श्री. श्याम मानवांचे (आचरट) प्रश्न

श्री. श्याम मानवांचे (आचरट) प्रश्न

(http://shyammanav.blogspot.in/2012/12/blog-post_7.html)

1) फलज्योतिष हे शास्त्र आहे का?

-तुम्हाला शास्त्र म्हणायचे नसेल तर नका म्हणू. पण ज्योतिष एक विद्या मात्र नक्की आहे.

2) पूर्वी फलज्योतिष आणि खगोलशास्त्र एकत्र होते. ग्रीकांपासून, आर्यभट्टापासून ते गॅलिलिओ- कोपर्निकसपर्यंत अनेक सुप्रसिद्ध खगोलशास्त्री ज्योतिषीही होते, पण एकोणिसाव्या शतकात खगोलशास्त्र व फलज्योतिष वेगळे झाले, ते का?

-असंख्य कारणे असू शकतात . शाखा, उपशाखा निर्माण होणे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. संगणकशास्त्रापासून अनेक नव्या शाखा जन्माला आल्या - संगणक अभियांत्रिकी, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, कृत्रिम मेधा, मानव-यंत्र संवाद इत्यादि.

3) खगोलशास्त्र ही विज्ञानाची व वैज्ञानिक अभ्यासाची महत्त्वाची शाखा झाली. त्याचा अभ्यास जगभराच्या सगळय़ा विद्यापीठांमधून होता; परंतु फलज्योतिष मात्र चोथा समजून विज्ञानाने फेकून दिले. असे का?

-विज्ञान फक्त फलज्योतिषाला चोथा म्हणुन फेकून देत नाही तर मुख्य प्रवाहात नसलेल्या अनेक गोष्टीना चोथा मानते. मुख्यप्रवाहातील अस्तित्व अनेक बाबींवर अवलंबून असते - fashion, politics, funding etc. कृत्रिम मेधा (Artifitial Intelligence) या शाखेला अनेक जण अजूनही चोथा मानतात (ही शाखा निर्माण झाली तेव्हाही मानत होते). तरीही अनेकजण अनेक विद्यापीठातून या विषयाचा अभ्यास करतात. ज्योतिषाच्या नावाने बोंबाबोंब करणार्‍या एका जागतिक कीर्तीच्या खगोलशास्त्रज्ञाची थिअरी पण "चोथा" झाल्याचे ऐकून आहे. MD करताना सायकियाट्रीला जाणारे "मेडीसन सोडणारे" (म्हणजे अप्रत्यक्षपणे चोथा) म्हणून हिणवले जातात. आयायटीत आमच्या वेळेला theoryचे लोक experimentalistना "चोथा" म्हणून हिणवत असत. आय़टिच्या विश्वात coding करणारे testing/debugging करणार्‍याना "चोथा"च समजतात.

तात्पर्य "चोथा होणे" ही भावना सापेक्ष आहे.

4) जगभराच्या 186 वैज्ञानिकांनी, ज्यात 19 नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत, 'फलज्योतिष हे शास्त्र नाही. तो केवळ काही लोकांचा पोट भरण्याचा धंदा आहे. त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये,' असे पत्रक काढले व ते जगभर प्रसिद्ध केले. त्याबद्दल 'ज्योतिष अधिवेशनाचे' काय मत आहे?

-मी 'ज्योतिष अधिवेशनाचे' प्रतिनिधीत्व करत नसल्याने या प्रश्नाचे उत्तर देऊ इच्छित नाही.

5) आजचे फलज्योतिषी 9 (किंवा 12) ग्रह मानतात. त्यात राहू, केतू नावाचे ग्रहही मानतात. प्रत्यक्षात राहू-केतू अस्तित्वातच नाहीत. ते ग्रहही नाहीत. तरी ज्योतिषी मात्र आजही जनतेच्या कुंडल्यांमध्ये (होरोस्कोप) राहू-केतू फिरवतच असतात. ते का? कसे? अस्तित्वात नसलेल्या राहू-केतूंना स्थान देणार्‍या कुंडल्या किती विश्वसनीय असू शकतात? व त्या आधारावर उभ्या असणार्‍या फलज्योतिषात कितपत अर्थ असू शकतो?

- श्याम मानव आणि ते ज्या गटाचे प्रतिनिधीत्व करतात त्यांच्या अडाणीपणाचा निदर्शक असा हा प्रश्न आहे. "ग्रह" ही तांत्रिक संज्ञा आहे. ज्याप्रमाणे "धातु", "मल", "अग्नि" या आयुर्वेदातील तांत्रिक संज्ञा आहेत. पाणिनीच्या व्याकरणात युस्त्र्याख्यौ नदी (1.4.3) असे एक सूत्र आहे. तेथे ईकारान्त आणि ऊकारान्त स्त्रीलिंगी शब्दाना "नदी" अशी तांत्रिक संज्ञा आहे.

तसेच ज्या बिंदुंचे भ्रमणकाल आणि कक्षा निश्चित झाले आहेत ते सर्व ग्रह मानावेत असा ज्योतिषात संकेत आहे. राहु-केतु, चंद्र-सूर्य या संकेतानुसार ग्रहच ठरतात.

6) चंद्र-सूर्याला ग्रह म्हणून आजही स्थान दिले जाते. चंद्र हा उपग्रह आहे, हे खगोलशास्त्राच्या ज्ञानामुळे पाचव्या वर्गातल्या मुलालाही ज्ञात असते. तरी सुशिक्षित विद्वान ज्योतिषीही चंद्राला ग्रह म्हणूनच कुंडलीत स्थान देतात. अशा अवस्थेत विद्वान ज्योतिष्यांपेक्षा पाचव्या वर्गातल्या मुलांनाही अधिक ज्ञान असते, असे का मानू नये?

- वर दिलेल्या प्र.क्र. ५च्या उत्तरात याचा खुलासा व्हावा अशी अपेक्षा करतो.

7) सूर्य हाही ग्रह म्हणूनच कुंडलीत मांडला जातो व आजही ज्योतिषी पृथ्वीभोवतीच (कुंडलीत) सूर्याला फिरवत असतात. सूर्य हा तारा आहे. तो ग्रह नाही व पृथ्वी इतर ग्रहांसोबत सूर्याभोवती फिरते हे शाळकरी मुलांना जसे शिकवले जाते तसेच ज्योतिष्यांना शिकवावे, प्रसंगी त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढाव्यात, अशी विनंती आम्ही सरकारला करावी काय?

