"गर्भपाताचे समर्थन" या विषयावरची कविता

"गर्भपाताचे (अ‍ॅबॉर्शन) समर्थन" या विषयावर वाचलेली ही पहीली कविता. इतक्या गंभीर विषयावर काव्यात्म टिप्पणी करणारी "द सब्बाथ ऑफ म्युच्युअल रिस्पेक्ट" ही मार्ज पियर्सी या कवयित्रीची कविता वाचनात आली. "द मून इज ऑलवेज फिमेल" या पुस्तकातील बर्‍याच कविता आवडल्या. गर्भपाताचे समर्थन करणारी ही जास्त रोखठोक असल्याने समजली.

या कवितेची सुरुवातच पूर्वजांच्या पुण्यस्मरणाने होते.

In the natural year come two thanksgivings,
the harvest of summer and the harvest of fall,
two times when we eat and drink and remember our dead
under the golden basin of the moon of plenty.

थँक्स्-गिव्हींगच्या दिवशी दिसून येणार्‍या सुगीच्या विपुलतेचे चित्रण पहील्या काही कडव्यात आढळते. कवयित्री पर्याय निवडीचे स्वातंत्र्य अगदी साध्या प्रसंगातून दाखविते. खाद्यपदार्थांची रेलचेल आहे व अनेक पौष्टिक पदार्थांतून आपण स्वतःला रुचणारे पदार्थ निवडतो.

The blowing grasses nourish us, wheat
and corn and rye, millet and rice, oat
and barley and buckwheat, all the servicable
grasses of the pasture that the cow grazes,
the lamb, the horse, the goat; the grasses
that quicken into meat and cheese and milk,
the humble necessary mute vegetable bees,
the armies of the grasses waving their
golden banners of ripe seed.

विपुलताच आपल्याला निवडीचे पर्याय देते व आपण किती सहजतेने ते निवडतो. हॅबॉन्डिया ही समृद्धीची देवता. तिच्या कारकत्वाखाली पर्यायनिवडीचे स्वातंत्र्यदेखील येते.
पुढे कवयित्री हेच लहानसे स्वातंत्र्य विस्तारुन आयुष्यातील अतिमहत्त्वाचे व आयुष्याला कलाटणी देणारे निर्णय यांची तुलना करते, ते निर्णय सहजतेने घेण्याचे स्वातंत्र्य यावर टिप्पणी करते. उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला विवाहामधून मूल जन्माला घालावेसे वाटेल तर कोणा स्त्रीला तिच्या "लेस्बियन" जोडीदाराबरोबर, मूल दत्तक घ्यायला आवडेल, तर अन्य कोणा स्त्रीला एकटेपण आवडेल. आपण निवडलेल्या पर्यायाहून अन्य कोणी दुसरा पर्याय निवडला तर त्याचा मान राखण्याचे भान ही कविता देते, तसा मान राखावा असे आवाहन करते.

In another
life, dear sister, I too would bear six fat
children. In another life, my sister, I too
would love another woman and raise one child
together as if that pushed from both our wombs.
In another life, sister, I too would dwell
solitary and splendid as a lighthouse on the rocks
or be born to mate for life like the faithful goose.
Praise all our choices. Praise any woman
who chooses, and make safe her choice.

मूल हवे असताना होऊ न देणे जितके यातनामय आहे तितकेच नको असलेले मूल प्रसविणे व वाढविणे त्रासदायक आहे ही जाणीव कवितेत बोलून दाखविलेली आहे.

To bear children unwanted
is to be used like a public sewer.
To be sterilized unchosen is to have
your heart cut out.

अनेक देवता - हॅबॉन्डिया, आर्टेमिस, दिती, इनाना, शिन मू इतकेच काय आपल्या पणजा, खापरपणजा यांनी त्यांचे जीवन, आराम सर्व त्यागून नवीन वाटा चोखाळल्या, आपल्याकरता नवीन वाटा बनविल्या. त्यांनी खंबीरपणे आपल्याला सोपविलेला इतिहास, वारसहक्क, जाणीवा, नवे हक्क व कर्तव्ये यांचा परीपाक म्हणजे आयुष्यविषयक निर्णय सहजतेने घेता येणे. आणि ते स्वातंत्र्य ही आपली(स्त्रियांची) खरी समृद्धी अशा आशयाची ही कविता आहे.

Praise our choices, sisters, for each doorway
open to us was taken by squads of fighting
women who paid years of trouble and struggle,
who paid their wombs, their sleep, their lives
that we might walk through these gates upright.
Doorways are sacred to women for we
are the doorways of life and we must choose
what comes in and what goes out. Freedom
is our real abundance.

मला या कवितेत काय आवडले तर - स्त्रीस्वातंत्र्याबद्दलचे मार्जचे विचार, गर्भपाताबद्दलचा तिने घेतलेली भूमिका व आवाहन याची काव्यमय अभिव्यक्ती आवडली. या विषयावर कळलेली ही पहीलीच कविता.

