साई -

सोन्याचा मुकुट
हिऱ्यांचा हार
सोन्याच्या पादुका
रत्नजडित सिंहासन
सोन्याचे मखर
सर्वांच्या डोळ्यांत ठसले -

त्या
सोनेरी धामधुमीपासून
दूर - - - -
कोपऱ्यातल्या
एका गरीबाच्या
मिटलेल्या डोळ्यांतून
ओघळणारे ... मोती ...
फक्त साईलाच दिसले ;

आणि
(सोन्यापेक्षा सामान्यांवर
माया जडलेले -)
साई
उदासपणे स्वत:शीच हसले !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बरी वाटली. भावनेला हात घालणारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भावना पोचल्या. बरे वाटले .
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0