- कुणी सरकारला कसली विनंती करावी हा ज्याच्या त्याच्या विवेकाचा, उपलब्ध वेळाचा आणि रिसोर्सेसचा प्रश्न आहे. पण याच न्यायाने आयुर्वेदातील संज्ञा, व्याकरणातील संज्ञा पण बदलण्याचा आग्रह धरावा. फक्त ज्योतिषाला बडवणे हे आकसाचे आहे.

Dirol पृथ्वी हा ग्रह आहे. त्याचा पत्रिकेत ग्रह म्हणून का समावेश नाही?

- Heliocentric astrology या नावाने एक ज्योतिषाची शाखा आहे. त्यानुसार ज्या पत्रिका तयार होतात त्यात पृथ्वी हा ग्रह दाखवला जातो. यात पत्रिकेतील निरीक्षक सूर्यस्थित असतो. ही शाखा मूलत: जागतिक पातळीवर घडणार्‍या मोठ्या घटनांशी संबंधित ग्रहयोगांचा अभ्यास करते.

9) ग्रहाचा मानवी जीवन प्रवाहावर परिणाम होतो असे फलज्योतिषी सांगतात व त्यावरच त्यांचे शास्त्र अवलंबून आहे. याला वैज्ञानिक आधार काय? एकाच स्थळी व एकाच ठिकाणी राहणार्‍या माणसांवर एकाच ग्रहाचे, ते केवळ वेगवेगळ्या वेळी जन्मले म्हणून वेगवेगळे परिणाम कसे होतील?

- मानवी भाषा व्यवहार हा जटिल प्रक्रियेतून निर्माण होतो. निरीक्षण, अनुभव, श्रद्धा आणि त्यांचे वर्णन करायला वापरली जाणारी भाषा एकमेकांवर सतत प्रभाव पाडतात. मला कोकणात एके ठिकाणी उंच हा शब्द खोल या अर्थाने वापरला जात असल्याचे आढळले. "भयंकर सुंदर" हा अलिकडचा एक प्रयोग. अशी अनेक उदा देता येईल.

आधुनिक ज्योतिषी ग्रहांचे मानवी जीवनावर परिणाम अजिबात मानत नाहीत तर ते ग्रहांनी तयार केलेल्या भौमितिक रचनांची मानवी जीवनातल्या अवस्थांशी सांगड घालून अनिश्चितते आणि अपरिहार्यते विषयी मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतात.

10) सगळे ग्रह व सूर्य यांची भ्रमणकक्षा व काळ निश्चित आहे. पुढील पाच हजार वा पाच लाख वर्षानंतर तो निश्चित ठरावीकच असणार आहे. याचाच अर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याचे भविष्य तो जन्मत:च ठरलेले असते. असे असतानाही अनेक ज्योतिषी ग्रहदशा बदलण्याचे व ग्रहांचे अरिष्ट टाळण्यासाठी अनेक पूजा, ताईत, खडे वगैरे उपाय सांगतात व ठरलेले आयुष्य बदलवता येते असेही सांगतात. ते कसे? ग्रहांची दिशा, स्थान व भ्रमण निश्चित असूनही या उपायांनी माणसांचे भविष्य बदलतेच कसे? हे सगळे उपाय म्हणजे सामान्य लोकांना लुबाडण्याची ज्योतिष्यांची एक क्लृप्ती नव्हे काय? मुळात माणसांचं आयुष्य ठरलेलं असतं हे सांगणंच लबाडी नव्हे काय?

- आपल्यामध्ये असलेले जनुक जसे आजुबाजुच्या परिस्थितीनुसार सक्रिय किंवा निष्क्रिय होतात. त्याप्रमाणेच आजुबाजुच्या परिस्थितीनुसार ग्रहयोगांनी सूचविलेल्या शक्यता व्यक्त होतात किंवा अव्यक्त राहतात. उपायांनी समस्येपासून काही काळ लांब राहता येते. आशा टिकून राहायला मदत होते. काही लोक लुबाडण्यासाठी हे वापरतात म्हणून उपाय करणे चूक ठरत नाही. कोणताही शहाणा ज्योतिषी "आयुष्य ठरलेलं असतं " असे सांगणार नाही. आयुष्यातील अनिश्चितता आणि अपरिहार्यता आपण कशी हाताळतो यावर ते अवलंबून असते.

11) माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो का? ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल काय? पण जर जन्म ठरलाच असेल तर मनुष्य स्वत: निर्णय घेऊन आजच्या काळात भारतीय कायद्याच्या परवानगीने कृत्रिम गर्भपात करतो व जन्माला येणार्‍या नव्या मनुष्याचे अख्खे आयुष्यच थांबवतो, हे कसे? ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का?

माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो का?

-जन्म होणं हा योगायोगाचा भाग आहे. पण प्रत्येक जीवित व्यक्ती कधी ना कधी मरणार हे मात्र नक्की आहे.

ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल काय?

-जीवन चालू झाल्यावर फलज्योतिषाला आधार निर्माण होतो (माझी भूमिका याच प्रश्नोत्तरात इतरत्र स्पष्ट केलेली आहे). कारण अनिश्चितता आणि अपरिहार्यता हाताळायची क्षमता प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने समान बहाल केली आहे, असे दिसत नाही.

ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का?

-हा प्रश्न मला खोडसाळ आणि आचरट वाटतो.

12) मृत्यू ठरलेला असतो का?

-सध्या तरी प्रत्येक जीवाचा मृत्यू ठरलेला आहे पण मृत्युची तिथी मात्र ठरलेली नाही.

अ) तो जर ठरलेला असेल तर, 1930 साली भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य केवळ 18 वर्षे होते. आता ते 68 वर्षापेक्षा अधिक झाले आहे. हे अधिकचे सरासरी आयुष्य भारतीयांच्या वाटय़ाला कुठून आले? याचे उत्तर फलज्योतिष्यांना पत्रिकांमध्ये दाखवता येईल का?

-पत्रिकांमध्ये कशाकशाची उत्तरे ज्योतिषानी शोधावित अशी श्री मानव यांची अपेक्षा आहे. मूळात पत्रिका ही एक मानवी जीवनातील सूचित अवस्थांची एक प्रतिकृती आहे. प्रत्येक प्रतिकृती सर्व प्रश्नांचे उत्तर देते का? घराची पुठ्ठ्याची प्रतिकृती घराचे आयुष्य किती या प्रश्नाचे उत्तर देईल का?

आ) मृत्यू ठरलेला असतो असे मानणारे ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात? ते डॉक्टरांची मदत का घेतात? जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच होणार असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन स्वत:चा व स्वत:च्या नातेवाईकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करून पैसा फुकट घालविणे मूर्खपणाचे नव्हे का?

- ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात?

--मृत्यु ही शक्यता पत्रिका दाखवत असेल तरीही जीवन स्वीकारायचे की मृत्यु हा पण प्रत्येक शुद्धीवर असलेल्या व्यक्तीचा प्रश्न आहे. आणि बेशुद्ध व्यक्तीच्या पत्रिकेत मृत्यु ही शक्यता असेल तर जगवायचे की मरू द्यायचे हा आप्तांचा (आणि कदाचित उपचार करणार्‍या डॉक्टरांचा प्रश्न). पुढे रस्ता बंद आहे असा कुणी सल्ला दिला तर तो न मानता तसंच पुढे जायच की मागे फिरून दुसरा रस्ता पकडायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सल्ला मिळाला म्हणून तो मानलाच पाहिजे असं कुठे लिहीले आहे?

इ) एकाच अपघातात ज्यावेळी शेकडो लोक मरतात त्या वेळी त्या सगळ्यांचा मृत्युयोग असतो काय? नागासाकी-हिरोशिमा अणुस्फोट व सगळ्याच मोठय़ा अपघातांबद्दल काय? तसा पुरावा पत्रिका तपासून देता येईल काय?

या प्रश्नांची उत्तरे मी सध्या तरी देऊ शकणार नाही कारण मी त्यासाठी आवश्यक असणारा अभ्यास मी केलेला नाही. मात्र लग्नाच्या वर्‍हाडांना होणारे अपघात आणि त्यात मरण पावणार्‍या व्यक्तींच्या पत्रिका तपासून काही अंदाज निश्चित बांधता येतील. आपली संघटना अशा अभ्यास-प्रकल्पाला मदत मिळवून देईल का?

13) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या पंचवीस वर्षापासून ज्योतिष्यांना सारखी आव्हाने देत आहे, तरी ज्योतिषी ती आव्हाने स्वीकारून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तोंड एकदाचे बंद का करीत नाही?

उत्तर - अशा आह्वानतून कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही किंवा निघत नाही. एक ज्योतिषी जिंकला किंवा हरला हे ज्योतिष(शास्त्रा/विद्ये) बद्दल कोणतीही विधाने करण्यास करण्यास पुरेसे नाही. आह्वाने देणारे ज्योतिषाच्या मर्यादांमध्ये त्यांचे आह्वान तयार करत नाहीत, हे कशाच द्योतक? प्रत्येक ज्योतिषी जे दावे करतात त्या दाव्याच्या अनुरोधानेच आह्वान देण्यात यायला हवं. हे दावे प्रत्येक ज्योतिषी जे तंत्र वापरतो त्या तंत्रानुसार बदलु शकतात. हाडाची ऑपरेशन्स करणार्‍या डॉक्टरला आपण हृदयाची शस्त्रक्रिया करायचा चॅलेंज कधी देतो का?

ज्योतिष टाकून द्यायचे असेल तर वेगवेगळ्या पातळ्यांवर संशोधनकरून मग ते टाकून द्यायला हवे. त्यासाठी विज्ञानात जसे aggressively संशोधन होते तसे संशोधन ज्योतिषात व्हायला हवे. त्यासाठी मुळात ज्योतिषातील नियम जास्त चिकित्सक पद्धतीने तयार केले जायला हवेत. असे सुसंशोधित नियम वापरून मगच आह्वाने स्वीकारायचा विचार करता येईल. मुळात ज्योतिषातील नियम हे व्याकरणाच्या/भाषेच्या नियमांप्रमाणे प्रवाही असतात. नियम बनविण्यासाठी कोणतीही साधने हाताशी नसलेले ज्योतिषी जुने ग्रंथ, प्रसिद्ध ज्योतिषांची निरीक्षणे/मते आधार म्हणून वापरतात. काही ज्योतिषी स्वत:ची निरीक्षणे नियम बनविण्यासाठी वापरतात. यामुळे अचूक भविष्य वर्तविण्याला आपसूकच मर्यादा पडतात.

14) दोनदा 20-20 पत्रिकांच्या आधारे, माणूस मेलेला आहे की जिवंत आहे व स्त्री की पुरुष आहे हे सांगा. दोन्ही वेळेस उत्तरे 90 टक्क्यांपेक्षा अधिक 95 टक्के अचूक निघायला हवीत. तर 15 लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल किंवा मानवी जीवनातील, तपासून शहानिशा करता येतील अशा कोणत्याही पाच घटना (लग्न, मूल, नोकरी, शिक्षण, अपघात, बढती वगैरे) वीस पत्रिकांच्या आधारे सांगाव्यात. त्या 90 टक्के खर्‍या ठराव्यात. दोनदा वीस-वीस पत्रिकांची भाकिते 90 टक्के अचूक निघावीत. 15 लाख मिळतील; पण 70 टक्के जरी खरी निघाली (दोनदा 20-20) तरी ते शास्त्र असू शकते असे आम्ही मानू, अशी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन नागपूर समितीने पुणे, धुळे, अमरावती या चारही अ. भा. ज्योतिष अधिवेशनात जाहीर आव्हाने दिली होती. ती आव्हाने स्वीकारून आपली बाजू सत्य असल्याचे ज्योतिष महामंडळ का सिद्ध करू शकले नाही? याचा अर्थ, फलज्योतिषशास्त्र नाही असाच घ्यायचा का? 15) कोणताही महत्त्वाचा ज्योतिषी वा ज्योतिष महामंडळ, या आव्हानानंतर पुढे आले नाही; पण श्री. एम. कटककर नावाचे ज्योतिषी मात्र आव्हान स्वीकारण्याची एक बालिश भाषा घेऊन पुढे आले होते. ते म्हणाले होते, मी माणसांची स्वभाववैशिष्टय़े सांगतो. त्या वेळी अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे आव्हान एका अटीवर स्वीकारण्याचे मान्य केले. कटककरांसोबत पाचव्या वर्गातील, फलज्योतिषाचे कुठलेही ज्ञान नसलेली कुठलीही 10 मुले बसवू. त्या दहा मुलांना पत्रिका न पाहताच अंदाजे स्वभाववैशिष्टय़े सांगावीत व श्री. कटककर महाशयांनी पत्रिका पाहून स्वभाववैशिष्टय़े सांगावीत. एका जरी शाळकरी मुलाने कटककरांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले, तर मात्र कटककरांनी त्या मुलाची व जनतेची जाहीर माफी मागावी व धंदा बंद करावा. त्या वेळी या प्रतिआव्हानातून एम. कटककरांनी चक्क पळ काढला. तरी असा पळपुटा ज्योतिषी, ज्योतिष महामंडळाच्याच नव्हे, तर अधिवेशनाच्या स्टेजवरही दिमाखाने मिरवतो आहे, हे ज्योतिष्यांना व अधिवेशनाला कितपत भूषणावह आहे? या प्रश्नांची उत्तरं ज्योतिष्यांनी जाहीररीत्या द्यावीत. पण ज्योतिषी या प्रश्नांची उत्तरं न देता ज्योतिष्यावरची टीका म्हणजे हिंदू धर्मावरचा हल्ला अशी ओरड करतात. मग स्वातंर्त्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद हिंदू नव्हते का?

