डुक्कर आणि कोंबडी
प्रकल्प व्यवस्थापनामध्ये एक मजेशीर concept आहे. ही concept मला रोचक तशीच अचूक वाटते म्हणून येथे देत आहे तसेच काही लोकांना ही माहीती नवीन असण्याची शक्यता आहे म्हणूनदेखील येथे देत आहे.
कोणत्याही प्रकल्पामध्ये बरेच team members असतात. पैकी प्रत्येकाचा सहभाग तसेच commitment ची पातळी ही निरनिराळी असण्याची शक्यता असते. ही commitment पातळी २ प्रकारात मोडते - डुक्कर आणि कोंबडी. ते कसे हे खालील गोष्टीवरून लक्षात येईल.
एका शेतकर्याकडे, त्याच्या मळ्यावर एक डुक्कर व एक कोंबडी होती. या दोघांनाही आपल्या मालकबद्दल अतोनात प्रेम आणि आदर होता. दोघांच्याही मनात मालकासाठी काहीतरी चांगले करावे अशी इच्छा होती.
एकदा कोंबडी डुकराकडे आली व म्हणाली - "मला एक सुरेख कल्पना सुचली आहे. तू जर ती मान्य केलीस तर मालकाकरता आपण काहीतरी मस्त करू शकू." डुकराने पृच्छा केली "काय?" तेव्हा कोंबडी म्हणाली - "मालकाला नाश्त आवडतो पण बिचार्याकरता वेळ नसतो तेव्हा आपण दोघांनी मिळून उद्या त्याच्याकरता नाश्ता बनवायचा का?" डुकराला ही कल्पना रुचली. तेम्हणाले "जरूर. काय बनवू यात बरे?" कोंबडी म्हणाली - "हे बघ मी नाश्त्याकरता अंडी देऊ शकेन. तू ham देशील का? बघ बुवा आपण मस्त ham- अंड्यांचा नाश्ता मालकाला देऊ"
यावर विचार करून डुक्कर म्हणाले - "नाश्त्यामध्ये तुझा फक्त सहभाग आहे. माझे तर सर्वस्व पणाला लागते आहे."
प्रकल्प व्यवस्थापनामध्ये देखील काही लोक हे डुकरासारखे संपूर्ण committed असतात. प्रकल्प चालणे अथवा न चालणे हे त्यांच्या करता तारक अथवा मारक ठरते तर दुसर्या प्रकारचे म्हणजे कोंबडी प्रकारचे लोक हे committed नसतात तर त्यांचा फक्त प्रकल्पामध्ये सहभाग असतो.
स्त्रोत - http://en.wikipedia.org/wiki/The_Chicken_and_the_Pig
प्रतिक्रिया
पाहुणा कलाकार
कोंबडा होणे सर्वात चांगले.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
अहो!
ते पर्फॉर्मन्स इव्हॅल्युएशन की काय असतं ना? त्यावेळेला कोंबड्याला सुद्धा अंडे देऊन दाखवावे लागते
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
एग्झ्याक्टली! हेच टंकायला
एग्झ्याक्टली! हेच टंकायला आलो होतो.
-अनामिक
ते पर्फॉर्मन्स इव्हॅल्युएशन
ते पर्फॉर्मन्स इव्हॅल्युएशन की काय असतं ना? त्यावेळेला कोंबड्याला सुद्धा अंडे देऊन दाखवावे लागते
..आणि प्रसंगी डुकरालाही..
ओ गवि अन्ना,
ते गुगळयांना कोंबडं बनलेलं जास्त चांगलं वाटत होतं. त्यांना भिती दाखवत होतो की अंडं देऊन दाखवावं लागेल
त्यांनी कुठे म्हटली की मला डुक्कर बनून अंडी घालायची आहेत अस? :x
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
ह्य ह्य.. मी अप्रेजलच्या
ह्य ह्य.. मी अप्रेजलच्या जोकवर जोक केलेला हो फक्त.. आधीच्याशी संबंध नाही..
आसंव्हय!
बरं बरं
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
तसं तर प्रत्येक प्रोजेकट मधे
तसं तर प्रत्येक प्रोजेकट मधे कोणीतरी पुर्णपणे कमिटेड असतं..असावंच लागतं तर काहींचा नुसताच सहभाग किंवा वर्हाड मधली नणंद जशी नुसती या खोलीतुन त्या खोलीत करत हिंडते तसे असतात.
तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेली सगळी माहीती शेअर करता याबद्द्ल कौतुक वाटते.
http://shilpasview.blogspot.com
पण
पण डुकराला घाबरण्याचं काय कारण? त्याने एखाद्या 'कलीग' डुकराचा बळी घेऊन हॅम बनवायचं! नाहीतरी हल्लीच्या व्यवस्थापनात कोणीही कोणाचाही बळी देतो.
किंवा अशी जीवघेणी सूचना केल्याबद्दल चिकन लॉलीपॉप व अंड्याचा नाश्ता बनवायचा. हाय काय आन नाय काय१