कविता येथे सापडेल.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

या कवितेत गर्भपाताचे समर्थन असे स्पेसिफिकली कोठे आढळले नाही. अन्यथा, स्त्रीस्वातंत्र्याबद्दलचे विचार या व्यापक निकषावर प्रस्तुत कविता आपल्या जागी ठीकच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शक्य आहे. या कवितेची समीक्षा (अनॅलिसीस) शोधला असता मला एक
दुवा सापडला. नंतर मग त्या 'गर्भपातास समर्थन" या दृष्टीकोनातून कविता मला जास्त समजली. पण अर्थात तसे कुठे सरळसरळ म्हटलेले आढळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण निवडलेल्या पर्यायाहून अन्य कोणी दुसरा पर्याय निवडला तर त्याचा मान राखण्याचे भान ही कविता देते, तसा मान राखावा असे आवाहन करते

असे भान समाजात असण्याची फार मोठी गरज आहे असे वाटते.

कविता ठिकठाक वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खरं आहे. मार्जची ही कविता ठीकठाकच आहे.

मार्जची आपण वाईन व्हायचं की व्हिनेगर हे आपण ठरवायचं अशा आशयाची दुसरी एक सुंदर कविता ऑफीसातून घरी गेल्यावर याच धाग्यावर देईन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचनीय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

http://exceptindreams.livejournal.com/91327.html
.
स्त्री म्हणजे काही पेरुचे वा आंब्याचे झाड नाही जे यांत्रिकपणे, तुम्हाला वर्षानुवर्षे त्याच्या पोटची फळे देत राहील. आंब्याच्या झाडाला, निसर्गाला जितकं समजतं तितकं माणसाला समजत नाही. आंब्याचं झाड एका वर्षी आंब्याने लगडतं तर दुसर्‍या वर्षी त्याला आंबे लागत नाहीत. ते विश्रांती घेतं, स्वतःची वाढ होऊ देतं. स्त्री ही काही तंदुरी रोटी भाजायची शेगडी वाटली का तुम्हाला की झाली इच्छा लावल्या रोट्या शेगडीमध्ये. शेकुन घेतल्या पानावरती. निर्बुद्ध कोंबडीच्या पिसांखाली, बदकांची अंडी सारता तुम्ही, मेंढी गुबगुबीत करुन तिचं मांस खाता, पर्वतचे पर्वत कापता का तर रस्ते काढायचे असतात, कोळशाच्या खाणी काढण्यासाठी, पठारे उध्वस्त करता. पाणी विषारी करता, मासे मारता. त्या माशांची तुम्हाला तोवर दया येत नाही जोवर की तुमच्या भूकेला मासे कमी पडत नाहीत. निसर्गावर बलात्कार करताच पण तुमची मग्रूरी, निर्बुद्ध हव्यास इथवर पोचला आहे की स्त्रीच्याही शरीरावरती तुम्ही हक्क गाजवु पहाताय. माणसांची शेती करणारी सुपिक भूमीच नाही का स्त्री?
.
तुम्हाला काय वाटतं या अनौरस, अवांछित मुलांची तुम्हाला भारी काळजी आहे, त्यांचे आक्रोश तुम्हाला अस्वस्थ करतात, त्यांची भूक तुम्हाला पाहवत नाही म्हणून तुम्ही त्यांना तुमच्यातली भाकरी देता? कशी आबळ होते अवांछित संततीची ते टेक्सासला जाऊन पहा. एक अर्धवट वैद्यकीय ज्ञान असलेली , अडाणी दाई एका अविवाहीत बाईचा गर्भ पाडते आहे. गरम पाणी व दाभणीने ते तुम्हाला कसं दिसत नाही? डाऊन द लेन, ५ दिवसात ती बाई धनुर्वात होऊन मरणार आहे का तर डॉक्टर तिला मदत करणार नाहीत. इथे डॉक्टर गर्भपात करत नाहीत. कायद्याने बंदी आहे. आणि ती बाई मेल्यावर तिच्या पोटचा ३ वर्षाचा गोळा, तिची मुलगी रडणार आहे, आक्रोशणार आहे पण तिला फॉस्टर केअरमध्ये भिरकावण्यात येणार आहे, पुढे तिचे काय होइल ते होईल.
एक जोडपं तर नको असलेल्या पोटच्या मुलाला सुया टोचतय, हाल हाल करतय का तर म्हणे शिस्त लावायचीये त्याला. पण मूळ कारण हे आहे की ते मूल नको असताना झालय. उद्या ते मूल मरेल तेव्हा पोलिसांना हेच जोडपं सांगेल, तो नालायक, दुष्ट मुलगा होता, त्याला शिस्त लावण्याकरता आम्ही योग्य तेच करत होतो.
.
अरे आपल्यापैकी प्रत्येकजणच कोण्या आईच्या रक्तामांसावर पोसून जन्माला आलाय. एखाद्या रोपट्याला सूर्यप्रकाश जितका आवश्यक असतो तितकी प्रेमाची आपल्याला आवश्यकता असते. अशी अवांछित, प्रेमास पोरकी माणसं पुढे काय भविष्य आहे त्यांचं. फक्त रागराग, अंगाची लाही, वेदना? त्यांच्या वेदनेतच तुमचा भविष्यकाळ ध्वस्त करण्याची बीजे रोवलेली तुम्हाला दिसत नाहीत का? मग बॉम्ब बनवणे, मशीदी-मंदीरे-चर्च पाडणे, हत्या करणे हेच या मुलांचे भविष्य व पर्यायाने तुमचा विनाश. एवढीही अक्कल तुम्हाला नाही.
.
नाही हे होता कामा नये. मी एक स्त्री, माझ्या कुशीत कोणत बी रुजेल यावर माझा हक्क आहे. तो हक्क ना राजकारणी ना धर्मगुरु हिसकाऊन घेऊ इच्छितात. माझ्या हाडामांसावर, माझ्या गर्भाशयावर काय हक्क आहे त्यांचा. माझे गर्भाशय मालमत्ता आहे का जिचे वाटेकरी राजकारणी, धर्मगुरु, पुरोहीत, पोप आहेत? कोणते मूल वाढवायचे, कसे वाढवायचे हा माझा विकल्प, माझा पर्याय आहे, असला पाहीजे. My life is a non-negotiable demand.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निर्बुद्ध कोंबडीच्या पिसांखाली, बदकांची अंडी सारता तुम्ही, मेंढी गुबगुबीत करुन तिचं मांस खाता, पर्वतचे पर्वत कापता का तर रस्ते काढायचे असतात, कोळशाच्या खाणी काढण्यासाठी, पठारे उध्वस्त करता. पाणी विषारी करता, मासे मारता. त्या माशांची तुम्हाला तोवर दया येत नाही जोवर की तुमच्या भूकेला मासे कमी पडत नाहीत. निसर्गावर बलात्कार करताच