--पत्रिका कुणी आणि कधी बघावी याबद्दल माझी भूमिका अशी आहे - २० वर्षांपर्यंत आणि सत्तरीनंतर (काही अपवाद वगळता) पत्रिका बघू नये असे माझे स्पष्ट मत आहे. याची कारणे अशी-

विशीपर्यंत व्यक्तीची स्वयंनिर्णयाची क्षमता पूर्णपणे विकास पावलेली नसते. सहसा आईवडिलांवर मुले अवलंबून असतात. सत्तरीनंतर तब्येत ठणठणीत नसेल तर हळुहळु परावलंबित्व यायला सुरुवात होते. अनेक इच्छाना मुरड घालावी लागते. मनमुरादपणे वानप्रस्थाश्रमाचा काल व्यतीत करणे सर्वच ज्येष्ठाना शक्य असते नाही. थोडक्यात या परावलंबीत्वामुळे एकंदरच संधी आणि निर्णय यावर मर्यादा असतात/यायला लागतात.

सांगायचे तात्पर्य असे की २० ते ७० या मधल्या काळात, सर्वसाधारणपणे स्वयंनिर्णयाचा हक्क बजावू शकणारी व्यक्तीच वेगवेगळ्या शक्यता/संधीना विवेकाने प्रतिसाद देऊ शकते. हे परावलंबी व्यक्तींच्या बाबतीत होऊ शकत नाही. पत्रिका ही केवळ शक्यता दाखवत असल्याने बंदिस्त आयुष्य जगणार्‍या व्यक्तींच्या आयुष्यात या शक्यता प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत.

बाकी पत्रिकेतील प्रत्येक ग्रहयोग/रचना एक घटना कधिच दाखवत नाहीत. प्रत्येक ग्रहयोग/रचना, ज्या core issue कडे निर्देश असतो त्या core issue चा घटनापट (event spectrum), सूचित करते. त्यामुळे पत्रिकेने निर्देशीत केलेला core issue संदर्भाशिवाय उलगडता येत नाही. त्यामुळे "माणूस मेलेला आहे की जिवंत आहे व स्त्री की पुरुष आहे हे सांगा" इ. प्रश्न/आह्वाने मुदलातच आचरट ठरतात.

तरी असा पळपुटा ज्योतिषी, ज्योतिष महामंडळाच्याच नव्हे, तर अधिवेशनाच्या स्टेजवरही दिमाखाने मिरवतो आहे, हे ज्योतिष्यांना व अधिवेशनाला कितपत भूषणावह आहे?

--ज्योतिषाच्या नावाने बोंबाबोंब करणार्‍या एका जागतिक कीर्तीच्या खगोलशास्त्रज्ञाची थिअरी पण "चोथा" झाल्याचे ऐकून आहे. त्यांच्या थिअरीचा गाजावाजा झाल्यामुळे मिळालेले सन्मान ते त्यांची theory चोथा झाली म्हणुन परत करतील का?.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (4 votes)

असो. चालु द्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असेच म्हणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अगदी हेच!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

हा शुद्ध आचरटपणा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्न की उत्तरं हा वादाचा मुद्दा होऊ शकतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे

ज्योतिषाच्या पुरस्कर्त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्हाला शास्त्र म्हणायचे नसेल तर नका म्हणू. पण ज्योतिष एक विद्या मात्र नक्की आहे.

हॅहॅहॅ ! आता या ज्योतिषाच काय करायच?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कारण अनिश्चितता आणि अपरिहार्यता हाताळायची क्षमता प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने समान बहाल केली आहे, असे दिसत नाही.

खर आहे! या बाबतीत मात्र आम्ही सहमत आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

खर आहे! या बाबतीत मात्र आम्ही सहमत आहोत.

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपले आणी नारळीकरांचे नक्की काय वाकडे आहे? हा संदर्भ आपल्या लिखाणात याआधीही वाचला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्याला त्याला आपलं दुकान चालायची काळजी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हीदेखील भारतातल्या जुन्या ज्ञानाची भलामण करण्याचं कार्य करून या माणसाप्रमाणेच आयायटीचं नाव उज्ज्वल करत आहात हे पाहून बरं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतातल्या जुन्या ज्ञानाची भलामण करण्याचं कार्य

ज्योतिष ही फकत भारताची मक्तेदारी आहे असे वाटते का तुम्हाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्योतिष ही फकत भारताची मक्तेदारी आहे असे वाटते का तुम्हाला?

कैच्याकै बोलणारे अन्य देशातले एवढे ठळकपणे मलातरी दिसून येत नाहीत. अमेरिकेतले ठराविक कंझर्व्हेटीव्ह हा अपवाद.

एक-दोन वाक्यात उत्तरं होती तोपर्यंत वाचलं. पुढे बोर झालं.

बाकी नारळीकरांचा विश्वास असणारा स्थिरस्थिती सिद्धांत बहुतांश शास्त्रज्ञांनी मागे टाकलेला असला तरी त्या सिद्धांतावर विज्ञानद्वेष्टा असण्याचे आक्षेप कोणीही घेत नाही. या शास्त्रज्ञांचा ज्या महास्फोटाच्या सिद्धांतावर विश्वास आहे तो सिद्धांतही फुलप्रूफ नाहीत; त्यातही बरीच भोकं आहेत जी अजून बुजवता आलेली नाहीत. याच नारळीकरांनी विज्ञान, विशेषतः खगोलशास्त्र, शास्त्रीय भूमिका, दृष्टीकोन मराठी, सुशिक्षित घरांमधे नेलेलं आहे हे सोयीस्करपणे टाळलेलं आहे का माहितच नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझ्या आचरट विधानाबद्दल क्षमस्व. "भारतातल्या जुन्या ज्ञानाची भलामण" च्या जागी "कुठल्यातरी जुनाट पारंपारिक, असिद्ध, तथाकथित शास्त्राची भलामण" असं वाचावं. मात्र तुमचं कौतुक करण्याची भावना अस्सल आहे, ती त्यामुळे बदलत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश घासकडवी,

मात्र तुमचं कौतुक करण्याची भावना अस्सल आहे, ती त्यामुळे बदलत नाही.

