तसा वर्षाचा कालावधी वाढत जातो. इथे वर्ष हा शब्द थोडा गडबडवणारा आहे. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारायला ग्रहाला लागणारा वेळ म्हणजे एक वर्ष.

इथे प्रत्येकासाठी वर्षाची व्याख्या करण्याऐवजी त्याला 'प्रदक्षिणाकाल' म्हटले तर गडबड कमी होईल असे वाटते. Smile

विश्वाचं 'वस्तूमान' जर दृष्य वस्तूमान आणि डार्क मॅटर एवढंच असेल तर आत्ता दिसतं आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक गतीने दीर्घिका आपल्यापासून लांब जातील. ते तसं दिसत नाही म्हणून अन्य काही ऊर्जा आहे असं समजतं.

कमी गतीने दूर जातील ना? डार्क एनर्जी ही विश्वाच्या त्वरणाला कारणीभूत आहे, जर ती नसेल तर दृश्य आणि अदृश्य वस्तुमानाच्या गुरुत्वाकर्षणामुळे प्रसरण होत असले तरी त्याचा वेग कमी व्हायला हवा ना?
.

अवांतर: 'मॅटर'साठी पदार्थ,द्रव्य आणि 'मास'साठी वस्तुमान (वस्तूमान नव्हे) असे शब्द वाचले आहेत. त्यामुळे सुरुवातीचा कृष्णपदार्थ गोंधळवणारा वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या दोन लेखांच्या मानाने हा लेख समजून घ्यायला किंचित अवघड झालेला आहे.

मात्र यातून कृष्णवस्तुमान दिसत नसलं तरी आहे याचा शोध कसा लागला याचं स्पष्टीकरण छान दिलेलं आहे. डब्ल्युमॅप आणि प्लॅंक यांच्याकडून मिळणाऱ्या उत्तरांमधला फरकही स्पष्ट होतो. प्लॅंकची उत्तरं अधिक अचूक आहेत असं गृहित धरतो. त्या दोन्हीतून मिळणारी उत्तरं साधारण सारखीच आहेत हेही दिसून येतं. म्हणजे प्लॅंकने मिळवलेल्या चित्रांतून काही क्रांतीकारक मिळालेलं नाही, असलेल्याच ज्ञानाचं चित्र अधिक स्पष्ट झालं इतकंच.

काही गोष्टी समजल्या नाहीत. उदाहरणार्थ कृष्णवस्तुमान 'दिसत नसलं तरी आहे' याचा युक्तिवाद पटतो - अशाच प्रकारच्या युक्तिवादाने काही ग्रह विशिष्ट ठिकाणी असावेत असा अंदाज मांडला जाऊन ते तिथे नीट बघितल्यावर सापडले होते. मात्र कृष्णोर्जा वस्तुमानासारखंच काम कसं करते, व तीसाठीही हाच युक्तिवाद कसा लागू होतो हे स्पष्ट झालेलं नाही. ती ऊर्जाच का, वस्तुमान का नाही हेही नीट कळलेलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या धाग्यातलं अवांतर, विषयाशी संबंधित धाग्यावर हललं आहे.

सोनवणींचा स्कीझोफ्रेनिया वा अडाणीपणा थोडासा मीही शेअर करतोय कि काय असे वाटतेय. पण त्यांनी जे लिहिलंय त्यात मला काही असुसूत्र वाटलं नाही. आता हा माझा विषय नाही, पण मला जे कळले ते लिहितो.

बिग बँग थेरी म्हणते अज्ञात आकाराचे, पण बहुधा माणसे ज्याला सुक्ष्म म्हणतील असे एक पार्टीकल अवकाशात कोठेतरी होते. ते फुटले आणि प्रसरण पावले तेव्हा त्याच्या आत बाहेरच्या अवकाशापासून वेगळी 'फाल्स स्पेस' निर्माण झाली.

सोनवणी म्हणतात कि असे कुठले पार्टीकल नव्हते. अशी एका स्थानापासून विश्वनिर्मिती झाली नाही. जगात सर्वत्र स्पेस (अवकाश) होती. जसे वस्तुमान आणि उर्जा यांचे परस्पर रुपांतरण होते तसेच अवकाश, वस्तुमान आणि उर्जा यांचे परस्पररुपांतर होते. अगदी विश्वाचे सर्वात पूर्वीचे रुप कल्पायचे असेल तर कोणतेही वस्तुमान वा उर्जा आत नसलेली पोकळी कल्पावी. आणि म्हणून १. प्रसरणासाठी अनंत अवकाश उपलब्ध आहे हे बिग बँग थेरीचे गृहितक चूक आहे. २. जग (वस्तुमान आणि उर्जा यांच्या रुपात पाहिले जाणारे)बनवण्यात अवकाश कामी आले नाही हे चूक आहे. ३. ज्ञानाच्या अभावाने No comments ४. काल काय आहे वा किती वेगाने जात आहे निष्कारण स्थानाशी जोडले आहे, म्हणून ब्लॅकहोलपाशी काळ थांबतो , मंदावतो अशी वाक्ये ऐकावयास मिळतात. बिग बँग थेरी, इ ने काळ जसा व्याख्यित केला आहे त्याप्रमाणे तो प्रत्येक क्लस्टरमधे वेगळा असेल, वेगळ्या गतीने वाहिल, ज्याचा फार अर्थ वाटत नाही. ५. फाल्स स्पेस जस्टीफाय करण्याकरिता बिग बँग वाले 'अवकाश ताणले जाऊ शकते' वैगेरे म्हणतात, पण असे नसावे.