नाही ते बाकी सगळं ठीक आहे पण उपरोल्लेखित गोष्टींमध्ये फक्त पुरुषांचाच सहभाग असतो काय? की दृष्टीआड सृष्टी म्हणत त्याचे फायदे तेवढे आयते उपटायचे असतात नॉन-पुरुषांना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाही ही कविता त्या सर्वांना उद्देश्युन आहे जे लोक गर्भपातावर बंदीची मागणी करतात. मग यात ब्रेन वॉशड स्त्रियाही आल्या. इन फॅक्ट परवा बसमध्ये फक्त एक बाई प्रो-चॉइस होती बाकीच्या गर्भपाताचा विरोधच करत होत्या. आणि त्या ४-५ मुलींना त्या विरोधात फार भूषण वाटत होतं का तर एक जीव वाचू शकतो म्हणजे आपण काय ग्रेट विचार करतो. आपण कसे अहिंसावादी आहोत. पण त्यांच्या पर्यंत मार्ज पियर्सी सारख्या कवयित्रींचे शब्द पोचले नसतील. कदाचित त्यांचे कंडीशनिंग तसेच झाले असेल. दोष त्यांचा नाही. प्रबोधन व्हायला हवे. अर्थात मी स्वतः अजिबात बंडखोर नाही पण अशा बंडखोर कविता, लोकं मला आवडतात. मार्ज पियर्सी माझी फार आवडती कवयित्री आहे.
____
Pro-choice people include those who are personally against abortion or feel uncomfortable with it, but who would not impose their viewpoint by law onto all women.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चालायचंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

If you can't negotiate contraception in your marriage, do you really think you're going to [negotiate] that high-powered job?

https://www.cnn.com/2021/09/03/africa/women-sexual-pleasure-gender-equal...
------------------

"Pleasure is threatening," he says. "It challenges those who are in power. As long as the society keeps women as second-class citizens, then men are in control. So denying [women] reproductive health, contraception, safe abortions, and certainly altering their body -- taking away the sexual pleasure aspects of one's anatomy -- keeps them suppressed and patriarchy in power."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Ever heard of rape, failure of contraception, incest?
best

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

एकोळी प्रतिसादातून काहीही समजत नाही कृपया आपले म्हणने थोडेफार तरी मांडण्याची तसदी घ्यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'अ‍ॅबॉर्शन रीपील लॉ' बद्दल एक निबंध वाचला. हा १९७०-१९७९ कालखंडातील लेख आहे. लेखिका - Lucinda Cisler
त्यात लेखिका म्हणते की आत्ताचा जो कायदा आहे त्यामध्ये पुढील ३ कारणांकरता गर्भपात समर्थनिय ठरतो-
(१) बलात्कारामधुन गर्भ राहीला (२) स्त्री वेडी असेल तर (३) बाळ सदोष वाढीचे असल्यास
-----------
या लेखात ४ मुद्द्यांवरती आक्षेप घेतलेला आहे.