ROFL!

पण तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. मी आयायटीत जाईन असं भाकीत तेव्हा मुंबई-आयायटीत अभ्यागत प्राध्यापक असलेल्या एका सद्गृहस्थांनी माझ्या पत्रिकेवर सहा तास खल करून केले होते. ते स्वतः उत्तम ज्योतिषी होते आणि सर्जन पुरंदरे त्यांना ज्योतिषातले गुरु मानत. याच प्राध्यापक सद्गृहस्थांनी केलेले एक भाकीत मी माझ्या एका आयायटीतल्याच दुस-या प्रा.ना दाखवले तेव्हा ते त्यांच्या मुलांच्या पत्रिका दाखवायला या ज्योतिषी प्राध्यापकांकडे गेले होते.

सांगायचा मुद्दा एव्हढाच की आयायटीत ज्योतिषाला तुम्ही समजता तेव्हढं हीन समजत नाहीत.

आणखी एक - नेहरू तारांगणाचे तेव्हाचे संचालक डॉ. वेंकटाचलम यांनी ज्योतिषाची केलेली भलावण सायन्स टुडे या प्रसिद्ध नियतकालिकाने छापल्याचे स्मरते. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी एक मोठेठे पारितोषिक देणारी एक व्यक्ती माझ्याबरोबर स्वतःच्या पत्रिकेची चर्चा करत असे. असो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मी आयायटीत जाईन असं भाकीत तेव्हा मुंबई-आयायटीत अभ्यागत प्राध्यापक असलेल्या एका सद्गृहस्थांनी माझ्या पत्रिकेवर सहा तास खल करून केले होते. ते स्वतः उत्तम ज्योतिषी होते आणि सर्जन पुरंदरे त्यांना ज्योतिषातले गुरु मानत. याच प्राध्यापक सद्गृहस्थांनी केलेले एक भाकीत मी माझ्या एका आयायटीतल्याच दुस-या प्रा.ना दाखवले तेव्हा ते त्यांच्या मुलांच्या पत्रिका दाखवायला या ज्योतिषी प्राध्यापकांकडे गेले होते.

सांगायचा मुद्दा एव्हढाच की आयायटीत ज्योतिषाला तुम्ही समजता तेव्हढं हीन समजत नाहीत. <<

सांगायचा मुद्दा असा की आयआय्टीतल्या प्रत्येकाला अक्कल असते हा एक मोठा गैरसमज आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सांगायचा मुद्दा असा की आयआय्टीतल्या प्रत्येकाला अक्कल असतेच हा एक मोठा गैरसमज आहे.

हे पहा, अशी सर्वसाधारण विधानं करून जनतेला बिथरवण्याचा तुम्ही जो प्रयत्न चालवलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे. विशेषतः मराठी संस्थळांवर अशी आयाय्टीयनांची छी-थू अजिबात चालवली जाणार नाही. आजमितीला चालू असलेल्या किमान तीन मराठी संस्थळांचे मालक आयाय्टीयन आहेत हे लक्षात ठेवा. त्यांनीच उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठांवर त्यांच्यावरच टीका करण्याची तुमची हिंमतच कशी होते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>आजमितीला चालू असलेल्या किमान तीन मराठी संस्थळांचे मालक आयाय्टीयन आहेत हे लक्षात ठेवा. त्यांनीच उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठांवर त्यांच्यावरच टीका करण्याची तुमची हिंमतच कशी होते?<<

संस्थळाचे मालक ठाण्याकडून आले असतील तरच आम्ही त्यांची अक्कल काढत नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रतिसादांमुळे चर्चा वाढते आहे. हा विषय इतका महत्वाचा आणि तथ्यपूर्ण वगैरे बहुतांश प्रतिसादकांना वाटतो असे दिसते.
@तर्कतीर्थ :- ते मागे मिसळपाव ह्या संकेतस्थळावर जाहीर च्यालेंज घ्यायचे चालले होते पत्रिका-भविष्यकथन वगैरेबद्दल. त्याचं पुढं काय झालं म्हणे? शाम मानव तुमच्या म्हणण्याप्रमाणे समजा ड्यांबिस/डामरट वगैरे असतील तरी इतर जालिय च्यालेंजाचे काय झाले म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आह्वानांबद्दल माझी भूमिका वर मूळ प्रश्नोत्तरात स्पष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> मात्र लग्नाच्या वर्‍हाडांना होणारे अपघात आणि त्यात मरण पावणार्‍या
> व्यक्तींच्या पत्रिका तपासून काही अंदाज निश्चित बांधता येतील. आपली
> संघटना अशा अभ्यास-प्रकल्पाला मदत मिळवून देईल का?

किती पैसे लागतील?

माझे अंजाजपत्रक येणेप्रमाणे (एका वर्षाचा अभ्यासप्रकल्प)
-------
(अ) कुठले ग्रह कुठल्या स्थितीत असले तर अपघाताची शक्यता अधिक? अशी यादी ज्योतिषाने तयार करणे : ८ तास (१ दिवस)

(आ) विश्लेषणाकरिता योग्य अशी (रिकामी) एक्सेल चौकट तयार करणे : संख्याशास्त्र्याचे काम : २ तास.

(इ) दररोजची ग्रहस्थिती सांगणारी संकेतस्थळे मोफत आहेत. एका वर्षाकरिता प्रत्येक दिवसाकरिताची ग्रहस्थिती एक्सेलमध्ये ते घालता येईल. वेब-प्रोग्रॅमरचा वेळ : ८ तास (एक दिवस). वाटल्यास हे आधी करून मग ही एक्सेल ज्योतिषाकडे देता येईल. प्रत्येक दिवसाच्या शेजारी "अपघात शक्यता +" किंवा "-" असे चिन्ह ज्योतिषी टंकू शकेल. (वेळेच्या खर्चाचा हिशोब वर दिला तोच.)