मला यात काहीही राहूलगांधीय* वाटत नाही.

*Complete nonsense and trasheable

शिवाय सोनवणींचे इतके समर्थन केले आहे म्हणजे मला त्यांची महाराष्ट्र शब्दाची फोड मान्य आहे असे होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमच्या शंकांना उत्तरं देतेच, पण या धाग्यावर आधीच चिकार अवांतर केलं आहे. विश्वरचनेच्या धाग्यावर प्रतिसाद हलवून तिथे लिहीते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>बिग बँग थेरी म्हणते अज्ञात आकाराचे, पण बहुधा माणसे ज्याला सुक्ष्म म्हणतील असे एक पार्टीकल अवकाशात कोठेतरी होते.

हेच बरोबर नाही. पार्टिकल कुठल्या स्पेसमध्ये नव्हतेच. पार्टिकल फ़ुटले तेव्हाच स्पेसही निर्माण झाली. पार्टिकल फुटून तयार झालेल्या विश्वाच्या बाहेर अशी काही स्पेस नाही. (असली तर तिचा आपल्या विश्वाशी काहीही संबंध कधीही येणार नाही). स्पेस बिग बँगने निर्माण झाली आणि ती विश्व प्रसरण पावते आहे त्याबरोबरच प्रसरण पावते आहे. (ती स्पेस अनंत आहे असे म्हणणे अर्थहीन आहे).

वरील पॅराग्राफ हे बिग बँग हायपोथिसिस काय सांगते ते आहे. प्रत्यक्षात तसेच घडले की कसे ते अजून कन्फर्म कळलेले नाही. तसे घडले असेल तर आजच्या घडीला काय परिस्थिती असायला हवी याची भाकिते गणिताने करता येतात.

अशी केलेली भाकिते आजवर बहुतांशी निरीक्षणांशी जुळली आहेत म्हणून बिग बँग हायपोथिसिस टिकून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अधिक अवकाश विश्वप्रसरणातून निर्माण होत आहे. एका बिंदूतून अवकाशाची सुरूवात झाली, आणि प्रसरण होऊन गेल्या तेरा-चौदा अब्ज वर्षांत अवकाशाची पोकळी तेरा-चौदा अब्ज प्रकाशवर्ष एवढी प्रसरण पावली आहे. सोनवणींचा मुद्दा क्र १ तुम्हाला (अरूण जोशींना) नीट समजला आहे, पण त्यांनाच महास्फोटाच्या सिद्धांताचं आकलन झालेलं नसल्यामुळे त्यात हशील नाही. आपणच काहीतरी चुकीचं गृहीतक धरायचं आणि ते चूक आहे म्हणून महास्फोटाचा सिद्धांत चूक समजणं असा प्रकार आहे.

२-४ हे त्यांचे मुद्दे त्यांना समजले असतील तरी पावलं. त्यांचे गैरसमज इथे मांडायचे का, त्यांच्या तथाकथित आकलनाबद्दल तुमचे यात माझी फार गडबड होते आहे. त्यातून सोनवणी सापेक्ष काल वगैरे म्हणतात पण त्यांच्या स्वयंघोषित व्याख्या देत नाहीत. त्यातून मला फार बोध होत नाही. त्यांचा हा आक्षेप: "It is accepted in the big band theory that space can be stretched…they have given an example of a rubbery net upon which if a ball is placed and the net is stretched the distance grows though the ball is in same place. However the idea in itself unscientific as space cannot be stretched. Same time idea of balloon too is baseless." हे विधान म्हणजे पॉप्युलर लेव्हलची पुस्तकं वाचून आपल्याला सगळं समजलं असं समजण्याचा प्रकार आहे. अवकाश ताणलं जाऊ शकत नाही, असा दावा करताना त्याला काही पुरावा वगैरे देण्याचे कष्ट त्यांनी घेतलेले नाहीत. कोणात्यातरी, स्वयंघोषित बहुजनप्रिय असणार्‍याला, काहीतरी वाटलं म्हणून ते खरं ठरतं इतपत "सॉलिड बेस" असणारा तथाकथित शास्त्रीय सिद्धांत खोडण्याचे कष्ट घेण्याची माझी तयारी नाही.

सोनवणींचा अजून एक गैरसमज: अवकाश = वस्तूमान/पदार्थ. निर्वात पोकळी असण्यासाठीसुद्धा अवकाशाची आवश्यकता असते एवढी मूलभूत गोष्ट त्यांना समजलेली नाही. शोधायचे तर असे गैरसमज खोर्‍याने निघतील. पण हे रटाळ काम करायची माझी तयारी नाही.

अडाणीपणा असण्यात काहीही गैर नाही. अळंबींची मशागत आणि सशांची पैदास या विषयातलं मलाही (घंटा) काही माहित नाही. समजलेलं नसताना ब्रह्मज्ञान कळण्याचा आव आणणं हास्यास्पद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.