(१) गर्भपात हा फक्त परवानाधारक दवा खान्यातच होउ शकतो - या आक्षेपामध्ये स्त्रीमुक्तीवाद्यांचे असे म्हणणे आहे की - गर्भपात ही फरशी क्लिष्ट नसलेली प्रोसिजर आहे ज्यात स्त्रीस झोपण्या एवढी जागा लागते व नंतर थोडी विश्रांतीची आवश्यकता असते. या २ बाबींकरता ना फारशी स्थावरजंगम फारशी जागा आवश्यक आहे ना कुशल स्टाफची गरज आहे कारण त्या दोन्ही गोष्टी महाग आहेत व गरीब स्त्रियांना परवडु शकणार नाहीत. 'परवान्याची' अट घालून विनाकारण हॉस्पिटल्सना मनमानी आणि मोनोपॉली करण्याची मुभा दिली जाइल. कारण काहीच नाही जी प्रोसिजर क्लिष्ट नाही तिचे उगाच अवडंबर माजवले जाइल आणि आर्थिक दृष्ट्या कमजोर महीलांना तोटा होइल .

(२) गर्भपात हा फक्त परवानाधारक डॉक्टर्सच करु शकतात. - यावर स्त्रीमुक्तीवाद्यांचे म्हणणे हे पडते की - हा मुद्दा तार्किक वाटत असला तरी तो बाष्कळ आहे कसा तर - गर्भपात ही क्लिष्ट आणि धोकादायक प्रोसिजर आहे हेच गृ हीतक मूळात चूकीचे आहे. गर्भातापेक्षा, प्रसूती अधिक किचकट असुनही तुम्ही मिडवाईव्हज ना परवानगी देता. पण गर्भपात म्हटलं की मात्र परवानाच हवा असा लाल फीतीचा बाऊ घालता हे बरोबर नाही. बहुसंख्य डॉ क्टरांचा अ‍ॅबॉर शन करण्यास विरोध असतो. जरी त्यांचा गर्भपातास रुकार असला तरी ती प्रोसिजरच इतकी कंटाळवाणी आहे की सहसा डॉक्टरांना ती करायची नसते. मग हा अडथळाच ठरतो. उद्या जर 'सेल्फ-अ‍ॅबॉर्सिअन्टस' चा शोध लागला व स्त्री स्वतःची स्वतः गर्भपात करुन घेउ शकली तरी परवान्याच्या अटीमुळे तिला ते करता येणार नाही.
(३) एका ठराविक मुदतीनंतर स्त्रीला गर्भपात करुन घेता येणार नाही. जर तिला स्वतःला धोका असेल तर मात्र परवानगी असेल. - या मुद्द्याचे खंडन करताना स्त्रीमुक्तीवादी म्हणातात - ही मॅजिक टाइम लिमिट कोण ठर व णार आणि समज अठरवली देखील तरी त्या मुदतीनंतर स्त्रीचा स्वतः च्या शरीरावरचा हक्क नाहीसा होउन तो हक्क सरकारकडे जातो हे कितपत ब रोबर आहे? एका ठराविक मुदतीनंतर असे समजून चाला की गर्भवती स्त्रीच्या जीवास समजा धोका आहे पण जर ती स्वतः हा धोका पत्करत असेले तर तिला 'वाचवणारे ' असे सरकार कोण टिक्कोजीराव लागून गेलेत? तसेच कन्सेप्शन केव्हा झाले हे ठामपणे कळत नसल्याने अशी मुदत ठरविणेच मूळात शक्य नाही.
(४) जर विवाहीत स्त्रीच्या नवर्‍याने परवानगी दिली किंवा एकट्या स्त्रीच्या पालकांनी परवानगी दिली तरच गर्भपात होउ शकतो - हा मुद्दा तर हास्यास्पदच आहे, याबद्दल फार बोलायलाच नको.
-----------------------------------------------
आत्ता अ‍ॅबॉर्शन रीपील / प्रो चॉइस चळवळ कोणत्या राज्यात अजुनही चालू आहे, कोणत्या राज्यांनी 'प्रो-चॉइअस हक्कांना' मान्यता दिलेली आहे ते मी फॉलो करत नाही. पण इथे हे पूर्वीचे विचार व चळवळ कशी फॉर्म होत गेली ते डॉक्युमेन्ट करुन ठेवते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ख्रिश्चन मूलतत्ववाद्यांच्या प्रभावाखाली असलेल्या , अमेरिकेच्या दक्षिणेतील अनेक राज्यांनी गर्भपात इतका अवघड करून ठेवला आहे ( ते करणारे सर्व दवाखाने राज्याबाहेर हुसकणे या प्रकारचा) की मूळ कायदा "रो वि वेड " रद्द करण्याची फारशी गरजच राहिलेली नाही. आणि "रो वि वेड " संबंधित एका नव्या केसची सुनावणी आता लवकरच अशा अमेरिकन सुप्रीम कोर्टासमोर होईल, की ज्याच्यात ६ न्यायाधीश "पारंपरिक" बाजूचे आहेत. तसेच गर्भपाताला विरोध असणारी एक नवी ट्रम्प-समर्थित, "कॅथॉलिक" स्त्री , न्यायाधीश-पदावर नव्याने नियुक्त झाली आहे , तिचा कार्यकाळ सुरु होईल.
स्त्री-स्वातंत्र्याचा संकोच, हे तथाकथित "स्वातंत्र्यवादी" च करत आहेत हे रोचक पण दुःखद आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