(ई) दररोज अमुक इतकी ठराविक प्रादेशिक वृत्तपत्रे वाचून एका एक्सेल फाईलमध्ये "अमुक संख्या अपघात , तमुक संख्या मृत्यू, ढमुक गाव/जिल्हा" अशी नोंद करणारा व्यक्ती लागेल. दिवसाला १ तासापेक्षा कमी वेळ लागेल. एका वर्षाची साधनसामग्री पुरेल का? म्हणजे कुण्या विद्यार्थ्याला ~४०० तासाकरिता काम. दर आठवड्याला नोंदींचा फेरतपास (आकड्यांची नोंद तपासणे - पूर्ण वर्तमानपत्र चाळणे नव्हे) - आठवड्याला १ तास, कुण्या विद्यार्थ्याला ~५२ तासांचे वेतन. एकूण ~४६० तास वेतन.

(उ) यादीत दिलेल्या ग्रहस्थितींच्या दिवशी अधिक अपघात होतात की नाही त्याची तालिका बनवणे, रँडमनेसचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करणे. संख्याशास्त्र्याचे काम : २ तास.
----
हे अंदाजपत्रक ठीक असेल, तर कितपत पैसे लागतील?

अर्थात, अनुदानाचा अपव्यय होत नाही ना? काम खरोखर होतेच आहे ना, की पैसे लंपास होत आहेत? त्याचा लेखा ठेवणे आवश्यक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खर तर यातून काही एक निष्पन्न होणार नाही पण एक डॉक्युमेंटेशन होईल. आपण डॉक्युमेंटेशन मधे कमी पडतो हे मान्य आहे. ज्योतिषी अशा प्रकारच्या संशोधन प्रकल्पाला तयार होणार नाहीत. हा संशोधन प्रकल्प सस्थात्मक पातळीवरच होऊ शकतो.
http://mr.upakram.org/node/854 प्रश्न क्र ६२) परदेशातील फलज्योतिष संशोधनावरची उदाहरणे नेहमी उगाळली जातात मग आपल्याकडे या विषयावर संशोधन का केले जात नाही?
यात त्याचे विवेचन आहेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मी श्री धनंजय यांच्या प्रतिसादाला माझे उत्तर तयार करत आहे. थोडा वेळ लागत आहे त्याबद्दल क्षमस्व...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मान्य. पूर्व-भाकित-अभ्यासाकरिता भाकिते पुरवणारा ज्योतिषी-तज्ज्ञ कमकुवत असला, तर सर्व खर्च वाया जाईल.

भाकिते पडताळण्यालायक आहेत अशी हमी देणारी पुरेशी मोठी संस्था हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री. धनंजय,

तुमच्या सकारात्मक प्रतिसादाने मी अत्यंत आनंदीत झालो आहे. तुम्ही एक पाऊल पुढे आल्यामुळे मला दोन पावले पुढे यायचा उत्साह आला आहे.

सध्या "केवळ सोयीसाठी" मी संख्याशास्त्रातील अडाणी आणि तुम्ही ज्योतिषातील अडाणी अशी भूमिका घेऊन आपण दिशा/सत्य शोधायचा प्रयत्न करू या.

मुळात श्री श्याम मानव यांचा मुद्दा असा आहे की, "एकाच अपघातात ज्यावेळी शेकडो लोक मरतात त्या वेळी त्या सगळ्यांचा मृत्युयोग असतो काय?". या प्रश्नावर मी दिलेले उत्तर असे, "या प्रश्नांची उत्तरे मी सध्या तरी देऊ शकणार नाही कारण मी त्यासाठी आवश्यक असणारा अभ्यास मी केलेला नाही. मात्र लग्नाच्या वर्‍हाडांना होणारे अपघात आणि त्यात मरण पावणार्‍या व्यक्तींच्या पत्रिका तपासून काही अंदाज निश्चित बांधता येतील. आपली संघटना अशा अभ्यास-प्रकल्पाला मदत मिळवून देईल का?"

आता "लग्नाच्या वर्‍हाडांना" होणारे अपघात सूचविण्यामागची भूमिका अशी की अशा अपघातात मरण पावणार्‍या व्यक्तींचा जन्मविदा गोळा करणे तूलनेने कमी त्रासदायक आहे.

श्री धनंजय यांच्या प्रस्तावातील विधानाप्रमाणे " यादीत दिलेल्या ग्रहस्थितींच्या दिवशी अधिक अपघात होतात की नाही त्याची तालिका बनवणे"

माझ्या मते श्री मानव ("सगळ्यांचा मृत्युयोग") आणि श्री धनंजय ("यादीत दिलेल्या ग्रहस्थितींच्या दिवशी अधिक अपघात") यांचे प्रस्ताव अत्यंत भिन्न आहेत. हे श्री. धनंजय यांना मान्य असेल तर श्री धनंजय यांच्या प्रस्तावाचा विचार करू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पश्चाद्-विश्लेषण वि. पूर्वविश्लेषण यांच्यात फरक आहे खास.

तुम्ही सुचवलेला अभ्यास पश्चाद्-विश्लेषणात्मक आहे. मृत्यू पावलेल्या लोकांच्या पत्रिका तपासणे. या प्रकारच्या विश्लेषणाकरिता सार्वजनिक मृत्यू न-पावलेल्या वर्‍हाडांच्या पत्रिका तपासणे, हा ताळा आहे. पश्चाद्-विश्लेषणेसुद्धा ज्ञानवर्धक असू शकतात, परंतु त्यांच्या बाबतीत पश्चाद्बुद्धीची शंका येत राहू शकते.

मी सुचवलेला अभ्यास पूर्व-भाकिताचा आहे. पूर्वभाकितांच्या अभ्यासात पश्चाद्बुद्धीची शंका घेता येत नाही.

म्हणून दोन्ही अभ्यासप्रस्ताव वेगवेगळे आहेत.
----

त्यांच्या हायपोथेसिस वेगळ्या आहेत, ही बाबसुद्धा आहेच.
तुम्ही सुचवलेल्या अभ्यासात हायपोथेसिस आहे, की "मृत्यूयोग निकट असलेले अनेक लोक एकत्र प्रवास करू लागल्यास अपघात होण्याची संभवनीयता अधिक आहे."
मी सुचवलेल्या अभ्यासात हायपोथेसिस आहे की "काही दिवशी ग्रहस्थिती अशी असते, की अनेक लोकांचे एकत्र मृत्यू होण्याची संभवनीयता अधिक असते."
(वरील दोन्ही हायपोथेसिसकरिता पूर्व-भाकित-विश्लेषण आणि पश्चाद्-विश्लेषण अभ्यास शक्य आहेत. हा मुद्दा वरच्या मुद्द्यापेक्षा वेगळा आहे.)