यावर बातम्या येत आहेत वेगवेगळ्या देशांच्या. कायदे बदलत आहेत आणि त्याविरुद्ध मोर्चे निघत आहेत.

-----
मी डॉक्टर नाही आणि
बाई नाही.
ज्याचं दु:ख त्याला समजतं.
त्यामुळे माझा पास.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वारंवार गर्भ पात केल्या मुळे स्त्रीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम किती प्रमाणात होतो हा प्रश्न आहे.
मानवी शरीर अनेक evolution मधून निर्माण झाले आहे .
गर्भ धारणा ही नैसर्गिक कृती आहे .गर्भपात ही निसर्गाच्या विरुद्ध कृती आहे.
१००% स्त्री च्या शरीरावर विपरीत परिणाम होणार बाजारू तज्ञ ते मान्य करणार नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उन्हाळ्यात एकावर एक कपड्यांचे थर चढवल्या मुळे माणसा च्या आरोग्यावर विपरीत परिणाम किती प्रमाणात होतो हा प्रश्न आहे.
मानवी शरीर अनेक evolution मधून निर्माण झाले आहे .
उकडत असेल तर नागडे फिरणे ही नैसर्गिक कृती आहे .कपडे घालणे ही निसर्गाच्या विरुद्ध कृती आहे.
१००% माणसा च्या शरीरावर विपरीत परिणाम होणार बाजारू तज्ञ ते मान्य करणार नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अन्न शिजवुन खाणे हीदेखील निसर्गनियमांविरुद्धच कृती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वारंवार गर्भपात नक्की कोण करते म्हणे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्भपात करण्या पेक्षा गर्भ धारणा होवू नये ही काळजी घेणे उत्तम.
कपडे वापरणे,जेवण शिजवून खाणे ह्याची तुलना गर्भपात शी होवू शकत नाही.
गर्भ राहतो आणि त्याची वाढ होण्याची procedure सुरू होते ह्या मध्ये शरीरातील अनेक यंत्रणा भाग घेत
असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उगाच नैसर्गिक अनैसर्गिकचा धोशा लावू नका मग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदलायला गर्भपात म्हणजे ipc ची कलम आहेत काय.
की साक्षीदार फिरले की सत्य सुद्धा असत्य ठरत.
गर्भपात स्त्री साठी कमी घातक असेल किंवा जास्त घातक असेल इतकाच फरक असू शकतो.
सत्य ह्याच्या मध्ये आहे .पण बिलकुल स्त्री शरीरावर परिणाम होणार नाही हे असत्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका ठराविक मुदतीनंतर असे समजून चाला की गर्भवती स्त्रीच्या जीवास समजा धोका आहे पण जर ती स्वतः हा धोका पत्करत असेले तर तिला 'वाचवणारे ' असे सरकार कोण टिक्कोजीराव लागून गेलेत?

हा प्रश्न आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-ताराबाई
टिप टिप चांदणी

कमजोर घटकांवर जबरदस्ती होवू नये म्हणून असतात.नियम पण त्या साठी च असतात.
स्त्री स्वतःच्या इच्छे नी स्वीकारत असेल तर ऑब्जेक्शन घेण्याचे काही कारण नाही.
पण हे असे नसते कोणत्या तरी बाह्य शक्तीच अदृश्य
( म्हणजे मानवी च अमानवीय नाही.) दबाव स्त्री वर असतो . तेव्हा तिचे रक्षण करण्यासाठी कायदे असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे काही प्रमाणात खरे आहे. खास करून भारतात स्त्री भ्रूण हत्येच्या समस्ये मुळे गर्भपाता वरील भूमिका सरधोपट मांडता येत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-ताराबाई
टिप टिप चांदणी

भारतात, खास करून उत्तरेकडे (दिल्लीच्या बाजूला वगैरे), bride burningच्या (मोठ्या प्रमाणावरील) समस्येमुळे ज्वालाग्राही पदार्थांवरील भूमिका सरधोपट मांडता येत नाही.

सबब, भारतात घासलेट, पेट्रोल आदींवर पूर्ण बंदी असणेच उचित आहे.

----------

भारतात डोकेदुखीची समस्या मोठ्या प्रमाणावर नाही, हे नशीब! अन्यथा, भारतीयांचा en masse शिरच्छेद करण्याची टूम जरी अतिलोकप्रिय झाली असती, तरीही आश्चर्य वाटले नसते.

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाश्चात्य देशांतील pro choice भूमिकेला समर्थन आणि भारतातील स्त्री भ्रूण हत्या विरोधी कायद्याला पण समर्थन ह्यात विसंगती आहे. एका internet forum वर अमेरिकन बाईला gender selective abortions का चुकीचे हे समजावून सांगण्यात बराच वेळ खर्ची घातला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-ताराबाई
टिप टिप चांदणी

Gender-selective abortion हा प्रकार चुकीचा आहे, असे जरी क्षणभर मानले, तरीही, (गर्भपाताचा तसा उपयोग) ही सरसकट गर्भपाताच्या विरोधाकरिता (तथा गर्भपाताच्या सरसकट illegalizationकरिता) excuse होऊ नये, हा मुद्दा आहे.

----------

याबद्दल मी किंचित साशंक आहे. बोले तो, एकदा गर्भपात per se हा नैतिक आहे, म्हटल्यावर, social impacts notwithstanding, तो कोठल्या कारणाकरिता केला, याने त्याच्या नैतिकतेवर कसा फरक पडावा, ते समजत नाही. (गर्भपातास सामाजिक विरोध हा मुख्यत्वेकरून तथाकथित नैतिक कारणांवरून आहे, अशी माझी समजूत आहे; चूभूद्याघ्या.) Gender-selective abortionमुळे समाजातील स्त्री-पुरुष प्रमाणाचे संतुलन बिघडेल, त्याचे इतरही काही दूरगामी सामाजिक दुष्परिणाम होतील, वगैरे सर्व मान्य आहे. हे सर्व social impacts झाले. परंतु, त्यात (कमीअधिक) नैतिकतेचा प्रश्न आला कोठे? एखाद्या स्त्रीला जर स्वेच्छेने गर्भपात करणे असेल, तर मग तिने तो तिला तूर्तास for whatever reason मूल नको आहे (जसे: तूर्तास परवडत नाही म्हणून; विवाहेतर संबंधांतून झालेल्या गर्भधारणेचे सामाजिक तोटे; बलात्कारातून झालेली गर्भधारणा; गर्भातील दोषांचा धोका; गर्भ ठेवल्याने आईच्या आणि/किंवा होऊ घातलेल्या संततीच्या जिवास धोका; किंवा इतर काही) म्हणून केला, की गर्भ स्त्रीलिंगी असल्यामुळे केला, याने नक्की काय फरक पडतो? (Mind you, हे मी गर्भपाताबद्दल बोलतोय; भ्रूणहत्येसंदर्भात नव्हे. ती मूल जन्माला आल्यानंतरची कृती झाली. मूल स्त्रीलिंगी असल्यास त्याची हत्या करणे हे अयोग्य असून तो गुन्हा असावा, हे ठीकच आहे; उलटपक्षी, कोणत्याही कारणास्तव कोणत्याही लिंगाच्या भ्रूणाची हत्या ही तशीही अयोग्य मानली जातेच, नि तो तसाही गुन्हा आहेच; परंतु मग त्याचा गर्भपाताशी नक्की काय संबंध?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुद्दा मान्यच आहे! आणि तुम्ही तो अगदी सरधोपट पणे मांडलात Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-ताराबाई
टिप टिप चांदणी

आत्ता मुलं नको आहेत म्हणून (स्त्रीनं स्वतः निर्णय घेऊन) गर्भपात करणे आणि पोटात जे मूल वाढते आहे ती स्त्री आहे म्हणून तो गर्भ पाडणे (किंवा पाडायला लावणे) यात फरक नाही?
Gender selective abortions are not always an act of free choice for the women who go through them. They also have to repeat the entire process (gestation until you can tell the sex of the baby) multiple times to finally arrive at a male fetus. During these trials, the woman goes through a lot of emotional and physical pain (which may not be her choice at all, and in many cases it isn't). So not only it isn't always an act of free choice for the woman, it is also highly exploitative when it isn't. And I am not even talking about the cultural beliefs which bring all the family members together in rationalising this decision.
Isn't the debate over being pro-choice or pro-life about giving the agency of that choice to the woman? Can you say that it holds true in the case of gender selective abortions in India?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण यात प्रॉब्लेम स्त्रीचे फ्री विल नसणे हा आहे. जेंडर सिलेक्टिव्ह गर्भपात इन इटसेल्फ नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्भपात म्हणजे गर्भाशयातून गर्भ काढून टाकण्याची वैद्यकीय क्रिया इतकं objectively त्याच्याकडे बघायचं असेल तर काहीही म्हणता येईल!
पण गर्भ राहिलेला असताना त्याच्या आजूबाजूला एक गर्भाशय असतं. त्या गर्भाशयाच्या आजूबाजूला एक शरीर असतं. त्यात एक मेंदू असतो आणि त्यात विचारही होतात आणि त्याला भावनाही असतात.
गर्भपात आणि गर्भपात करून घेणारी (किंवा करायला भाग पाडलेली) स्त्री या दोन वेगळ्या स्वतंत्र गोष्टी आहेत हे गृहीतक थोर आहे!
असे विचार करणारे पुरुष कशालाही 'अकॅडेमिक डिस्कशन' चा मुलामा देऊन काहीही बरळू शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

काय म्हणताय ? ह्या सगळ्या गोष्टींच्या विरुद्ध अर्थाचे मी काय बोललो ? एकंदरीत तुमच्या प्रतिसादाचा अर्थ आजिबात समजला नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकंदरीत तुमच्या प्रतिसादाचा अर्थ आजिबात समजला नाही.