आता लोक अविरत जन्मतच असतात आणि वेगवेगळ्या काँबिनेशनांमध्ये समूह बनून प्रवास करीत असतात, असे असल्यास वरील दोन्ही हायपोथेसिस एकाच निष्कर्षाकडे पोचतील - आकडेवारी मोठी असल्यास.

---
असो. सुचवलेले अभ्यास वेगवेगळे आहेत, हे मान्य. त्यांचे निष्कर्ष समसमान होण्याइतपत मोठ्या संख्येची आकडेवारी उपलब्ध आहे की नाही ते मी ठरवू शकत नाही. (मृत्युयोगांची सरासरी संभवनीयता काळानुसार किती हे ठाऊक असल्यास समूहांच्या एकत्र-मृत्युयोगाची संभवनीयता मला काढता येईल, आणि किती मोठी आकडेवारी लागेल, ते सांगता येईल.)

श्याम मानवांच्या प्रस्तावातील हिरोशिमा/नागासकी उदाहरणे मग अधिक सुस्पष्ट होतात. हिरोशिमा शहर बर्‍यापैकी मोठे असल्यामुळे साधारण दर ताशी-दोन ताशी एकतरी जन्म होतच असणार. आता २३ जानेवारी १९२३ रोजी सकाळी ८-१० वाजता जन्मलेल्या मुलाचे/मुलीचे नाव "यामामोतो" आहे की "ताकेशी" आहे, हे ठाऊक असणे आवश्यक नाही. हिरोशिमा शहराचा अक्षांश-रेखांश घ्यावा, आणि अणुस्फोटाच्या वेळी २०-७० वय असलेल्या काळाच्या सर्व पत्रिका गणिताने करून घ्याव्या - कारण त्या पत्रिका असलेले कोणी-ना-कोणी हिरोशिमा शहरात होते. आणि त्या सर्व पत्रिकांमध्ये अणुबाँबदिनी मृत्यूयोग होता काय बघता येईल. लग्नाचे वर्‍हाड आणि हिरोशिमा यांच्यात हा संख्यात्मक फरक आहे. हिरोशिमा शहरात दर-दिवशीचा जन्म असलेले कोणी-ना-कोणीतरी मेले असे म्हणण्याइतकी मोठी मृत्युसंख्या होती, म्हणून दोन्ही हायपोथेसिसचे निष्कर्ष समसमान होतात.

हिरोशिमा अभ्यासाचा (खर्चाच्या दृष्टीने) फायदा असा, की तारीख/अक्षांश/रेखांश देऊन पत्रिका बनवणारे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे.

परंतु वर श्री. घाटपांडे यांनी सुचवलेला अडथळा आहेच. "मृत्यूयोग म्हणजे काय" याबाबत ज्योतिषा-ज्योतिषांमध्ये प्रचंड मतभेद असल्यास होरोशिमा अक्षांश-रेखांशाच्या सर्व पत्रिकांमध्ये ६ ऑगस्ट १९४५ रोजी मृत्युयोग होता की नाही याबाबत काहीच निष्कर्ष मिळणार नाही. पत्रिकेत मृत्युयोग कसा ओळखायचा, याबाबत हमी देणारी पुरेशी मोठी संस्था हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या चर्चेत नाक खुपसतो आहे त्याबद्दल क्षमस्व. माझा मुद्दा लहानसा आहे.

तुम्ही सुचवलेला अभ्यास पश्चाद्-विश्लेषणात्मक आहे. मृत्यू पावलेल्या लोकांच्या पत्रिका तपासणे. या प्रकारच्या विश्लेषणाकरिता सार्वजनिक मृत्यू न-पावलेल्या वर्‍हाडांच्या पत्रिका तपासणे, हा ताळा आहे. पश्चाद्-विश्लेषणेसुद्धा ज्ञानवर्धक असू शकतात, परंतु त्यांच्या बाबतीत पश्चाद्बुद्धीची शंका येत राहू शकते.
मी सुचवलेला अभ्यास पूर्व-भाकिताचा आहे. पूर्वभाकितांच्या अभ्यासात पश्चाद्बुद्धीची शंका घेता येत नाही.

इन जण्रल, संख्याशास्त्रात पश्चाद्विश्लेषण करून मग मॉडेल्स बनतात, आणि नवनवीन विदाबिंदू मिळतील तसतसे त्यांच्यासाठी ती मॉडेल्स वापरून भाकिते केली जातात. तस्मात, पहिल्यांदा पश्चाद्विश्लेषण केल्यास त्याचा वापर नंतरच्या पूर्वभाकितासाठी करता येऊ शकेलच, नाही का?

(हे अवांतर वाटल्यास क्षमस्व).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमचे म्हणणे काहीसे बरोबर आहे.* पण या धाग्यात काहीसे नि:संदर्भ आहे.**

पश्चाद्-विश्लेषणातून आदली हायपोथेसिस-मॉडेले तपासता येतात, आणि नवीन हायपोथेसिस-मॉडेले बनवताही येतात.
तसेच पूर्व-विश्लेषणाच्या प्रकल्पातून दोन्ही प्रकार करता येतात. आदली हायपोथेसिस-मॉडेले तपासता येतात, आणि नवीन हायपोथेसिस-मॉडेले बनवताही येतात.

(नवीन मॉडेल विरुद्ध आदले मॉडेल exploratory data fitting vs hypothesis testing) ही द्विविधा वेगळी
आणि
(पूर्वघटिताचे पश्चाद्-विश्लेषण विरुद्ध भविष्यातील घटनांचे विश्लेषण करायचा पूर्वसंकल्प retrospective vs. prospective study design) ही द्विविधा वेगळी.
चारही प्रकार होऊ शकतात :
retrospective exploratory data fitting
retrospective hypothesis testing
prospective exploratory data fitting
prospective hypothesis testing

येथे नवीन भाकित-शास्त्र तयार करायचे आहे, की सध्या शिकवल्या जाणार्‍या शास्त्राची भाकिते कितपत तंतोतंत आहेत, ते तपासायचे आहे; यावर अभ्यास-चौकट अवलंबून राहील. तळटिपेतल्या स्पष्टीकरणात बघावे, तर नवीन भाकित-शास्त्र तयार करायचे नाही, तर काहीतरी मॉडेल सध्याच उपलब्ध आहे.

भविष्यात भाकिते करायची असतील, तर अंतिम सिद्धतेकरिता prospective hypothesis testing आवश्यक आहे. त्यापूर्वीची अर्ध-सिद्धता म्हणून retrospective hypothesis testing सुद्धा चालेल.