आडात नसेल, तर...

असे विचार करणारे पुरुष कशालाही 'अकॅडेमिक डिस्कशन' चा मुलामा देऊन काहीही बरळू शकतात.

ही बॉटमलाइन आहे. काय समजलेत? (गृहीतकांना प्रूफबीफ वगैरे भानगडींची गरज नसते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण यात प्रॉब्लेम स्त्रीचे फ्री विल नसणे हा आहे. जेंडर सिलेक्टिव्ह गर्भपात इन इटसेल्फ नाही.

@गलिव्हर - यात म्हणजे पाश्चात्य देशात म्हणायचे आहे ना तुम्हाला? बरोबर आहे तिथे जेंडर सिलेक्टिव्ह गर्भपात होत नाहीत - फार चांगली गोष्ट आहे.
मात्र स्त्रीच्या पर्यायस्वातंत्र्याचा संकोच होतो आहे, जे बदलण्याकरता लढा चालला आहे.

तेव्हा तुम्ही बरोबर आहात. जे मला म्हणायचे आहे त्याच्याशी सुसंगत तुमचे विधान आहे. फक्त मोघम लिहू नका हो. त्यामुळे गैरसमज वाढतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलगा आणि मुलगी ह्यांच्या मध्ये आज पण भेदभाव
केला जातो.भारतात गर्भ लिंग माहीत करणे गुन्हा असेल तर जिथे गुन्हा नाही त्या देशात जावून गर्भलिंग माहीत करून घेतले जाते.सरसकट गर्भपात कायदेशीर करता येणार नाही.काही नियम जे असावेच लागणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

To bear children unwanted
is to be used like a public sewer.
To be sterilized unchosen is to have
your heart cut out.

या ओळी अगदी यथार्थ आहेत. नको असलेल्या मुलाला जन्मं देणं नक्कीच त्रासदायक होत असणार. पण ते मूल का नको आहे याचे कारण देखिल संयुक्तिक असायला हवे असे नाही का वाटत तुम्हाला?
आधीच्या कवितेत वर्णन केले आहे की तिथे खाद्यपदार्थांची विविधता आहे, त्यातले आपण आपल्या आवडीचे निवडणार आहोत. हे निर्णय स्वातंत्र्य आहे.. परंतु मुलाला जन्मं देण अथवा न देण याचा निर्णय घेणे, तितकच सहज आणि सोपे असू शकतं का?
या कविता कुठल्या कालखंडात लिहिलेल्या आहेत याचा उल्लेख नाहीये. पण ते महत्वाचे आहे. कारण काही दशकांपूर्वी, स्त्री म्हणजे मुलं जन्माला घालायचे माध्यम मानले जात असे. आणि गर्भ निरोधाची कसलीही साधने, माहिती उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत गर्भ धारण करणारी स्त्री असहाय होत असणार. कारण ते गर्भारपण तिच्यावर लादलेले असणार.

पण आज या क्षेत्रात भरपूर साधने, माहिती उपलब्ध आहेत. भारतात तर एस टी स्टॅण्डच्या भितिंवरही जाहिराती लिहिलेल्या असतात. सरकारी दवाखान्यात मोफत किंवा कमी खर्चात सुविधा मिळू शकतात. अशा परिस्थितीत गर्भ धारण करणे न करणे याचा निर्णय स्त्री घेऊ शकते. मग गर्भपाताचा निर्णय घेण्याचा प्रश्न का येतो?

कदाचित बलात्कार किंवा इतर काही कारणाने गर्भ राहिला, अथवा गर्भवतीचे वय कमी आहे, किंवा तिच्या जिवाला काही धोका संभवतो, किंवा गर्भामधे दोष आहे अशा काही कारणाने गर्भपाताचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. परंतु या व्यतिरिक्तं कारणांसाठी गर्भपाताचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असू नये असे मला वाटते.
-- आणि गर्भपात करणे हे स्त्रीच्या जिवाला, आरोग्यासाठी घातक आहे हे वैद्यकीय ज्ञान तर सार्वत्रिक आहे.
क्षमस्व!
माझे विचार अती मागासलेले आहे, हे माहिती असल्याने आजवर लिहीले नाही. पण मला मनापासून वाटते की गर्भपाताचे समर्थन करणाऱ्यांनी यावर जरूर विचार करावा. माझ्या दृष्टीने गर्भपात म्हणजे जन्माला येऊ शकणाऱ्या एका जिवाची हत्या आहे. आणि ते करण्याचे स्वतंत्र्य असायला हवे असे मला वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

>>>>>पण ते मूल का नको आहे याचे कारण देखिल संयुक्तिक असायला हवे असे नाही का वाटत तुम्हाला?
मुद्दाम रहात नाही हो मूल. टीनेज प्रेग्नन्सीज, मेनापॉझमध्ये आहोत असे वाटून पन्नाशी-साठीत राहीलेले गर्भ यांची विल्हेवाट आवश्यक असते. नाहीतर मग ते मूल कसंबसं वाढवत बसायचं नाहीतर दत्तक देउन समाजावरती बोजा टाकायचा यापैकी एकच पर्याय उरतो. त्यात त्या मूलाचेही हाल व आईचे हाल वेगळेच.
पुरुष शुक्राणू देउन नामानिराळा होतो, हात झटकतो, स्त्रीचं शरीर मात्र पुरेपूर वापरलं जातं. जिने काळजी घ्यावी असे समाज म्हणतो आहे तिचा निर्णय हवा ना. तिला काही पर्यायस्वातंत्र्य हवेच की.
अजुन एक जन्मत: डिफॉर्मिटी असलेले बालक - याचा गर्भपात करावा की करु नये? तुम्हाला काय वाटतं?
- तुम्ही म्हणाल करु नये - मग तो आईच्या आयुष्याला एक विपरीत कलाटणी देणारा निर्णय नाही होत का? आईची स्वप्नं/आकांक्षा उध्वस्त नाही होत का?
- तुम्ही म्हणाल करावा - तर का? ते मूल (तुमच्याच लॉजिक प्रमाणे) एक जीव नाहीये का? मग असं कसं तुमचं लॉजिक सोइस्कररीत्या बदलत रहातं?

आणि जर सोइस्कररीत्या बदलायचेच असतील नियम तर मग तुमचे नियम का पाळावेत? त्या गर्भाच्या आईनेच का ठरवु नयेत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कदाचित बलात्कार किंवा इतर काही कारणाने गर्भ राहिला, अथवा गर्भवतीचे वय कमी आहे, किंवा तिच्या जिवाला काही धोका संभवतो, किंवा गर्भामधे दोष आहे अशा काही कारणाने गर्भपाताचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. परंतु या व्यतिरिक्तं कारणांसाठी गर्भपाताचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असू नये असे मला वाटते.

तुम्ही हे वाचलं नाही का?
मी गर्भपात अजिबात त्याज्ज्यं आहे असे म्हणतच नाहीये. पण त्या साठी तसेच काही कारण असायला हवे असे मला वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

"आणि गर्भपात करणे हे स्त्रीच्या जिवाला, आरोग्यासाठी घातक आहे हे वैद्यकीय ज्ञान तर सार्वत्रिक आहे."

नऊ महिने गरोदरपण आणि मूल जन्माला घालणे हे स्त्रीच्या जिवाला, आरोग्यासाठी जास्त घातक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-ताराबाई
टिप टिप चांदणी

ह्या पृथ्वी वरील जीव सृष्टी च reproductions करण्याची जी कुवत निसर्गाने सजीव ना दिली आहे त्या मुळे अस्तित्वात आहे.
सेक्स हवा पण मुल नको?
मग सेक्स च नको असा विचार का कोणी करत नाही
सेक्स ची भावना ही काही मौज मजेसाठी निर्माण झाली नाही.reproduction होण्यासाठी ती व्यवस्था आहे.
ज्या लोकांना मुल नको,कुटुंब नको.ह्या लोकांना सेक्शुअल neutralise करायची काळाची गरज आहे.
सेक्स ची भावना निर्माण करणारे हार्मोन्स च नष्ट करण्याची उपचार पद्धती शोधून त्याचा वापर करणे गरजेचे आहे.
.पुनरुत्पादन करण्यास योग्य अशीच
शरीर रचना निर्माण झाली आहे.
धोका वैगेरे काही नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

गर्भपात हा मूल “होऊ” न देण्यासाठीचाच पर्याय आहे!

सेक्स हा मौजमजेसाठी की पुनरुत्पादनासाठी असतो हा प्रश्न बाकी रोचक आहे. प्रतिसादातील भूमिका १८८% चूक असली तरीही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

मुल नको असे मुल राहिल्या नंतर वाटले तर गर्भपात करायला आडकाठी नको.
हे जेव्हा योग्य आहे असे आपण समजतो.
तेव्हा
किती दिवसांनी गर्भपात करायला हवा ह्या विषयी नियम असणे गरजेचे आहे.
मुलाची वाढ पूर्ण झाल्या नंतर गर्भपात च्या नावाखाली हत्या होणार असतील तर त्याचे समर्थन कसे करावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0