----

*काहीसे बरोबर असे का म्हटले? ज्या बाबतीत काहीच ठाऊक नाही, त्या बाबतीत भूतकाळातल्या साधनसामग्रीचे विश्लेषण करण्यावेगळा पर्यायच नसतो. कारण भविष्यात कुठल्या निरीक्षणांची नोंद करायची त्याबाबत काहीएक कल्पना नसते, तर "निरीक्षणांची नोंद करूया" असा संकल्पही करता येत नाही. म्हणजे "ब्लँक स्लेट" ज्ञानाच्या स्थितीत भूतकाळाचे पश्चाद्-विश्लेषण हे सुरुवातीला करावे लागते, आणि भाकिते करून भविष्यात तपासायचे विश्लेषण नंतरच करावे लागते. (तुमचे "इन जण्रल" म्हणणे खरे आहे.)

**काहीसे नि:संदर्भ असे का म्हटले? ज्योतिष म्हणजे ब्लँक-स्लेट आहे अशी चौकट वरील प्रश्नोत्तरी-लेखात मांडलेली नाही. बरेचसे मॉडेल-बिल्डिंग आधीच झालेले आहे, असे प्रश्नोत्तरीतून जाणवते.
उदाहरणार्थ :

आधुनिक ज्योतिषी ग्रहांचे मानवी जीवनावर परिणाम अजिबात मानत नाहीत तर ते ग्रहांनी तयार केलेल्या भौमितिक रचनांची मानवी जीवनातल्या अवस्थांशी सांगड घालून अनिश्चितते आणि अपरिहार्यते विषयी मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतात.

हे मार्गदर्शन आहे, म्हणजे दाखवण्यालायक मार्ग आधुनिक ज्योतिषांच्या अनुसार काही मार्ग = मॉडेल आहे. काही मानवी अवस्था ग्रहांच्या भौमितिक रचनांशी अपरिहार्यतेने निगडित आहेत, अशा प्रकारची मॉडेले आहेत. कितपत अनिश्चितता आहे, त्याविषयी मॉडेले आहेत. त्यामुळे हा संदर्भ "इन जण्रल" exploratory data fittingचा नाही. त्यामुळे इन जण्रल सत्यसुद्धा या चर्चेत काहीसे नि:संदर्भ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे विधान धाग्यात काहीसे/बरेच नि:संदर्भ असण्याबद्दल सहमत आहे.

ज्योतिषाची व्हॅलिडिटी तपासणे हा हायपोथेसिस टेस्टिंगचा प्रॉब्लेम आहे हे तुमच्या प्रतिसादावरून ध्वनित होते. हे मान्यच.

ज्योतिषाभ्यासकांना बेनिफिट ऑफ डौट द्यावा म्हणून मी तो मुद्दा उपस्थित केला होता इतकेच. म्हणजे त्यांना योग्य वाटते तशा पद्धतीने त्यांनी एकदाचे काय ते मॉडेल बनवले की मग हायपोथेसिस टेस्टिंग करायला बाकीचे मोकळे. सद्यःस्थितीतली मॉडेल्स काही बाबतींत तितकी रिगरस नाहीत असे तर्कतीर्थ यांचे म्हणणे असल्याचे वाटले म्हणून मी म्हणालो, बाकी काही नाही. बाकी मग सहमतच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं


"पत्रिकेत मृत्युयोग कसा ओळखायचा, याबाबत हमी देणारी पुरेशी मोठी संस्था हवी."

याबाबत महत्त्वाचा खुलासा -
१. मी कोणत्याही ज्योतिष संस्थेशी संबंधित नसून माझी या तपासणीसाठी संस्थात्मक अंतर्भाव करण्यासाठी हरकत नाही. संशोधननिधीच्या खर्चाची जबाबदारी संस्थात्मक पातळीवर घेतली जावी, हे मला पूर्ण मान्य आहे.

२.पूर्वविश्लेषणावर माझा आक्षेप एव्हढ्यासाठी आहे की, त्यामुळे फक्त ज्योतिषी सध्या वापरत असलेले मृत्युयोगाचे नियम कदाचित टाकाऊ ठरतील.

मी मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे, पश्चाद्-विश्लेषणात सापडलेले सुसंशोधित नियम वापरून भाकीते करणे हे ज्योतिष टाकाऊ आहे की नाही ठरवायला जास्त मदत करेल असे वाटते. त्यासाठी संस्थेच्या अभिप्रायाची गरज असू नये वाटते.

माझा हा मुद्दा धनंजय यांना मान्य असेल तर चर्चा पुढे नेता येईल...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१२ राशींवर आधारलेल्या ज्योतिषाचा अभिमान बाळगण्याअगोदर ते भारतीय आहे किंवा नाही याची तपासणी करावी अशा विचाराने पुस्तके चाळू लागलो. पण तेच्यायला ते तर सालं ग्रीक निघालं!!!! लैच १२चं आहे झालं Wink त्यामुळे असल्या यावनी गोष्टीचा अभिमान कसला बाळगायचा, धिक्कार असो त्याचा!!! डौन विथ स्यूडोसायन्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हणूनच इथल्या बर्‍याच मंडळीना ते ग्रीक असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शक्यता नाकारता येत नाही. आणि जे जे ग्रीक ते ते चिक या न्यायाने काही लोकांनी त्याला उचलूनही धरले असण्याची शक्यता आहे. पण अशी ही मूले कुठारः जाते हे पाहून सुरुवातीला तरी आमचे डोळे भस्कन पाणावल्या गेले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'चीकाचा' चिक काढलात, कुठवर: जाते म्हणजे ग्रीकांपर्यंत जाते हे पाहून आम्हाला पण गहिवरुन आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ज्योतिष्यांना कोणतेही प्रश्न विचारणे हा आचरटपणा आहे याच्याशी सहमत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'भारतीय फलज्योतिष्यांच्या अभ्यासकांना संशोधनप्रकल्पात रस नसतो' हे विधान सिद्ध करण्यासाठी काय प्रकारचा विदा गोळा करावा लागेल? त्यासाठी अंदाजे किती खर्च येईल? हे सिद्ध करण्यात या विधानाच्याच सत्यासत्येचा अडथळा येऊ शकेल काय? (उदाहरणार्थ, असा विदा गोळा करण्यासाठी जर ज्योतिषी मंडळींना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांच्या रस घेण्या न घेण्याने विदा गोळा करण्याच्या प्रक्रियेवरच परिणाम होईल) हा परिणामच त्या विधानाची सत्यासत्यता सिद्ध करण्यासाठी वापरता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0